JOIN Telegram

पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा – How to Apply Police Bharti 2024

How to Apply Police Bharti 2024 

How to Apply Police Bharti 2024(www.mahapolice.gov.in 2024) –  From  5th March 2024 Maharashtra Police Recruitment process has been started for 17000+ Constable, Driver and SRPF Posts. This recruitment is carried Out last year. So its been very Important to Know each details regarding Maha Police Recruitment Exam 2024. Many candidates who are new to this just Go through Official Notification read each information given in Booklet, Understand Your Eligibility criteria and then Proceed further for Maha Police exam Online Application form. If You are confused How To Fill Maharashtra Police Constable Online Application you can refer this section. Here we have given step by Step Procedure about How to Apply Police Bharti 2024. Check this posts and apply without any Mistake, fill all valid details and Make Your Documents Ready for it.

राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी ! पोलिस भरतीच्या माध्यमातून यंदा तब्बल १७ हजार जागांची भरती केली जात आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. दरम्यान, अनेक तरूण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा तथा शहर कोणते, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन अर्ज भरायचे असल्यास त्यांना ही माहिती उपयुक्तास येईल. फॉर्म भरायची मुदत संपल्यावर अर्जांची पडताळणी होऊन सर्व उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित केले जाणार आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

 

Vacancy Details For SRPF

Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks

पोलीस भरती प्रक्रिया बाबत विविध पोलीस घटकांना असलेले प्रश्नांबाबत पोलीस प्रशिक्षण खास पथके अप्पर पोलीस महासंचालक यांचे मार्गदर्शन पर सूचना…..

अर्जदाराने अर्जभरण्या पूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्या | Police Bharti Form Kasa Bharava?

✅️ इमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर व पासवर्ड व्यवस्थित जपून ठेवा त्यावर सर्व डिपेंड आहे.
✅️ महिलांनी महिला आरक्षण YES करायचं विसरू नका.
✅️ तम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भारत आहात त्या ठिकाणी कास्ट साठी जागा आहेत का ते बघून भरा.
✅️ सर्वात महत्वाचे म्हणजे महिलांनी स्पोर्ट्स, होमगार्ड,प्रकल्प ग्रस्त अशा समांतर आरक्षण मधून फॉर्म भरत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तिथे महिलांसाठी विशेष अशी जागा राखीव नसते तुमची स्पर्धा मुलांसोबत लागते.

✅️ जर समजा माझ्याकडे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट आहे व माझी कास्ट SC आहे तर जर ओपन प्रकल्पग्रस्त इतके मार्कांनी मिळवले तर मला ओपन प्रकल्पग्रस्त मध्ये सिलेक्शन होईल 👍 तयामुळे जर तुमच्याकडे समांतर आरक्षण सर्टिफिकेट असेल तर तुम्ही तुमच्या कास्ट मधूनच फॉर्म भरा.

 • अर्ज भरण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच Ncc प्रमाणपत्र इत्यादी अर्हतेनुसार तयार ठेवावे.
 • अर्जदाराने त्याचा ई-मेल आयडी व मोबाइल नंबर काळजीपूर्वक निवडावा. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदविलेल्या ई-मेल आयडी व मोबाइल नंबरवर पुरवण्यात येईल.
 • अर्जदारास पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण ३ पदांसाठी एकाच घटकात किंवा ३ वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज सादर करता येईल. परंतु एकाच घटकात एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाही.
 • अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असेल.
 • परीक्षेची निश्चित तारीख हि संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल.

महत्वाची टिप• ऑनलाईन आवेदन अर्ज भरतानाच वैध कालावधीची प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

 • सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराचे स्वत:चे नांव, शिक्का, जात प्रवर्ग, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी इ. बरोबर असल्याची खात्री उमेदवारांने स्वत: करावी. आवश्यक प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास किंवा अपूर्ण असल्यास किंवा अवैध असल्यास सदरहू उमेदवारास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल व त्याबाबत कोणताही दावा / तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही. • उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. • उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
 • उमेदवारांनी जाहीरात काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत. उमेदवारांनी संकेतस्थळावर जावुन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.
 • एच.एस.सी. प्रमाणपत्र अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करावेत. नाव बदललेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावांत कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, संबंधित बदलासंदर्भातील राजपत्रातील प्रत, कागदपत्र व संबंधित ओळखपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावेत.

 Note : आपला ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर भविष्यात बदलू नये भरती संदर्भात सर्व माहिती नोंदवलेल्या ई-मेल आयडी व मोबाइल नंबर वर पुरवण्यात येईल. 

💎How To Prepare For Maharashtra Police Bharti Exam

💎Police Bharti 2024 Syllabus Download PDF -18 हजार पोलीस भरती

पोलीस भरती ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

policerecruitment2024.mahait.org या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.

अर्ज सुरु होण्याची तारीख 05-3-2024 00.00 वा.
अर्ज बंद होण्याची तारीख 31-3-2024 24.00 वा.
ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 31-3-2024 24.00 वा.

मुख्य पृष्ठावरील पासवर्ड विसरलात या दुव्यावर क्लिक करा आणि इच्छित माध्यम, ईमेल आयडी पर्याय निवडा.

सादर करा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर एक ओटीपी संकेतांक प्राप्त होईल.

अन्यथा 022-61316418 ह्या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या अर्जामध्ये नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधा

How to Apply Maha Police Bharti 2024

 1. Before Applying For Maha Police Check Official Maharashtra Police Constable Recruitment PDF
 2. Know Eligibility Criteria Like Age Limit, Physical Criteria, Educational Criteria For Constable, Driver, SRPF Posts
 3. If You Fulfill all eligibility then Check Which Documents Are Required To Fill Maha Police Online Exam Form
 4. Make Sure to ready this Documents During Online Application
 5. Now You are ready to Fill Maharashtra Police Online Application Form 2024
 6. Fill All details Like Educational, Age, Choose Your District
 7. Pay Application Fees As Given

💯Maharashtra Police Driver Syllabus And Selection Process

नवीन उमेदवार नोंदणी, अर्ज करण्याचे चार सुलभ टप्पे

Step 1 नोंदणी
Step 2 लॉग इन
Step 3 अर्ज करा
Step 4 शुल्क भरणा करा

 

How to Register For Maha Police Constable Recruitment 2024

 • To Register For Maha Police Exam 2024, Click On New Registration, Fill Important details asked in

नवीन नोंदणी करा (आपले खाते नसल्यास)

`
`

How to Apply Police Bharti 2022

 • Now For Filling Online Application Click On “Login In”. Enter Credentials Like UserName/Email ID, Password, And Text in Box, then click On Login In

After Login You will Redirect To Below Page

How to Apply Police Bharti 2022

 • How to Apply Police Bharti 2022If you fill this after that fill Cast Certificate Details, Contact Details, Educational Details
 • Upload Your Photo and Sign
 • Pay Application Fees and Submit Your Application form
 • Take a Print Out Of Your Filled Application For Future Use

🎯Download Full PDF For How to Apply Police Bharti 2024 

⚡पोलिस भरती साठी लागणारे कागदपत्र

Police Bharti Online Application Form FAQ

 • उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का?

  • उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो, प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
 • परीक्षा शुल्क भरणा कशा प्रकारे करता येईल?

  • ऑनलाईन अर्ज भरताना ऑनलाईन भरणा – पेमेंट गेटवेच्या माध्यमातून परीक्षा शुल्क भरणा करू शकता.
 • दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट मार्कलिस्ट किंवा कोणता डॉक्युमेंट ओरिजनल नसेल तर चालेल का?

  • फॉर्म भरतेवेळी ओरिजनल नसलं तरी चालेल पण भरती वेळी तुम्हाला ओरिजनल सर्व डॉक्युमेंट लागतील.
 • परीक्षा एकाच दिवशी होईल का?

  • हा पॉईंट सुद्धा दरवर्षी नमूद केलेला असतो परंतु परीक्षा एकादिवशी कधीही होत नाही. त्यामुळे यावेळेस सुद्धा परीक्षा एकादशी होईल की नाही यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
 • अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायचे राहून गेले. मला ती कशा प्रकारे प्राप्त करता येईल?

  • तुम्ही ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता.
 • मी आवेदन अर्ज भरला, शुल्क भरणा प्रक्रियासुद्धा पूर्ण केली, मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही. मला अर्ज शुल्क परत मिळेल काय ?

  • नाही. कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळणार नाही.
 • ऑनलाईन भरती अर्ज प्रक्रियेअंतर्गत मी अनेक मोड्युल्समध्ये माहितीची नोंद करीत आहे. आणि प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मला एका/अनेक रकान्यांमधल्या माहितीमध्ये बदल करायचा आहे. मला ते कसे करता येईल ?

  • तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज सादर करण्यापूर्वी विविध मोड्युल्समधील माहिती अद्ययावत/ बदल करू शकता (नोंदणी तपशील वगळता). यंत्रणेमार्फत तुम्हाला पूर्ण केलेल्या अर्जाचे पूर्वदृश्य दर्शविले जाईल. ही माहिती योग्य असल्याची खातरजमा केल्यानंतरच तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत तुमचा अर्ज सादर करावा. एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
 • स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावे?

  • छायाचित्र आणि स्वाक्षरी जेपीईजी/पीएनजी/टीआयएफएफ स्वरूपातच स्कॅन करणे आवश्यक आहे.
 • चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास मला तो रद्द करून पुन्हा नोंदणी करता येईल काय?

  • होय. अर्ज रद्द करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज रद्द करू शकता. मात्र शुल्क भरणा केल्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होईल, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. योग्य कारण देऊन तुम्ही अर्ज रद्द करू शकता आणि पुन्हा ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करू शकता.

 


महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) ने ‘ट्रान्सजेंडर’ उमेदवारांसाठी पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 8 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी मॅटला सांगण्यात आले होते की गृह विभागाने ‘ट्रान्सजेंडर’साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तिसरा पर्याय उपलब्ध केलेला नाही. ‘ट्रान्सजेंडर’ श्रेणीच्या स्वरूपात पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठी. 18 नोव्हेंबर 2022 रोजी एका अर्जावर सुनावणी करताना, गृह विभागाने याबाबत आदेश पारित केला होता. ट्रान्सजेंडर वर्गीकरणाबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे दुःखी झालेल्या अध्यक्षा मृदुला भाटकर यांनी ‘ट्रान्सजेंडर’साठी अर्ज स्वीकारण्याची तारीख 30 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली.

 

आजपासून (9 नोव्हेंबर 2022) महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया 14000+ कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि SRPF पदांसाठी अर्जप्रणाली सुरू झाली आहे. ही भरती ३ वर्षानंतर होत असल्यामुळे महा पोलीस भरती परीक्षा 2022 संबंधी प्रत्येक तपशील जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. अनेक उमेदवार जे पोलीस भरती साठी नवीन आहेत त्यांनी अधिकृत अधिसूचनेद्वारे दिलेली प्रत्येक माहिती वाचावी, आपली पात्रता निकष समजून घ्या आणि नंतर महा पोलीस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जासाठी पुढे जा. . महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल ऑनलाइन अर्ज कसा भरायचा या गोंधळात असाल तर तुम्ही या विभागात संपूर्ण माहिती पाहू शकता. येथे आम्ही पोलीस भरती 2022 ला अर्ज कसा करायचा याबद्दल स्टेप बाय स्टेप प्रक्रिया दिली आहे. हि पोस्ट तपासा आणि कोणतीही चूक न करता अर्ज करा, सर्व वैध तपशील भरा आणि त्यासाठी तुमची कागदपत्रे तयार करून ठेवा…


test99

4 thoughts on “पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा – How to Apply Police Bharti 2024”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड