आनंदाची बातमी, पोलिस भरतीत आता आदिवासी उमेदवारांना ५ सेंमीची सूट! Maharashtra Police Bharti 2024 @policerecruitment2024.mahait.org

Maharashtra Police Bharti 2024 @policerecruitment2024.mahait.org

Maharashtra Police Bharti 2024

राज्य सरकारने पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ सेंमी उंचीची सूट दिली आहे. ही अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद आहे. यामुळे पोलिस भरतीत आदिवासी तरुण तरुणींना आता मोठा लाभ होणार आहे. राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेमधील विहित केलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटरची शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी केळापूर-आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी निवेदन दिले होते. शासनाने आदिवासी उमेदवारांना पाच सेंटिमीटरची सूट देण्याबाबत ४ ऑक्टोबरसी राजपत्र जारी केले आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम (१९५१चा २२) याच्या कलम ५ च्या खंड (व) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या नियमास महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश (सुधारणा) नियम, २०२४ संबोधले जाणार आहे. जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात, अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटर इतकी शिथिलता यापुढे पोलिस भरतीत देण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 


मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास ३५ हजार पोलिसांची भरती झाली. पण आपल्या साठी लवकरच अजून एक पोलीस भरतीची संधी मिळणार आहे. आता पुन्हा डिसेंबरमध्ये जवळपास 7,500 पदांची मोठी भरती होणार आहे. साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत. राज्यात २०२२ व २०२३ मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. सध्या, विवीध विभागांमध्ये रिक्त पदांचा तपशील मागविण्यात येत आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Police Bharti

 

करोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८ हजार व १७ हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, लवकरात लवकर सध्याची १४ हजार ४७१ पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाने न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीराने सुरू झाली होती. परंतु ती ही लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलिस भरतीला सुरुवात होणार आहे.

प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढणार

राज्यातील १० पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमताही आता वाढविण्यात आली आहे. सध्या १० प्रशिक्षण केंद्रांमध्ये ८४०० पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. येणाऱ्या काळात त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.


राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन व उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले होते. मराठा आरक्षणाचा लढा सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजातील ईडब्ल्यूएस प्रवर्गातील भावी पोलिसांची उमेदवारी स्थगित करण्यात आली आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती स्थगिती ठेवण्याचे आदेश 30 जुलैला अपर महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

राज्य पोलिस दलातील भरती प्रक्रियेत ‘एसईबीसी’ व ‘ओबीसी’ ऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता त्यांची प्रकरणे स्थगित ठेवण्याचे आदेश प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिले आहेत. त्यातून बृहन्मुंबई, लोहमार्ग, हिंगोली पोलिसांना वगळण्यात आले आहे. नाशिक जिल्हयातील तात्पुरत्या निवड यादीतील EWS प्रवर्गातील 6 पैकी 4 मराठा उमेदवारांनी हमीपत्र देण्यास नकार दिल्याची माहिती मिळत आहे.

या निर्णयामुळं मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. तर,  इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मात्र मोकळा ठेवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी 16 जुलैला जाहीर केल्यानंतर अशा उमेदवारांना हमीपत्र बंधनकारक करण्यात आले होते. मात्र काही विद्यार्थ्यांनी याला नकार दिल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची भरती थेट स्थगित करण्यात आली आहे.

मराठा समाजाचा उमेदवारांची निवड करण्याबाबत प्रवर्गाचा गोंधळ अद्याप सुरूच आहे. एसीबीसी किंवा खुला प्रवर्गापैकी एकाची निवड करण्यासंबंधात ईडब्ल्यूएस प्रवर्गातील एकाची निवड करण्याचे आदेश देण्यात आले होते. भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडून हमीपत्र घेण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र नाशिकमध्ये चार उमेदवारांनी यासाठी नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, आता शासन निर्णय होत नाही तोवर केवळ या उमेदवारांचे प्रशिक्षण स्थगित करण्याचे आदेश कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

…म्हणून प्रवर्ग बदलास नकार !

शहर पोलिस आयुक्तालयाकडे प्राप्त उमेदवार अर्जापैकी चौघांनी प्रवर्ग बदलण्यास नकार दिला आहे. कारण प्रवर्ग बदलला तर ते प्रतीक्षा यादीत जातील, आता सध्या ते तात्पुरत्या निवड यादीत आहेत. यामुळे ते ‘ईडडब्ल्यूएस’ प्रवर्गावर ठाम राहिले आहे. त्यांनी याच प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावे, अशी लेखी
विनंती पोलिस आयुक्तालयाकडे केली आहे.

…आता पुढील शासकीय आदेशाकडे लागले लक्ष !

पोलिस आयुक्तालयासह राज्यभरातून ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांनी हमीपत्र देण्यास नकार देत त्यावर आक्षेप घेतला होता. यामुळे आता मंगळवारी नव्याने प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी पत्र काढले आहे. या पत्रानुसार संबंधित उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता तात्पुरती स्थगीत ठेवून त्याप्रकरणी पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी, असे म्हटले आहे. यामुळे शासनाकडून काय धोरण निश्चित केले जाते व नवीन शासननिर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नियुक्तीची कार्यवाही पुढे सुरू ठेवा
डब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांच्या उमेदवारीचा अपवाद वगळता उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही सुरू ठेवण्यात यावी, असेही नव्याने जारी करण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाकडून धोरण निश्चित होताच नवीन शासननिर्णय प्राप्त होताच संबंधित पोलिस आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयांना कळविण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे.


Maharashtra Police Vacancy 2024 Details

पोलीस भरती साठी या वर्षी अजून एक संधी प्राप्त होणार आहे. २०२४ च्या अखेरीस अजून एक नवीन भरती प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो, प्राप्त माहिती नुसार राज्यात सध्या २०२३ मधील रिक्त असलेल्या १७ हजार ४७१ पोलिस जागांवर भरती सुरू असून १ सप्टेंबरपूर्वी ही भरती संपणार आहे. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या काळातील अंदाजे सात हजार पोलिसांची भरती होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोनवेळा पोलिस भरती झाली आहे. त्यांच्याच कार्यकाळात १९७६ चा गृह विभागाचा आकृतिबंध बदलून नवीन तयार केला. वाढती गुन्हेगारी, शहर-जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलिस ठाण्यांची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार मागील अडीच-तीन वर्षांत ३० हजार पोलिसांची भरती झाली आहे. राज्यातील दहा पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता देखील आता वाढविण्यात आली असून सध्या तेथील नवप्रविष्ठ पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

तत्पूर्वी, १ सप्टेंबरपर्यंत सध्याची १४ हजार ४७१ जागांची पोलिस भरती पूर्ण करण्याचा आदेश गृह विभागाने सर्वच जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. आतापर्यंत २५ जिल्ह्यांत पोलिस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बॅँडमॅनसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर नवीन पोलिस भरतीला सुरवात होणार आहे.

रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव

सध्याच्या १७ हजार ४७१ पोलिस जागांसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापूर्वी १३ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या भरतीला सुरवात होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

शहर-जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांनी द्यावेत प्रस्ताव

अनेक शहरांचा विस्तार वाढला, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, लोकसंख्याही वाढली, वाहनांची संख्या वाढली, अशावेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शहर-जिल्ह्यात नवीन पोलिस ठाण्यांची गरज आहे, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, पोलिस शिपाई अशी पदे कमी आहेत, त्यांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर करावेत. त्याचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ वाढवून मिळेल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

 

 

पोलीस भरती 2024 महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती २०२४ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती २०२४ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅पोलीस भरती २०२४ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 | Pune Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2024
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2024 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

 


Documents Required for Maharashtra Police Recruitment 2024 Application Form

  • Aadhar Card. (आधार कार्ड.
  • Residence Certificate. (निवास प्रमाणपत्र.)
  • 10th Marksheet. (10वी मार्कशीट.)
  • 12th Marksheet. (12वी मार्कशीट.)
  • Graduation Certificate. (पदवी प्रमाणपत्र.)
  • Computer Proficiency Certificate. (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र.)
  • Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र.
  • Signature. (स्वाक्षरी.)
  • Photograph. (फोटो.

 

Police bharti information in marathi & police bharti mahiti


महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

Maharashtra Police Bharti 2024: पुढील महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर)  तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

Maharashtra Police Bharti 2024 | Shipai Bharti 2024 

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी? 

What is the height of Maharashtra police? | Is height important for Constable?

महिला (Female) महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष (Male) पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject) गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

Physical Eligibility For Police Bharti 2024 | Maharashtra Police Bharti 2024 

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक (4 किलो) 10 Marks
एकूण गुण (Total Marks) 50 Marks
  • Maharashtra Police Bharti 2024 
  • Maharashtra Police Bharti 2022 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
  • Age Limit For Maharashtra Police Bharti 2024 

Police Bharti Age Limit 2024

Category (प्रवर्ग) Age (वय)
खुला 18 ते 28
मागास 18 ते 33
प्रकल्पग्रस्थ उमेदवार 18 ते 45
माजी सैनिक उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील.
अनाथ उमेदवार 18 ते 33
भूकंपग्रस्थ उमेदवार 18 ते 45
खेळाडू 18 ते 38
पोलीस पाल्य 18 ते 33
गृहरक्षक 18 ते 33
महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33

Age Limit For Maharashtra Police Bharti। Police Recruitment 2024

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Maharashtra Police Recruitment 2024

Minimum Height For Female Candidates 155 CM
Minimum Height For Male Candidates 165 CM

Maharashtra Police Recruitment | Application Fees Details

For General Category ₹450
For Reserve Category ₹350
For Ex-Serviceman Candidates -NA-

 

Selection Procedure For Maharashtra Police Recruitment 2024

  • Maharashtra Police Bharti 20221, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the Maharashtra Police Bharti 2022 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

पोलीस भरती 2022 – महत्त्वाचे कागदपत्रे | Maharashtra Police Bharti 2024

  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
    ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
  • Maharashtra Police Bharti 2024 – Required Documents List
  • Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
  • Candidates availing the benefit of caste reservation require a caste certificate.
  • MS-CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification
  • The candidate must have an identity card while appearing for the written test. For this PAN card, passport, driving license, voter
    Identity card, updated bank passbook, Aadhaar card
  • Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non-Criminal Layer Certificate
  • Attested photocopies of certificates
  • Caste certificate validity
  • Caste Certificate for Socially, Educationally Backward Candidates
  • Certificate of Financially Backward
  • Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for players

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 – जिल्हानिहाय PDF जाहिराती 

मुंबई पोलीस भरती 2024 – 8,070 पदे  
पुणे पोलीस भरती 2024 – 795 पदे
पुणे ग्रामीण पोलीस भरती 2024 – 669 पदे
ठाणे पोलीस भरती 2024 – 521 पदे
पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2024 – 216 पदे
मीरा भाईंदर पोलीस भरती 2024 – 996 पदे 
नागपूर पोलीस भरती 2024 – 429 पदे
नवी मुंबई पोलीस भरती 2024 – 204 पदे
औरंगाबाद पोलीस भरती 2024 – 15 पदे
अमरावती पोलीस भरती 2024 – 41 पदे
सोलापूर पोलीस भरती 2024 – 171 पदे
मुंबई रेल्वे पोलीस भरती 2024 – 620 पदे
ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2024 – 116 पदे
रायगड पोलीस भरती 2024 – 278 पदे
पालघर पोलीस भरती 2024 – 216 पदे
सिंधुदुर्ग पोलीस विभागात 121 पदांची भरती- अर्ज करा
रत्नागिरी पोलीस विभागात 131 पोलीस शिपाई पदांची नवीन भरती
नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2024 – 179 पदे
अहमदनगर पोलीस भरती 2024 – 139 पदे
धुळे पोलीस विभाग नवीन भरती – 42 पदे
सातारा पोलीस विभागात 145 रिक्त पदांची नवीन भरती
कोल्हापूर पोलीस भरती 2024 – 24 पदे
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2024 – 54 पदे
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात शिपाई पदाच्या 39 जागा रिक्त
नांदेड पोलीस भरती 2024 – 185 पदे
परभणी पोलीस भरती प्रक्रिया 75 पदांसाठी होणार
हिंगोली पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती
नागपूर ग्रामीण पोलीस विभागात 179 पदांची भरती
भंडारा पोलीस विभाग अंतर्गत 117 पदांची भरती
चंद्रपूर पोलीस भरती 2024 – 275 पदे
वर्धा पोलीस भरती 2024 – 126 पदे
गडचिरोली पोलीस विभागात 508 पदांची भरती लवकरच
गोंदिया पोलीस भरती 2024 – 194 पदे
अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2024 – 197 पदे
वाशीम चालक पोलीस शिपाई भरती 2024
अकोला पोलीस भरती 2024 – 366 पदे
बुलढाणा पोलीस विभागात पोलीस शिपाई पदांची भरती
यवतमाळ पोलीस भरती 2024 – 302 पदे
पुणे रेल्वे पोलीस भरती 2024 – 124 पदे
औरंगाबाद रेल्वे पोलीस भरती 2024 – 154 पदे
नागपूर रेल्वे पोलीस भरती 2024 – 28 पदे
लातूर पोलीस नवीन भरती – 28 पदे

Maharashtra Police Bharti 2022

 

FAQs

Police Bharti 2024 Maharashtra Date?

Maharashtra Police Bharti 2024 is starting from  November 2024, last date to apply for this recruitment will be available soon.

What is the Maharashtra Police Shipai Salary 2024?

The Salary for Constable posts is Rs.5200 To Rs. 20200 with Grade Pay of Rs 2020.

What is the official website for Maharashtra State Police Recruitment 2024?

The official website to apply for Maharashtra Police Bharti 2024 is www.mahapolice.gov.in.

What is the Minimum Age limit for Maharashtra Police Constable Bharti 2024?

The minimum age required for Constable Bharti 2024 is 19 Years.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

120 Comments
  1. MahaBharti says

    Thanks for Update

  2. Rathod Krishna Laxman says

    My a 10th pass and my eyr 17
    My detofbardh 15/01/2005

  3. Rathod Krishna Laxman says

    My name is Rathod Krishna Laxmna

  4. Kirti avhad says

    Bharti kdhi sutnar ahe

  5. Bidgar gaytri says

    10th &12th ch
    Sir marksheet aahe pn passing certificate harvl aahe chalel ka police bharti sati

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड