रत्नागिरी अंतर्गत ३०+ रिक्त पदांकरिता ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन; १०वी पास उमेदवारांना संधी-त्वरित नोंदणी करा! | Ratnagiri Job Fair 2023

Ratnagiri Rojgar Melava 2023

Ratnagiri Rojgar Melava 2023

Ratnagiri Job Fair 2023: Ratnagiri Rojgar Melava 2023 Advertisement is published now for Various vacancies. The Eligible & interested candidates can Apply Online For This Job Fair from the given respective Links. The job fair will be held on 29th of November 2023. Further details are as follows:-

Ratnagiri Rojgar Melava 2023 : रत्नागिरी येथे “पाउच फिलर” पदांकरिता पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ऑनलाईन रत्नागिरी – 7 चे आयोजन करण्यात आलेले आहे. ऑनलाइन मेळाव्याची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Ratnagiri Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Ratnagiri Job Fair has been organized for the “POUCH FILLER” post. There are a total of 30+ vacancies are available to fill the posts. The place of employment for this job fair is Ratnagiri. Interested and eligible candidates can apply online. Eligible candidates register to the given link before the last. The Online job fair is on the 29th of November 2023. For more details on Ratnagiri Online Rojgar Melava 2023, visit our website www.MahaBharti.in.

  • रोजगार मेळाव्याचे नाव – पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ऑनलाईन रत्नागिरी – 7
  • पदाचे नाव – पाउच फिलर
  • पदसंख्या – 30+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC (Refer PDF)
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (Online Registration)
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – मुंबई
  • जिल्हारत्नागिरी
  • मेळाव्याची तारीख – 29 नोव्हेंबर 2023

Ratnagiri Online Job Fair 2023

Ratnagiri Rojgar Melava 2023

Ratnagiri Rojgar Melava 2023 Details

Job Fair Name
Pandit Dindayal Upadhyay Job Fair Online Ratnagiri – 7
Recruitment Name
Ratnagiri Rojgar Melava 2023
Name of Posts POUCH FILLER
Total Vacancies 30+ vacancies
How To Apply Online Registration

Ratmagiri Rojgar Melava All Important Dates

Date of Job Fair 29th of November 2023.

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Ratnagiri Rojgar Melava 2023

📑 जाहिरात
https://shorturl.at/ipDHR
✅ नोंदणी करा https://shorturl.at/suSW1

Ratnagiri Job Fair 2023: Ratnagiri Rojgar Melava 2023 Advertisement is published now for 150 vacancies. The Eligible & interested candidates can Apply Online For This Job Fair from the given respective Links. The job fair will be held on 28th of March 2023. Further details are as follows:-

आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी रत्नागिरीत २८ मार्च रोजी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती पुणे येथील ऑटोमोबाईल क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनी कंपनीत होणार आहे. सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनी गट नं. २०७, प्लॉट नं. ६, ७ व ८, शिंदेवाडी, (ता. भोर, जि. पुणे) येथे आहे. या कंपनीमध्ये मशिन ऑपरेटर या पदासाठी १५० जागांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी आयटीआय ट्रेडमधील टर्नर, फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, मिलर, ड्रिलर, मॅकेनिकल, मशिन टूल्स मेंटेनन्स (MMTM), डिप्लोमा मॅकेनिकल आदी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

 

सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनी १९९२ पासून ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल १७० कोटी असून कंपनीने पुढील विस्तार योजना आखली आहे. त्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे, अशी माहिती कंपनीचे महाव्यवस्थापक (वित्त) राजीव पाध्ये यांनी सांगितली. राजीव पाध्ये हे मूळचे धामणी, संगमेश्वरचे असून गेले १० वर्षे या कंपनीचा वित्त कारभार सांभाळतात.

 

कोकणातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी श्री. पाध्ये, रत्नागिरी जिल्हा बेरोजगार व स्वयंरोजगार सहकारी संघाचे संचालक राजू भाटलेकर यांनी रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील बीटीआरआय अधिकारी नीलेश मद्रे यांच्याशी समक्ष चर्चा करून रोजगार मेळावा आयोजित केला. यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथे मंगळवार दि. २८ मार्च रोजी सकाळी ९.३० पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वरील उल्लेख केलेल्या शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेततर्फे करण्यात आले आहे.


Ratnagiri Rojgar Melava Registartion 2023

Ratnagiri Job Fair 2023: Ratnagiri Government of Maharashtra in association with Industries Department on Sunday, dt. On 12th February at Ratnagiri city. Bh. An employment fair has been organized at Shirke High School. At least 150 to 175 companies will come for interviews, and at least 1800 to 2000 youth will get employment. State Industries Minister Uday Samant and Guardian Minister Uday Samant informed in a press conference that the appointment letter will be given on the same day.

उद्योग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या रोजगार महामेळाव्यात तब्बल २ हजार १४० जणांना नोकरी मिळाल्याची माहिती उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योग विभागाच्या वतीने राज्यभर रोजगार महामेळावे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात पहिला रोजगार महामेळावा घेण्यात आला. या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन ७ हजार ८०० युवक-युवतींनी नोंदणी केली होती तर जवळपास ३ हजार जणांनी ऑफलाईन नोंदणी केली होती. नोंदणी झालेल्या जवळपास १० हजार उमेदवारांपैकी ४ हजार २२८ जणांच्या मुलाखती पार पडल्या. त्यातील २ हजार १४० जणांना नोकरीचे देकार (ऑफर लेटर ) प्रमाणपत्र अदा करण्यात आले.

 

२ हजार ८८ जणांना कौशल्य विकास विभागाकडे प्रशिक्षणासाठी वर्ग करण्यात आले. रोजगार मेळाव्यामध्ये रत्नागिरी, पुणे, सातारा, मुंबई येथील १३० कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. यापुढे राज्याच्या इतर भागातही अशा प्रकारचे रोजगार महामेळावे घेण्यात येणार असल्याचे ना. सामंत यांनी जाहीर केले आहे. विशेषतः सीमावर्ती भागातील रोजगार मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या रोजगार मेळाव्यात अनेक दिव्यांग तरुण, तरुणी सहभागी झाले होते, त्यांना देखील नोकरी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

 

रत्नागिरी महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शहरातील रा. भा. शिर्के हायस्कूलमध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुलाखतीसाठी किमान १५० ते १७५ कंपन्या येणार असून, किमान १८०० ते २००० युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे. त्याचदिवशी नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे : जिल्हा प्रशासन,रत्नागिरी यांचे वतीने रत्नागिरी जिल्हयातील उमेदवारांकरिता भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळावा.

रोजगार मेळाव्यासाठी माहिती पत्रकांचे प्रकाशन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संकेतस्थळाचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार अण्णा कोकजे, अलिमियाँ काझी, किशोर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, महेश म्हाप, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर उपस्थित होते. पुण्यातील युवा हब फाउंडेशनतर्फे रत्नागिरीनंतर जॉब फेअर राज्यातील अन्य जिल्ह्यातही टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात येणार आहेत.

Ratnagiri Rojgar Melava 2023 Details

जिल्हा प्रशासन,रत्नागिरी यांचे वतीने रत्नागिरी जिल्हयातील उमेदवारांकरिता भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळावा.
DISTRICT
Private Employer
General
12-02-2023
12-02-2023
India
Maharashtra
Ratnagiri
रा.भा.शिर्के प्रशाला, शामराव पेजे चौक,जुना माळनाका,रत्नागिरी

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Ratnagiri Rojgar Melava 2023

📑 जाहिरात
https://bit.ly/3eLQpJ2
✅ नोंदणी करा
shorturl.at/aDFUX


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड