Pune Shikshak Bharti 2026 – शिक्षक भरती २०२५तील निवड प्रक्रिया पूर्ण, तरी नियुक्तीची प्रतीक्षा; उमेदवारांना तातडीने आदेश देण्याची मागणी! शिक्षक भरती २०२५ अंतर्गत निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या तसेच कागदपत्र पडताळणी, प्रशासकीय कार्यवाही आणि समुपदेशनाची प्रक्रिया पूर्ण करून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती आदेश देण्यात यावेत, अशी मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे काही उमेदवारांच्या नियुक्त्या प्रलंबित राहिल्या असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. निवड प्रक्रियेतील आवश्यक टप्पे पूर्ण झालेल्या उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नियुक्ती आदेश जारी करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पूर्ण, तरी नियुक्ती आदेश रखडले; उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण! निवड प्रक्रिया, कागदपत्र पडताळणी आणि इतर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरही केवळ नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची चिंता वाढत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही नियुक्ती कधी मिळणार, याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा पूर्ण सन्मान राखत, निवडणूक आयोगाकडून आवश्यक परवानगी अथवा स्पष्ट मार्गदर्शन घेऊन नियुक्तीची पुढील कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागू नये आणि नियुक्ती प्रक्रियेला स्पष्ट दिशा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नियुक्तीला आचारसंहितेचा अडथळा असेल तर स्पष्टता द्या; निवड झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याची संघटनेची मागणी! यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच शालेय शिक्षण विभागाकडे संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यास आचारसंहितेतील कोणती तरतूद अडथळा ठरत असेल, तर त्याबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा करावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांची नियुक्ती केवळ प्रशासकीय संभ्रमामुळे प्रलंबित राहू नये, यासाठी संबंधित विभागांनी निवडणूक आयोगाशी समन्वय साधून नियमांच्या चौकटीत निर्णय घ्यावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

Pune Shikshak Bharti 2026 – मित्रांनो, पुणे शिक्षक भरती संदर्भात एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी आणि राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सिंह म्हणाले की, पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीशिवायच्या १९ हाजर ४५४ पदांपैकी आत्तापर्यंत १७ हजार ५०९ शिक्षकांची शिफारस झाली आहे. विनामुलाखतीच्या भरतीमध्ये काही अंशकालीन आणि इतर समांतर आरक्षणाच्या प्रवर्गात उमेदवार उपलब्ध झाले नव्हते. अशा रिक्त जागांवर त्याच संबंधित प्रवर्गातील सामान्य उमेदवार घेण्यास शासनाने मान्यता दिली. त्यानुसार कन्व्हर्जन राउंडमध्ये ४ हजार ३९० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. मुलाखतीशिवाय जाहिरातीत जिल्हा परिषदांच्या १३,२२५ पदांच्या जाहिरातीत यापूर्वी ८,४८१ उमेदवारांची शिफारस झाली होती. आता ३,१०५ उमेदवार मिळाल्याने एकूण ११,५८६ शिक्षक रुजू होतील. नगरपालिकांच्या २८० पदांपैकी २२६ आणि आता पाच, म्हणजे २३१ तर महापालिकांच्या १,९५४ पदांपैकी १,३०६ आणि आता ४२७, म्हणजे १,७३३ शिक्षक मिळणार आहेत. आदिवासी विकास विभागाच्या २,४२१ पदांपैकी १,६०१ आणि आता ५२७, म्हणजे २,१२८ शिक्षक मिळतील. शासकीय विद्यानिकेतनची सर्व ५६ पदे भरली असून, खासगी संस्थांना एकूण १,७७५ शिक्षक मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात मुलाखतीसह पदभरतीसाठी प्रत्येक पदासाठी तीन पात्र उमेदवार शाळा व्यवस्थापनाला दिले जाणार असून, त्यांची मुलाखत घेऊन व्यवस्थापन निवड करेल. संबंधित भावी शिक्षकांना नियुक्ती प्राधिकारी आणि व्यवस्थापनांना हे उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतील. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी २४ ते २८ सप्टेंबरदरम्यान, तर पदस्थापनेसाठी समुपदेशनाची प्रक्रिया ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पूर्ण करावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण
मुलाखतीसह पदभरतीसाठी १०० गुण असतील. यामध्ये २० गुण टीईटी, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेवर आधारित स्वयंचलित पद्धतीने निश्चित होतील, तर १० गुण व्यवस्थापनाच्या मुलाखतीसाठी असतील. उमेदवारांना प्राधान्यक्रम आणि त्यांच्या प्रवर्गातील आधीच्या उमेदवारांची माहितीही पोर्टलवर पाहता येणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, असे सिंह यांनी सांगितले. मुलाखतीसह १० हजार ३४७ पदांसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आठवडाभरात सुरू होणार आहे. प्रत्येक पदासाठी तीन पात्र उमेदवार शाळा व्यवस्थापनाला दिले जाणार असून, त्यांची मुलाखत घेऊन व्यवस्थापन निवड करेल. मात्र, व्यवस्थापनाने चुकीच्या पद्धतीने भरती केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे देखील सिंह यांनी स्पष्ट केले.
पदभरतीसाठी निरीक्षक नेमणार – राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या मुलाखतीसह शिक्षक भरतीसाठी निरीक्षक नेमण्यात येणार आहेत. ज्या संस्थांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी हे निरीक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाते का? याची पाहणी करणार असल्याची माहिती देखील सिंह यांनी दिली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















