DBSKKV Bharti Result 2026
DBSKKV Bharti Result 2026: मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली अंतर्गत गावतळे विभागात राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत कारळा बियाणे केंद्र या योजनेअंतर्गत कंत्राटी कनिष्ठ संशोधन सहाय्यक आणि कंत्राटी प्रक्षेत्र सहाय्यक यांची पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहणेबाबतची अधिसूचना (मुलाखत दिनांक ०९-१०-२०२६) पात्र उमेदवारांची यादी.
DBSKKV Bharti Result 2026: केंद्रीय संशोधन केंद्र, वाकवली येथील ‘व्हिलेज पॉन्ड युनिट’ (Village Pond Unit) येथे, ‘नॅशनल फूड ऑईल मिशन (ऑईलसीड्स)’ अंतर्गत असलेल्या ‘नायजर सीड सेंटर’ (Niger Seed Centre) योजनेतील ‘कंत्राटी कनिष्ठ संशोधन सहाय्यक’ आणि ‘कंत्राटी क्षेत्रीय सहाय्यक’ या पदांसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.
पात्र व अपात्र उमेदवारांची यादी
DBSKKV Bharti Result 2026: दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषि अर्थशास्त्र विभागात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांच्या कालावधीसाठी दोन अध्यापक सहयोगी पदे भरण्याकरिता जा. क्र. ADCD/ECON/ADV/616 of 2026, दिनांक ३१ जुलै २०२६ अन्वये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार १९ ऑगस्ट २०२६ रोजी निवड समितीसमोर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीनंतर निवड समितीने खालील उमेदवारांची अध्यापक सहयोगी पदासाठी निवड केली आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये (रत्नागिरी) येथे ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावरील कर्षित्रचालक (ट्रॅक्टर चालक) पदासाठी मुलाखतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदासाठी श्री. विवेकानंद प्रभाकर सोळंके हे पात्र ठरले असून, त्यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
DBSKKV Bharti Result 2026
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे गेली १० वर्षे व त्यापेक्षा अधिक काळ रोजंदारी, कंत्राटी व ठेका पद्धतीने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दत्ताराम दळवी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विविध विभागांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या रोजंदारी, कंत्राटी व ठेका कर्मचाऱ्यांनाही न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. हे कर्मचारी विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विद्यापीठ सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी सुनील दळवी यांनी केली आहे.
राज्य शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतल्यास विद्यापीठातील अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या शेकडो कंत्राटी, रोजंदारी व ठेका कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या निवेदनानंतर संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
DBSKKV Bharti Result 2026: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी या विद्यालयातील Teaching Assistant (Fisheries Engineering) करिता जाहिरात क्रमांक मअतं/आस्था/ताप्पुरती भरती/४९४/२०२६ दि. ०९/०६/२०२६ अन्वये प्रात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जानमधून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पात्र उमेदवारांच्या मुलाखती गुरूवार, दि. २५.०६.२०२६ रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे घेण्यात येणार आहेत. तरी पात्र उमेदवारांनी अर्जासोबत जोडण्यात आलेल्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतींसह मुलाखतीसाठी गुरूवार, दि. २५.०६.२०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता उपस्थित राहावे. पात्र उमेदवारांना भ्रमणध्वनी आणि ई-मेल द्वारे कळविण्यात येईल मात्र याबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पात्र व अपात्र उमेदवारांची यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















