महत्त्वाचे – राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये 13 हजार 521 पदांची भरती लवकरच!! | ZP Bharti 2022

Zilla Parishad Bharti 2022

ZP Bharti 2022

Zilla Parishad Bharti 2022 : Recruitment of 13 thousand 521 posts of various forms under Zilla Parishad in the state has been stalled for four years. On March 3, 2019, the government advertised for various posts in the Zilla Parishads of Maharashtra. The highest number of 729 posts is in Ahmednagar district, while the lowest number of 142 posts is in Bhandara Zilla Parishad. A total of 12 lakh 72 thousand 391 candidates have filed applications for these 13 thousand 521 posts from all over the state. Further details are as follows:-

राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत विविध स्वरूपाच्या 13 हजार 521 पदांची नोकरभरती चार वर्षांपासून रखडली आहे. या भरतीसाठी ग्रामीण विकास विभाग स्वमान्य प्रशासन विभागाकडे बोट दाखवून आपली  जबाबदारी झटकताना दिसते आहे. विशेष असे की, या भरतीच्या अनुषंगाने राज्यभरातील सुमारे १३ लाख सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब युवकांकडून परीक्षा शुल्क म्हणून गोळा केलेली २५ कोटी ८७ लाख रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत पडून आहे.

Zilla Parishad Bharti 2022

३ मार्च २०१९ ला शासनाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात काढली होती. त्यात सर्वाधिक ७२९ पदे अहमदनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी १४२ पदे भंडारा जिल्हा परिषदेतील आहेत. या एकूण १३ हजार ५२१ पदांसाठी राज्यभरातून १२ लाख ७२ हजार ३९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. खुल्या प्रवर्गाच्या एका पदासाठी ५०० रुपये, तर आरक्षित वर्गासाठी २५० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले गेले.

Zilla Parishad Bharti 2022 – District-Wise Vacancy 

अशी आहेत राज्यातील जिल्हानिहाय पदे  

 • अहमदनगर – ७२९
 • अमरावती – ४६३
 • अकोला – २४२
 • औरंगाबाद – ३६२
 • भंडारा – १४२
 • बीड – ४५६
 • चंद्रपूर – ३२३
 • गोंदिया – २५७
 • गडचिरोली – ३३५
 • हिंगोली – १५०
 • नाशिक – ६८७
 • लातूर – २८६
 • नंदुरबार – ३३३
 • पालघर – ७०८
 • परभणी – २५९
 • रायगड – ५१०
 • सातारा – ७०८
 • नागपूर – ४१८
 • पुणे – ५९५
 • बुलडाणा – ३३२
 • वाशिम – १८२
 • यवतमाळ – ५०५
 • जालना – ३२८
 • उस्मानाबाद – ३२०
 • ठाणे – १९६
 • नांदेड – ५५७
 • रलागिरी – ४६६
 • सिंधुदुर्ग – १६२
 • धुळे – २१९
 • वर्धा – २६७
 • जळगाव – ६०७
 • कोल्हापूर – ५३२
 • सांगली – ४७१
 • सोलापूर – ४१४

ZP Bharti 2022 – Name of Posts

रिक्त असलेल्या पदांचे नाव 

Junior Engineer, Gramsevak, Pharmacist, Laboratory Technician, Health Worker, Health Worker, Extension Officer, Agriculture & Statistics, Architectural Assistant, Livestock Supervisor, Senior Assistant (Accounts), Senior Assistant (Clerk), Anganwadi Supervisor, Junior Accounts Officer, Junior Mechanics

Zilla Parishad Bharti 2022


जिल्हा परिषद अंतर्गत ‘आरोग्य’च्या 550 हून अधिक पदे भरणार!!

Zilla Parishad Bharti 2022 : Movements have started for the recruitment of Class C staff in the Health Department of Zilla Parishad. The Ministry of Rural Development has instructed to prepare new diagrams in this category and submit them to the Government. Therefore, the way has been cleared to fill 582 posts in the health department in Nagar Zilla Parishad also. Further details are as follows:-

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील क वर्ग कर्मचारी पदे भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामविकास मंत्रालयाने या संवर्गातील नवीन आकृतीबंध तयार करून शासनाला सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेतही आरोग्य विभागाचे 582 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 • दिवसेंदिवस जिल्ह्यातील लोकसंख्या वाढत असून, तसे आरोग्य विभागातील अनेक कर्मचारीही निवृत्त होत आहेत.
 • परिणामी, रिक्त जागाही वाढत्या आहेत.
 • त्यातून प्रशासकीय कामावर परिणाम होताना दिसून येतो.
 • वास्तविकतः राज्य सरकारने क वर्गातील औषध निर्माता, आरोग्य सेवक महिला व पुरुष, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पाच संवर्गातील रिक्त जागांची भरती करण्यासाठी 2019 मध्ये एजन्सी नेमली होती.
 • नगर जिल्ह्यामध्येही 582 पदांसाठी अर्ज मागावले होते. परंतु कोरोना आणि तांत्रिक अडचणींनी ही भरती झाली नाही.
 • आता मात्र शासनाने नव्याने आदेश काढून ही भरती करण्याच्या सूचना केल्या आहेत.
 • शिवाय जिल्हा परिषद स्तरावरील निवड समितीलाच भरतीचे अधिकार देण्यात आले आहेत.
 • शासनाकडून लवकरच याबाबत मार्गदर्शक सूचना मिळणार आहेत.
 • 2019 मध्ये अर्ज केलेल्यांचीच परीक्षा घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

आरोग्य विभागातील क वर्गातील पदांच्या भरतीबाबत शासनाने आदेश काढले आहेत. त्यानुसार 2019 मध्ये ज्या पदांसाठी अर्ज मागावले होते, त्याच जागा भरल्या जातील. याबाबत जिल्हा निवड समितीला ते अधिकार असतील.

डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद


ZP Group C Bharti 2022

Zilla Parishad Bharti 2022 : The Rural Development Department had taken over the right to recruit from Group ‘C’ in the Zilla Parishad. However, recruitment has not taken place yet. So now it has been given back to the council. The government has clarified that the recruitment will be done through the district selection board.

Zilla Parishad Group C Recruitment 2022

जिल्हा परिषदेतील गट ‘क’ मधील पद भरतीचे अधिकार ग्राम विकास विभागाने आपल्याकडे घेतले होते. परंतु, अद्याप भरतीच झाली नाही. त्यामुळे आता हे पुन्हा जिल्हा परिषदेकडे देण्यात आला आहे. जिल्हा निवड मंडळ मार्फत ही भरती करण्यात येणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा  

ZP भरती नवीन टेस्ट सिरीज

जिल्हा परिषद भरती महत्त्वाचे सराव प्रश्नसंच

तत्कालीन सरकारने मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी तयारी जोरात सुरु केली. अन्त्रच्या काळात राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरीत 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. नोकर भरती करताना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्याने नव्याने बिंदूनामावलीत बदल करण्यात आला होता.

Zilla Parishad Bharti 2022

त्याचा भरती प्रक्रियेवर परिणाम झाला. ही बिंदूनामावली अंतिम होत असतानाच केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकाला 10 टक्के आरक्षण दिले त्यामुळे पुन्हा बिंदूनामावली बदलावी लागली. यात बराच काळ केला. त्यामुळे पुन्हा भरती प्रक्रिया लांबली. दरम्यानच्या काळात महाभरती पोर्टलच्या माध्यमातून शासनाच्या हराम विकास विभागाकडून ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या पदांकरिता राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे सांगण्यात येते.


Zilla Parishad Bharti 2022 | जिल्हा परिषद, आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती!!

Zilla Parishad Bharti 2022 : Recruitment process has been started for 10 thousand 127 vacancies in the categories of Health Workers, Nurses, Laboratory Technicians, Pharmaceutical Manufacturers and Health Supervisors in the Zilla Parishads of the State. Further details are as follows:-

खुशखबर – राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.

Zilla Parishad Bharti 2022

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे. पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पाच संवर्गासाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारित आकृतीबंधास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

ZP Bharti Vacancy Details

आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे, औषध निर्मात्याची ३२४ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६, आरोग्य सेवकाची तीन हजार १८४ पदे आणि आरोग्य सेविकांची सहा हजार ४७६ पदे अशी एकूण १० हजार १२७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.


जिल्हा परिषदेतील 2400 पदे लवकरच सरळसेवा भरतीने भरणार!!

Zilla Parishad Bharti 2022: Rural Development Minister Hasan Mushrif on Monday announced that the posts of ‘C’ and ‘D’ category employees in the Zilla Parishad would be filled on behalf of the Zilla Parishad. Further details are as follows:-

खुशखबर!! 3 वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया होणार सुरु, 5300 जणांना मिळणार नोकरी

जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गातील कर्मचाऱ्यांची पदे जिल्हा परिषदेच्या वतीने सरळ सेवेने भरण्यात येतील, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली. 

जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गातील पदांचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय मागे घेण्यात येत आहे. ‘क’ वर्गातील २३२८ व ’ड’ वर्गातील १०० अशी २४२८ पदे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत भरण्यात येतील, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

Zilla Parishad Bharti 2022 – Vacancy Details 

क’ व ‘ड’ वर्गातील पदे

‘क’वर्गामध्ये कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ यांत्रिकी यांचा तर ‘ड’ वर्गात शिपाई पदाचा समावेश आहे.

ZP Recruitment 2022 | Zilla Parishad Bharti 2022

जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या रिक्त जागा सरळ सेवा भरतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी (दि.२) दिली. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आदेश प्रदान कार्यक्रम आज जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

 • जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या जागा आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
 • परंतु, हा निर्णय आज मागे घेत मंत्री मुश्रीफ यांनी या जागा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या वतीने भरण्यात येतील, असे स्पष्ट केले.

Zilla Parishad Recruitment 2022 | ZP Bharti 2022

Zilla Parishad Bharti 2022: Recruitment for 13 thousand 521 posts in all Zilla Parishads of the state, which has been stalled for three years, has been cleared. The state’s general administration department has approved the recruitment and selected a company for the examination. As a result, more than 20 lakh applicants have been relieved. Further details are as follows:-

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५२१ पदांची तीन वर्षांपासून रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पदभरतीला मान्यता दिली असून परीक्षेसाठी एका कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे २० लाखांहून अधिक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. 

राज्यात मेगा भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदे मधील १३ हजार ५२१ जागांचा समावेश होता. यासाठी मार्च २०१९ मध्ये २० लाखांवर अर्ज आले. एका उमेदवाराने तीन ते चार हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केलेत. वर्षभरापासून विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेचीही पदभरती होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती.

मात्र, सरकारकडून कुठलीच हालचाल नसल्याने रोष वाढला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग आता सुकर झाल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सामान्य प्रशासन विभागाने भरतीसाठी परवानगी दिली असून शासनाने नव्याने नेमलेल्या तीन कंपन्यांपैकी एकाची परीक्षेसाठी निवड करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामविकास व पंचायत राज विभाग लवकरच एका कंपनीची निवड करून भरती प्रक्रियेला सुरुवात करणार आहे.

महापरीक्षा संकेतस्थळ बंद झाल्याने पुढे सरकारने परीक्षेसाठी चार खासगी कंपन्यांची निवड केली. यातील न्यासा कंपनीसोबत ग्रामविकास विभागाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, न्यासा कंपनीसोबतचा करारही सरकाने रद्द केल्याने जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये पुन्हा खोडा निर्माण झाला होता. शासनाने आता नव्याने तीन कंपन्या निवडल्या असून त्यामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या ‘म्हाडा’ परीक्षेत राज्यभर बनावट उमेदवारांना पकडण्यात आले होते. आता जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे परीक्षेत पुन्हा गोंधळ टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, बायमेट्रिक, मोबाईल जॅमर व अंग तपासणी बंधनकारक करावी.

– नीलेश गायकवाड, सचिव, एमपीएससी समन्वय समिती.


Zilla Parishad Bharti 2022

Zilla Parishad Bharti 2022: The recruitment process for 13 thousand 521 posts in all the Zilla Parishads in the state has been stalled for three years. More than 20 lakh applicants are waiting as the recruitment process is not being carried out even after completing the application process for this post in March 2019. Further details are as follows:-

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील 13 हजार 521 पदांची भरती प्रक्रिया तीन वर्षांपासून रखडली आहे. मार्च २०१९ मध्ये या प्दानास्ठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करूनही भरती प्रक्रिया घेतली जात नसल्याने 20 लाखांहून अधिक अर्जदार प्रतीक्षेत आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

परीक्षेतील अडचणी काय?

जिल्हा परिषदेच्या १३ हजार पदांची परीक्षा ही जिल्हा निवड समितीकडून घेण्यात येणार होती. मात्र, नंतर महापरीक्षा संकेतस्थळावरून परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. परंतु, या संकेतस्थळावरील गोंधळ समोर आल्याने ते बंदच करण्यात आले. पुढे सरकारने परीक्षेसाठी चार खासगी कंपन्यांची निवड केली. यातील न्यासा कंपनीसोबत ग्रामविकास विभागाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, आता न्यासा कंपनीसोबतचा करारही सरकाने रद्द केल्याने जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये पुन्हा खोडा निर्माण झाला. शासनाने आता नव्याने तीन कंपन्या निवडल्या असून त्यामार्फत परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

ZP Bharti 2022 | ZP Recruitment 2022

 

फडणवीस सरकारच्या काळात राज्यात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदेमधील १३ हजार ५२१ जागांचा समावेश होता. यासाठी मार्च २०१९ मध्ये २० लाखांवर अर्ज आले. एका उमेदवाराने तीन ते चार हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केलेत. मात्र, राज्य शासनाने कधी करोनाचे तर कधी आर्थिक अडचणीचे कारण समोर केल्याने परीक्षा लांबणीवर पडली. वर्षभरापासून विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेचीही पदभरती होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र, सरकारकडून कुठलीच हालचाल नाही. राज्य सरकारने पदभरतीसंदर्भात त्वरित निर्णय न घेतल्यास लाखो उमेदवारांकडून येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा एमपीएससी समन्वय समितीने दिला आहे.

Zilla Parishad Recruitment 2022

Zilla Parishad Bharti 2022

परीक्षा केंद्रांवर कठोर निर्बंधांची मागणी

 • नुकत्याच झालेल्या ‘म्हाडा’ परीक्षेत राज्यभर डमी उमेदवारांना पकडण्यात आले होते. आता जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे परीक्षेत पुन्हा गोंधळ टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, बायमेटृकि, मोबाईल जॅमर व अंग तपासणी बंधनकारक करावी, अशी मागणीही एमपीएससी समन्वय समितीने केली आहे.
 • लाखो उमेदवारांनी तीन वर्षांआधी जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी अर्ज केले होते. बेरोजगारांचे कोटय़वधी रुपये सरकारकडे पडून आहेत. पदभरती करायची नसेल तर सरकारने व्याजासकट उमेदवारांचे पैसे परत करावे अन्यथा त्वरित पदभरती घ्यावी.
 • भरती संदर्भात विभाग अधिक चिंतेत असून सातत्याने प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा लांबली आहे. सध्या सामान्य प्रशासनाकडे हे प्रकरण आहे. काही तांत्रिक बाबींवर तोडगा निघताच परीक्षा घेतली जाईल.
 • मार्च २०१९ मध्ये या पदांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करूनही भरती घेतली जात नसल्याने २० लाखांहून अधिक अर्जदार परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.

 

Table of Contents


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Ajay Madavi says

  Website sir Last date sanga

 2. Atul says

  From भरण्याची date
  Web sait

 3. प्रीती डहाळे says

  कधी आहे जिल्हा परिषद ची परीक्षा?….

 4. Shubham sanap says

  Bsc job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड