राज्यात ८ हजार पोलिसांच्या रिक्त जागा भरणार

Police Bharti 2020

Maharashtra Police Bharti 2020 Starting Soon For 8000 Vacancies. More details given below. 

पोलिसांत भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. येत्या काळात राज्यात ८ हजार पोलिसांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे. शिवाय पोलिसांच्या सोबत ७ हजार सुरक्षा रक्षकांचीही भरती केली जाणार आहे. राज्यात पोलिसांच्या जागा रिक्त आहेत त्या भरण्यासाठी सरकार अग्रक्रम देणार असल्याचे देशमुखांनी सांगितले आहे. दरम्यान, NPR आणि NRC ची अंमलबजावणी करायची की नाही बाबत राज्य सरकारच्या बैठकीत तीन्ही पक्ष चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ असंही देशमुखांनी सांगितले आहे.

बलात्कार गुन्ह्यात आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या २० तारखेला आंध्र प्रदेश मध्ये जाणार आहोत. येत्या काही दिवसात पोलीस खात्यात ८ हजार जागा भरणार, ७ हजार सिक्युरिटी गार्ड च्या जागा भरणार आहोत. आमचे म्हणणे एवढेच होते की एआयएकडे तपास देताना राज्य सरकारला विचारात घ्यायला हवे होते. एआयए तपास करत असताना एसआयटी स्थापन करता येते का समांतर तपास करता येतो का याचा कायदेशीर सल्ला घेत आहोत, कायदेशीर तरतूद असेल तर कोरेगाव भीमा प्रकरणी एसआयटी स्थापन करु, असे अनिल देशमुख म्हणालेत.

फोन टॅपिंग प्रकरणी आम्ही दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, त्याचा अहवाल आला की या बाबत माहिती दिली जाईल. महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व जाऊ देणार नाही. एनपीआर आणि एनआरसीबाबत राज्य सरकारच्या बैठकीत तीन्ही पक्ष चर्चा करू आणि त्यानंतर त्याच्या अमलबाजवणी बाबत निर्णय होईल. दरम्यान, शरद पवार यांनी पोलिसांना ताटकळत उभे राहावे लागते याबाबत दिलेल्या पत्रानंतर आम्ही समिती स्थापन केली आहे. त्यावर उपाय योजना केल्या जातील, असे ते म्हणालेत.


 

Police Bharti 2020 Previous Update on 12th Feb 2020 – राज्यातील साडेतीन हजार पोलिस शिपाई भरतीसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरून घेतल्यानंतर आतापर्यंत गृह विभागाकडून पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यातच नोव्हेंबरमध्ये पोलिस वाहनचालक व राज्य राखीव पोलिस दलाच्या शिपाई भरतीचेही अर्ज भरून घेतले. मात्र, पुढे काहीच हालचाल नसल्याने उमेदवार निराश झाले आहेत. मागील वर्षीचीच साडेपाच हजारांची भरती होत नसताना गृहमंत्री नव्याने आठ हजार पदांची भरती होणार असल्याचे सांगत असल्याने ही निराशा वाढली आहे.

गृह विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये राज्यात तीन हजार ५०० पोलिस शिपाई पदांची भरती जाहीर केली. त्याचे अर्ज उमेदवारांनी भरले. आतापर्यंतच्या सात वर्षांतील पोलिस भरती प्रक्रियेत अर्ज भरल्यानंतर एका महिन्याच्या आत मैदानी किंवा लेखी परीक्षेच्या प्रक्रियेला सुरुवात केली जात होती. मात्र, २०१९ मध्ये ही प्रक्रिया रखडली. ती अजूनही सुरू झालेली नाही. सरकारने पोलिस वाहनचालकांच्या एक हजार जागांची भरती जाहीर केली. त्याचेही अर्ज उमेदवारांनी भरले. नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या ८२८ जागांची भरतीप्रक्रिया जाहीर झाली. त्याचेही अर्ज उमेदवारांनी भरले. मात्र, या तिन्ही दलांच्या भरती प्रक्रियेला अद्याप मूहूर्त मिळालेला नाही.

या संदर्भात सरकारनेही कोणतेही परिपत्रक काढले नसल्याने राज्यभरातून शहरांच्या ठिकाणी किंवा मोठ्या अॅकॅडमीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेणारे उमेदवार संभ्रमात आहेत. त्यांचा प्रतिमहिना चार हजार रुपयांचा खर्च वाढत चालला आहे. ही परीक्षा महापोर्टलद्वारे होणार, की यापूर्वीच्या प्रक्रियेतून होणार; तसेच ऑनलाइन की ऑफलाइन, याचीही माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. यामुळे संगणकावर सराव करावा, की कागद-पेन पद्धती अवलंबावी, या विषयीही उमेदवार संभ्रमात आहेत. पोलिस भरती होताना अगोदर लेखी चाचणी होणार, की मैदानी चाचणी याविषयीही उमेदवारांत गोंधळाचे वातावरण आहे.

मी पोलिस शिपाई होण्यासाठी सोलापूरातून बारामतीत आले आहे. गेले चार महिने मी फक्त अभ्यासच करत आहे. यातून माझा प्रशिक्षण व निवास, भोजनाचा खर्च वाढत चालला आहे. आतापर्यंत महिन्यात प्रक्रिया सुरू व्हायची आणि भरतीही पूर्ण होत होती. आता मात्र ती लांबली असल्याने माझ्यापुढे समस्या वाढत चालल्या आहेत.

गृह विभागाने या संदर्भात परिपत्रक काढणे अत्यंत जरुरीचे आहे. राज्यात वेगवेगळ्या शहरांत गावांकडून आलेले उमेदवार थांबून आहेत. त्यांचा खर्च दिवसेदिवस वाढत चालला आहे. ही मुले अल्प उत्पन्नगटातील असतात. त्याचा विचार सरकारने करावा. भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यानुसार व पद्धतीने होणार, याचाही खुलासा करावा. ही सर्व पदे पाच हजार २९७ आहेत. त्यासाठी लाखो उमेदवार प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे हा गोंधळ थांबला पाहिजे.

म. टा.


Police Driver Bharti 2020 Maharashtra

Police Driver Bharti 2020 is started in all over Maharashtra from 2nd December 2019. Large number of candidates from all over Maharashtra are applying for this bharti process. All details about this are given below. This Bharti process registration is under the Mahapariksha Protal. So can Apply online For this bharti from there.  All the details about this like Post details, Application process, How to register, Education Details, Age limit are given below. Read all details carefully & apply now.

पोलीस भरती २०१९ आज शेवटची तारीख – ड्रॉयव्हर पदाच्याचे १०१९ पदांसाठी ऑनलाइन अर्ज २ डिसेम्बर २०१९ पासून सुरु झाले आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी 2020 मुदतवाढ राहणार आहे. तरी या पोलीस भरती संदर्भाती सर्व अपडेट्स आणि बातम्या आम्ही महाभरती (MahaBharti.in) वर वेळोवेळी प्रकशित करूच.

शैक्षणिक पात्रात १२ वी पास + आपल्या जवळ हलके वाहन [LMV -TR] चालविण्याचा वैध परवाना असावा (नक्षलग्रस्थ भागाताली उमेदवारांना ही अट सातवी उत्तीर्ण अशी आहे.)
वयोमर्यादा१८ ते ३३ वर्षे
वेतनश्रेणीRs. ५२०० to २०२००
अर्ज पद्धतीमहापरीक्षा पोर्टल द्वारे. अर्ज लिंक येथे क्लिक करा 
अर्ज उपलब्ध होण्याची तारीख२ डिसेंबर २०१९
अर्ज करण्याची अंतिम तारीख८ जानेवारी 2020 मुदतवाढ
परीक्षा शुल्क खुला वर्ग : ₹ ४५०  / राखीव वर्ग : ₹ ३५०

District Vacancy Details

Following are the City or unit wise Post details. Read all respective details carefully. The Reservation in Police Bharti as per the category is given in following table. You are requested to read all instructions carefully before submitting your application Form.

Driver Police Bharti 2019 Post Details
Post Details

कशी राहील Police Bharti परीक्षा?

Written Exam Details For Driver Police Bharti 2019

Written Examination Syllabus & Marks Details are given below. The Exam Duration & marks distribution details are given below.

 • प्रथम १०० मार्कांची वस्तुनिष्ठ (Objective)लेखी परीक्षा घेण्यात येईल.
 •  या परीक्षेचा वेळ ९० मिनिटे राहील.

Police Bharti For Driver Written Test Syllabus

Subjects / विषय Marks / मार्क्स 
Mathematics (गणित)२० गुण
वाहतुकीचे नियम २० गुण
General Knowledge & Current Affairs (सामान्य ज्ञान/ चालू घडामोडी)२० गुण
Intellectual Test (बौद्धिक चाचणी)२० गुण
Marathi Grammar (मराठी व्याकरण)२० गुण
TOTAL MARKS (एकूण मार्क्स)१०० गुण 


चालक पोलीस भरतीसाठी शारीरिक क्षमता काय आहे? 

जर आपण पोलीस भरती साठी अर्ज करणार असत तर प्रथम आपली शारीरिक मापदंडन पडताळून बघा. या संदर्भात पूर्ण माहिती आणि अपडेट्स खालील प्रमाणे आहेत.

चालक पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता
Height (उंची)पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि १६५ सेमी असावी.

महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि १५८ सेमी असावी.

Chest (छाती)पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी.

Police Bharti शारीरिक चाचणी कशी होईल? 

Police Bharti 2019 – 2020 Physical Examination details are given below. The details For both Male & female candidates are given separately.

शारीरिक चाचणीचे विवरण (पुरुष उमेदवार)
1600 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण50 गुण
शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक (4 किलो)10 गुण
एकूण गुण50 गुण

District wise All Police Bharti 2019 Links given below.

जिल्ह्याचे नावएकूण जागालिंक
मुंबई156 जागायेथे क्लिक करा
नवी मुंबई103 जागायेथे क्लिक करा
ठाणे116 जागायेथे क्लिक करा
नागपूर शहर87 जागायेथे क्लिक करा
नागपूर ग्रामीण28 जागायेथे क्लिक करा
सांगली77 जागायेथे क्लिक करा
औरंगाबाद शहर24 जागायेथे क्लिक करा
सोलापूर41 जागायेथे क्लिक करा
रायगड27 जागायेथे क्लिक करा
लातूर6 जागायेथे क्लिक करा
बीड36  जागायेथे क्लिक करा
उस्मानाबाद33 जागायेथे क्लिक करा
मुंबई रेल्वे18 जागायेथे क्लिक करा
अमरावती19 जागायेथे क्लिक करा
अकोला34 जागायेथे क्लिक करा
बुलढाणा52 जागायेथे क्लिक करा
वर्धा37 जागायेथे क्लिक करा
सिंधुदुर्ग20 जागायेथे क्लिक करा
रत्नागिरी44 जागायेथे क्लिक करा
जालना25 जागायेथे क्लिक करा
भंडारा36 जागायेथे क्लिक करा
एकूण जागा1019 जागा

कोणती कागदपत्र आवश्यक? 

 • ऑनलाईन अर्ज करताना इच्छुकांना काही कागदपत्र सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात तुमच्याजवळ ठेवणं आवश्यक आहेत. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश आहे.
 • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
 • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
 • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
 • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
 • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
 • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
 • जात प्रमाणपत्र वैधता
 • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
 • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
 • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Ishwar says

  Bharati honar kadhi pan

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप