Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलीस भरती अर्ज केलेल्या उमेदवारांनी हे हमीपत्र द्यावे! – Police Bharti 2024 Result

Police Bharti 2024 Result

Maharashtra Police Bharti 2024 Result

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज सादर केले आहेत, अशा उमेदवारांनी कोणताही एक घटक निश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

 

याठिकाणी उमेदवाराने प्रत्यक्ष येऊन एक घटक निवडून स्वतःचे हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी मंगळवार पर्यंतची अंतिम मुदत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, तसेच वाहनचालक या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. शिवाय विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस दलाच्या विविध ठिकाणी पदांसाठीसुद्धा हे ऑनलाइन अर्ज उमेदवारांनी सादर केले आहेत उमेदवारांना कोणत्याही एका घटकात अर्ज भरल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी सहभागी होता येणार आहे.

याकरिता संबंधित उमेदवारांनी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्थापन केलेल्या कक्षामध्ये येऊन स्वतःचे हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांना घटक निवडता येणार आहे. याची अंतिम मुदत १४ मे मंगळवारपर्यंत निश्चित केली आहे.कार्यालयीन वेळेत आजपासून कागदपत्रांची पूर्तता करून हमीपत्र भरून द्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक परदेशी यांनी आहे.


निवडणुकी मुळे ढकलण्यात आल्या असून, पोलि

 भरती प्रक्रियाही थांबवण्यात आली आहे. राज्यात शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर पोलिस भरतीची मैदानी चाचणी त्यादृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे.

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

लोकसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. मैदानी व लेखी चाचणीचे एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार शिपाई पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे. चालकपदासाठी उमेदवारांना स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. साधारणतः ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे परीक्षार्थीनीही मैदानी चाचणीचा सरावा करावा. ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने शिक्षण विभागातर्फे नियोजन देखील केले जात आहे.

अशी असणार चाचणी ‘पोलिस भरती २०२४’ च्या मैदानी
चाचणीत १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार असणार आहेत. या चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत. शारीरिक चाचणीचा नवीन २०२४ तपशील या लिंक वर उपलब्ध आहे.

 


मोठ्या प्रमाणावरील बेरोजगारी आणि सार्वजनिक क्षेत्रांत नोकऱ्या मिळवण्याची तरुणांची आकांक्षा यांच्यातील संघर्ष लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगार मिळविण्यासाठी कोणताही अन्यायकारक किंवा फसवणुकीचा मार्ग अवलंबला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, जिल्हा पोलीस चालक पदाच्या भरतीप्रक्रियेत एकाच पदासाठी विविध जिल्ह्यांतून अर्ज करणाऱ्या २,८९७ उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून कायम ठेवला. भरतीच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज केल्याबद्दल निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती ए, एस. चांदूरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या.

जिल्हा पोलीस चालक पदासाठी २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीनंतर एक लाख १७ हजार उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २,८९७ उमेदवारांनी एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या ई-मेलवरून आणि माहिती बदलून अर्ज केले होते. मात्र, ही भरती पोलीस दलातील रिक्त पदांसाठी असून ९७.५ टक्के उमेदवारांना मोजक्या उमेदवारांच्या वर्तनाची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देताना स्पष्ट केले.

 


Maharashtra police bharti result 2022– Police Bharti 2022 Result पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा – Maharashtra Police Bharti 2022 Result of Physical Examinations of various District is started to declarer now. The candidates participated in Physical Examination can Check their Online results From following given links of Districts. For More update keep visiting us.

महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ चे विविध जिल्ह्यांच्या शारीरिक चाचणीचे गुण याद्या प्रकाशित होत आहे. सर्व जिल्ह्यांच्या निकालाच्या लिंक्स याच पेज वर पुढे प्रकाशित होत राहतील. तसेच खालील आपल्या जिल्ह्याच्या लिंक वरून आपण आपले मार्क्स चेक करू शकता. खालील लिंक मध्ये संबंधित जिल्ह्याची PDF  डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे.

मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे यावर्षीच्या पोलीस भरती मध्ये शारीरिक चाचणी ही फक्त 50 गुणांची ठेवण्यात आली आहे. लेखी परीक्षा ही 100 गुणांची ठेवण्यात आली आहे. यावरून असे लक्षात येते की जे उमेदवार शारीरिक चाचणी मध्ये 40 गुणांच्या वर असतील त्यांना निवड यादी मध्ये येण्यासाठी कसरत थोडी फार कमी करावी लागणार आहे.

Maharashtra Police Bharti Result 2022 – 2023

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड