जिल्हा परिषद भरती २ महिने लांबणार? विधानसभेत माहिती – ZP भरती अपडेट २०२३ | ZP Bharti 2023
Zilla Parishad Bharti 2023, ZP Mega Bharti 2023
Maharashtra Zilla Parishad Bharti 2023 Update
Zilla Parishad Bharti 2023 – Under the Zilla Parishad Recruitment Process for various Position will be staring soon !! As Per latest Information about Maha ZP Bharti 2023, IBPS is going to conduct ZP Exam 2023. ZP Application Form 2023 will be available very soon. Students are advised to keep visiting this page to get instant ZP Recruitment 2023 News.
जिल्हापरिषद भरती अजून दोन महिने लांबू शकते. स बद्दलची माहिती वरील व्हिडीओ मध्ये दिलेली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे दि. २१ ऑक्टोबर २०२२ व दि. १५ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला होता.
या भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच सराव पेपर साठी येथे क्लीक करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
तथापि, सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा टी.सी.एस. आय.बी.पी.एस. या कंपन्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने घ्यावयाच्या आहेत. त्यानुसार जि.प. स्तरावर आय.बी.पी.एस. या कंपनीसोबत सामंजस्य करार (MOU) अंतिम करण्याची कार्यवाही सुरु आहे. तद्नंतर Application Portal विकसित करून लवकरच जिल्हा परिषद स्तरावर जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले / भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून पुढील फक्त एका परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
ZP Recruitment 2023 News
Zilla Parishad Bharti 2023 : Finally, the company decided to fill more than nine hundred posts of ZP. An agreement will be signed with the company soon. First, the posts in the health department will be filled. Finally, the recruitment of about 30 cadre vacancies will be done through the company. Specially, the government had fixed the schedule for the month of March in accordance with the recruitment of this post.
बहुप्रतिक्षीत जिल्हा परिषदेच्या पद भरतीला आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पदभरतीकरीता आयबीपीएस कंपनीची निवड झाली असून, त्या पद्धतीने करारनामा करण्याची प्रक्रीया चालू आहे. करारनामा होताच प्राधान्यक्रमानुसार आरोग्य विभागाच्या पद भरतीला सुरूवात होईल. तद्नंतर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात उर्वरीत संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. जवळपास ३० संवर्गातील नऊशेहून अधिक जागा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच सराव पेपर साठी येथे क्लीक करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023
पूणे जिल्हा परिषद प्रशासनाने पद भरतीच्या दृष्टीने आयबीपीएस कंपनीची निवड केली !!
मार्च २०१९ मध्ये जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी महाभरती घेण्यात येणार होती. कंपनीची निवड करून उमेदवारांकडून अर्जसुद्धा बोलावण्यात आले होते. मात्र, राज्य सरकार बदलताच तांत्रीक कारण पूढे करून पद भरतीला थांबविण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भरतीला मुहूर्त मिळूच शकला नाही. शेवटी शिंदे-फडणवीस यांचे सरकार राज्यात आले. पदभरतीच्या अनुषंगाने निर्माण झालेला गोंधळ पाहून मुख्यमंत्र्यांनी भरती प्रक्रीया रद्द केली. आणि नव्याने भरती घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांना आकृतीबंध मंजूर करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार जवळपास सर्वच विभागाने आकृतीबंध मंजूर करून घेतला आहे. तर कंपनीची निवड करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत होते. अशात पूणे जिल्हा परिषद प्रशासनाने पद भरतीच्या दृष्टीने आयबीपीएस कंपनीची निवड केली. लगेच करारनामा सुद्धा केला. याच धर्तीवर जिल्हाधिकाऱ्यांसह यवतमाळ जिल्हा परिषदेने सुद्धा कंपनीशी संवाद साधला असून, भरती घेण्याच्या दृष्टीने कंपनीने होकार दर्शविला आहे.
सर्वप्रथम आरोग्य विभागातील पदे भरण्यात येणार !!
आता लवकरच कंपनीशी करारनामा केला जाणार आहे. तर सर्वप्रथम आरोग्य विभागातील पदे भरण्यात येणार आहे. शेवटी जवळपास ३० संवर्गातील रिक्त पदांची भरती कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. विशेष म्हणजे ह्या पद भरतीच्या अनुषंगाने मार्च महिन्याचे वेळापत्रक शासनाने निश्चित केले होते. मात्र, निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पद भरती होणार नाही, परंतू ऑगस्ट ते सप्टेंबर ह्या कालावधीत जिल्हा परिषदेची भरती होणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील जवळपास नऊशेहून अधिक पदांची भरती होणार आहे. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच रिक्त पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे बेरोजगार उमेदवारांमध्ये भरतीची उत्सुकता स्पष्ट दिसून येत आहे.
उमेदवारांच्या शुल्काचा प्रश्न कायम
मार्च २०१९ मध्ये आयोजित महाभरतीतील विविध संवर्गातील लाखो उमेदवारांनी परिक्षा शुल्क भरून रितसर अर्ज दाखल केला होता. मात्र, वेळेवर भरती होवूच शकली नाही. उमेदवार पद भरतीची प्रतीक्षा करीत होते, परंतू मागिल वर्षी भरती रद्दचा निर्णय झाला. त्या उमेदवारांना परिक्षा शुल्क वापस करण्याचे धोरण शासनाने आखले. त्यावर वर्षभरापासून कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होवू शकली नाही.
मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणार होती महा भरती
करारनामा लवकर करून भरती घेऊ
# जिल्हा परिषदेतील पद भरतीच्या दृष्टीने एक कंपनीशी चर्चा झाली होती. मात्र, त्या कंपनीने परिक्षा घेण्यासाठी सकारात्मकता दाखवलीच नाही. शेवटी पूणे जिल्हा परिषदेने निवडलेल्या आयबीपीएस कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच कंपनीशी करारनामा होईल. तद्नंतर पद भरतीला सुरूवात होईल.
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ.
रिक्त पदे, अन् कार्यरत कर्मचाऱ्यांची डोकेदुखी
सध्या जिल्हा परिषदेतील विविध विभागातील पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदांचा प्रभार कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांची डोकेदुखी चांगलीच वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून कुठल्याही विभागातील पदांची भरती झाली नाही. त्यामुळे कामकाजात गतीमानता दिसत नाही. आता आगामी काळात होवू घातलेल्या पद भरतीमुळे प्रशासनालाही मोठा आधार मिळणार आहे.
Zilla Parishad Bharti 2023 Latest Update
Zilla Parishad Bharti 2023: ZP Bharti 2023 The latest update for Zilla Parishad Recruitment 2023. As per the latest news, The announced recruitment of thirteen and a half thousand posts in Zilla Parishad has been canceled. For more details keep visiting www.MahaBharti.in. Further details are as follows:-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरभरती करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून आदेशही काढला होता. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेकडील १३ हजार ५२१ कर्मचाऱ्यांच्या भरतीचे अधिकाऱ्यांनी वेळापत्रकही जाहीर केले. पण, खासगी कंपन्यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी नकार दिल्यामुळे नोकरभरती पुन्हा लांबणीवर गेली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत गट क वर्गाची नोकरभरती करण्यास राज्य सरकारने डिसेंबर २०२२ मध्ये हिरवा कंदील दाखवला होता. एकूण रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
दीड महिन्याचा कालावधी संपला
■ शासनाने जिल्हा परिषद नोकरभरतीचे प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकातील दीड महिन्याचा कालावधी संपला आहे. याबद्दल ग्रामविकास • विभागाकडे विचारणा केल्यानंतर नोकरभरतीचा धोरणात्मक निर्णय झाला नाही. यामुळे भरती प्रक्रिया थांबली आहे.
■ काही अधिकायांनी खासगीत सांगितले की, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी खासगी संस्था इच्छुक नाहीत. संबंधित कंपन्यांकडे एवढी मोठी यंत्रणा नसल्यामुळे नोकरभरती थांबली आहे.
जाहिरातच प्रसिद्ध नाही
- वाहनचालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची • भरतीप्रक्रिया चालू झाली होती. शासनाच्या आदेशानुसार सर्व जिल्हा परिषदांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत बिंदू नामावली अंतिम केली आहे. १ ते ७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार होती.
- ८ ते २२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मागवून पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा एप्रिल महिन्यात घ्यायची होती. पण, शासनाकडून अद्याप जिल्हा परिषद भरतीची जाहिरातच प्रसिद्ध झाली नाही.
राज्यातील जिल्हा परिषदेमधील भरती मागील साडेतीन वर्षांहून अधिक काळ रखडली असून, तीन वेळा ही भरती पुढे ढकलल्यानंतर रद्द करण्यात आली आहे. तीन सरकारांच्या काळात ही भरती रखडल्याने भरती इच्छुक तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आता राज्य सरकारने यातील केवळ आरोग्य विभागाच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर केले असून, उर्वरित पदांच्या भरतीचे काय, ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करून अर्जाची रक्कम भरली आहे त्याचे काय, असा प्रश्न उमेदवार विचारत आहेत.
ZP Recruitment 2023 Details – Those candidates who fill the ZP Recruitment 2019 will get a refund from the respective Zilla Parishad. Now the new ZP recruitment will be held in 2023. Candidates are advised to read the article below to know detailed information about Maharashtra ZP Bharti 2023. We have provided the information about ZP Recruitment 2023 like ZP Exam Date 2023, Apply online dates, etc. below.
तीन सरकारच्या काळातही होऊ शकली नाही भरती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २६ मार्च २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या १३,५२१ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. महाविकास आघाडी सरकारने १४ जून २०२१ रोजी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून ते २८ जून २०२१ रोजी रद्द केले. २८ ऑगस्ट २०२१ रोजी पुन्हा वेळापत्रक जाहीर करून ते २९ सप्टेंबर २०२१ रोजी रद्द केले. १० मे २०२२ रोजी पुन्हा वेळापत्रक जाहीर केले. नंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा २६ ऑगस्ट २०२२ रोजी वेळापत्रक जाहीर करून १९ सप्टेंबर रोजी रद्द केले.
ZP Bharti 2023 Exam Dates and Other Important Dates |
|
Event | Dates |
बिंदू नामावली अंतिम करणे, रिक्त पदांची संवर्गनिहाय आरक्षण निश्चिती करणे, कंपनीची निवड करणे (आवश्यक असल्यास) व तदनुषंगिक सर्व कामे करणे | Up to 31 December 2022 |
ZP Bharti 2023 Notification (Other than Health Services Posts) | 01 January 2023 to 07 January 2023 |
ZP Bharti 2023 Online Application | 08 January 2023 to 22 January 2023 |
Checking Online Application | 23 January 2023 to 30 January 2023 |
Official Work | 03 February 2023 to 03 March 2023 |
ZP Recruitment Admit Card 2023 | 04 March 2023 to 11 March 2023 |
ZP Recruitment Exam Date 2023
आरोग्य पर्यवेक्षक – (सकाळी 11 ते 01 वाजता) औषध निर्माता – (दुपारी 03 ते 05 वाजता) आरोग्य सेवक (पुरूष), आरोग्य सेविका – (सकाळी 11 ते 01 वाजता) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (दुपारी 03 ते 05 वाजता) |
25 and 26 March 2023 |
ZP Recruitment Result 2023 | 27 March 2023 to 27 April 2023 |
निवडणूक आचारसंहिता, कोरोनाही कारणीभूत
२१ ऑक्टोबर २०२२ रोजी शिंदे-फडणवीस सरकारने ही संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आधी निवडणूक आचारसंहिता, त्यानंतर महापोर्टल रद्द झाल्याने आणि कोरोना महामारी अशा विविध कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती.
जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे वय दिवसेंदिवस वाढत असून, भरती होत नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. रखडलेली ही भरती तत्काळ करण्यात यावी.
ग्रामविकास राज्यातील जिल्हा विभागाने परिषदांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे दोन हजार ३० जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून, यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागा भरणार आहे. त्यात राज्यातील जिल्हा परिषदांमधील सहा हजारांवर जागांची भरती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ व गट ‘ड’ या संवर्गाच्या दोन हजार ७२६ जागा रिक्त आहेत. यामध्ये दोन हजार ५३८ जागा या गट ‘क’मधील आहेत, तर १८८ जागा गट ‘ड’मधील आहेत. ग्रामविकास विभागाने राज्यातील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण दोन हजार ७२६ जागा रिक्त असून, त्यात गट ‘ड’मधील १८८ जागा रिक्त आहेत. मात्र, ग्रामविकास विभागाने गट ‘ड’ची रिक्त पदे भरण्यास परवानगी दिलेली नाही. केवळ गट ‘क’ संवर्गातील पदांची भरती करायची असल्यामुळे दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के जागांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. यात भरतीसाठी अर्ज मागवीत, ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यामुळे बेरोजगारांमध्ये मोठी नाराजी होती.
जिल्हा परिषदांमध्ये सुमारे ६ हजार ५०० पदे रिक्त आहेत. कोरोनाकाळात भरतीवर निबंध घालण्यात आले होते.ही पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असून भरतीवरील निबंध उठविण्यात आले आहेत. या रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद कार्यालयांत येणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन कार्यालयांतील गट ‘क’ च्या अंतर्गत येणारी सर्व संवर्गातील ८० टक्के पदे भरण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
रखडलेल्या जिल्हा परिषद ‘गट क’च्या पदभरतीसाठी अखेर मुहूर्त मिळाला. त्यानुसार, रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत पदे भरण्यासाठीचे वेळापत्रक शासनाच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केले. ही पदे भरण्यासाठी १४ ते ३० एप्रिल २०२३या कालावधीत उमेदवारांची ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेही ही पदभरती रखडली होती. १० मे, २०२२ च्या शासन निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच ही पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली होती. ३१ ऑक्टोबर,२०२२ च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार ज्या विभाग किंवा कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही. अशा विभागाकडील गट ‘अ’, ‘ब’,’क’ मधील वाहन चालक व गट ड संवर्गातील पदे वगळून सरळसेवेच्या कोट्यातील ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली. यास अनुसरून हा भरतीबाबतचा आदेश काढण्यात आला आहे. सुरुवातीला ७५ हजार पदे भरण्याची घोषणा झाली होती, परंतु २० टक्के आणि वाहन चालकांची पदे वगळता किमान ५० हजारांहून कर्मचाऱ्यांची ही भरती होईल, असे सांगण्यात आले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
Previous Update –
महत्त्वाचे – जिल्हा परिषद भरती जानेवारी 2023 मध्ये!! | ZP Bharti 2023
Zilla Parishad Bharti 2023: The latest update for Zilla Parishad Recruitment 2023. As per the latest news, There are a total of 13 thousand 521 posts vacant in Zilla Parishad. The recruitment process of 13 thousand 521 vacant posts in Zilla Parishads which was started in 2019 is still stalled in 2022. Further details are as follows:-
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी महाभरतीअंतर्गत याआधी मार्च २०१९ आणि आॅगस्ट २०२१ मध्ये राबविण्यात आलेली नोकर भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने शुक्रवारी (ता.२१) रद्द केली आहे. यामुळे या दोन्ही भरती प्रक्रियेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. हे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेकडून परत देण्यात येणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे. दरम्यान, या रिक्त पदांच्या भरतीसाठी येत्या जानेवारी महिन्यात नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून स्थगित असलेली जिल्हा परिषद नोकर भरती करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने याबाबतचा आदेश जिल्हा परिषदांना दिला आहे. या आदेशाची प्रत शुक्रवारी पुणे जिल्हा परिषदेला मिळाली आहे. जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्ग संवर्गातील रिक्त पदांचा सुधारित आकृतिबंध तयार केला जाणार आहे. हा सुधारित आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर नव्याने या रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी निश्चित करून देण्यात आला आहे. दरम्यान, ही भरती प्रक्रिया आता पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषद पातळीवरच राबविली जाणार आहे.
पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास परवानगी
पूर्वी जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील रिक्त पदे ही दरवर्षी भरली जातात. यासाठी जिल्हा परिषद स्तरावरच भरती प्रक्रिया राबविली जाते. जिल्हा परिषदेत ‘क’ संवर्गातील विविध प्रकारची १८ पदे आहेत. यापैकी आरोग्य विभागातील विविध पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. उर्वरित सर्व संवर्गातील ‘क’ वर्गीय रिक्त पदे ही सुधारित आकृतिबंध मंजूर झाल्यानंतरच भरावीत, असे ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राजकीय नेत्यांना केवळ सत्ता दिसते, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते, पण नोकरीसाठी परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार दिसत नाहीत का, जिल्हा परिषद भरती सातत्याने का पुढे ढकलली जाते, असा संताप उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.
Previous Update –
ZP Bharti 2022
Zilla Parishad Bharti 2022 : Recruitment of 13 thousand 521 posts of various forms under Zilla Parishad in the state has been stalled for four years. On March 3, 2019, the government advertised for various posts in the Zilla Parishads of Maharashtra. The highest number of 729 posts is in Ahmednagar district, while the lowest number of 142 posts is in Bhandara Zilla Parishad. A total of 12 lakh 72 thousand 391 candidates have filed applications for these 13 thousand 521 posts from all over the state. Further details are as follows:-
आनंदाची बातमी!! रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 2 हजार 844 पदांची होणार बंपर भरती
नवीन अपडेट – जिल्हापरिषदेच्या शाळांत शिक्षकांची 450 पदे रिक्त!!
ZP प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी 200 स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय!!
महत्त्वाचे – ‘या’ जिल्हा परिषदेत सरळ सेवेची 498 पदे रिक्त!!
महत्त्वाचे – जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची 1639 पदे रिक्त!!
राज्यात पवित्र पोर्टल असताना MPSC चा अट्टाहास का?
जिल्हा परिषदेत 1 हजाराहून अधिक पदे रिक्त!! जाणून घ्या सविस्तर माहिती
विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा
जिल्हा परिषद भरती महत्त्वाचे सराव प्रश्नसंच
Maharashtra ZP Bharti 2022
राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत विविध स्वरूपाच्या 13 हजार 521 पदांची नोकरभरती चार वर्षांपासून रखडली आहे. या भरतीसाठी ग्रामीण विकास विभाग स्वमान्य प्रशासन विभागाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकताना दिसते आहे. विशेष असे की, या भरतीच्या अनुषंगाने राज्यभरातील सुमारे १३ लाख सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब युवकांकडून परीक्षा शुल्क म्हणून गोळा केलेली २५ कोटी ८७ लाख रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत पडून आहे.
Maharashtra Zilla Parishad Bharti 2022
३ मार्च २०१९ ला शासनाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात काढली होती. त्यात सर्वाधिक ७२९ पदे अहमदनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी १४२ पदे भंडारा जिल्हा परिषदेतील आहेत. या एकूण १३ हजार ५२१ पदांसाठी राज्यभरातून १२ लाख ७२ हजार ३९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. खुल्या प्रवर्गाच्या एका पदासाठी ५०० रुपये, तर आरक्षित वर्गासाठी २५० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले गेले.
रिक्त असलेल्या पदांचे नाव
Junior Engineer, Gramsevak, Pharmacist, Laboratory Technician, Health Worker, Health Worker, Extension Officer, Agriculture & Statistics, Architectural Assistant, Livestock Supervisor, Senior Assistant (Accounts), Senior Assistant (Clerk), Anganwadi Supervisor, Junior Accounts Officer, Junior Mechanics
जिल्हा परिषद अंतर्गत ‘आरोग्य’च्या 550 हून अधिक पदे भरणार!!
Zilla Parishad Bharti 2022 : Movements have started for the recruitment of Class C staff in the Health Department of Zilla Parishad. The Ministry of Rural Development has instructed to prepare new diagrams in this category and submit them to the Government. Therefore, the way has been cleared to fill 582 posts in the health department in Nagar Zilla Parishad also. Further details are as follows:-
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील क वर्ग कर्मचारी पदे भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामविकास मंत्रालयाने या संवर्गातील नवीन आकृतीबंध तयार करून शासनाला सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेतही आरोग्य विभागाचे 582 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- दिवसेंदिवस जिल्ह्यातील लोकसंख्या वाढत असून, तसे आरोग्य विभागातील अनेक कर्मचारीही निवृत्त होत आहेत.
- परिणामी, रिक्त जागाही वाढत्या आहेत.
- त्यातून प्रशासकीय कामावर परिणाम होताना दिसून येतो.
- वास्तविकतः राज्य सरकारने क वर्गातील औषध निर्माता, आरोग्य सेवक महिला व पुरुष, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पाच संवर्गातील रिक्त जागांची भरती करण्यासाठी 2019 मध्ये एजन्सी नेमली होती.
- नगर जिल्ह्यामध्येही 582 पदांसाठी अर्ज मागावले होते. परंतु कोरोना आणि तांत्रिक अडचणींनी ही भरती झाली नाही.
- आता मात्र शासनाने नव्याने आदेश काढून ही भरती करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- शिवाय जिल्हा परिषद स्तरावरील निवड समितीलाच भरतीचे अधिकार देण्यात आले आहेत.
- शासनाकडून लवकरच याबाबत मार्गदर्शक सूचना मिळणार आहेत.
- 2019 मध्ये अर्ज केलेल्यांचीच परीक्षा घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
आरोग्य विभागातील क वर्गातील पदांच्या भरतीबाबत शासनाने आदेश काढले आहेत. त्यानुसार 2019 मध्ये ज्या पदांसाठी अर्ज मागावले होते, त्याच जागा भरल्या जातील. याबाबत जिल्हा निवड समितीला ते अधिकार असतील.
डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
ZP Group C Bharti 2022
Zilla Parishad Bharti 2022 : The Rural Development Department had taken over the right to recruit from Group ‘C’ in the Zilla Parishad. However, recruitment has not taken place yet. So now it has been given back to the council. The government has clarified that the recruitment will be done through the district selection board.
Zilla Parishad Group C Recruitment 2022
जिल्हा परिषदेतील गट ‘क’ मधील पद भरतीचे अधिकार ग्राम विकास विभागाने आपल्याकडे घेतले होते. परंतु, अद्याप भरतीच झाली नाही. त्यामुळे आता हे पुन्हा जिल्हा परिषदेकडे देण्यात आला आहे. जिल्हा निवड मंडळ मार्फत ही भरती करण्यात येणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तत्कालीन सरकारने मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी तयारी जोरात सुरु केली. अन्त्रच्या काळात राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरीत 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. नोकर भरती करताना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्याने नव्याने बिंदूनामावलीत बदल करण्यात आला होता.
त्याचा भरती प्रक्रियेवर परिणाम झाला. ही बिंदूनामावली अंतिम होत असतानाच केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकाला 10 टक्के आरक्षण दिले त्यामुळे पुन्हा बिंदूनामावली बदलावी लागली. यात बराच काळ केला. त्यामुळे पुन्हा भरती प्रक्रिया लांबली. दरम्यानच्या काळात महाभरती पोर्टलच्या माध्यमातून शासनाच्या हराम विकास विभागाकडून ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या पदांकरिता राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे सांगण्यात येते.
Zilla Parishad Bharti 2022 | जिल्हा परिषद, आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती!!
Zilla Parishad Bharti 2022 : Recruitment process has been started for 10 thousand 127 vacancies in the categories of Health Workers, Nurses, Laboratory Technicians, Pharmaceutical Manufacturers and Health Supervisors in the Zilla Parishads of the State. Further details are as follows:-
खुशखबर – राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे. पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पाच संवर्गासाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारित आकृतीबंधास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
ZP Bharti Vacancy Details
आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे, औषध निर्मात्याची ३२४ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६, आरोग्य सेवकाची तीन हजार १८४ पदे आणि आरोग्य सेविकांची सहा हजार ४७६ पदे अशी एकूण १० हजार १२७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
00
नाशिक जि.प मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका पद भरती कधी होणार?
New Update