राष्ट्रीय आरोग्य अभियानातील भरती आता ‘आऊटसोर्सिंग’ द्वारे! कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम न करण्यासाठी निर्णय! | NHM Maharashtra Bharti 2026 | NHM Maharashtra Recruitment 2026

NHM Maharashtra Bharti 2026

राज्य सरकार द्वारे एक महत्वाचा अँड आज जाहीर केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) विविध आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी यापुढे थेट कंत्राटी भरतीऐवजी आऊटसोर्सिंगद्वारे अथवा सेवा कराराच्या माध्यमातून नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळाच्या सेवेमुळे निर्माण होणाऱ्या नियमितीकरणाच्या मागण्या आणि त्यातून उद्भवणारे प्रशासकीय व कायदेशीर पेच टाळण्यासाठी शासनाने भरती प्रक्रियेची पद्धतच बदलण्याचा निर्णय घेतल्याचे आरोप एनएचएम कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून होत आहे. NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या राज्यभर विविध पदांवर मोठ्या संख्येने कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. यापैकी १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.

आरोग्य संस्थांसाठी बाह्यस्रोताने मनुष्यबळ – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, नागरी सामुदायिक आरोग्य केंद्रे, पॉलिक्लिनिक्स तसेच ‘आपला दवाखाना’ यांसारख्या आरोग्य संस्थांमध्ये विविध पदांसाठी आवश्यक असलेले मंजूर मनुष्यबळ यापुढे बाह्यस्रोताद्वारे किंवा सेवा कराराने उपलब्ध करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका तसेच जिल्हास्तरावर या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून आवश्यक कार्यवाहीचा अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयाला सादर करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी नवा पेच ? – एकीकडे दीर्घकाळ सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा निर्णय घेण्यात आला असतानाच दुसरीकडे नवीन मनुष्यबळ बाह्यस्रोताद्वारे घेण्याचा निर्णय झाल्याने आरोग्य अभियानातील रोजगार व्यवस्थेबाबत नवा प्रश्न निर्माण झाला आहे. बाह्यस्रोताद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांचे सेवासातत्य, वेतन, सामाजिक सुरक्षा, सेवा अटी आणि भविष्यातील हक्क याबाबतही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी (पर्मनंट) सार्वजनिक आरोग्य विभागाने ३० जून २०२६ रोजी अखेर शासन निर्णय जारी केला आहे. या हक्कासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यापासून ते मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत तीव्र आंदोलने छेडली होती, तसेच अनेकदा काम बंद आंदोलनही केले होते, ज्याची दखल अखेर शासनाला घ्यावी लागली. तर समायोजनासह इतर विविध मागण्यांसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये राज्यातील तब्बल ३८ हजार कर्मचारी संपावर गेले होते. या प्रक्रियेची मुळात सुरुवात १४ मार्च २०२४ रोजीच्या पहिल्या शासन निर्णयाने झाली होती. मात्र, पहिला जीआर निघून दोन वर्षे उलटली. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १७ नोव्हेंबर २०२५ रोजी समिती स्थापन करण्याचा जीआर काढण्यात आला. या समितीच्या अभ्यासानंतर मंत्रिमंडळाच्या २५ जून २०२६ रोजीच्या बैठकीत या निर्णयास अंतिम मंजुरी देण्यात आली असून, वार्षिक ११५३.६० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे.

पदोन्नती अन् अनुकंपा नाही
शासनाच्या नियमांनुसार, या अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, सेवानिवृत्तिवेतन (पेन्शन) किंवा अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती लागू राहणार नाही. संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यतच हे पद अस्तित्वात राहील, पद रिक्त झाल्यास ते आपोआप रद्द होणार आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार समकक्ष पदांची वेतनश्रेणी व महागाई, प्रवास भत्ता कर्मचाऱ्यांना लागू राहील, तसेच अधिसंख्य पदावर सेवा करण्याची कमाल वयोमर्यादा ५८ वर्षे असणार आहे. या निर्णयामुळे अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 


मागील अपडेट्स

राष्ट्रीय आरोग्य अभियानात १० वर्षांहून अधिक सेवा बजावणाऱ्या १४ हजार कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा निर्णय शासनाने घेतला. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरीही मिळाली, आरोग्यमंत्र्यांसोबत अनेक बैठका झाल्या; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही. त्यामुळे राज्यभरातील हजारो अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप असून शासनाच्या आश्वासनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात गेल्या २० वर्षापासून ग्रामीण आणि शहरी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका, सहायिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आदी संवर्गातील कर्मचारी अत्यल्प मानधनावर सेवा देत आहेत. करोना महामारीच्या काळातही त्यांनी आरोग्य सेवा दिली. मात्र, त्यांच्या समायोजनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. या सर्वांच्याच समायोजनासंदर्भात २० मार्च २०२३ रोजी सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यानंतर समायोजनाचा निर्णय घेण्यात आला आणि मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली. पुढे अनेक बैठका पार पडल्या. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आरोग्यमंत्र्यांनी १५ जानेवारी २०२६ पर्यंत समायोजनासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ३१ मार्च २०२४ पर्यंत १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी परिचारिका, शहरी व ग्रामीण आरोग्य सेविका, प्रयोगशाव्य तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यावेळी सुमारे १४ हजार अधिकारी व कर्मचारी समायोजनासाठी पात्र होते. मात्र, त्यापैकी केवळ चतुर्थ श्रेणीतील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचेच समायोजन करण्यात आले. त्यानंतर शासनाकडून वारंवार आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शासनाच्या भूमिकेबाबत नाराजी वाढत आहे.
दरम्यान, कालावधी लोटत असल्याने आता आणखी अनेक कर्मचाऱ्यांनी १० वर्षांची सेवा पूर्ण केली असून समायोजनाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी भ्रमणध्वनी आणि लघुसंदेशाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.


NHM Maharashtra Bharti 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत कित्येक वर्षापासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने आरोग्य सेवेत सलग १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील सुमारे ४ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे भवितव्य सुरक्षित होणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या आणि सलग दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून २६ डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आला.

पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती होणार
1.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करण्यासंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने, सलग १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या वाहन चालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतिबंधातील नियमित वाहन चालक पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत शासन आदेश दिनांक ०४ डिसेंबर २०२४ रोजी जारी केला होता.
2. त्यानंतर वेतन निश्चितीबाबतच्या आधीच्या शासन आदेशातील परिच्छेद क्रमांक ५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित आदेशानुसार, सेवा समावेशनानंतर संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन हे त्यांना मागील महिन्यांत प्राप्त होणाऱ्या मानधनाइतके किंवा त्यापेक्षा अधिक, नियमित वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येणार आहे. सुमारे चारहजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे.

 

 


 

NHM Maharashtra Bharti 2025

राज्यातील सुमारे ३२ हजार ५०० एनएचएम कर्मचाऱ्यांना गेल्या एप्रिल व मे महिन्याचे वेतन बुधवारी (२५ जून) एकदाचे मिळाले. मात्र, जून महिना जवळजवळ संपल्यानंतर एप्रिल व मे महिन्याचे वेतन मिळाल्याने जून महिन्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे वेतनासाठी दोन-दोन वाट पाहावी लागत असतानाच, समायोजनासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ व इतर योजना व प्रकल्पांमुळे सरकारच्या तिजोरीच्या खडखडाटाकडे वारंवार लक्ष वेधले जात आहे. याच स्थितीमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन देणे शक्य होत नसताना, समायोजनानंतर याच कर्मचाऱ्यांना कायमपदाचे वेतन देणे शक्य होणार आहे का, का कायमपदांचे वेतन देणे शक्य होणार नाही म्हणून समायोजनात सातत्याने चालढकल केली जात आहे, अशीही शंका कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केली जात आहे.

याच कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीपासूनचे तीन महिन्यांचे वेतन रखडले होते आणि वेतनाचा विषय राज्यभर गाजला होता. निवेदने देऊन, विनंत्या करुन तसेच आंदोलन करुनही कर्मचाऱ्यांना जवळजवळ साडेतीन महिने वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागली. पुन्हा तीन महिन्यांचे वेतन रखडलेले असताना, दोनच महिन्यांचे म्हणजे फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन हे मे महिन्यात मिळाले. एप्रिल महिन्याचे वेतन पुन्हा रखडले व एप्रिलच्या वेतनासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा दोन-अडीच महिने वाट पाहण्याची वेळ लागली. दरम्यान, बुधवारी (२५ जून) एप्रिल व मे महिन्याचे वेतन एकदाचे झाले. मात्र एक तारखेला वेतन होण्याची मागणी असताना जवळजवळ जून संपत आल्यानंतर हे वेतन झाले आहे. त्यामुळे आता जून महिन्यासाठी कोणत्या महिन्याची कोणती तारीख उजाडणार, असा प्रश्न आहे. दहा वर्षे पूर्ण केलेल्यांचे समायोजन केले जाणार असल्याचा शासन आदेश असताना आणि समायोजन लवकरच सुरू केले जाणार असल्याचे पुन्हा सरकारकडून आश्वासन देण्यात आले असताना, समायोजनाच्या प्रक्रियेने वेग घेणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात समायोजनासाठी पावले उचलली जात नसल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांच्या वतीने केला जात आहे.

 


NHM Maharashtra Bharti Application Form 2025

NHM Maharashtra Bharti 2025: NHM Maharashtra (Maharashtra National Health Mission) – Good news for job seekers. The latest update for NHM Maharashtra Recruitment 2025. As per the latest news, Maharashtra National Health Mission is going to start the latest recruitment for State Program Manager, Senior Consultant, Public Health Consultant, State Accounts and Finance Manager, Non Medical Consultant, Legal Consultant, Programme Manager, Junior Engineer and other posts on contract basis.There are total vacancies to be filled under NHM Maharashtra Vacancy 2025. Eligible candidates may submit online application before last date. For more details about NHM Maharashtra Bharti 2025, and NHM Maharashtra Recruitment 2025, visit our website www.MahaBharti.in.

 

 

NHM Maharashtra Bharti 2024: The state cabinet on Wednesday decided to accommodate the contractual employees working in the state under the National Rural Health Mission and National Urban Health Mission who have served for 10 years and above on approved equivalent posts in the health service. 30 per cent of these contract employees will be adjusted against the approved equivalent posts in the health service, while 70 per cent of the posts will be filled by direct service.

 

 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातील नियमित पदांकरिताचे सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करुन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर रिक्त पदांच्या 30 टक्के प्रमाणात समायोजन केले जाणार आहे. तर 70 टक्के पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.
या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेश केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधना एवढया नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सुचना, मार्गदर्शन तत्वे यांचे काटेकोरपणे पालन करुन समायोजन करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

आशा स्वयंसेविकांच्या  मानधनात 5 हजार रुपयांची भरीव वाढ

राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता  देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मानधनातील ही वाढ नोव्हेंबर, 2023 या महिन्यापासून देण्यात येईल. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच 961.08 कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली.

आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना शासन सेवेत सामावून घेणार

राज्यात सध्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये कार्यरत 297 कंत्राटी शिल्पनिदेशकांचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागात सामावून घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भरुन निघण्यास मदत होणार आहे. शासकीय सेवेत सामावण्यात येणाऱ्या 297 पदांकरीता वेतन व इतर भत्यांकरता 16.09 कोटी प्रति वर्ष इतक्या खर्चास सुध्दा यावेळी मान्यता देण्यात आली.

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात वाढ

शुभमंगल सामूहिक * विवाह योजनेच्या अनुदानात वाढ करून २५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहांसाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडप्याला १० हजार रुपये अनुदान देण्यात येते.
त्याचप्रमाणे 3 सामूहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना २ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. आता जोडप्यांना २५ हजार रुपये आणि संस्थांना २,५०० रुपये वाढीव अनुदान देण्यात येणार आहे.

 


The applicant is expected to fill the application in 8 steps in total. OTP will not be required while filling the application for the first time. Applicant cannot update/edit application once application is submitted. If Application is not Submitted and wants to Update/Edit incomplete application, Please provide OTP received on your Mobile for NHM Maharashtra Bharti 2024. Last date to Fill Application form is 11/09/2023. After this date, Link will be closed for New Application. Details of amount paid by you also included in the application printout.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजुर कंत्राटी पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरीता तसेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान व्यतिरिक्त राष्ट्रीय आयुष अभियान व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण या कार्यक्रमांमधील 340 रिक्त पदांची जाहिरात www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करावयाच्या पध्दतीबाबत सर्वसाधारण सुचना/माहिती पुढीलप्रमाणे आहेत. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून ऑनलाईन अर्ज विहित केलेल्या पध्दतीनुसारच सादर करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, सार्वजनिक आरोग्य सल्लागार, राज्य लेखा आणि वित्त व्यवस्थापक, गैर-वैद्यकीय सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता आणि इतर
  • पदसंख्या – 340 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग – 300/-
    • राखीव प्रवर्ग – 200/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट –  www.arogya.maharashtra.gov.in

State Health Society Maharashtra Bharti 2024 Details

Recruitment Name : National Health Mission Maharashtra
Number of Vacancies : 340 Posts under NHM Maharashtra Bharti 2024
Name of Department : State Level, District Level, National Urban Health Mission, National Ayush Mission, Maharashtra Medical Goods Procurement Authority
Job Location : All Over Maharashtra
Pay-Scale Rs. 18,000/- to Rs. 65,000/-PM
Application Mode : Online Application Form
Age Criteria : 18 to 43 year
Exam Fees : For Open Category- Rs. 300/- & For Reserved Category Rs. 200/-

National Health Mission Recruitment 2024 Vacancy Details

National Health Mission Maharashtra Recruitment 2024 Vacancy Details

1. State Level Posts106 Posts
2. District Level Posts27 Posts
3. National Urban Health Mission Posts06 Posts
4. National Ayush Mission Posts52 Posts
5. Maharashtra Medical Goods Procurement Authority Posts149 Post

Educational Qualification For NHM Maharashtra Recruitment 2024

Education qualifications & Eligibility criteria details are given in following table. Just go through all details and apply from the Application Form link given below. Also we request you to go through the Official PDF advertisement published by the NHM Health department of Maharashtra where your will find all respective details about each post.

How To Apply For Maharashtra National Health Mission Recruitment 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवार https://nhmrecruitment.maha-arogya.com/ या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  • देय तारखेला प्राप्त झालेले अपूर्ण/चुकीचे ऑनलाइन अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

महत्वाचे फॉर्म – Important Forms For Maha NHM Online Application 2024

1) महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम 2005 च्या अधिसूचनेनुसार (Maharashtra Civil Services (Small Family Declaration) Rules 2005 Notification)

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.arogya.maharashtra.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
shorturl.at/DET04
???? ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/jL248
✅ अधिकृत वेबसाईट
www.arogya.maharashtra.gov.in

 

NHM Maharashtra Bharti 2024 Details

✅Name of Department Maharashtra National Health Mission
✅Recruitment Details NHM Maharashtra Bharti 2024
✅Name of PostsState Program Manager, Senior Consultant, Public Health Consultant, State Accounts and Finance Manager, Non Medical Consultant, Legal Consultant, Programme Manager, Junior Engineer and other
✅ No of Posts340 vacancies
✅ Job LocationMaharashtra
✍? Application ModeOnline
✉️ Address Read PDF
✅ Official WebSitewww.arogya.maharashtra.gov.in

Educational Qualification For NHM Maharashtra Recruitment 2024

State Program Manager, Senior Consultant, Public Health Consultant, State Accounts and Finance Manager, Non Medical Consultant, Legal Consultant, Programme Manager, Junior Engineer and other(Refer PDF)

Age Criteria For NHM Maharashtra Jobs 2024

Age Limit 18 – 38 Years

National Health Mission Maharashtra Recruitment Vacancy Details

State Program Manager, Senior Consultant, Public Health Consultant, State Accounts and Finance Manager, Non Medical Consultant, Legal Consultant, Programme Manager, Junior Engineer and other340 vacancies

All Important Dates | www.arogya.maharashtra.gov.in Recruitment 2024

⏰ Last Date 11th of September 2023.

NHM Maharashtra Bharti 2024 Important Links

Full Advertisementजाहिरात
✅ Official Website📝 अर्ज करा

National Health Mission Maharashtra Bharti 

NHM Maharastra Recruitment District Wise –

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड