कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून ४२ हजार उमेदवारांना रोजगार संधी, नोंदणी करा | Maharashtra Rojgar Melava 2023

Maharashtra Job Fair 2023

Maharashtra Job Fair on Shivaji Jayanti 2023

Maharashtra Job Fair 2023: 500 skill development centers are being set up in sparsely populated villages. Minister Mr. Lodha said that the number of unregistered is more than the registered unemployed and they will benefit from skill development centers. Employment has been provided to 42 thousand people through employment fairs and through MoUs with various establishments. Henceforth, the companies will be instructed to develop a new app and keep information about vacancies on it.

 

राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

 

सर्व जिह्यानिहाय रोजगार मेळावे पहा 

 मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्याला प्राधान्य दिले आहे. यासाठी १२०० कोटी रूपये खर्च करून ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर कोणते अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत याबाबत स्थानिकांचे मत विचारात घेऊन एक, दोन, तीन महिन्यांचे विविध अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कमी लोकसंख्येच्या गावात ५०० कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहेत. नोंदणीकृत बेरोजगारांपेक्षा नोंदणी न केलेल्यांची संख्या अधिक असून कौशल्य विकास केंद्रांचा त्यांना लाभ होईल असे मंत्री श्री.लोढा म्हणाले. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून तसेच विविध आस्थापनांशी सामंजस्य करारांच्या माध्यमातून ४२ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. यापुढे नवीन ॲप विकसित करून त्यावर रिक्त जागांची माहिती ठेवण्याची सूचना कंपन्यांना करण्यात येईल.

राज्यात २०० कोटी रुपयांचा नाविन्यता निधी तयार करण्यात आला असून यातील २० टक्के निधी आयटीआयसाठी, तर २० टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दटके, अनिकेत तटकरे, सतीश चव्हाण, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, किरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला.

 


 

महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील सुशिक्षित बेरोजगांसाठी १९ फेब्रुवारीला नजिकच्या अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात रोजगार मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. शिवाय मेळावा यशस्वी करण्यासाठी १५ जणांची समिती निर्माण केली असून त्यात शासनाच्या उद्योग खात्याच्या अधिका-यांसह महाराष्ट्र एकीकरण युवा समिती पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन रोजगार मेळावे

मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी रविवारी (ता. ५) कोल्हापूर येथील सर्कीट हाऊसमध्ये सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष व खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी खासदार माने म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे सीमाभागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याची मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.

त्यानुसार मेळाव्यात ५ हजार अर्जांचे वितरण केले जाणार आहे. यावेळी लक्ष्मीकांत पाटील, बंडा पाटील, सुनील किरळे, भाऊसाहेब पाटील, शुभम शेळके, आशिष शहा यांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस किरण मोदगेकर, मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर, बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे रवी माने, अमोल शेळके व अधिकारी उपस्थित होते.

उद्योग भवनात समितीची बैठक रविवारी (ता. ५) खासदार माने यांच्याशी बैठक झाल्यावर सोमवारी (ता. ६) दुपारी औद्योगिक विकास महामंडळाचे जिल्हा अधिकारी श्री. भिंगारे यांच्यासोबत उद्योग भवनात समितीची बैठक झाली. यावेळी मेळाव्याबाबत चर्चा झाली. मेळाव्यात नोकरी मिळविण्याची संधी यावर मार्गदर्शनासाठी विविध महामंडळाचे तज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.


Maharashtra Rojgar Melava 2023

Maharashtra Rojgar Melava 2023: Good news for job seekers!! Pandit Deendayal Upadhyay Job Fair has been organized for interested and eligible candidates to fill various vacant posts. Interested and eligible candidates can register online for Maharashtra Job Fair 2023. It is conducted by MahaRojgar or MahaSwayam the Department of Skill Development and Entrepreneurship under the Maharashtra Government. In the Month of January 2023. Maharashtra Rojgar Melava 2023 has organized for Varioud vacancies in all the Districts of Maharashtra. In this article, you get detailed information about Maharashtra Rojgar Melava 2023 for various locations in Maharashtra, Important Dates, Vacancy Details, How to apply, Application Fee for Maharashtra Rojgar Melava 2023. Also the District wise links are given for your refrence. Further details are as follows:-

MahaRojgar – Mahaswayam 2023

महाराष्ट्रातील विविध जिल्हांमध्ये पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या संबंधित जिल्ह्याच्या लिंक वरून नोंदणी करावी. तसेच रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maha Rojgar Melava 2023

महारोजगार मेळाव्याचे आयोजन

या महारोजगार मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील 40 हून अधिक खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 7500 रिक्तपदे भरण्यात येणार आहेत.

Eligibility Criteria For Maha Rojgar Mela

 • या पदांसाठी किमान आठवी, नववी, दहावी, बारावी उत्तीर्णांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी पात्रता असणारे महिला-पुरुष उमेदवार पात्र असतील.
 • या रोजगार मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करणारी महामंडळे, दिव्यांग उमेदवारांसाठी विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे माहिती देणारे स्टॉलही लावण्यात येणार आहेत.
 • उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.

How to Apply For Maharashtra Job Fair 2023 :

 •  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दया .
 • Jobseeker (Find a Job) या Tab वरून Login Box च्या खाली REGISTER वर Click करून आधार कार्ड वरील माहिती भरल्यानंतर OTP येईल.
 • यानंतर Password तयार केलेनुसार मोबाईल वर User व Password मिळेल,
 • आपणास प्राप्त User व Password लॉगीन बॉक्स टाकुन डाव्या बाजूच्या Edit बटन मधून शैक्षणिक आणि तत्सम पात्रतेनुसार माहिती Update करणे आवश्यक आहे.
 • यानंतरच आपण रोजगार मेळावा मध्ये Online सहभागी होऊ शकता.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

Maharashtra Rojgar Melava 2023 Important Dates

District Date
Pune (पुणे) 11 January 2023
Parbhani (परभणी) 11 January 2023
Nandurbar (नंदुरबार) 11 January 2023
Jalna (जालना) 11 January 2023

 

 

District Venue of Job Fair 
Pune (पुणे) Online Mode
Parbhani (परभणी) Dist Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, First Floor, Parbhani
Nandurbar (नंदुरबार) Dist Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, 481, Rasta Peth, Pune 1
Jalna (जालना) Dist Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Administrative Building, 2, Jalna

 

Maharashtra Rojgar Melava 2023

Category Rojgar Melava
Department Skill Development Department of Maharashtra
Name Maharashtra Job Fair 2023
Total Vacancy Click Here
Districts
 1. Ahmednagar
 2. Akola
 3. Amravati
 4. Aurangabad
 5. Beed
 6. Bhandara
 7. Buldhana
 8. Chandrapur
 9. Dhule
 10. Gadchiroli
 11. Gondia
 12. Hingoli
 13. Jalgaon
 14. Jalna
 15. Kolhapur
 16. Latur
 17. Mumbai City
 18. Mumbai Suburban
 19. Nagpur
 20. Nanded
 21. Nandurbar
 22. Nashik
 23. Osmanabad
 24. Palghar
 25. Parbhani
 26. Pune
 27. Raigad
 28. Ratnagiri
 29. Sangli
 30. Satara
 31. Sindhudurg
 32. Solapur
 33. Thane
 34. Wardha
 35. Washim
 36. Yavatmal

10 लाख तरुणांना मिळणार रोजगार!! – PM Rojgar Melava 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 ऑक्टोबर रोजी पीएम रोजगार मेळा सुरू केला होता. याद्वारे केंद्र सरकारच्या विविध सरकारी विभागांमध्ये 10 लाख भरती होणार आहे. पंतप्रधान मोदींनी 75000 तरुणांना नियुक्तीपत्रे देऊन त्याची सुरुवात केली. यानंतर, यापूर्वी सीआयएसएफसह इतर अनेक विभागांमध्ये भरती झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. येत्या 18 महिन्यांत 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

देशात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत चालली असताना केंद्र सरकारनं हे बेरोजगारी कमी करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. मात्र या रोजगार मेळाव्यासाठी नक्की पात्रता काय आहे? आणि रजिस्ट्रेशन कसं करणार यावर अनेकांमध्ये संभ्रम आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यासाठी काय पात्रता आहे आन रजिस्ट्रेशन कसं करावं हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

जून 2022 मध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्याबाबत पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम सर्व मंत्रालये आणि विभागांना सूचना दिल्या. रोजगार मेळाव्याद्वारे 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये भरती केली जात आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, प्राप्तिकर विभागासह विविध विभागांमध्ये ही भरती सुरू आहे.

अहवालानुसार, केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 2023 च्या अखेरीस गट अ श्रेणीतील एकूण 2386, गट ब मधील 25836 आणि गट क मधील 7.6 लाख रिक्त जागा भरल्या जातील. विविध शासकीय विभागांतर्गत एकूण 10 लाख पदे एकत्रितपणे भरण्यात येणार आहेत.

पंतप्रधान रोजगार मेळाव्यासाठी अर्ज कसा करावा?- PM Registration 2023

पीएम रोजगार मेळ्याची माहिती यूपीएससी, एसएससी इत्यादी विविध भरती मंडळांवर उपलब्ध असेल.

 • पीएम रोजगार मेळा 2022 ची लिंक भर्ती बोर्डाच्या वेबसाइटवर आढळेल.
 • पीएम एम्प्लॉयमेंट फेअर 2022 च्या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
 • पंतप्रधान रोजगार मेळ्यासाठी कोण अर्ज करू शकतो?

पंतप्रधान रोजगार मेळ्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 29 वर्षे असावे.

 • उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
 • उमेदवारास संबंधित विषयात बॅचलर डिग्री / 10वी, 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.

 

Maharashtra Job Fair 2022: Good news for job seekers!! The job fair will conduct for 10 Lac candidates. Employment will be provided to 75,000 youth during Diwali under this fair. Therefore, this Diwali gift given by the Prime Minister for the youth is going to be a gift. Further details are as follows:-

‘‘जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेसमोर सध्या मोठी आव्हाने आहेत. जगभरातील अनेक देशांना प्रचंड महागाई आणि बेरोजगारीने ग्रासले आहे. या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,’’ अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली. दहा लाखांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्यांचा प्रारंभ मोदी यांनी केला. शनिवारी पहिल्या टप्प्यात ७५ हजारांहून अधिक युवकांना विविध सरकारी सेवांचे नियुक्तिपत्र दिल्यानंतर ते बोलत होते. बेरोजगारीच्या मुद्दय़ावरून विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना गेल्या आठ वर्षांत नोकऱ्या निर्माण करण्याच्या आपल्या सरकारच्या प्रयत्नांना त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मोदी म्हणाले, की जागतिक परिस्थिती फारशी चांगली नाही हे खरे आहे. अनेक मोठय़ा अर्थव्यवस्था अडचणीत आहेत. शतकातून एकदा येत असलेल्या अशा करोनासारख्या महासाथीचे दुष्परिणाम शंभर दिवसांत दूर होतील, असा कुणाचाही भ्रम नाही. तरीही या समस्यांची झळ बसू नये म्हणून भारत अग्रक्रमाने काही प्रयत्न, उपाययोजना करत आहे. प्रसंगी जोखीमही घेत आहे. हे एक आव्हानात्मक काम आहे. परंतु जनतेच्या आशीर्वादाने आम्ही ते आतापर्यंत पार पाडू शकलो आहोत. आपल्या सरकारने अर्थव्यवस्थेला अडथळा ठरणाऱ्या त्रुटी दूर केल्या, म्हणून हे शक्य झाले. आता सरकारी विभागांची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढली आहे. भारताने आठ वर्षांत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन, पायाभूत सुविधा आणि पर्यटन क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासह सरकारने उचललेल्या विविध पावलांचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.

युवकांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार अनेक आघाडय़ांवर काम करत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की उगवत्या उद्योजकांना ‘मुद्रा’ योजनेंतर्गत विक्रमी रकमेचे कर्ज आतापर्यंत देण्यात आले आहे. महासाथीच्या काळात तीन लाख कोटींहून अधिक मदतीमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील दीड कोटींहून अधिक नोकऱ्यांवरील गंडातर टाळले गेले. तरुणांतील कौशल्य सुधारणांवर सरकारचा भर आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसह कृषी आणि इतर क्षेत्रांना प्रोत्साहन दिले जात आहे. ‘स्किल इंडिया’अंतर्गत सव्वा कोटींहून अधिक जणांना प्रशिक्षण देण्यात आले.

जूनमध्ये पंतप्रधानांनी विविध सरकारी खात्यांना पुढील दीड वर्षांत विशेष मोहीम राबवून दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे निर्देश दिले होते. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष (७५ वर्षे) डोळय़ांसमोर ठेवून आपले सरकार आठ वर्षांपासून रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारतर्फे शनिवारी ७५ हजार युवकांना नियुक्तिपत्रे दिली गेली. देशभरातून निवडलेल्या या उमेदवारांना भारत सरकारच्या ३८ खात्यांत रुजू करून घेतले जाईल.

देशात ठिकठिकाणी मंत्र्यांच्या उपस्थितीत नियुक्त्या
सक्षम उमेदवारांना गट ‘अ’आणि ‘ब’ (राजपत्रित), गट ‘ब’ (अराजपत्रित) आणि गट ‘क’मध्ये वेगवेगळय़ा स्तरावरील सेवांवर रुजू करून घेतले जात आहे. नियुक्त्या केल्या जात असलेल्या पदांमध्ये केंद्रीय संरक्षण दल कर्मचारी, उपनिरीक्षक, हवालदार, स्टेनोग्राफर, प्राप्तिकर निरीक्षक आदींचा समावेश आहे. ही भरती सरकारी खात्यांमार्फत किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), कर्मचारी निवड आयोग (एसएससी) किंवा रेल्वे भरती मंडळातर्फे केली जात आहे. जलद भरतीसाठी निवड प्रक्रिया सोपी व तांत्रिकदृष्टय़ा सुलभ केल्याचे सरकारने स्पष्ट केले. शनिवारी पन्नासहून अधिक केंद्रीय मंत्र्यांनी देशभरात विविध ठिकाणी हजारो तरुणांना नियुक्तिपत्रे दिली. गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असताना या रोजगार मोहिमेमुळे विरोधकांना शह देण्यास यश मिळेल, असा भाजपला विश्वास वाटतो.

 

 

पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ ऑक्टोबर २०२२ रोजी तरुणांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यावेळी रोजगार मेळावा लॉन्च केला जाणार आहे. यामध्ये २०२३ पर्यंत १० लाख लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात ७५,००० तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

दरम्यान, बेरोजगारीच्या मुद्यावरुन विरोधकांकडून कायम मोदी सरकारला निशाणा बनवण्यात येत आहे. त्यामुळेच सरकारनं रोजगार देणारी ही योजना आणण्याचा प्लॅन आखला. त्यानंतर सर्व विभाग आणि मंत्रालयांच्या समीक्षेनंतर यावर मिशन मोडवर काम सुरु करण्यात आलं होतं. त्याअंतर्गतच मोदी ७५,००० तरुणांना नोकरीचं नियुक्तीपत्र देणार आहेत.

Maharashtra Rojgar Melava 2022

विरोधकांचा आरोप

विरोधकांनी आरोप केला आहे की, मोदी सरकार तरुणांना रोजगार देण्यात अपयशी ठरलं आहे. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत सांगितलं होतं की, केंद्र सरकारच्या विभागांत १ मार्च २०२० पर्यंत ८.७२ लाख पदं रिक्त होती. केंद्रीय विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदं आहेत. ज्यामध्ये ३१ लाख ३२ हजार पद भरती झाली. सन २०१६-१७मध्ये सन २०२०-२१ दरम्यान एसएससीमध्ये एकूण २,१४,६०१ कर्मचाऱ्यांना भर्ती करण्यात आलं. तसेच आरआरबीमध्ये २,०४,९४५ जागांवर नियुक्त्या देण्यात आल्या होत्या तर युपीएससीत २५,२६७ उमेदवारांची निवड झाली होती.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

21 Comments
 1. Z says

  New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड