समाज कल्याण Proficiency Test Admit Card डाउनलोड करा!!- Samaj Kalyan Proficiency Test Hall ticket Download

समाज कल्याण Proficiency Test अधिकारी पदाच्या मुलाखतीचे कॉल लेटर उमेदवाराच्या प्रोफाइल मध्ये मध्ये उपलब्ध झाले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत लघुटंकलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी लघुलेखक या पदांच्या पदभरती करिता लेखी परक्षिा माहे मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. सदर परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक ०५.०३.२०२६ रोजी व्यावसायिक चाचणी परीक्षा (Proficiency Test Admit Card) महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र आपणास ईमेलव्दारे पाठविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना ई-मेलव्दारे प्रवेश पत्र प्राप्त झालेले नसतील त्यांनी खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया हेल्पलाईन नंबर 91-9986638901 वर संपर्क साधा. तसेच या परीक्षेचे स्वरूप समाज कल्याण आयुक्तालय अभ्यासक्रम, निवड पद्धती व परीक्षेचे स्वरूप या लिंक वर उपलब्ध आहे.  हि लेखी परीक्षा ११ मार्च पासून विविध शिफ्ट मध्ये आयोजित करण्यात येणार असून आपण या लिंक वरून समाज कल्याण २०२५ टेस्ट सिरीज सोडवू शकता, यात नेहमी नवीन प्रश्नसंच आम्ही प्रकाशित करत असतो. २०२५ या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा..

Samaj Kalyan Proficiency Test Hall ticket Download

 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 

उमेदवारांना कळविण्यात येते की, काही उमेदवारांना प्रोविटी इन्फोटेक अमरावती हे परीक्षा केंद्र ठरवून दिले आहे. सदर केंद्र त्याच्या मागील स्थानापासून अंदाजे 6 किमी अंतरावर असलेल्या नवीन पत्त्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी आधीच त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड केले आहे त्यांनी सुधारीत पत्त्यासह अपडेट केलेले हॉल तिकीट डाउनलोड करण्यात यावे. ईमेल आणि स्वयंचलित व्हॉइस कॉलद्वारे याबाबत सूचना पाठवण्यात आल्या आहेत. तरी संबंधित उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी योग्य हॉल तिकीट बाळगन्याची खात्री करावी. 

पुणेः समाजकल्याण आयुक्तालयातील वर्ग-३ संवर्गातील २१९ विविध पदांसाठी १ लाख ८७ हजार अर्ज उमेदवारांनी केले आहेत, यासाठी राज्यातील ५६ केंद्रांवर ४ मार्चपासून ऑनलाइन परीक्षा सुरु झाली असून, १९ मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान, ऑनलाइन परीक्षेसाठी काही परीक्षा केंद्रांवर उमेदवार वेळेवर पोहोचत नसल्याचे दिसून आले आहे, तसेच उशिराने आलेले अर्जदारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली आहे. परीक्षा कामकाजात व्यत्यय येऊ नये यासाठी वेळा पाळण्याचे आवाहन करण्यात आले. ही संगणक आधारित परीक्षा असून, ३ सत्रांमध्ये ती आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील ५६ केंद्रांवर दररोज साधारणपणे २२ हजार उमेदवार परीक्षेस सामोरे जात आहेत. त्यामध्ये वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षकांच्या ५ जागांसाठी ११ हजार २१६ अर्ज, गृहपाल, अधीक्षक-६१ जागांसाठी ४० हजार ९६८, गृहपाल, अधीक्षक (महिला) ९२ जागांसाठी ७३ हजार ६२५, समाजकल्याण निरीक्षक ३९ जागांसाठी ५८ हजार ९, उच्च श्रेणी लघुलेखक १० जागांसाठी १ हजार ३१७, निम्म श्रेणी लघुलेखक ३ जागांसाठी ६२० व लघु टंकलेखक ९ जागांसाठी १ हजार ४४७, असे एकूण २१९ जागांसाठी १८७२०२ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये ९९ हजार ५०८ महिला अर्जदार असून, ८७ हजार ६५८ पुरुष अर्जदार आहेत.

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Samaj Kalyan Exam Date Hall ticket Download) तब्बल बारा वर्षांनी समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ आणि तत्सम पदांसाठी होणाऱ्या पदभरतीसाठी उमेदवारांनी मे २०२३ मध्ये अर्ज केले. या संपूर्ण प्रक्रियेच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आणि वेळापत्रक जाहीर झाले आहे. खालील लिंक वरून आपण प्रवेशपत्र लवकरच २५  फेब्रुवारी २०२५ पासून डाउनलोड करू शकाल. समाज कल्याण विभाग विविध पदांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परीक्षा ४ मार्च पासून सुरुवात होणार असून, २५ फेब्रुवारी पासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेश पत्र (हॉल तिकीट) संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे अर्जदारांना समाज कल्याण विभागाचे आवाहन केले आहे. समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यात येत आहे. उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही व्यक्तीने भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे, परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखविल्यास अशा भूलथापांना बळी न पडता त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क करावा.  

Samaj Kalyan Vibhag Hall Ticket – Samaj Kalyan Vibhag Admit Card – Candidates can Download the Admit Cards / Hall tickets of Samaj Kalyan examinations 2025 from following given link. The Given link will be active from Feb 2024. Also the Schedule or Timetable of this Commissioner Social Welfare Department which is under Maharashtra government is published now. You can check the Details from given respective Links.

समाजकल्याण प्रवेशपत्र डाउनलोड लिंक 

Samaj Kalyan Bharti Help Line Number 

उमेदवारांना या क्रमांकावर करता येऊ शकतो संपर्क भरती प्रक्रियेशी संबंधित हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून घेताना तांत्रिक अडचण असल्यास संबंधित उमेदवारांनी ९१-९९८६६३८९०९ या क्रमांकावर संपर्क करावा. हा क्रमांक सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत सुरू राहील

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल, अधीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गासाठी ही ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. उमेदवारांना २५ फेब्रुवारीपासून प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या सूचना संदर्भात माहितीचा समावेश असेल. भरती प्रक्रियेस संबंधित अधिकृत माहिती करिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharas htra.gov.in या संकेतस्थळाला उमेदवारांनी भेट द्यावी. तसेच भरती प्रक्रियाच्या अनुषंगाने ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी व ई-मेल ने वेळोवेळी पाठवण्यात येणाऱ्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे, अशी माहिती कळवण्यात आली आहे.

समाजकल्याण प्रवेशपत्र डाउनलोड लिंक 
समाज कल्याण लेखी परीक्षा टेस्ट सिरीज 2025 – Samaj Kalyan Papers 2025 Test Series

परीक्षेची माहिती आणि पॅटर्न PDF 

समाज कल्याण विभागातील गट ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील ८१ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी मे २०२३ मध्ये अर्जही भरून घेण्यात आले होते. आयोगाच्या वतीने जुलै २०२३ मध्ये देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार संगणक आधारित चाळणी परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाईल, असे कळवण्यात आले. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेची तयारी सुरू केली. परंतु, परीक्षेची तारीख जाहीर करण्यास दीड वर्षाचा विलंब झाल्याने उमेदवार आता आक्रमक झाले आहे.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड