ZP शाळांसाठी मोठी खुशखबर; १०० हून अधिक शिक्षकांची भरती !! | ZP Teachers Recruitment

ZP Shikshak Bharti Update 2026

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पवित्र पोर्टलद्वारे विनामुलाखत टप्प्यात गुणवत्तेच्या आधारे राज्यातील तब्बल १३ हजार ११९ उमेदवारांची शिक्षक पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद (झेड.पी.) शाळांसाठी १०० हून अधिक शिक्षकांचा समावेश असल्याचा अंदाज आहे. आता कागदपत्र पडताळणी आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना नियुक्ती देऊन शाळांमध्ये रुजू करून घेतले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्याच्या दिशेने आता महत्त्वाचे पाऊल पडले आहे. जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सक्षमपणे टक्कर देत असल्या, तरी अनेक शाळांमध्ये शिक्षकांची अपुरी संख्या आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही आव्हाने कायम आहेत. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची जवळपास २५० पदे रिक्त असून, त्यापैकी १९९ पदांच्या भरतीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १०० हून अधिक शिक्षक उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने रिक्त पदांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे.

ZP Shikshak Bharti Update 2026


राज्यात पवित्र प्रणाली द्वारे राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीविना या गटातून १३ हजार ११९ उमेदवारांची निवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक आठ हजार ४८१ उमेदवार जिल्हा परिषद शाळांसाठी निवडले गेले आहेत. पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून त्यांना तात्काळ सेवेत रुजू करण्यासाठी शिक्षण विभाग लवकरच सविस्तर वेळापत्रक जाहीर करणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्यातील सर्व संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरती करण्यात येत आहे. या पदभरती मुलाखतीशिवाय या प्रकारातील शिफारस झालेल्या उमेदवारांची गुणवत्तायादी गुरूवारी सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध करण्यात आली. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सिंह यांनी ही माहिती दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी, परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे, राजेश शिंदे आदी उपस्थित होते. शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शाळा व्यवस्थापनांनी दिलेल्या जाहिरातीनुसार ३० हजार २०९ पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवून घेण्यात आले होते.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

मुलाखतीविना निवड या प्रकारासाठी एकूण १९ हजार ७५४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १३ हजार ११९ जागांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. सिंह म्हणाले, “निवड प्रक्रियेत प्रत्येक पदासाठीचे पात्रता गुण (कटऑफ) संकेतस्थळावर जाहीर केले आहेत. आता या उमेदवारांना लवकरात लवकर रुजू करून घेण्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाईल.” पदभरतीतील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत उमेदवारांचे काही म्हणणे, मागणी, तक्रारी असल्यास त्यासाठी ‘तक्रार निवारण आणि दुरुस्ती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी edupavitra2025grcc@ gmail.com’ या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
रिक्त पदांसाठी नव्याने फेरी समांतर आरक्षणातील माजी सैनिक अंशकालीन प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने दोन हजार ७६० आणि एक हजार ७६० पदे रिक्त आहेत. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२ पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील एक हजार ४०८ पदे रिक्त आहेत. येत्या काही दिवसांत रिक्त पदे रूपांतरित करून नव्याने फेरी राबवण्यात येणार असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले.

 

ZP Shikshak Bharti Update 2026 – राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! खासगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. यापूर्वी तब्बल तीन वेळा मुदतवाढ देऊनही हजारो कर्मचाऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे शालार्थ प्रणालीवर आता अंतिम मुदत देण्यात आली असून, संबंधित कर्मचाऱ्यांनी २० सप्टेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. अन्यथा ऑक्टोबरपासून संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन बंद होण्याची शक्यता असल्याने ही अंतिम संधी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसीबाबत महत्त्वाची आणि निर्णायक सूचना समोर आली आहे. शालार्थ प्रणालीवरील विभागनिहाय ई-केवायसी प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर, प्रक्रिया पूर्ण करण्यास काहीसा अधिक वेळ लागत असल्याच्या तक्रारींची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त आदेश काढत ई-केवायसीसाठी अंतिम मुदतवाढ दिली आहे.

मात्र, या मुदतवाढीसोबतच शिक्षण विभागाने कडक इशाराही दिला आहे. २० सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे, नोव्हेंबरमध्ये मिळणारे वेतन रोखले जाणार आहे. संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांनी सर्व शाळांना तातडीने सूचना देऊन मुदतीत ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मुदतीनंतर ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास संबंधित शिक्षकांचे पगारबिलच अपलोड केले जाणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आता यापुढे मुदतवाढ नाहीच !!

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसीची ही शेवटची संधी असून, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही! राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शालार्थ आयडीतील गैरप्रकार समोर आल्यानंतर शासनाने शालार्थ प्रणालीवरील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘ई-केवायसी’ अनिवार्य केली आहे. मात्र, वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक कर्मचाऱ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही, तर काहींच्या प्रक्रियेत त्रुटी कायम आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी आता अंतिम मुदत निश्चित केली असून, त्यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी ही शेवटची संधी गांभीर्याने घेत तातडीने ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.


ZP Shikshak Bharti Update 2026 – जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या वाढत्या रिक्त जागांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने आहे. पदभरतीच्या धोरणानुसार ४१८ सहायक शिक्षकांची भरती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने आरक्षण निहाय जाहिरातीचा मसुदा तयार करून तो शिक्षण आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविला असून, मंजुरी मिळताच येत्या आठवडाभरात ‘पवित्र पोर्टल’द्वारे भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आरे जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त पदांची संख्या सातत्याने वाढत आहे. १ जानेवारी २०२६ रोजीच्या बिंदुनामावलीनुसार जिल्ह्यात एकूण ५२३ पदे रिक्त आहेत. शासनाच्या निर्देशांनुसार यापैकी ८० टक्के म्हणजेच ४१८ पदे भरण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. या सर्व जागा सहायक शिक्षकांच्या असून आरक्षणनिहाय जाहिरातीचा मसुदा शिक्षण आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, बिंदुनामावली निश्चित होण्यास झालेल्या विलंबामुळे ही भरती प्रक्रिया तब्बल पाच वेळा पुढे ढकलावी लागली. त्यामुळे दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. आता मंजुरी मिळाल्यानंतर शासनाच्या निकषांनुसार ‘पवित्र पोर्टल’वर ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार असून महिनाभरात संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर नव्याने नियुक्त होणारे शिक्षक जिल्हा परिषद शाळांमध्ये रुजू उमेदवारांनाही टोणार आहेत.  

ZP Shikshak Bharti Update News 2026

७५ शिक्षकांचे समायोजन – जि. प्र. शाळांत अतिरिक्त ठरलेल्या ७५ शिक्षकांचे समायोजन विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे थांबले होते. या शिक्षकांचे आदेश शिक्षण विभागाने काढले असून यातील काही शिक्षक संबंधित शाळांत रुजू झाले असून काहींची प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे.

 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड