🚨थोड्याच वेळात होणार लिंक बंद; त्वरित अर्ज करा -आदिवासी विकास विभागात लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती पुन्हा सुरु! | Adivasi Vikas Vibhag Bharti 2024
Mahatribal Bharti 2024
Mahatribal Mega Bharti 2024
Mahatribal Bharti 2024: Under the Commissioner of Tribal Development Department, Tribal Development Department, State of Maharashtra, Nashik as well as appointing authority Additional Commissioner, Nashik/Thane/Amravati/Nagpur establishment Group (B) Non-Gazetted and Group C Cadre Direct Service Quota for direct service recruitment of 614 posts in various cadres Applications are being invited from September only through online mode from eligible candidates on the website @tribal.maharashtra.gov.in. Under Maharashtra Tribal Department Bharti 2024, there is a vacancy for Senior Tribal Development Inspector / Research Assistant / Deputy Accountant Chief Clerk-Statistical Assistant (Senior) / Tribal Development Inspector (Non-Pesa) / Senior Clerk-Statistical Assistant / Junior Education Extension Officer / Stylist / Housekeeper-Female / Housekeeper Male / Superintendent Female in Class-III Cadre / Superintendent Men / Librarian / Assistant Librarian / Laboratory Assistant / Cameraman-cum-Projector Operator as well as High Grade Stenographers and Low Grade Stenographers etc. at the Commissioner’s Office level Posts. The last date for Adivasi Vikas Bharti Online Application 2024 is 30th November 2024. To recruit the said posts, a Computer Based Test will be conducted at the designated examination center in Maharashtra. Know More details about Mahatribal Bharti 2024 at below:
Finally, Mega Adivasi Vibhag Recruitment 2024 Notification is Out !! Those who are eagerly waiting for this, must grab this Opportunity for being a part of MahaTribal Department Of Maharashtra. For this You have to go through all the details mentioned below like How Many Vacancies are there in Mahatribal Bharti 2024, Posts Names, Mahatribal Eligibility Criteria 2024, Mahatribal Age Limit, How To Apply For Mahatribal Vacancy 2024 and other details so that you can get all information before filling Maharashtra Tribal Department Online Application 2024
Tribal Development Department has published the notification dated 5.10.2024. According to the said announcement, the candidates were given a deadline for applying online from 12.10.2024 to 02.11.2024. Now, candidates are being given extension from 05.11.2024 to 12.11.2024 to apply online for various posts as per the said notification.
आदिवासी विकास महामंडळ येथे “वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ.” पदांच्या एकूण 614 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 12 ऑक्टोबर पासून करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 (मुदतवाढ)आहे .
आदिवासी विकास विभाग सरळ सेवाभरती हॉल तिकीट व परीक्षा तारखा
- पदाचे नाव – वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ.
- पद संख्या – 614 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- वयोमर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
- अर्ज शुल्क –
- राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
- खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in
आदिवासी विकास विभागाची दिनांक ५.१०.२०२४ रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर जाहीरातीनुसार उमेदवाराना ऑनलाईन अर्ज करण्या करिता दिनांक १२.१०.२०२४ ते ०२.११.२०२४ या कालावधी करीता मुदत देण्यात आलेली होती. तदनंतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता दिनांक ०५.११.२०२४ ते १२.११.२०२४ पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली होती. आता, उमेदवारांना सदर जाहीरातीनुसार विविध पदांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता दिनांक २३.११.२०२४ ते दिनांक ३०.११.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
Adivasi Vikas Vibhag Zone Wise Vacancy 2024 (NEW)
पदाचे नाव | Nashik | Nagpur | Amravati | Thane |
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक | 7 | 4 | 4 | 3 |
संशोधन सहाय्यक | 4 | 3 | 5 | 7 |
उपलेखापाल-मुख्य लिपिक | 16 | 10 | 8 | – |
आदिवासी विकास निरिक्षक | 1 | – | – | – |
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | 61 | 44 | 43 | 57 |
लघुटंकलेखक | 3 | 4 | 3 | |
गृहपाल (पुरुष) | 14 | 19 | 13 | 16 |
गृहपाल (स्त्री) | 10 | 6 | 8 | 5 |
अधिक्षक (पुरुष) | 9 | 4 | 16 | |
अधिक्षक (स्त्री) | 17 | 8 | 3 | 27 |
ग्रंथपाल | 24 | 8 | 1 | 15 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 12 | 5 | – | 13 |
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) | 3 | – | – | 7 |
कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर | – | – | – | 1 |
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | – | – | 24 | 21 |
सहाय्यक ग्रंथपाल | – | – | — | 01 |
उच्च श्रेणी लघुलेखक | 3 | – | – | – |
निम्न श्रेणी लघुलेखक | 14 | – | – | – |
Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक |
|
संशोधन सहाय्यक |
|
उपलेखापाल-मुख्य लिपिक |
|
आदिवासी विकास निरिक्षक |
|
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक |
|
लघुटंकलेखक |
|
गृहपाल (पुरुष) |
|
गृहपाल (स्त्री) |
|
अधिक्षक (पुरुष) |
|
अधिक्षक (स्त्री) |
|
ग्रंथपाल |
|
प्रयोगशाळा सहाय्यक |
|
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) |
|
सहाय्यक ग्रंथपाल |
|
कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर वेतन श्रेणी एस-१० |
|
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी |
|
उच्च श्रेणी लघुलेखक | शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम ब) १. उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण २. उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण वरील ब मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनीट ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनीट इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ई) सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल. |
निम्न श्रेणी लघुलेखक | शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम ब) १. लघुलेखक (इंग्रजी) निम्न श्रेणी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण २. निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण वरील ब मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनीट ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनीट इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल. |
Salary Details For Adivasi Vikas Vibhag Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक | 38600-122800 |
संशोधन सहाय्यक | 38600-122800 |
उपलेखापाल-मुख्य लिपिक | 35400-112400 |
आदिवासी विकास निरिक्षक | 35400-112400 |
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | 25500-81100 |
लघुटंकलेखक | 25500-81100 |
गृहपाल (पुरुष) | 38600-122800 |
गृहपाल (स्त्री) | 38600-122800 |
अधिक्षक (पुरुष) | 25500-81100 |
अधिक्षक (स्त्री) | 25500-81100 |
ग्रंथपाल | 25500-81100 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 19900-63200 |
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) | 35400-112400 |
सहाय्यक ग्रंथपाल | 21700-69100 |
उच्च श्रेणी लघुलेखक | 41800-132300 |
निम्न श्रेणी लघुलेखक | 38600-122800 |
Important Date – Tribal Development Department Bharti 2024
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 12th October 2024 |
Closure of registration of application | 30th November 2024 |
Important Events | Dates | |
---|---|---|
Commencement of on-line registration of application | 12/10/2024 03:00 PM | |
Closure of registration of application | ||
Closure for editing application details | ||
Last date for printing your application |
|
|
Online Fee Payment | 12/10/2024 03:00 PM to 12/11/2024 |
Adivasi Vikas Mahamandal Bharti Details 2024
१) परोक्षेत्ता दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
२) ऑनलाइन अर्ज भरण्याची पध्दत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, विहित क्योमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण अटी व शतीं, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याचाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल,
३) स्पर्धात्मक परिक्षा स्थगित करणे, रद करणे, अर्शतः बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील, व त्यांचा निर्णय अंतिम असेल, पात्रावत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल, सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात बाद, तक्रारी, उद्भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील.
Maha Tribal Development Department Jobs 2024 – Important Documents
- परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत.
- शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे
- संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
- परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.
- अर्जात नमूद केलेंप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र / नॉन क्रीमीलेअर / इतर आवश्यक प्रमाणपत्र
How to Apply For Maha Tribal Development Department Recruitment 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
- उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
- सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 12 October 2024 पासून सुरू होणार आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे :-
- ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे / स्वाक्षरी इत्यादीचे स्कॅन करून ठेवावे.
- छायाचित्र (४.५ से.मी. x ३.५ से.मी.) १०.१ २ स्वतःची स्वाक्षरी (काळ्या शाईने)
- स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा (काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर)
- इंग्रजी भाषेतील खाली दिलेला मजकुर असलेले स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र (काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर)
- हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज या जाहिरातीतील मुद्दा ११:३ मध्ये नमूद तपशिलाप्रमाणे आहेत याची खात्री
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी करावी इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील (Capital Letters) स्वाक्षरी स्विकारली जाणार नाही
- डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग येऊ देऊ नये. (उमेदवारास अंगठा नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करू शकतो)
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For tribal.maharashtra.gov.in Recruitment 2024
|
|
सिलॅबस व परीक्षा स्वरूप | पूर्ण माहिती वाचा |
PDF जाहिरात | https://shorturl.at/vtz4m |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/svAH4 |
✅ अधिकृत वेबसाईट | tribal.maharashtra.gov.in |
District Wise Maharashtra Tribal Department Notification PDF
District Name |
PDF Download |
Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2024 |
Download |
Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024 |
Download |
Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 |
Download |
Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 |
Download |
राज्य शासनाने आदिवासींच्या हिताचा घेतला निर्णय, आदिवासी तरुणांच्या ६९३१ पदभरतीस मंजुरी !
राज्यात आदिवासी समाजाच्या १२ हजार ५०० पदांच्या भरतीसाठी यापूर्वी दोन शासन निर्णय आणि एक पत्र जारी केले आहे. एवढेच नव्हे तर सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयीन विभागातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिवांना या पदभरतीची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, २२ दिवस लोटले, तरी पदभरतीची कार्यवाही न केल्यामुळे ‘ट्रायबल फोरम’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालय गातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रिद्वय विविध खात्याचे मंत्री, मंत्रालयीन विभागातील प्रमुखांना निवेदन आपली कैफियत मांडली.
मोहीम राबविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने २१ डिसेंबर २०१९ व १४ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केले आहे. दोन शासन निर्णय निर्गमित करूनही विशेष पदभरतीची मोहीम राबविण्यात आली नाही. यानंतर सामान्य प्रशासन विभागाने १३ ऑगस्ट २०२४ रोजी एक स्वतंत्र पत्र जारी केले. असताना आदिवासी समाजाची विशेष पदभरती मोहीम का राबविण्यात आली नाही?, असा सवाल उपस्थित करीत १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती मोहीम तत्काळ राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय जनजाती आयोगासमोर राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी ८ ऑगस्ट २०२२ रोजी शपथपत्र देऊन मुख्यमंत्री व वित्त विभागाची मंजुरी घेऊन लवकरच अनुसूचित जमातीची विशेष पदभरती केली जाईल, अशी हमी आयोगासमोर दिली होती. याशिवाय शासनाच्या विविध विभागांत अनुसूचित जमातीची ५५ हजार ६८७ पदे रिक्त असल्याची ३१ ऑगस्ट २०२० ची स्थिती आयोगासमोर मांडली होती.
३० बोगस आदिवासींनी बळकावलेली पदे कमी रिक्त करून खऱ्या आदिवासींची पदभरती करावी, असा निर्णय सर्वोच्च अनेक न्यायालयाने जुलै २०१७ मध्ये दिला. मात्र सात वर्षे लोटूनही ‘सरकारी खेळ’ सुरूच असून ही पदभरती अधांतरीच आहे. आदिवासींची ५५ हजारपिक्षा अधिक पदे रिक्त असल्याची माहिती खुद्द शासनानेच न्यायालयात सादर केली. आता आचारसंहितेपूर्वी ही भरती होईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सात वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शासनाने ५ जून २०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित करून बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र आफ्रोट संघटनेने नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून या जीआरला आव्हान दिले. या याचिकेवर उच्च न्यायालयाने राखीव जागेवर नियुक्त व जमातीचे दावे अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांची पदे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त करून भरण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले होते. मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयात एसटी संवर्गात सेवारत १२ हजार ५०० कर्मचारी गैरआदिवासी असल्याची माहिती दिली होती. या कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करून त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचा निर्णय शासनाने २१ डिसेंबर २०१९ ला निर्गमित केला. नंतर या जागा भरण्यासाठी जाहिरातीही दिल्या. मात्र कोविडमुळे ही भरती अर्धवटच राहिली. यानंतर अनुसूचित जनजाती आयोगाने ऑगस्ट २०२२ मध्ये राज्याच्या मुख्य सचिवांना रखडलेल्या पदभरतीबाबत समन्स बजावून शपथपत्र घेतले. त्यावेळी सचिवांनी सामान्य प्रशासन विभागाने ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत भरलेल्या व रिक्त पदांची माहिती आयोगापुढे सादर केली. मात्र त्यानंतर पदभरतीसाठी शासनातर्फे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही, असा आरोप आफ्रोट संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे यांनी केला.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024
आदिवासी विभागातील विविध संवर्गातील रखडलेल्या भरतीप्रक्रियेला मुहूर्त सापडला असून, साडेबारा हजार पदांच्या भरतीसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाचत विनाविलंब भरतीप्रक्रिया राबविण्यात यावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली रिक्त पदे भरली जाणार आहेत.
उमेदवारांच्या आशा पल्लवित
• महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीतील पदे भरण्याची कार्यवाही ३२ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करायची होती. तसेच गट क व गट ‘ड’मधील पदे भरण्याची कार्यवाही ३१ जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश १४ डिसेंबर २०२२ रोजी देण्यात आले होते. मात्र दीड वर्षे उलटले तरी विशेष भरती मोहीम राचविण्यात आलेली नव्हती. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शासनाने विनाविलंब पदभरतीचे निर्देश दिले, यासंदर्भात १३ ऑगस्ट रोजी आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे बेरोजगार आदिवासी उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यासंदर्भात १३ ऑगस्ट २०२४ रोजी आदेश निर्गमित केले असून या आदेशावर उपसचिव र. अं. खडसे यांची स्वाक्षरी आहे. आदिवासी बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी ‘लोकमत’ने रखडलेल्या या पदभरतीबाबतचा विषय सातत्याने प्रकाशित केला. परिणामी, आदिवासी समाजाचे आमदार, खासदारांसह शासनाला दखल घ्यावी लागली, हे विशेष.
पदभरतीसाठी विधिमंडळातील कार्यवाही एक नजर…
- २ मार्च २०२१ रोजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी ३१ क्रमांकावर तारांकित प्रश्न विचारला होता.
- १० मार्च २०२२ रोजी सभागृहात आदिवासी भरतीबाबत आदिवासींचे नेते म्हणून बोलण्याची संधी.
- पदभरतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २८ जून २०२४ रोजी निवेदन दिले होते.
“बेरोजगार आदिवासी उमेदवारांच्या रखडलेल्या १२ हजार ५०० पदांच्या भरतीसाठी सातत्याने सरकार आणि शासनाकडे दोन वर्षभरापासून पाठपुरावा करण्यात आला. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समर्थ साथ मिळाली. आता सामान्य प्रशासनाने निर्देश जारी केल्यामुळे आदिवासी युवकांना न्याय मिळणार आहे.”
आदिवासी विभागातील वर्ग-तीन संवर्गातील विविध पदांसाठी नऊ महिन्यांपूर्वी जाहिरात निघाली होती. एप्रिलमध्ये ही परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे मागे पडलेली ही परीक्षा अद्यापही न घेतल्याने परीक्षार्थ्यांनी संताप व्यक्त केला. आदिवासी विकास निरीक्षक, उपलेखापाल, ग्रंथपाल, लिपिक, गृहपाल, अधीक्षक, शिक्षक या पदांसाठी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर २०२३ ही होती. यासाठी एक हजार रुपये परीक्षाशुल्कही विद्यार्थ्यांनी भरले. मार्च किंवा एप्रिल २०२४ मध्ये परीक्षा होणे अपेक्षित होते. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे ही परीक्षा मागे पडली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
विभागाच्या मदत कक्षाशी संपर्क साधला असता, ‘संकेतस्थळावर माहिती सांगण्यात येईल’, असे उत्तर देण्यात आले. ही परीक्षा ‘आयबीपीएस’च्या माध्यमातून घेण्यात येते. ११ जून २०२४ रोजी आदिवासी विभागाने नोटीस काढून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश करून पुन्हा जाहिरात काढण्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्यापही ही जाहिरात प्रसिद्धच झाली नाही. परीक्षेला स्थगिती देण्यात आल्याचे विभागाकडून जाहीर करण्यात आले. लवकरच आता विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर महापालिका निवडणूकही आहे. त्यामुळे परीक्षा नेमकी केव्हा होणार, असे आदिवासी विभागाने जाहीर करावे, अशी मागणी योगेश ढवळे, अक्षय तिडके, रोहित खुळे, निखिल चव्हाण आदी परीक्षार्थ्यांनी केली. संबंधित विभागाचे मंत्री आणि लोकप्रतिनिधींनीही याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे.
सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत आणि वसतिगृहात रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Adivasi Vikas Vibhag Bharti 2024) एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प अंतर्गत तु्म्हालाही नोकरी मिळू शकते. यासाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. विद्युत आणि प्लंबिंग दुरुस्ती या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी आपले नाव, पत्ता आणि संपूर्ण माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण, नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर फाटा, कळवण, नाशिक रोड येथे पाठवायचा आहे.
या नोकरीचे ठिकाण कळवण, सुरगाणा (नाशिक) आहे. ८ जुलै २०२४ ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी उमेदवाराचा अनुभव आणि कौशल्य या आधारावर नोकरी दिली जाईल. नोकरीसाठी अर्ज करण्याआधी तुम्ही तुमचा बायोडाटा खूप चांगल्या पद्धतीने तयार करायला हवा. तुमच्या बायोडाटामध्ये तुमचे शिक्षण, कौशल्य याबाबतची सर्व माहिती लिहायला हवी. त्याचसोबत तुमच्या कामाचा अनुभव, तुम्ही किती ठिकाणी काम केले आहे, याबाबत माहिती टाकायला हवी. जर तुमचा बायोडाटा चांगला असेल तर एचआर तुम्हाला नक्की प्राधान्य देतील. तसेच तुम्ही स्वतः ला खूप चांगल्या पद्धतीने तयार करायला हवे.
Mahatribal Bharti 2024: Last year, with great fanfare, the tribal development department had decided to conduct mega recruitment for 602 posts in various 19 cadres. Accordingly, online applications were invited till December 13, 2023. But the state government has directed to release a fresh advertisement with Maratha Reservation (SEBC) postponing the recruitment process.
गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करत आदिवासी विकास विभागाकडून विविध १९ संवर्गातील ६०२ पदांसाठी मेगा भरती राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १३ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु सुरू केलेली पदभरती प्रक्रिया स्थगित करत मराठा आरक्षणासह (एसईबीसी) नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. (Tribal Development Department Recruitment postponed).. ✅या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, गुण पद्धती व परीक्षा स्वरूप येथे बघा !
त्यामुळे ही पदभरती जाहिरात तूर्त स्थगित करण्यात आली असल्याचे आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी शासकीय प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे. राज्यात आदिवासी विकास विभागाची चार अपर आयुक्तालये असून, त्या माध्यमातून दैनंदिन कामकाज चालते. सरळसेवा भरती-२०२३ अंतर्गत आयुक्तालयात १६, नाशिक अपर आयुक्तालयात १६६, ठाणे अपर आयुक्तालयात १४५.
अमरावती अपर आयुक्तालयात ८३, तर नागपूर आयुक्तालयात १९२ पदे भरण्यात येणार आहेत. यात उच्च श्रेणी लघुलेखक- ०३, निम्न श्रेणी लघुलेखक- १३, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक- १४, संशोधन सहाय्यक- १७, उपलेखापाल/मुख्य लिपिक- ४१, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक- १८७, लघुटंकलेखक- ५, गृहपाल (पुरुष)-४३, गृहपाल (स्त्री)- २५, अधीक्षक (पुरुष)- २६, अधीक्षक (महिला)- ४८, ग्रंथपाल- ३८.
प्रयोगशाळा सहाय्यक- २९, आदिवासी विकास निरीक्षक- ८, सहाय्यक ग्रंथपाल- १, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी)- २७, माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी)- १५, उच्च माध्यमिक शिक्षणसेवक- १४, प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी)- ४८ यांचा समावेश होता. आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या स्तरावरून या पदभरती जाहिरातीनुसार २३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.
विविध पदांकरिता उमेदवारांचे अर्जही ऑनलाइन प्राप्त झाले होते. तथापि २६ फेब्रुवारी २०२४ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश करून त्यानुसार बिंदुनामावली अद्ययावत करून गट ‘क’ संवर्गासाठी जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करण्याबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे ही जाहिरात तूर्त स्थगित करण्यात आली असून, याची उमेदवारांनी नोंद घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे. तसेच, याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुन्हा बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येणार असल्याचे अर्ज भरलेल्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असेही विभागाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Mahatribal Bharti 2024
Mahatribal Bharti 2024: आदिवासी विकास विभागा मार्फत जाहीर प्रगटन करण्यात येते की, आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे स्तरावरुन दिनांक २३.११.२०२३ रोजी आदिवासी विकास विभागामधील ६०२ विविध रिक्त पदांकरिता जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. व त्यानुसार दिनांक २३.११.२०२३ ते १३.१२.२०२३ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. सदर विविध पदांकरीता उमेदवारांची ऑनलाईन पध्दतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत. तथापि, सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६, दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) या संवर्गाचा समावेश करुन जाहिरात पुनश्च प्रसिध्द करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार पुनश्च बिंदूनामावली अद्ययावत करुन गट-क संवर्गासाठी पुनश्च जाहीरात प्रसिध्द करण्याबाबत शासन स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. ✅या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, गुण पद्धती व परीक्षा स्वरूप येथे बघा !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तरी, आदिवासी विकास विभागाची दिनांक २३.११.२०२३ रोजी दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे. यांची नोंद सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी घ्यावी. याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर बिंदूनामावली अद्ययावत झाल्यानंतर हया बाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येईल याची सर्व संबधीतांनी नोंद घ्यावी.
Mahatribal Bharti 2024
Mahatribal Bharti 2024: राज्याच्या आदिवासी विकास विभाग अधिनस्थ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीच्या तपासणी कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावर मोठा परिणाम होत असून आदिवासींच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ची प्रक्रिया राबविताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, ‘ट्रायबल’च्या जात पडताळणीचे कामकाज सुरळीत होण्यासाठी पोलिस उपअधीक्षक पोलिस निरीक्षक अशा २७ अधिकाऱ्यांची विवक्षित कामांसाठी करार पद्धतीने सेवा घेण्यात येणार आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.. ✅या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, गुण पद्धती व परीक्षा स्वरूप येथे बघा !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सह आयुक्त कार्यालयात दक्षता पथकाद्वारे आदिवासींच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ जारी केल्या जातात. मात्र, आदिवासींकडून शिक्षण, नोकरी, राजकीय अथवा अन्य कारणांसाठी ‘कास्ट व्हॅलिडिटी’च्या प्रकरणाशी निगडित कागदपत्रांची शहानिशा किंवा पडताळणी दक्षता समितीचे अध्यक्ष, सदस्य सचिव आणि सचिव अशी समितीमार्फत केली जाते. या समितीच्या निर्णयानंतरच आदिवासींना ‘कास्ट व्हॅलिडिटी’ बहाल केली जाते; परंतु दक्षता समितीत पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक ही पदे सुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने सेवा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील यांनी २१ मे रोजी पत्र निर्गमित केले आहे.
११ महिन्यांच्या कालावधीकरिता होणार करार
पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक अशा ५३ अधिकाऱ्यांच्या पदांना मंजुरी देण्यात आली असून ११ महिन्यांच्या कालावधीकरिता नियुक्ती केली जाणार आहे. १७ डिसेंबर २०१६ शासन निर्णयाच्या अधीन राहून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये दक्षता पथकाची निकड लक्षात घेता ही पदभरती केली जाणार आहे. जाहिरातीद्वारे पात्र पोलिस अधिकाऱ्यांचे अर्ज मागवावे लागणर आहेत. प्राप्त अर्जातून पात्र उमेदवारांची ११ महिन्यांकरिता निवड केली जाईल. यापूर्वी २५ पदांची भरती झाली असून २७ पदे आता भरण्यात येणार आहेत.
Adivasi Vikas Vibhag Vacancy 2024 (OLD)
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक | 7 (14) |
संशोधन सहाय्यक | 17 |
उपलेखापाल-मुख्य लिपिक | 30 |
आदिवासी विकास निरिक्षक | 08 |
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | 187 |
लघुटंकलेखक | 05 |
गृहपाल (पुरुष) | 43 |
गृहपाल (स्त्री) | 25 |
अधिक्षक (पुरुष) | 26 |
अधिक्षक (स्त्री) | 48 |
ग्रंथपाल | 38 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 29 |
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) | 11 |
सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक | 14 |
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) | 48 |
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) | 27 |
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) | 15 |
उच्च श्रेणी लघुलेखक | 03 |
निम्न श्रेणी लघुलेखक | 13 |
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) शैक्षणिक अर्हतेबाबत
It is mandatory for the candidates to have completed their education from 1st to 10th through English medium. However, even if such candidates select the No option in front of this option in the link, they will be given the option of further education from 1st to 12th through English medium. In this option, since some applicants have completed their education only in 11th and 12th through English medium, even if they select the Yes option there, since their basic education from 1st to 10th was not through English medium, even if the application of such a candidate is accepted due to wrong information filled by him, such a candidate is eligible. It should be noted that it will not be done and such candidates should apply for the suitable post as per their educational qualification.
Maha Tribal Primary Shikshan Sevak Eductaional Criteria
Download Maha Tribal Department Corrigendum
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For tribal.maharashtra.gov.in Recruitment 2024
|
|
सिलॅबस व परीक्षा स्वरूप | पूर्ण माहिती वाचा |
PDF जाहिरात(New Tentative) | https://shorturl.at/vtz4m |
PDF जाहिरात (Old) | https://shorturl.at/bLN49 |
ऑनलाईन अर्ज करा (Old Link) | https://shorturl.at/svAH4 |
✅ अधिकृत वेबसाईट | tribal.maharashtra.gov.in |
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 (OLD)
Table of Contents
Q krun pn answer det nh n bhai