नवीन अपडेट- नागपूर, मुंबई पोलीस भरती रद्द होणार?- Police Bharti 2023

Maharashtra Police Bharti

Maharashtra Police Bharti 2023

Maharashtra Police Bharti 2023 – Recruitment for post of Police Constable Driver Directed to announce revised list by issuing appointment letter within 3 weeks. More Details about Maharashtra Police Bharti 2023 are given below. Read all instructions carefully. Also more details about Police Bharti 2022 – 2023 will be published here. So keep visiting MahaBharti for more updates.

या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी गुण असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने हा घोटाळा उघडकीस आणला असून पोलिसांनी एक दलालाला पकडले आहे. या भारतामधील अनेक घोटाळे समोर येत असल्याने या प्रकरणात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करावी व नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात राज्यातील विविध भागातून आलेल्या मुला-मुलींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पक्षकार्यालय टिळक भवन येथे भेट घेऊन या परिक्षेत झालेल्या घोटाळ्याची माहिती दिली. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस महासंचालकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सर्व प्रकार त्यांना सांगितला व कारवाई करण्याची मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवले आहे.

 

या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, पोलीस भरती प्रक्रियेत जास्त मार्क असलेल्यांना वगळून कमी गुण मिळालेल्या मुलांना भऱती करून घेण्यात आले आहे. शारिरिक चाचणीमध्येही पैसे घेऊन गुण वाढवण्यात आले, शारिरिक चाचणीत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. पोलीस दलात भरती होण्यासाठी काही मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आले असून या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला.

 

पात्र विद्यार्थ्यांना वंचित ठेवून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेल्यांना पोलीस दलात भरती करण्यात आले. अशा प्रकारच्या तक्रारी या भरती प्रक्रियेतील मुला-मुलांनी आमच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करुन पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्या अशी मागणी केली आहे.

 


मैदानी परीक्षेनंतर उपलब्ध पदे आणि एकूण उमेदवार यांच्या संख्येनुसार प्रमाण ठरवण्यात आले. त्यानुसार लेखी परीक्षेसाठी 83 हजार 743 उमेदवार हे पात्र झाले. 7 मे रोजी मुंबईतील 215 सेंटरवर लेखी परीक्षा घेण्यात आली. चार ठिकाणी कॉपी, ब्लू टूथ बटणाचा वापर झाल्याने पोलिसांनी गुन्हे नोंद केले होते. लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. पात्र असलेल्या 7076 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. काही उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.

 

मुंबईतील सहा हजार ७४० जागांसाठी तब्बल सात लाख उमेदवारांचे अर्ज आहेत. अजूनही मैदानीच चाचणी संपलेली नाही. तत्पूर्वी, सर्वच जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा संपली आहे. चालक पदांचा निकाल देखील जाहीर झाला असून आता काही दिवसांत शिपायांचीही निकाल लागेल. त्यांचे प्रशिक्षण १ जुलैपासून राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांवर सुरु होईल. नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या उमेदवार त्याठिकाणी जातील. तत्पूर्वी, पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता साडेसहा हजारांवरून आठ हजारांपर्यंत वाढवली आहे. त्यात सोलापूर, नाशिकसह इतर पोलिस प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.

महिला पोलिसांना आठ तास ड्यूटी नाहीच

कुटुंब आणि नोकरी, अशा दुहेरी भूमिकेतील महिला पोलिस अंमलदारांना आठ तासांची ड्यूटी करण्याचा निर्णय सव्वावर्षापूर्वी झाला. पण, अजूनही निम्म्यापेक्षा जास्त शहर-जिल्ह्यात तो लागू झालेला नाही. त्याला प्रमुख अडथळा म्हणजे अपुरे मनुष्यबळ हेच आहे. राज्यातील बहुतेक शहरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्या देखील वाढली आहे. गुन्ह्यांची संख्या दरवर्षी सरासरी ९ ते १० टक्क्यांनी वाढत आहे. तरीपण त्यांचे वर्षातील ३६५पैकी दोनशेहून अधिक दिवस बंदोबस्तातच जातात. रिक्तपदांमुळे ताण वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सद्य:स्थितीत ३० टक्क्यांपेक्षा जास्त पोलिस अधिकारी, अंमलदारांना बीपी, शुगरचा त्रास आहे. आता पोलिस भरती झालेले उमेदवार दाखल झाल्यावर थोडा ताण कमी होईल.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

मुंबईतील पोलिस भरती होणाऱ्या उमेदवारांचे प्रशिक्षण दुसऱ्या टप्प्यात होईल. तत्पूर्वी, राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील उमेदवारांचे प्रशिक्षण १ जुलैपासून सुरु करण्याचे नियोजन आहे. राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांमध्ये आठ हजार उमेदवार प्रशिक्षण पूर्ण करतील, अशी व्यवस्था केली आहे.




 

राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (मुंबई) यांनी पोलिस शिपाई चालक पदासाठी राबविलेल्या भरती प्रक्रियेत सुधारणेचे निर्देश देत, ज्या उमेदवारांनी फक्त एकाच जिल्ह्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांना तीन आठवड्यांत नियुक्तीपत्र देऊन सुधारित यादी जाहीर करावी, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायाधिकरणाच्या मुंबई, नागपूर व औरंगाबादच्या खंडपीठाने दिला. (Recruitment for post of Police Constable Driver Directed to announce revised list by issuing appointment letter within 3 weeks)

 

तीन खंडपीठाने एखाद्या नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात दिलेला हा बहुधा पहिलाच निकाल असावा. या संदर्भात जळगाव येथील व सध्या मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड दर्शना आर. नवाल आणि ॲड. प्रणव आव्हाड यांनी दिलेली अधिक माहिती अशी ः अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी ३० नोव्हेंबर २०१९ च्या जाहिरातीद्वारे पोलिस शिपाई (ड्रायव्हर) पदाच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया स्वतंत्र युनिट्स/जिल्ह्यांसाठी आयोजित केली होती.

 

सुमारे नऊ हजार ८२७ उमेदवारांनी (अर्जदारांचा पहिला संच) जाहिरातीतील अटी व शर्तीचे उल्लंघन करीत एकापेक्षा जास्त युनिट/जिल्ह्यांसाठी फॉर्म भरले आणि परीक्षाही दिल्या. अशा उमेदवारांची नावे जरी गुणवत्ता यादीत समाविष्ट केली गेली, तरी एकापेक्षा जास्त ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले म्हणून भरती प्रक्रियेच्या अटी, शर्तींचे उल्लंघन केले म्हणून सुधारित गुणवत्ता यादीतून ते हटविण्यात आले.

 

गुणवत्ता यादीतून वगळण्यात आलेल्या उमेदवारांनी (अर्जदारांच्या पहिल्या संचाने) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्याकडे अर्ज दाखल करून सुधारित गुणवत्ता यादीला आव्हान दिले. न्यायाधिकरणाने पुढील प्रक्रियेत उमेदवारी विचारात घेऊन त्यांच्या अर्जांना परवानगी दिली.

 

११ एप्रिल २०२२ च्या या आदेशाच्या अंमलबजाणीमुळे ज्या उमेदवारांनी एकच फॉर्म (उमेदवारांचा दुसरा संच) भरले होते, त्यांनी या आदेशावर आक्षेप घेत अर्ज दाखल केला. त्यामुळे हे प्रकरण मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तीन खंडपीठात सादर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी या तीन खंडपीठासमोर झाली.

 

या खंडपीठाने १७ मार्च २०२३ ला निकाल दिला आणि ज्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज भरले होते. अर्थात, अर्जदारांच्या पहिला संचच्या बाजूने जारी केलेल्या नियुक्त्या बाजूला ठेवत पोलिस आयुक्तांना निकालाच्या तारखेपासून तीन आठवड्यांच्या आत सुधारित निवड यादी तयार करण्याचे आदेश दिले. खटल्यात उमेदवारांच्या दुसऱ्या संचाची बाजू ॲड. प्रणव आव्हाड आणि ॲड. दर्शना नवाल यांनी खंडपीठात मांडली.

पोलीस भरती 2022 नवीन मोफत टेस्ट सिरीज

पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस २०२२

पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच


जिल्हा पोलिस शिपाई भरती प्रक्रिया २ ते ५ जानेवारी या कालावधीत घेण्यात आली. यंदाच्या पोलिस भरती प्रक्रियेत ट्रान्सजेंडर उमेदवार चांद सरवर तडवी यांना सामावून घेण्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त हाेताच त्यांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. त्यात ते उत्तीर्ण झाल्याने लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे २ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या परीक्षेत त्यांनाही समाविष्ट केले जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस भरतीचे अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर मोफत उपलब्ध आहे.!!

 

जिल्हा पोलिस शिपाई भरती प्रक्रिया २ ते ५ जानेवारी या कालावधीत घेण्यात आली. त्यावेळी ट्रान्सजेंडर उमेदवार चांद सरवर तडवी यांनी ऑनलाइन फार्म भरलेला होता. ते ५ जानेवारी रोजी भरतीकामी उपस्थित होते. परंतु, ट्रान्सजेंडर उमेदवारांच्या संदर्भात कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त नसल्याने त्यांना पोलिस भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात आले नव्हते.

 

गृह विभागाकडून १४ मार्च रोजी या विषयीची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार, ट्रान्सजेंडर उमेदवारांची १७ मार्च रोजी सकाळी ७ वाजता पोलिस कवायत मैदानावर निवड चाचणी घेण्यात आली. महिला की पुरुष अशी वर्गवारी विचारल्यावर महिला सांगितल्याने त्यानुसार मैदानी चाचणी घेण्यात आली. एकूण ४२ पदांसाठी ५०५ जणांची अंतिम निवड करण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी हे सर्व उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत.

लेखी परीक्षेच्या संदर्भातील इतर महत्वाच्या लिंक खाली दिलेल्या आहे : खालील सर्व टेस्ट आणि पेपर्स सर्व महाभरती द्वारे मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहे रोज येथे नवीन प्रश्नसंच सुद्धा प्रकाशित होत असतात तेव्हा प्रत्येक उमेदवाराने रोज सराव करावा. 

 


साताऱ्यात तीन तृतीयपंथीयांनी पोलीस भरतीसाठी मैदानी परीक्षा दिली. राज्यात पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर साताऱ्यात तीन तृतीयपंथीयांची शारीरिक परीक्षा घेण्यात आली.   साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली पोलीस भरती प्रक्रिया पार पडली असून, यामध्ये आर्या पुजारी, भूषण शिंदे आणि सतीश पाटील यांचा समावेश आहे. या तृतीयपंथीयांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. राज्यभरातून एकूण ७३ तृतीयपंथीय उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला आहे. अधिक माहिती खाली वाचा… तसेच

Maharashtra Transgender Bhartiअसे आहेत निकष

तरुणांनो लागा तयारीला!! पोलिस भरतीची मैदानी व लेखी परीक्षा परीक्षेच्या तारखा जाहीर!!

पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस २०२२

पोलीस भरती 2022 नवीन मोफत टेस्ट सिरीज

पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस २०२२

पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच

राजभरातून एकूण 73 तृतीयपंथीय उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला आहे. साताऱ्याच्या आर्या पुजारी यांनी पोलीस होण्याची इच्छा व्यक्त करत सराव सुरू केला होता. आर्यांची पहिली बातमी LOKशाहीने प्रसारित केल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागी झाले होते.

साताऱ्याच्या आर्या पुजारी यांनी पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी जागा उपलब्ध करावी यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्याला यश मिळाले असून आज राज्यातील तृतीयपंथीयांची पहिली भरती ही साताऱ्यात होत आहे.

तीन जणांच्या भरतीसाठी 70हुन अधिक पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. 100 मीटर, 800 मीटर आणि गोळा फेक अशी मैदानी चाचणी घेण्यात आली. मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा होणार असून यामध्ये पात्र झाल्यास राज्यातील पहिली तृतीयपंथी पोलीस होण्याचा मान आर्या पुजारीला मिळणार आहे.

दरम्यान सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ चे (Satara Police Recruitment 2021) अनुषंगाने शारीरिक चाचणी व मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी ५० टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून प्रवर्गनिहाय जाहिरातमध्ये दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्दी माध्यम फेसबुक, ट्विटर तसेच (www.satarapolice.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमध्ये प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणानुसार उमेदवारांच्या काही तक्रारी / हरकती असल्यास २० मार्च २०२३ रोजी १८.०० वाजेपर्यंत (सायबर पोलीस ठाणे ०२१६२-२३४१३० Extn – २३८) या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा ([email protected]) या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी केले आहे.


Maharashtra Police Bharti 2023

Maharashtra Police Bharti 2022 – As per Notice Published About Police Bharti 2022, it has been observed that a physical test, as well as a skill test, has been completed for driver police constables in the below-mentioned categories in police constable recruitment 2021. Candidates who have passed the physical test and skill test with the prescribed marks and qualified in the written test are proposed to be held on 19.03.2023 at 11.00 to 13.00 hrs in the below-mentioned components. Read More Information Below

उपरोक्त विषयास अनुसरुन सन २०२१ पोलीस शिपाई भरतीमध्ये खालील नमूद घटकांतील चालक पोलीस शिपाई यांची शारीरिक चाचणी तसेच, कौशल्य चाचणी संपन्न झाल्याचे निदर्शनास आले आहे. शारीरिक चाचणी व कौशल्य चाचणीमध्ये विहित गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची खालील नमूद घटकांत दिनांक १९.०३.२०२३ रोजी ११.०० ते १३.०० वाजता घेण्याचे प्रस्तावित आहे. अधिक माहिती खाली वाचा… तसेच पोलीस भरतीचे अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर मोफत उपलब्ध आहे.!!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तरी खालील नमूद घटक प्रमुखांना कळविण्यात येते की, त्यांनी त्यांचे घटकाचे अधिनस्त चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये शारीरिक चाचणी व कौशल्य चाचणीमध्ये विहित गुणांनी उत्तीर्ण होवून लेखी परीक्षेसाठी पात्र टरलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन लेखी परीक्षेचे ठिकाण निश्चित करावे व लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची खालील नमूद विहित नमुन्यात इंग्रजीमध्ये यादी तयार करुन दिनांक ०६.०३.२०२३ पर्यंत महाआयटी विभागास [email protected] / raunak.saraf@mahait.org या संकेत स्थळावर व पोलीस महासंचालक यांचे वेबसाईटवर पाठविण्यात यावी व त्याची एक प्रत या कार्यालयास पाठवावी. तसेच, परीक्षेसंबंधी इतर सुचना यथवकाश देण्यात येतील.

 

 


Maha Police Recruitment 2023 New Update

Maharashtra Police Bharti 2022 – 23: Due to insufficient manpower, the police force has many vacant posts. As two thousand posts of officers and policemen are vacant in comparison to the sanctioned posts. In kolhapur district, there is 98 posts of senior police officers are vacant. Its a big question before students when this Vacant Posts get Filled. Right Now There is Ongoing Police Bharti Recruitmnt 2021 is conducting in 2022-23. So after finishng this it may possible that this Recruitment will also carried Out by Police Department !! Check More update about Maha Police Bharti 2023 at below

पोलिस दलात तब्बल दोन हजार पदे रिक्त

कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पोलिस उपअधीक्षकपदाची ४१, पोलिस निरीक्षक १४७, सहायक पोलिस निरीक्षक २४३, पोलिस उपनिरीक्षक ४११, पोलिस अंमलदार १० हजार ७२५, तर महिला पोलिस २ हजार ४१० पदे मंजूर असताना प्रत्यक्षात १ हजार ८५० पेक्षा जादा पदे रिक्त आहेत. मनुष्यबळासह यंत्रणा अद्ययावत करणे गरजेचे आहे. अधिक माहिती खाली वाचा… तसेच पोलीस भरतीचे अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर मोफत उपलब्ध आहे.!!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, साता-यासह पाचही जिल्ह्यांत अट्टल गुंडांसह माफिया टोळ्यांचे वर्चस्व आणि दहशत वाढत समाजकंटकांवर वर्दीचा धाक राहिला पाहिजे, ही भावना स्वाभाविक असली तरी अपुरे मनुष्यबळ, अत्याधुनिक साधनसुविधांचा अभाव असेल तर… सद्यस्थितीत कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत एकूण मंजूर पदांपेक्षा अधिकारी, पोलिसांची दोन हजारांवर पदे रिक्त असल्याने आणीबाणीच्या काळात यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Maha Police Bharti 2023 Update

कोल्हापूर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीणसह पुणे ग्रामीण क्षेत्रात २०२१ व २०२२ या कालावधीत गंभीर गुन्ह्यांचा टक्का वाढला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच गुन्हेगारी टोळ्यांना जरब बसविण्यासाठी यंत्रणेवर अनेक मर्यादा येत आहेत. वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख या तुलनेत पोलिस दलाची यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसून येते. त्यासाठी मनुष्यबळासह यंत्रणा अद्ययावत करणे गरजेचे आहे.

Maharashtra Police Bharti 2023

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची ९८ पदे रिकामी !

कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पोलिस उपअधीक्षकपदाची ४१, पोलिस निरीक्षक १४७, सहायक पोलिस निरीक्षक २४३, पोलिस उपनिरीक्षक ४११, पोलिस अंमलदार १० हजार ७२५, तर महिला पोलिस २ हजार ४१० पदे मंजूर असताना प्रत्यक्षात १ हजार ८५० पेक्षा जादा पदे रिक्त आहेत. कोल्हापुरात पोलिसांची (११६), सांगली (१४२), सातारा (३३८), सोलापूर ग्रामीण (२३४), पुणे ग्रामीणला ९७२ पदे रिक्त आहेत. परिक्षेत्रांतर्गत पाचही जिल्ह्यांत उपअधीक्षकांपासून उपनिरीक्षकांपर्यंत ९८ पदे रिकामी आहेत.

कोल्हापूर, सांगलीत जिल्ह्यात जत, इस्लामपूर, मिरज, उपअधीक्षक (गृह) व आर्थिक गुन्हे शाखेतील उपअधीक्षकांची पदे रिक्त आहेत. इस्लामपूरचे तत्कालीन उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची पाच महिन्यांपूर्वी बदली होऊनही त्यांची अजूनही पोस्टिंग झालेली नाही.
उपअधीक्षकपदाची ८ पदे रिक्त पोलिस उपअधीक्षकपदाची कोल्हापुरात ३, सांगलीत ५, पुणे ग्रामीणला ३ आणि सातारा येथे दोन पदे रिक्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शाहूवाडी तसेच सांगली


Police Bharti 2022 Maharashtra New Update

Maharashtra Police Bharti 2022: Police Bharati 2022 Latest Updates. As per the latest news, The deadline of 15 days has now been extended to fill the police recruitment application and Fadnavis has informed about this by tweeting. The deadline has been extended till December 15, 2022. Further details are as follows:-

 

राज्यात पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी सुरू असून, नाशिक ग्रामीणमध्ये २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी चालणार असून, त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. अद्याप लेखी परीक्षेची तारीख महासंचालक कार्यालयाने जाहीर केली नसली, तरी एका पदामागे दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात १८ हजार ३३१ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी राज्यभरातून १४ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केल्याने उमेदवारांच्या अनुपस्थितीचे प्रमाण सर्वत्र सुमारे चाळीस टक्के आहे. राज्यातील काही पोलिस आयुक्तालय/अधीक्षक कार्यालयांमधील मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १६४ शिपाई व १५ चालक पदांसाठी सुरू असलेल्या मैदानी चाचणीत आत्तापर्यंत सरासरी ४० टक्के उमेदवार गैरहजर राहत असल्याचे समोर आले आहे. उमेदवारांनी एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केले असून, पसंतीक्रम ठरवून ते मैदानी चाचणीस हजर राहत आहेत.

Police Bharti Written Exam 2022 – लेखी परीक्षेची तयारी

मैदानी चाचणीनंतर प्रत्येक रिक्त जागेमागे १० पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी केली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षेचे वेळापत्रक लागणार असून, १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा अवधी राहणार असून, मराठी भाषेतच परीक्षा होईल. मैदानी व लेखी परीक्षेतील गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. तसेच पोलीस भरतीचे अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर मोफत उपलब्ध आहे.

Ten candidates will be selected for ‘Lekhi’ based on merit for one post out of those who passed in ‘Maidani’. Accordingly one lakh 83 thousand 310 candidates will be eligible for writing. But, without the ‘ground’ of the third parties, the written examination of the police recruitment candidates cannot be conducted. After deciding the criteria, their field test will be conducted in March. On the other hand, centers will not be available due to most of the university exams including 10th-12th. Therefore, the written examination for police recruitment will be held in the month of April, said senior officials of the Home Department.

तरुणांनो लागा तयारीला!! पोलिस भरतीची मैदानी व लेखी परीक्षा परीक्षेच्या तारखा जाहीर!!

पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस २०२२

पोलीस भरती 2022 नवीन मोफत टेस्ट सिरीज

पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस २०२२

पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच

तसेच नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत ६५ टक्के उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. मैदानी चाचणीत ५० टक्के गुण मिळवणाऱ्यांची प्रवर्गनिहाय यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार एका पदामागे किमान दहा उमेदवारांना लेखी परीक्षेत संधी दिली जाईल. त्यानुसार नाशिक ग्रामीणच्या १७९ पदांसाठी सुमारे अडीच ते तीन हजार उमेदवार लेखी परीक्षेच्या शर्यतीत असतील.

दरम्यान, सध्या उमेदवार गैरहजर राहत असल्याने लेखी परीक्षेपूर्वीच्या गुणवत्ता यादीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मैदानी चाचणी पार करून पुढे जाणाऱ्या उमेदवारांची संख्या निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांमध्ये जास्त स्पर्धा राहणार आहे.

 


पोलीस भरती – २०२१ मध्ये मा. उच्च न्यायालय, बॉम्बे यांनी तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पोलीस भरती २०२१ मध्ये policerecruitment२०२२.mahait.org या संकेतस्थळावर तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सदरचा पर्याय पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदासाठी दिनांक १३.१२.२०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

पोलीस भरती २०२२ साठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची उद्या लास्ट डेट आहे, तरी मित्रांनो जर आपण अर्ज नसेल केला तर त्वरित अर्ज करा, कारण उद्या जास्तीत जास्त उमेदवार अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात वेबसाईट मध्ये तांत्रिक अड्चण येण्याची शक्यता सुद्धा जास्त राहील, तेव्हा आजच आपला अर्ज दाखल करून निश्चित व्हा. अर्ज दाखल करण्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. तसेच जर अर्ज कसा करायचा हे जाणून घ्यायचे असेल तर या लिंक वर क्लिक करा. पुढील अपडेट महाभरती वर प्रकाशित करूच तेव्हा रोज भेट देत रहा. तेव्हा महाभरतीला भेट देत रहा. तसेच पोलीस भरती २०२२ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत.  ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर पर्यंत असणार होती. मात्र त्यानंतर शेवटची तारीख वाढवून 15 डिसेंबर पर्यंत करण्यात आली. आज महाराष्ट्र पोलीस भरतीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्हीही फॉर्म भरला नसेल तर ही शेवटची संधी असणार आहे !!

प्रक्रियेत दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे.

पोलिस भरतीच्या माध्यमातून राज्यात १८ हजार ३३१ पदांची भरती होणार आहे. सहा-सात वर्षांपासून शासकीय मेगाभरती निघाली नसल्याने पोलिस भरतीसाठी तब्बल १४ लाख ४७ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एका जागेसाठी तब्बल ७९ उमेदवारांमध्ये स्पर्धा पहायला मिळणार आहे. सर्वांची एकाचवेळी परीक्षा होणार आहे. 

राज्यात सध्या सर्वच विभागांची पदभरती निघाली आहे. जवळपास ७५ हजार पदे भरली जात आहेत. त्यामुळे बहुतेक तरुण- तरुणांनी पोलिस भरती बरोबरच अन्य भरतीसाठी देखील तयारी सुरू केली आहे. ‘काहीही होऊ दे पण आता यावर्षी नोकरी मिळवायचीच’ असा संकल्प करून ते मेहनत करत आहेत. दरम्यान, पोलिस भरती संपल्यावर किंवा कदाचित काही जिल्हा परिषदेची भरती पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेवेळी होऊ शकते. जानेवारीत मैदानी आणि १५ ते २० फेब्रुवारीपूर्वी लेखी परीक्षा होईल. त्यानंतर दहावी-बारावी मुलांच्या परीक्षा सुरू होतील. उमेदवारांची संख्या पाहता परीक्षांना थोडा वेळ लागू शकतो. एका जागेसाठी १० म्हणजेच १८ हजार ३३१ जागांसाठी १४ लाख ४७ हजार अर्जदारांपैकी एक लाख ८३ हजार ३१० जणांची निवड लेखी परीक्षेसाठी होईल. त्यामुळे स्पर्धा मोठी असून या भरतीसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अर्जदार आहेत.

 

Police Bharti 2022 Maharashtra New Update

नवीन GR – https://bit.ly/3HsLFIQ
अर्ज लिंक – policerecruitment2022.mahait.org

Police Bharti 2022

 

Police Recruitment 2022

  • राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
  • अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.

17,130 पदांची पोलीस भरती! Police Recruitment 2022

Maharashtra Police Bharti 2022  Finally New Update Regarding Maharashtra Police Bharti has come Out Just now. As per the latest update, the Maharashtra Police Bharti Online Application Process is starting from 9th November 2022 For 17,130 Vacancies @ policerecruitment2022.mahait.org. So Students Be prepared with Your All Documents to apply for this Mega Police Bharti. This time there will be a huge Number of vacancies: for Police Shipai number of Posts is 14956 and for Police Driver 2174 Posts will be filled. It is temporary data, but as soon as the Advertisement is issued we will update this. So stay connected with this Page. The Maharashtra Police Recruitment 2022 registration process will start today (November 9). Interested candidates must note that the last date to apply is November 30. Maharashtra Police is aiming to fill a total of 17,130 vacancies through this recruitment drive.

मित्रांनो, पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती आज प्रकाशित झाल्या असून सर्व जिल्ह्यांच्या जाहिरातीच्या लिंक्स आम्ही खाली दिलेल्या आहे, तसेच पोलीस भरतीच्या ऑनलाईन अर्जाला सुरवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच होणार आहे. या अपडेट मुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे हे निश्चित. आपल्या जिल्ह्यातील जाहिरातीच्या लिंक्स आपण खाली दिलेल्या तक्त्यामध्ये बघू शकता. पुढील सर्व अपडेट्स महाभरती वर प्रकाशित होतीलच. मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पोलीस भरती २०२२ अर्ज कसा कराल ?

SRPF पोलीस भरतीची १२०१ पदांची जाहिरात प्रकाशित

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
  • पद संख्या – 21,764 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन

Police Bharti 2022 शिपाई Post Details

 

महत्वाचे निर्णय आणि सूचना 

पोलीस भरती संदर्भातील पूर्ण नियम, अटी आणि माहिती

 

पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करायचा- पूर्ण माहिती

Maharashtra police bharti 2022 district wise vacancy

  • Maharashtra police bharti 2022 district wise vacancies are given in following table. Check the number of vacancies in your district. You can apply for any single district only.

महाराष्ट्र पोलीस भरती 2023 – जिल्हानिहाय PDF जाहिराती 

मुंबई पोलीस भरती 2022 – 8,070 पदे (जागा वाढल्या)
पुणे पोलीस भरती 2022 – 795 पदे
पुणे ग्रामीण पोलीस भरती 2022 – 669 पदे
ठाणे पोलीस भरती 2022 – 521 पदे
पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2022 – 216 पदे
मीरा भाईंदर पोलीस भरती 2022 – 996 पदे 
नागपूर पोलीस भरती 2022 – 429 पदे
नवी मुंबई पोलीस भरती 2022 – 204 पदे
औरंगाबाद पोलीस भरती 2022 – 15 पदे
अमरावती पोलीस भरती 2022 – 41 पदे
सोलापूर पोलीस भरती 2022 – 171 पदे
मुंबई रेल्वे पोलीस भरती 2022 – 620 पदे
ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2022 – 116 पदे
रायगड पोलीस भरती 2022 – 278 पदे
पालघर पोलीस भरती 2022 – 216 पदे
सिंधुदुर्ग पोलीस विभागात 121 पदांची भरती- अर्ज करा
रत्नागिरी पोलीस विभागात 131 पोलीस शिपाई पदांची नवीन भरती
नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2022 – 179 पदे
अहमदनगर पोलीस भरती 2022 – 139 पदे
धुळे पोलीस विभाग नवीन भरती – 42 पदे
सातारा पोलीस विभागात 145 रिक्त पदांची नवीन भरती
कोल्हापूर पोलीस भरती 2022 – 24 पदे
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2022 – 54 पदे
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात शिपाई पदाच्या 39 जागा रिक्त
नांदेड पोलीस भरती 2022 – 185 पदे
परभणी पोलीस भरती प्रक्रिया 75 पदांसाठी होणार
हिंगोली पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती
नागपूर ग्रामीण पोलीस विभागात 179 पदांची भरती
भंडारा पोलीस विभाग अंतर्गत 117 पदांची भरती
चंद्रपूर पोलीस भरती 2022 – 275 पदे
वर्धा पोलीस भरती 2022 – 126 पदे
गडचिरोली पोलीस विभागात 508 पदांची भरती लवकरच
गोंदिया पोलीस भरती 2022 – 194 पदे
अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2022 – 197 पदे
वाशीम चालक पोलीस शिपाई भरती 2022
अकोला पोलीस भरती 2022 – 366 पदे
बुलढाणा पोलीस विभागात पोलीस शिपाई पदांची भरती
यवतमाळ पोलीस भरती 2022 – 302 पदे
पुणे रेल्वे पोलीस भरती 2022 – 124 पदे
औरंगाबाद रेल्वे पोलीस भरती 2022 – 154 पदे
नागपूर रेल्वे पोलीस भरती 2022 – 28 पदे
लातूर पोलीस नवीन भरती – 28 पदे

 

  • Maharashtra Police Constable Recruitment 2022: Vacancy details 
    • Police Constable: 14956 posts
    • SRPF Police Constable:1204 posts
    • Driver Police Constable: 2174 posts

    Maharashtra Police Constable Job 2022: How to apply 

    • Visit the website of the Maharashtra Police i.e. policerecruitment2022.mahait.org.
    • Register for the Post
    • After registration, login into your account
    • Fill the Form
    • Pay Application Fee.

Maharashtra Police Bharti Written Exam 2022


18000 पोलीसांच्या भरतीची जाहिरात

  • Maharashtra Police Bharti 2022: The latest update for Maharashtra Police Recruitment 2022. As per the latest news, 18000 police posts will be recruited soon in Next week by State Police Department. This state is given by Hon. Devendra Fadnavin in Nagpur Today- Maharashtra Home Department. There is good news for the young people who have their eyes set on this. Further details are as follows:-

 

पहिल्यांदाच होणार शारीरिक चाचणी 

  • शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
  • शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.

 

Maha Police Constable Bharti 2022 Notification PDF

  • The Maha Police Constable Bharti 2022 Notification PDF is released on 9th November 2022.
  • Notice is published online on mahapolice.gov.in according to which notification for recruitment will be published online on 9th November 2022.
  • Application Form Dates for the Recruitment are given below for your reference.
  • Interested Candidates can download the Notification and check their Age Limit and Eligibility from it.
  • There are 17000+ Posts of Constable available under this Notification.
  • Maha Police Bharti Physical Test Details will be mentioned on the Notification and we have also curated it below for your reference.

Documents Required for Maharashtra Police Recruitment 2022 Application Form

  • Aadhar Card. (आधार कार्ड.
  • Residence Certificate. (निवास प्रमाणपत्र.)
  • 10th Marksheet. (10वी मार्कशीट.)
  • 12th Marksheet. (12वी मार्कशीट.)
  • Graduation Certificate. (पदवी प्रमाणपत्र.)
  • Computer Proficiency Certificate. (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र.)
  • Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र.
  • Signature. (स्वाक्षरी.)
  • Photograph. (फोटो.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


: पोलीस भरतीचे मागील अपडेट्स खालील प्रमाणे आहेत  : 

Police Recruitment Vacancy 2022

Police Recruitment 2022

  • Police Bharti Physical Test 
  • पहिल्यांदाच होणार शारीरिक चाचणी
  • शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे.
  • मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • Maharashtra Police Recruitment 2022 – Exam Pattern 
  • पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
  • शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.

Maharashtra Police Recruitment 2022

Maharashtra Police Bharti 2022 Physical Test Details

Category Running Race Long Jump Shot Puts
Male 1600 Metre 100 Metre 4 Metre 7 Metre
Female 800 Metre 100 Metre 3 Metre 6 Metre

  • Police Bharti 2022 – GR Published
  • Maharashtra Police Bharti 2022: The candidates who fulfill the physical and educational qualification shall be required to appear for physical fitness test. The physical Fitness test will be of total 50 marks as follows, namely :—
  • क्रमांक – सेप्रनि-१८१८/प्र.क्र.३१३(भाग-२)/पोल-५अ.-महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा मुंबई अधि.२२) याच्या कलम ५ च्या खंड (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याच्या वतीने त्यास समर्थकरणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता पुढील नियम करीत आहेत. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • १. या नियमास, “महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (पहिली सुधारणा) नियम, २०२२” असे म्हणावे.
  • २. “महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ याच्या नियम ४ ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येईल:-
  • (१) शारीरिक चाचणी (५० गुण) :
  • जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल.
  • शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण ५० गुणांची असेल :
  • Maharashtra Police Bharti 2022
  • (अ) शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
  • (ब) लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील :
  • (१) अंकगणित
  • (२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • (३) बुध्दीमत्ता चाचणी
  • (४) मराठी व्याकरण
  • (क) लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे इतका असेल.
  • (ड) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
  • स्पष्टीकरण:- शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलाविण्यास पात्र असतील. उदाहरणार्थ, जर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये १० रिक्त पदे व अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये ५ रिक्त पदे असतील तर, अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये गुणवत्तेनुसार १०० (१०x१०=१००) उमेदवार, सूचीबध्द करण्यात येतील आणि अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये गुणवत्तेनुसार ५० (१०४५-५०) उमेदवार, सूचीबध्द करण्यात येतील. तथापि, अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणानुक्रमे १०० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातर्गत लेखी चाचणीस बसण्यासाठी बोलवण्यास पात्र असतील. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणानुक्रमे ५० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गांतर्गत लेखी चाचणीस बसण्यासाठी बोलावण्यास पात्र असतील.
  • GR डाउनलोड – https://bit.ly/39SbiEr

  • Maharashtra Police Bharti 2022 – As you know, Maharashtra Police Bharti 2022 is expected soon. The Maharashtra Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra State Police Recruitment 2022 MahaPolice Link is given for other District Advertisements.
  • Police Bharti 2022 | Police Recruitment 2022
  • तुम्हाला माहिती आहेच की, महाराष्ट्र पोलीस भारती 2022 लवकरच अपेक्षित आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिकृत PDF जाहिरात लवकरच उपलब्ध होईल. या भरती प्रक्रियेचे अपडेट्स आणि तपशील येथे दिले आहेत. अंतिम तारीख आणि नोंदणी प्रक्रियेचे तपशील लवकरच उपलब्ध होतील. 

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

Maharashtra Police Bharti 2022: पुढील महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर)  तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

Maharashtra Police Bharti 2022 | Shipai Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी? 

What is the height of Maharashtra police? | Is height important for Constable?

महिला (Female) महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष (Male) पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject) गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

Physical Eligibility For Police Bharti 2022 | Maharashtra Police Bharti 2022 

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक (4 किलो) 10 Marks
एकूण गुण (Total Marks) 50 Marks
  • Maharashtra Police Bharti 2022
  • Maharashtra Police Bharti 2022 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
  • Age Limit For Maharashtra Police Bharti 2022
Category (प्रवर्ग) Age (वय)
खुला 18 ते 28
मागास 18 ते 33
प्रकल्पग्रस्थ उमेदवार 18 ते 45
माजी सैनिक उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील.
अनाथ उमेदवार 18 ते 33
भूकंपग्रस्थ उमेदवार 18 ते 45
खेळाडू 18 ते 38
पोलीस पाल्य 18 ते 33
गृहरक्षक 18 ते 33
महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33

Age Limit For Maharashtra Police Bharti। Police Recruitment 2022

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Maharashtra Police Recruitment 2022

Minimum Height For Female Candidates 155 CM
Minimum Height For Male Candidates 165 CM

Maharashtra Police Recruitment | Application Fees Details

For General Category ₹450
For Reserve Category ₹350
For Ex-Serviceman Candidates -NA-

 

Selection Procedure For Maharashtra Police Recruitment 2022

  • Maharashtra Police Bharti 20221, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the Maharashtra Police Bharti 2022 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

पोलीस भरती 2022 – महत्त्वाचे कागदपत्रे | Maharashtra Police Bharti 2022

  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
    ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
  • Maharashtra Police Bharti 2022 – Required Documents List
  • Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
  • Candidates availing the benefit of caste reservation require a caste certificate.
  • MS-CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification
  • The candidate must have an identity card while appearing for the written test. For this PAN card, passport, driving license, voter
    Identity card, updated bank passbook, Aadhaar card
  • Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non-Criminal Layer Certificate
  • Attested photocopies of certificates
  • Caste certificate validity
  • Caste Certificate for Socially, Educationally Backward Candidates
  • Certificate of Financially Backward
  • Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for players

Maharashtra Police Bharti 2022

 

FAQs

Police Bharti 2022 Maharashtra Date?

Maharashtra Police Bharti 2022 is starting from 9th November 2022, last date to apply for this recruitment will be available soon.

What is the Maharashtra Police Shipai Salary 2022?

The Salary for Constable posts is Rs.5200 To Rs. 20200 with Grade Pay of Rs 2020.

What is the official website for Maharashtra State Police Recruitment 2022?

The official website to apply for Maharashtra Police Bharti 2022 is www.mahapolice.gov.in.

What is the Minimum Age limit for Maharashtra Police Constable Bharti 2022?

The minimum age required for Constable Bharti 2022 is 19 Years.

पोलीस भरती 2022 कधीपासून सुरु होईल?

आत्ताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरती 2022, ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणार आहे. महाभरती वर  सविस्तर माहिती दिलेली आहे.

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

104 Comments
  1. MahaBharti says

    पोलीस भरती २०२२ भरतीची नवीन तारीख जाहीर !!

  2. Vishwajit ghuge says

    अ.जा.चे वय मार्यादा 18/33 आहे मग या मध्ये 5 वर्षा ची सूट नाही का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड