शासकीय नोकरीची संधी !! तब्बल ७१ हजार युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी नियुक्तीपत्र वाटप करणार | Maharashtra Rojgar Melava 2024-25

Maharashtra Job Fair 2024

Appointment Letter By PM Modi

Maharashtra Job Fair 2025: वेगवेगळ्या नोकरभरतीच्या माध्यमातून शासकीय नोकरीची संधी (Maharashtra Job Fair 2025) मिळालेल्या तब्बल ७१ हजार युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी नियुक्तीपत्र वाटप करणार आहेत. याप्रसंगी मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे युवकांना संबोधितदेखील करणार आहेत. देशभरात एकाच वेळी ४५ ठिकाणी नियुक्तीपत्र वाटपासंबंधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maharashtra Job Fair 2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या कार्यक्रमात मोदींच्या हस्ते तब्बल ७१ हजारहून अधिक युवकांना नियुक्तीपत्र दिले जाईल. या नियुक्त्यांमध्ये गृह मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण व अर्थ सेवा विभागासह विविध मंत्रालये व विभागांचा समावेश आहे. रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची कटिबद्धता पूर्ण करण्याच्या देण्याची कटिबद्धता पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक पाऊल असल्याचे ‘पीएमओ’ने म्हटले आहे. यापूर्वी २९ ऑक्टोबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१ हजारहून अधिक युवकांना नियुक्तीपत्र वाटप केले होते. एक प्रशासक म्हणून नाही तर जनतेचा सेवक म्हणून गरीब-वंचितांचे काम करा, असे आवाहन मोदींनी युवकांना केले होते. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला रोजगार मेळावा होता. मोदी सरकारने ऑक्टोबर २०२२ पासून भरती झालेल्या युवकांना नियुक्तीपत्र देण्यासाठी रोजगार मेळावा सुरू केला होता. आतापर्यंत अशा १३ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे साडेआठ लाखांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे.


Maharashtra Job Fair 2024 List

Maharashtra Job Fair 2024: राज्यस्तरावर येत्या सहा महिन्यांत पाच हजार नवीन रोजगार निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाने भारत विकास ग्रुप (बीव्हजी), पुणे या विविध सेवा पुरवठादार कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ सभागृहात कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडचे अप्रेंटीसशिप विभागाचे प्रमुख रवी घाटे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. डॉ. सोनवणे म्हणाले, “येत्या सहा महिन्यांत राज्यात पाच हजार नवीन रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट विद्यापीठाने निर्धारित केले आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधातील युवकांसाठी सामंजस्य करार फायदेशीर ठरेल. करारामुळे विद्यापीठातून दूरस्थ शिक्षण पद्धतीने पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या व घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळील भागांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध केली जाईल.”

रवी घाटे म्हणाले, की कंपनी यांत्रिक घरकाम, लँडस्केपिंग आणि बागकाम, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल मेटेनन्स, फॅब्रिकेशन सर्व्हिसेस, टर्न की सोल्यूशन्स, लॉजिस्टिक सपोर्ट आणि कोणत्याही संस्थेला आवश्यक असलेल्या अनेक सेवा सुविधा क्षेत्रात कार्यरत आहे.


Maharashtra Employment Fair 2204

Maharashtra Job Fair 2024: In the Lok Sabha elections, it was seen that the opposition surrounded the ruling party on the issues of inflation, unemployment and farmers. Against this backdrop, 100 employment fairs (at least three fairs in each district) will be conducted across the state by the Department of Skill Development, Employment and Entrepreneurship and Innovation before the Code of Conduct for Assembly Elections.

Maharashtra Job Fair 2024: लोकसभा निवडणुकीत महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचे पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यभरात १०० रोजगार मेळावे (प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन मेळावे) घेतले जाणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या मेळाव्यांमधून सुमारे एक लाख सुशिक्षित तरूण-तरूणींना रोजगार तथा नोकरी देण्याचे नियोजन आहे. दुसरीकडे आगामी तीन महिन्यांत (३१ ऑगस्टपूर्वी) विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांच्या भरतीचेही नियोजन करण्यात आले आहे.

मागील नऊ वर्षांत राज्यातील तीन लाख तरूणांना रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या, पण २०१४-१५ ते २०१८-१९ च्या तुलनेत पुढील साडेचार वर्षांत रोजगार मेळावे व नोकरी मिळालेल्या तरूणांची संख्या निम्म्याने कमी झाल्याची स्थिती आहे. २०१९-२० ते २०२२-२३ या चार वर्षांत ८६१ रोजगार मेळाव्यांमधून राज्यातील केवळ ९१ हजार तरूणांना नोकरी तथा रोजगार मिळाला. तत्पूर्वी, २०१४ ते २०१९ या काळात अकराशे रोजगार मेळाव्यांमधून राज्यातील दोन लाख तरूणांना नोकऱ्या मिळाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी प्रत्येक जिल्ह्यात (जून, जुलै ते ऑगस्टपर्यंत) किमान तीन रोजगार मेळावे होतील आणि त्यातून राज्यातील एक लाख तरूण- तरूणींना नोकऱ्या मिळतील, असे नियोजन अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यासंबंधीचे निर्देश दिल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. जेणेकरून विधानसभा निवडणुकीत ‘बेरोजगारी’ हा विषय राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरणार नाही, हा त्यामागील हेतू असल्याचेही बोलले जात आहे.
ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात तीन मेळाव्यांचे नियोजन
जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित तरूणांना रोजगार तथा नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने ३१ ऑगस्टपर्यंत किमान तीन रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्यांचे नियोजन होईल.
– हणुमंत नलावडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सोलापूर

चार वर्षांतील रोजगार मेळावे अन्‌ नोकऱ्यांची स्थिती
साल मेळावे रिक्त जागा नोकरी मिळालेले
२०१९-२० १४८ ८४,८७५ २२,८७७
२०२०-२१ १९४ १,८०,३०४ २८,८१२
२०२१-२२ २०२ ९३,६५२ ९,५९५
२०२२-२३ ३१७ २,३०,७४८ २९,८७०
एकूण ८६१ ५,८९,५७९ ९१,१५४


Maharashtra Mega Job Fair 2023

राज्यात नमो महारोजगार मेळाव्यातून २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण विभागांमध्ये महारोजगार मेळावे आयोजित करण्यास सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी नागपूर येथे प्रथमच राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन चालू वर्षी प्रत्येक महसुली विभागात एक याप्रमाणे सहा नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मेळाव्यांमार्फत राज्यातील किमान दोन लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येतील. या मेळाव्यांसाठी प्रति मेळावा पाच कोटी याप्रमाणे तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मेळाव्यांसाठी विविध विभागांवर जबाबदारी देण्यात आली आहे. होतकरू तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी उद्योजक, समाजसेवक आणि स्वयंसेवी संघटनांचा सहभाग घेतला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या मालमत्ताधारकांना यावर्षीदेखील मालमत्ता करात वाढ न करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातर्फे दरवर्षी १६ रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात १२ ऑनलाइन आणि ४ ऑफलाईन मेळावे होतात. दहावी उत्तीर्णपासून ते पदवीधरच्या विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होता येते. आता २९ डिसेंबर आणि ३१ जानेवारीपूर्वी असे दोन मेळावे होणार आहेत. सरकारी नोकऱ्या मर्यादित असून त्याची भरती देखील वेळेत होत नाही. सध्या राज्याच्या विविध विभागांमध्ये दोन लाखांवर रिक्त पदे आहेत. काही पदांची भरती यावर्षी झाली आहे. सरकारी नोकरीत एका जागेसाठी तब्बल २०० ते २५० तरुण अर्ज करतात अशी वस्तुस्थिती आहे. तर दुसरीकडे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातर्फे होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी जागांच्या तुलनेत अर्जच येत नाहीत, अशी स्थिती आहे. 

 

कौशल्याचा अभाव, कामाचा पुरेसा अनुभव नाही, पगाराची जास्त अपेक्षा, अपेक्षित जॉब नाही आणि घरापासून दूरवर नोकरी, अशी त्यामागील कारणे आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये दरवर्षी रोजगार मेळावे होतात. दरमहा तर रोजगार मेळावा होतोच, काहीवेळा महिन्यातून दोनवेळा मेळाव्यांचे आयोजन केले जाते. आता २९ डिसेंबरला ऑनलाइन मेळावा होणार असून त्याद्वारे जवळपास ७०० जणांना रोजगार मिळू शकतो. त्यानंतर ३१ जानेवारीपूर्वी विभागीय मेळावा होणार असून त्यातही चार ते पाच हजार तरुण- तरुणींना रोजगाराची संधी मिळणार आहे. गरजू तरूणांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त हणमंत नलावडे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून कृषी, ब्युटी ॲण्ड वेलनेस, सोलार पॅनल इन्स्टॉलेशन, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, इलेक्ट्रिकल-टेक्निशियन, ग्राफिक डिझायनर, मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन, वेब डेव्हलपर, सोलर ॲण्ड एलईडी टेक्निशियन, डेअरी प्रॉडक्ट प्रोसेसर, फिटर- फॅब्रिकेशन, ॲनिमेटर, अशा कोर्सेसच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण संस्थांची निवड झाल्यानंतर बेरोजगार तरुण- तरुणींसाठी ही सोय केली जाणार आहे.

 


राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन सर्वत्र केले जात आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच औद्योगिक संघटनाना पत्र पाठवून तुमच्या परिसरातील कंपन्यांमध्ये किती मनुष्यबळाची गरज आहे याची माहिती मागीतली आहे. मात्र, आतापर्यंत फक्त दोनच टक्के कंपन्यांनी त्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याला मंदीचा फटका बसण्याचे संकेत मिळू लागले आहेत. 

 

अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने हळूहळू वाटचाल करत आहे. त्यामुळेच नागपूर, पुण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये आयटी, इंजीनिअरिंग, औषधी आणि प्लास्टिक उद्योगातील नोकर कपातीलाही सुरवात झालेली आहे. इतरही क्षेत्रात नोकर कपात करण्यात आली नसली तरी नवीन मनुष्यबळाच्या भरतीवर निर्बंध आणलेले आहेत. युक्रेन-रशिया आणि इजराईल – हमास यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थ्यांच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. उद्योग सर्वाधिक प्रभावित झालेला आहे. या सर्व अस्थिरतेचा फटका आता राज्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याला बसण्याची शक्यता असल्याचे संकेत उद्योजकांनी  व्यक्त केले.

 

सरकारच्या उपक्रमाला आम्ही सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. बेरोजगारी वाढलेली आहे, रोजगार देण्याची इच्छाही आमची आहे. मात्र, अस्थिरतेमुळे मनुष्यबळाची गरज नसल्याने कोणाकडूनच त्याबद्दल मागणी नोंदवली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यभरातून विविध क्षेत्रातील किमान १००० कंपन्याना यात प्राधान्याने सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी या महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आस्थापनेवर असणाऱ्या रिक्तपदांबाबत माहिती मागवण्यात येत आहे. मात्र, त्याला अतिशय अल्प प्रतिसाद मिळत असल्याने संबधित विभागाचे धाबे दणाणले आहे. सध्या बाजारात उत्पादनाला मागणीही कमी झालेली आहे.

 

परिणामी, अनेक कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. विदर्भातील अनेक औद्योगिक वसाहतीतील ५० ते ६० टक्के उद्योग बंदच आहेत. त्यात सुरू असलेल्या उद्योगांना मंदीसह विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्याने रिक्त पदेच नाही. सध्या नवीन ऑर्डरही नसल्याने औद्योगिक संघटनांकडून आलेल्या पत्रांना काय उत्तर द्यावे या चिंतेच उद्योजक सापडले आहेत.

 


 

Maharashtra Job Fair 2023: NAMO Mega Job Fair – is scheduled on 9th & 10th Dec., 2023, at Nagpur. Are you looking for a job in Maharashtra? Do you want to work in the private or public sector? If yes, then you should not miss the NMO Maharojgar melava 2023, which is a state-level online job fair organized by the Skill Development and Entrepreneurship Department of Maharashtra. The NMO Maharojgar melava 2023 aims to provide various employment opportunities to the educated unemployed in Maharashtra. The job fair will be held for different districts of Maharashtra at regular intervals of time. In this article, we will give you all the details about the NMO Maharojgar melava 2023, such as the important dates, vacancy details, eligibility criteria, how to apply, and more.

What is the NMO Maharrojgar melava 2023?

The NMO Maharrojgar melava 2023 is a part of the Pandit Deendayal Upadhyay online job fair, which is conducted by the MahaRojgar or MahaSwayam, the official portal of the Skill Development and Entrepreneurship Department of Maharashtra. The job fair aims to connect the job seekers with the employers from various sectors, such as IT, manufacturing, banking, education, health, agriculture, and more. The job fair also provides career guidance, skill development, and entrepreneurship training to the candidates.

राज्य सरकारकडून (Maharashtra Government) पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे (Pandit Dindayal Upadhyay Maharojgar Melava) आयोजन करण्यात आले आहे. नागपुरात 9 आणि 10 डिसेंबर रोजी या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याचा मोठा लाभ तरुणांना होणार आहे. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्यांकडून आपल्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची मागणी नोंदविण्यात आली. या महारोजगार मेळाव्यात जवळपास 300 कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या मार्फत विविध 50,000 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. 

रोजगार सेवांचा विनामुल्य लाभ घेण्यासाठी नियोक्ता (Employer) यांनी या संकेतस्थळावर स्‍थानिक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

कधी आणि किती वाजता होणार महारोजगार मेळावा?

दिनांक : शनिवार 9 डिसेंबर, व रविवार 10 डिसेंबर, 2023 वेळ : सकाळी 10 ते 6 पर्यंत)
स्थान : जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपुर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपुर

वैशिष्ट्ये

  • सर्व रोजगार सेवा विनामुल्य उपलब्ध.
  • नियोक्ता नोंदणी, रिक्तपदे प्रसिध्दी आणि जॉब पोस्टींग ते प्लेसमेंट पर्यंतच्या संपूर्ण भरती प्रक्रियेचे व्यवस्थापन.
  • शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे नोंदणीकृत 2845710 नोकरीच्छूक उमेदवारांमधून पात्र मनुष्यबळ शोध.
  • कायम/तात्पुरती स्वरुपाची रिक्‍तपदे, रोजगार मेळावा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (ईपीपी) अंतर्गत अधिसूचित करण्याची ऑनलाईन सुविधा.
  • रोजगार मेळाव्‍याचे स्‍थळ, वेळ तपशीलासह सहभागासाठी इच्छूकता दर्शविण्याची सुविधा (लवकरच उपलब्धता).

NMO Maharojgar Melava 2023

NMO Maharojgar Melava 2023

Click Here To Apply For NMO Maha Job Fair 2023

How To Apply For Maharashtra Mega Job Fair 2023

नागपुरातील जमनलाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, अमरावती रोड नागपूर येथे हा महारोजगार मेळावा होणार आहे. अधिकाधिक तरुणांनी या मेळाव्यात सहभागी होऊन नोकरीची संधी मिळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या महारोजगार मेळाव्यात 300 हून अधिक कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट कंपन्या सहभागी होणार आहेत. या महारोजगाराच्या माध्यमातून राज्यातील किमान 21,000 तरुणांना नोकरी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा महारोजगार मेळावा राज्यातील सर्वात मोठा मेळावा असणार आहे. हा मेळावा आयोजित करण्यासाठी राज्य सरकारकडून 5 कोटी रुपयांच्या खर्चाला यापूर्वीच मान्यता दिली होती.”राज्य सरकारकडून https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2023 पर्यंत 290 ऑनलाईन आणि ऑफलाईन विविध मेळावे घेण्यात आले असून यामध्ये 1 लाख 40 हजार 110 युवक आणि युवतींना रोजगार प्राप्त झाला आहे. आतापर्यंत विभागीय रोजगार मेळाव्यासाठी 1 लाख रुपये, तर जिल्हास्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती.सन 2023 पासून मेळावे अधिक प्रभावीरित्या राबविण्यासाठी 5 लाख रूपयांची मर्यादा वाढविण्यात आली आहे.

NMO Rojgar Melava 2023 Educational Criteria

  • S.S.C.
  • H.S.C
  • H.S.C.
  • B.A.
  • B.E./B.Tech.
  • B.Com.
  • B.Sc.
  • Dip-CIVIL ENGG
  • H.S.C.-MCVC
  • M.A.
  • 9th Pass
  • Dip-MECHANICAL ENGG
  • M.Com.
  • D.Ed./D.T.Ed.
  • B.C.A
  • Dip-ELECTRICAL ENGG
  • M.Sc.
  • M.B.A.
  • B.Ed.
  • 8th Pass
  • 7th Pass
  • Dip-AGRICULTURE
  • M.E./M.Tech.
  • Dip-ELECTRONICS AND TELECOMMUNICATION
  • Dip-PHARMACY(D.PHARM)

Required Skills For Maha NAMO Rojgar Melava 2023

  • MS-CIT
  • Typing-Marathi-30
  • Typing-English-40
  • Typing-English-30
  • Computer
  • Tally
  • Fitter
  • Electrician
  • Typing-Marathi-40
  • Welder
  • Cad & Engg Drawing (Auto Cad)
  • Computer Hardware & Networking
  • Computer Operator & Programming Assistant
  • Typing-Hindi-30
  • Mechanic Motor Vehicle
  • Diesel Mechanic
  • Bus Conductor
  • Typing-English-50
  • Wireman
  • Welder Gas & Electric
  • Machinist
  • Driver-lmv
  • National Cadet Corps(NCC)
  • Turner
  • Accountant

Participating Districts in Maharashtra Mega Employment Fair 2023

  • Pune
  • Thane
  • Nashik
  • Nagpur
  • Kolhapur
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Solapur
  • Ahmednagar
  • Sangli
  • Jalgaon
  • Bid
  • Satara
  • Mumbai Sub Urban
  • Latur
  • Parbhani
  • Jalna
  • Amravati
  • Nanded
  • Buldana
  • Chandrapur
  • Mumbai City
  • Yavatmal
  • Bhandara
  • Dharashiv
  • Dhule
  • Raigarh
  • Akola
  • Gondiya
  • Wardha
  • Ratnagiri
  • Palghar
  • Hingoli
  • Nandurbar
  • Washim
  • Sindhudurg
  • Gadchiroli
  • Other

Maharashtra Job Fair 2023:  During the year, industries in Aurangabad and Nashik divisions will require about 65 thousand skilled manpower through Maharashtra Rojgar Melava 2023. In order to provide this manpower, MoUs will be entered into with 197 companies in Aurangabad and Nashik divisions on behalf of the Department of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation. For this, an industrial meet has been organized on August 18 in Chhatrapati Sambhaji Nagar @ Maharashtra Rojgar Melava 2023.

वर्षभरात औरंगाबाद आणि नाशिक विभागातील उद्योगांना सुमारे ६५ हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने औरंगाबाद आणि नाशिक विभागातील १९७ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले जाणार आहेत. याकरिता १८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रियल मीटचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास विभागाच्या वतीने दरवर्षी रोजगार मेळावे घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात. या मेळाव्याला उपस्थित विविध उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या शोधात असतात. बऱ्याचदा त्यांना हवे तसे मनुष्यबळ मिळत नाही, तसेच उमेदवारही मिळणाऱ्या वेतनावर खुश नसतात. परिणामी मेळाव्याला नुसतीच गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन उद्योगांना कुठल्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे आहे, तसेच आगामी वर्षभरात त्यांच्या कंपन्यांमध्ये साधारणतः किती रोजगार उपलब्ध होऊ शकतो, याबाबतची माहिती कौशल्य विकास विभागाने नुकतीच गोळा केली. त्यातून औरंगाबाद आणि नाशिक विभागामध्ये वर्षभरात सुमारे ६५ हजार रिक्त पदे असल्याचे समोर आले.

 

१८ ऑगस्ट रोजी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात इंडस्ट्रियल मीटचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाणे यांनी दिली. ते म्हणाले की, या इंडस्ट्रियल मीटकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सचिव यांची उपस्थिती असेल. त्यांच्या उपस्थितीत उद्योजकांसोबत एमओयू करण्यात येईल.

 


Maharashtra Job Fair 2023: Union Minister of Commerce and Industry, Consumer Affairs, Food and Public Distribution and Textiles Piyush Goyal, Union Minister of State for Health and Family Welfare S.P. Singh Baghel was present. Rozgar Melawa is an initiative of the central government to provide government jobs to 10 lakh youth. This time too more than 70 thousand youths have been given appointment letters. Employment fairs were organized in 44 places in the country by Maharashtra Rojgar Melava 2023.

देशात अनेक ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. पीएम मोदींनी 70 हजाराहून अधिक तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्ती पत्र दिले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना संबोधित केले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री एस.पी. सिंग बघेल उपस्थित होते. रोजगार मेळावा हा केंद्र सरकारचा 10 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचा उपक्रम आहे. यावेळीही 70 हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. देशात 44 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या ठिकाणांहून 70 हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. याआधीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे युवकांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

कोणत्या विभागात नोकरी मिळाली

ही भरती केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आली आहे. पीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशभरातून निवडलेल्या या तरुणांची वेगवेगळ्या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

या तरुणांची महसूल विभाग, वित्तीय सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल संसाधन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि गृह मंत्रालयासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रोजगार मेळावा हा रोजगार निर्मितीच्या दिशेने केलेला प्रयत्न आहे. यामुळे अधिक रोजगार निर्माण होतील आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध होतील.

युवकांना रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्र मिळण्याचा मार्गही सुकर झाला आहे. पीएम मोदी म्हणाले की रोजगार मेळा हा तरुणांना सशक्त करण्याचा आणि देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा प्रयत्न आहे.


Maha Rojgar Melava 2024

Maharashtra Job Fair 2024: The fifth phase of Pradhan Mantri Rojgar Mela will be held on May 16. Meanwhile, employment fairs will be organized on May 16 at 45 centers in 22 states. Prime Minister Narendra Modi will personally distribute the appointment letters.

An employment fair is being organized for the past two years to provide jobs to the youth at the centre. The next stage of this series will be held on Tuesday. This fair will be held at 45 places across the country and all these candidates will get jobs in various ministries and departments of the central government with immediate effect.

भारत सरकारतर्फे १० लाख युवकांना रोजगार देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत आजपर्यंत ७१ हजार पेक्षा जास्त तरुणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. याच धर्तीवर दि. १६ मे रोजी मंगळवारी ५ वाजता राष्ट्रीय रोजगार मेळावा नांदेडसह देशभरातील ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यातील एक मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे, नांदेडचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व इतर मान्यवर नांदेड येथील मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  1. केंद्राकडून आज मिळणार ७१ हजार तरुणांना नोकऱ्या, पंतप्रधान मोदी वितरित करणार नियुक्तिपत्रे जाणार असून या सर्व उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये
  2. देशभरातील ७१ हजार तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि खात्यांमध्ये मंगळवारी नोकऱ्या मिळणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या तरुणांना नियुक्तिपत्रांचे वाटप करणार असून नंतर त्यांना आभासी माध्यमातून संबोधितही करणार आहेत.
  3. तरुणांना केंद्रात नोकन्या देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून रोजगार मेळ्याचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेतील पुढचा टप्पा मंगळवारी पार पडणार आहे. देशभरातील ४५ ठिकाणी हा मेळा आयोजित केला जाणार असून या सर्व उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागामध्ये तत्काळ प्रभावाने नोकन्या मिळणार आहेत.
  4. यात ग्रामीण डाक सेवक, टपाल निरीक्षक, तिकीट क्लर्क, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, ट्रॅक मेंटनर, असिस्टंट, सेक्शन ऑफिसर, उपविभागीय अधिकारी आणि कर सहायक अशा पदांचा यात समावेश आहे. तरुणांना केंद्राच्या विविध विभागांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या निर्धाराचा भाग म्हणून प्रत्येक तीन महिन्यांनंतर या रोजगार मेळ्याचे आयोजन केले जाते.
Maharashtra Job Fair 2023
Maharashtra Rojgar Melava 2023

या मेळाव्याच्या आयोजनासाठी छ. संभाजीनगर परिक्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल अदनान अहेमद यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या मेळाव्यादरम्यान भारत सरकारच्या ३८ मंत्रालयाअंतर्गत विविध विभागांतील सरकारी नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. त्यापैकी नांदेड येथील मेळाव्यात जवळपास २५० उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने व केंद्रीय रेल्वे, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. उर्वरीत उमेदवारांना ईमेल किंवा पोस्टाद्वारे नियुक्तीपत्र दिली जातील.

भारत सरकारच्या विविध मंत्रालय व विभागांनी ही भरती प्रक्रिया केली आहे. यात संघ लोक सेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भर्ती बोर्ड यासारख्या निवड एजन्सीद्वारे या नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पुढील दीड वर्षात याच मिशन मोडवर १० लाख तरुणांना रोजगार देण्याचे नियोजन असल्याची माहिती नांदेड विभागाचे डाकघर अधिक्षक राजीव पाळेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

सर्व जिह्यानिहाय रोजगार मेळावे पहा 

पीयूष गोयल मुंबईत, धर्मेंद्र प्रधान भुवनेश्वरमध्ये, अश्विनी वैष्णव जयपूरमध्ये, हरदीप सिंग पुरी कपूरथला, निर्मला सीतारामन चेन्नईमध्ये, नरेंद्र सिंह तोमर रतलाममध्ये, ज्योतिरादित्य शिंदे भोपाळमध्ये आणि अनुराग सिंह ठाकूर शिमल्यात उपस्थित राहणार आहेत. केंद्रातील सर्व मंत्रालये आणि विभाग ही भरती करतील. केंद्रीय मंत्री प्रत्येक मंत्रालय आणि विभागातील नियुक्त्या आणि रिक्त पदे भरण्यावर लक्ष ठेवत आहेत.

 या रोजगार मेळाव्यात आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, लोको पायलट, तंत्रज्ञ, पोस्टल सहाय्यक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, लिपिक, स्टेनोग्राफर, वैयक्तिक सहाय्यक, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कर्मचारी आणि ग्रंथपालांचा समावेश आहे.

  • गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांनी रोजगार मेळावा योजना सुरू केली होती.
  • पहिला रोजगार मेळावा 22 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये 75 हजार नवीन नियुक्ती प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
  • आणि दुसरा मेळावा 22 नोव्हेंबर 2022 रोजी देशातील अनेक केंद्रांवर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 71 हजार ज्वॉइनिंग लेटर देण्यात आले.
  • याशिवाय, 20 जानेवारी 2023 रोजी तिसऱ्या रोजगार मेळाव्यात आणि 13 एप्रिल 2023 रोजी चौथ्या रोजगार मेळाव्यात 70 हजारांहून अधिक नियुक्ती प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले होते.

Maharashtra Job Fair on Shivaji Jayanti 2023

Maharashtra Job Fair 2023: 500 skill development centers are being set up in sparsely populated villages. Minister Mr. Lodha said that the number of unregistered is more than the registered unemployed and they will benefit from skill development centers. Employment has been provided to 42 thousand people through employment fairs and through MoUs with various establishments. Henceforth, the companies will be instructed to develop a new app and keep information about vacancies on it.

 

राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

 

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्याला प्राधान्य दिले आहे. यासाठी १२०० कोटी रूपये खर्च करून ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर कोणते अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत याबाबत स्थानिकांचे मत विचारात घेऊन एक, दोन, तीन महिन्यांचे विविध अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कमी लोकसंख्येच्या गावात ५०० कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहेत. नोंदणीकृत बेरोजगारांपेक्षा नोंदणी न केलेल्यांची संख्या अधिक असून कौशल्य विकास केंद्रांचा त्यांना लाभ होईल असे मंत्री श्री.लोढा म्हणाले. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून तसेच विविध आस्थापनांशी सामंजस्य करारांच्या माध्यमातून ४२ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. यापुढे नवीन ॲप विकसित करून त्यावर रिक्त जागांची माहिती ठेवण्याची सूचना कंपन्यांना करण्यात येईल.

राज्यात २०० कोटी रुपयांचा नाविन्यता निधी तयार करण्यात आला असून यातील २० टक्के निधी आयटीआयसाठी, तर २० टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दटके, अनिकेत तटकरे, सतीश चव्हाण, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, किरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला.

 


 

महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील सुशिक्षित बेरोजगांसाठी १९ फेब्रुवारीला नजिकच्या अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात रोजगार मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. शिवाय मेळावा यशस्वी करण्यासाठी १५ जणांची समिती निर्माण केली असून त्यात शासनाच्या उद्योग खात्याच्या अधिका-यांसह महाराष्ट्र एकीकरण युवा समिती पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी रविवारी (ता. ५) कोल्हापूर येथील सर्कीट हाऊसमध्ये सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष व खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी खासदार माने म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे सीमाभागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याची मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.

त्यानुसार मेळाव्यात ५ हजार अर्जांचे वितरण केले जाणार आहे. यावेळी लक्ष्मीकांत पाटील, बंडा पाटील, सुनील किरळे, भाऊसाहेब पाटील, शुभम शेळके, आशिष शहा यांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस किरण मोदगेकर, मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर, बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे रवी माने, अमोल शेळके व अधिकारी उपस्थित होते.

उद्योग भवनात समितीची बैठक रविवारी (ता. ५) खासदार माने यांच्याशी बैठक झाल्यावर सोमवारी (ता. ६) दुपारी औद्योगिक विकास महामंडळाचे जिल्हा अधिकारी श्री. भिंगारे यांच्यासोबत उद्योग भवनात समितीची बैठक झाली. यावेळी मेळाव्याबाबत चर्चा झाली. मेळाव्यात नोकरी मिळविण्याची संधी यावर मार्गदर्शनासाठी विविध महामंडळाचे तज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.


Maharashtra Rojgar Melava 2024

Maharashtra Rojgar Melava 2024: Good news for job seekers!! Pandit Deendayal Upadhyay Job Fair has been organized for interested and eligible candidates to fill various vacant posts. Interested and eligible candidates can register online for Maharashtra Job Fair 2024. It is conducted by MahaRojgar or MahaSwayam the Department of Skill Development and Entrepreneurship under the Maharashtra Government. In the Month of January 2023. Maharashtra Rojgar Melava 2024 has organized for Varioud vacancies in all the Districts of Maharashtra. In this article, you get detailed information about Maharashtra Rojgar Melava 2024 for various locations in Maharashtra, Important Dates, Vacancy Details, How to apply, Application Fee for Maharashtra Rojgar Melava 2024. Also the District wise links are given for your refrence. Further details are as follows:-

MahaRojgar – Mahaswayam 2024

महाराष्ट्रातील विविध जिल्हांमध्ये पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या संबंधित जिल्ह्याच्या लिंक वरून नोंदणी करावी. तसेच रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maha Rojgar Melava 2024

महारोजगार मेळाव्याचे आयोजन

या महारोजगार मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील 40 हून अधिक खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 7500 रिक्तपदे भरण्यात येणार आहेत.

Eligibility Criteria For Maha Rojgar Mela

  • या पदांसाठी किमान आठवी, नववी, दहावी, बारावी उत्तीर्णांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी पात्रता असणारे महिला-पुरुष उमेदवार पात्र असतील.
  • या रोजगार मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करणारी महामंडळे, दिव्यांग उमेदवारांसाठी विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे माहिती देणारे स्टॉलही लावण्यात येणार आहेत.
  • उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.

How to Apply For Maharashtra Job Fair 2024 :

  •  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दया .
  • Jobseeker (Find a Job) या Tab वरून Login Box च्या खाली REGISTER वर Click करून आधार कार्ड वरील माहिती भरल्यानंतर OTP येईल.
  • यानंतर Password तयार केलेनुसार मोबाईल वर User व Password मिळेल,
  • आपणास प्राप्त User व Password लॉगीन बॉक्स टाकुन डाव्या बाजूच्या Edit बटन मधून शैक्षणिक आणि तत्सम पात्रतेनुसार माहिती Update करणे आवश्यक आहे.
  • यानंतरच आपण रोजगार मेळावा मध्ये Online सहभागी होऊ शकता.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

Maharashtra Rojgar Melava 2024 Important Dates

District Date
Pune (पुणे) 11 January 2023
Parbhani (परभणी) 11 January 2023
Nandurbar (नंदुरबार) 11 January 2023
Jalna (जालना) 11 January 2023

 

 

District Venue of Job Fair 
Pune (पुणे) Online Mode
Parbhani (परभणी) Dist Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, First Floor, Parbhani
Nandurbar (नंदुरबार) Dist Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, 481, Rasta Peth, Pune 1
Jalna (जालना) Dist Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Administrative Building, 2, Jalna

 

Maharashtra Rojgar Melava 2024

Category Rojgar Melava
Department Skill Development Department of Maharashtra
Name Maharashtra Job Fair 2023
Total Vacancy Click Here
Districts
  1. Ahmednagar
  2. Akola
  3. Amravati
  4. Aurangabad
  5. Beed
  6. Bhandara
  7. Buldhana
  8. Chandrapur
  9. Dhule
  10. Gadchiroli
  11. Gondia
  12. Hingoli
  13. Jalgaon
  14. Jalna
  15. Kolhapur
  16. Latur
  17. Mumbai City
  18. Mumbai Suburban
  19. Nagpur
  20. Nanded
  21. Nandurbar
  22. Nashik
  23. Osmanabad
  24. Palghar
  25. Parbhani
  26. Pune
  27. Raigad
  28. Ratnagiri
  29. Sangli
  30. Satara
  31. Sindhudurg
  32. Solapur
  33. Thane
  34. Wardha
  35. Washim
  36. Yavatmal

10 लाख तरुणांना मिळणार रोजगार!! – PM Rojgar Melava 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 ऑक्टोबर रोजी पीएम रोजगार मेळा सुरू केला होता. याद्वारे केंद्र सरकारच्या विविध सरकारी विभागांमध्ये 10 लाख भरती होणार आहे. पंतप्रधान मोदींनी 75000 तरुणांना नियुक्तीपत्रे देऊन त्याची सुरुवात केली. यानंतर, यापूर्वी सीआयएसएफसह इतर अनेक विभागांमध्ये भरती झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. येत्या 18 महिन्यांत 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

देशात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत चालली असताना केंद्र सरकारनं हे बेरोजगारी कमी करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. मात्र या रोजगार मेळाव्यासाठी नक्की पात्रता काय आहे? आणि रजिस्ट्रेशन कसं करणार यावर अनेकांमध्ये संभ्रम आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यासाठी काय पात्रता आहे आन रजिस्ट्रेशन कसं करावं हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

जून 2022 मध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्याबाबत पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम सर्व मंत्रालये आणि विभागांना सूचना दिल्या. रोजगार मेळाव्याद्वारे 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये भरती केली जात आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, प्राप्तिकर विभागासह विविध विभागांमध्ये ही भरती सुरू आहे.

अहवालानुसार, केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 2023 च्या अखेरीस गट अ श्रेणीतील एकूण 2386, गट ब मधील 25836 आणि गट क मधील 7.6 लाख रिक्त जागा भरल्या जातील. विविध शासकीय विभागांतर्गत एकूण 10 लाख पदे एकत्रितपणे भरण्यात येणार आहेत.

पंतप्रधान रोजगार मेळाव्यासाठी अर्ज कसा करावा?- PM Registration 2024

पीएम रोजगार मेळ्याची माहिती यूपीएससी, एसएससी इत्यादी विविध भरती मंडळांवर उपलब्ध असेल.

  • पीएम रोजगार मेळा 2022 ची लिंक भर्ती बोर्डाच्या वेबसाइटवर आढळेल.
  • पीएम एम्प्लॉयमेंट फेअर 2022 च्या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
  • पंतप्रधान रोजगार मेळ्यासाठी कोण अर्ज करू शकतो?

पंतप्रधान रोजगार मेळ्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 29 वर्षे असावे.

  • उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास संबंधित विषयात बॅचलर डिग्री / 10वी, 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

23 Comments
  1. Rupesh laxman Shende says

    सर मला खूप गरज आहे जॉब ची

  2. Ramprasad Gangadhar Swami says

    Job work timing facility payment time to time thanks for you

  3. Kiahan raigude says

    Permanent job ahe ka

  4. Rahul arjun kamble says

    Life time job nahi. ddu gky (dindyal upadhyay graamin kaushalya Yojana)

  5. Sunil wankar says

    मि 12वी पास असुन आय. टी. आई. केले आहे तसेच माझ्या कडे चार कंपनी चा अनुभव आहे परंतु माझा wardha still plants मध्ये अपघात होऊन मी अपंग आहे तर मला रोजगार मिळेल का❓

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड