महत्त्वाचे – जिल्हाभरात तब्बल 581 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त!!

Maharashtra Anganwadi Bharti 2022

Maharashtra Anganwadi Bharti 2022

Maharashtra Anganwadi Bharti 2022 : There are a total of 581 Anganwadi worker posts vacant in the District. This recruitment has not been conducted last 3 years. For more details about Maharashtra Anganwadi Recruitment 2022, Anganwadi Bharti 2022, Anganwadi Bharti 2022 Online Form, Anganwadi Bharti Maharashtra, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

जिल्हाभरात अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या तब्बल 581 जागा रिक्त आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ही पदे रिक्त आहेत. रिक्त जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर कामाचा अतिरिक्‍त भार वाढला आहे.

7 वी उत्तीर्णांना संधी!! ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती सुरू

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

 • अंगणवाडीकडे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया म्हणून पाहिले जाते.
 • बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी शासन त्यांच्या आहारासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे.
 • रिक्त जागामुळे अंगणवाडीतील बालकांचे भवितव्य अंधारात सापडण्याची चिन्हे आहेत.
 • अनेक नजीकच्या अंगणवाडी सेविकांना रिक्त पदावरील अंगणवाडीचा प्रभारी चार्ज देण्यात आला आहे, मात्र त्याकडे त्यांना पूर्ण वेळ देता येत नसल्याने येथील अनेक बालकेही दुर्लक्षित ठरत आहेत.
 • सहा महिन्यांपूर्वी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांकडून रिक्त जागांच्या 50 टक्के जागा भरण्याचा आदेश आला.
 • या आदेशात 31 डिसेंबर 2019 पूर्वी रिक्त झालेल्या जागाना प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले होते.
 • त्यानुसार 50 टक्के जागा भरुनदेखील गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात आजपर्यंत 581 कर्मचार्‍यांच्या जागा या रिक्त आहेत.
 • येत्या काळात लवकर या जागा न भरल्यास अंगणवाडीतील मुलांच्या शिक्षणाचा दर्जा ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Anganwadi Bharti 2022 – Vacancy Details 

फक्त सोलापुरात ही परिस्थिती नसून अशी परिस्थिती संपूर्ण राज्यभरात आहे. अंगणवाडीत काम करणारे कर्मचारी कमी मानधनावर प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे नेहमीच कौतुक होत असते. असे असतानाही कमी मानधनासाठी कर्मचार्‍यांची नियुक्‍ती राज्य शासनाकडून होत नसल्याने पालकांत शासनाच्या विरोधात रोष बळावत आहे. अक्कलकोट तालुक्यात सेविका 16, मिनी सेविका 3, मदतनीस 55, बार्शी तालुक्यात सेविका 12, मिनी सेविका 1, मदतनीस 30, वैराग सेविका 8, मदतनीस 20, करमाळा तालुक्यात सेविका 17, मिनी सेविका 1, मदतनीस 25. माढा तालुक्यात सेविका 2, मिनी सेविका 1, मदतनीस 22, कुर्डूवाडी आणि टेंभुर्णी येथे सेविका 6, मदतनीस 11, माळशिरस तालुक्यात सेविका 18, मिनी सेविका 1, मदतनीस 19, अकलूज येथे सेविका 17, मदतनीस 31. मंगळवेढा तालुक्यात सेविका 1, मिनी सेविका 1, मदतनीस 26, मोहोळ तालुक्यात सेविका 13, मिनी सेविका 5, मदतनीस 29, उत्तर सोलापूर सेविका 13, मदतनीस 20, पंढरपूर 1 सेविका 9, मदतनीस 36, पंढरपूर क्र. 2 येथे सेविका 9, मदतनीस 24, सांगोला तालुक्यात सेविका 3, मिनी सेविका 1, मदतनीस 10, कोळा येथे सेविका 11, मिनी सेविका 2, मदतनीस 9, दक्षिण सोलापूर येथे 9, मदतनीस 34 अशा जागा रिक्त आहेत.

जी रिक्त पदे होतील, त्यातील 50 टक्के पदांची भरती करण्याचा शासनाचा आदेश होता. त्यानुसार सर्व पदे भरण्यात आली आहेत. जानेवारी 2020 पासूनची रिक्त पदे शिल्लक आहेत. शासनाचा आदेश येताच रिक्‍त पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच करण्यात येईल.

– जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि.प. सोलापूर


Maharashtra Anganwadi Bharti 2022

Maharashtra Anganwadi Bharti 2022: Ekatmik Balvikas Seva Yojna Prakalp 1 & 2 are invited offline applications for Anganwadi Sevika, Helper posts. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 4th of July 2022. For more details about Maharashtra Anganwadi Bharti 2022, Anganwadi Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प १ व २ मध्ये अंगणवाडी सेविका पदासाठी व मदतनीस पदासाठी रिक्त जागा भरावयाच्या आहेत. यासाठी इच्छुक व आवश्यक अर्हताधारक संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक रहीवाशी असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचे अर्ज २२ जून ते ४ जुलैपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी परकार कॉम्पलेक्स दुसरा मजला २१८ येथे सादर करावे.

 • पदाचे नाव – अंगणवाडी सेविका, मदतनीस
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी परकार कॉम्पलेक्स दुसरा मजला २१८
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जून ते ४ जुलै २०२२ 

Maharashtra Anganwadi Recruitment 2022

 • तालुक्यातील अंगणवाडी सेविका पदासाठी रिक्त जागा प्रकल्प १ व २मध्ये जाहीर झाले असून यासाठी विविध नमुन्यांमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • प्रकल्प १ मध्ये अंगणवाडीका सेविका पदासाठी धामेली गायकर व निरबाडे लाल या ठिकाणी अंगणवाडी सेविका पद रिक्त आहे.
 • सदर पदासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक उमेदवारांनी अर्ज करावेत.
 • त्याप्रमाणे प्रकल्प २ मध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी रिक्त जागा भरावयाच्या आहेत.
 • यासाठी गाव मजरेकाशी अंगणवाडी मजरेकाशी व गाव मिरजोळीमध्ये अंगणवाडी कोलेखाजन या ठिकाणी अंगणवाडी सेविका पद भरावयाचे आहेत.

अंगणवाडी मदतनीस रिक्त जागेसाठी कामथेमधील अंगणवाडी कामथे टेपवाडी येथे मदतनीस पद भरावयाचे आहे. सदर पदासाठी दि. २२ जून ते १ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचे अर्ज परकार कॉम्पलेक्स गाळा नं. २२६ या कार्यालयामध्ये सादर करावे. अंगणवाडी सेविका पदासाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्ष असे राहील. सदर पदांसाठी यापुर्वी जाहीरातीनुसार अर्ज केले असल्यास पुन्हा अर्ज करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी १मध्ये शिवानी शिंदे आणि प्रकल्प २ मध्ये अधिकारी एस.एस. नार्वेकर यांच्याशी संपर्क साधावा.


Anganwadi Recruitment 2022

Maharashtra Anganwadi Bharti 2022 : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी. तोपर्यंत त्यांना २६ हजार रुपये किमान वेतन मिळावे, पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सिट्र भवन येथे मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे होते. यावेळी अखिल भारतीय सीटूचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र सिटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी.

तोपर्यंत त्यांना २६ हजार रुपये किमान वेतन मिळावे, पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या जिल्हाध्यक्ष सुलक्षणा ठोंबरे, सरचिटणीस कल्पना शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुनीता मोगल, लता लावले, सुरेखा पवार, गौरी वैद्य, अंबाबाई गुंबाडे, कुसुम खोकरे, सुनीता कांबळी, लीला भोये, वैशाली घुमरे, आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Maharashtra Anganwadi Bharti 2022


Maharashtra Anganwadi Bharti 2022

Maharashtra Anganwadi Bharti 2022: Chief Minister Uddhav Thackeray on Tuesday agreed to distribute Rs 100 crore for the scheme of giving lump sum benefits to Anganwadi workers, mini Anganwadi workers and mini helpers in the state. Further details are as follows:-

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मण्यात दिली. यामुळे या संवांना सेवानिवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे किंवा मृत्युनंतर द्यावयाच्या विमा योजनेनंतर एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे.

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस पदांकरिता नोकरी करण्याची सुवर्णसंधी!!

 


Anganwadi Sevika Bharti 2022

Maharashtra Anganwadi Bharti 2022: As per the order of the state government, the process of filling up the vacancies of Anganwadi workers and helpers has been started in Ramtek taluka. Applications for these posts were to be submitted to Gram Sevaks by 21st. Further details are as follows:-

राज्य सरकारच्या आदेशान्वये रामटेक तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी करावयाचे अर्ज दिनांक 21 पर्यंत ग्रामसेवकांकडे सोपवायचे होते. मात्र, पुसदा पुनर्वसन क्रमांक 1 येथील ग्रामसेवक सहा दिवसांपासून कार्यालयात आले नाही.त्यामुळे अर्ज सोपवायचे कुणाकडे असा प्रश्न इच्छुकांसमोर निर्माण झाल्याने येथील भरती प्रक्रिया वाध्यंत आली आहे.

Anganwadi Bharti 2022

 


अंगणवाडी सेविका, मदतनीस शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता अपडेट!!

Maharashtra Anganwadi Bharti 2022अंगणवाडी सेविका भरती 2022 बद्दलच्या ताज्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांना अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदासाठी इच्छुक आहेत त्यांची काही मागणी आहे. त्यांच्या मागणीनुसार त्यांना अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना मंजुरी मिळावी, अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा तसेच मनमानी कारभार करणाऱ्या बालविकास प्रकल्प अशिकारी यांची चौकशी करण्यात यावी, यासारख्या विविध मागणीसाठी शुक्रवारी बीडच्या पंचायत समितीसमोर धरणे आंदोलने करण्यात आले.

Anganwadi Sevika Bharti 2022


Maharashtra Anganwadi Recruitment 2022 | Anganwadi Sevika Bharti 2022

Maharashtra Anganwadi Bharti 2022 – Anganwadi Sevika Bharti 2022: The recruitment process will be implemented for the post of Anganwadi Mini Sevika and Helper. Applications will be accepted during office hours on office working days from 30 December 2021 to 10 January 2022. For more details about Maharashtra Anganwadi Recruitment 2022, Anganwadi Sevika Bharti 2022, Pimpalner Anganwadi Bharti 2022, Dhule Pimpalner Anganwadi Bharti 2022, are as follows:-

Pimpalner Anganwadi Bharti 2022 | Helper Recruitment 2022

एकात्मिक बालविकास सेवा योजना, Integrated Child Development Services Scheme (Maharashtra Anganwadi Bharti 2022) प्रकल्प पिंपळनेर, ता. साक्री यांच्या अंतर्गत रिक्त अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 30 डिसेंबर 2021 ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील, असे बालविकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Dhule Pimpalner Anganwadi Bharti 2022 | Maharashtra Anganwadi Bharti 2022

पिंपळनेर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीसांची 15, तर मिनी अंगणवाडी सेविकेचे एक, अशी एकूण 16 पदे रिक्त आहेत (Maharashtra Anganwadi Bharti 2022). त्यासाठी ही भरती प्रक्रिया होईल. मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदांचा तपशील असा (अनुक्रमे ग्रामपंचायत/पाड्याचे नाव, अंगणवाडी केंद्र, रिक्त पदांची संख्या प्रत्येकी एक) : बोपखेल, भोरटीपाडा. मदतनीस रिक्त पदांचा तपशील असा : पिंपळनेर- नाना चौक, इदगाव पाडा-1. टेंभा प्र. वार्सा- दळूबाई गावठाण. शेवगे-शेवगे- 1. शेवडीपाडा- शेवडीपाडा- 1. कुडाशी- महुबंद, बंधारपाडा. वार्सा- सीताडी. खरगाव- खरगाव, पारसरी. बसरावळ- बसरावळ. प्रतापपूर- प्रतापपूर- 3. देगाव- देगाव. शेणपूर- शेणपूर 1. नवडणे- नवडणे 1. एकूण 15.

Integrated Child Development Services Scheme

The information about the terms and conditions has been published on the notice board of the concerned Gram Panchayat, Village, Pade and Project Office, said Project Officer Mrs. Bansode.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

61 Comments
 1. Harshada Arjun Bendal says

  Angnwadi bharti aahe ka
  Mobile no 8591442212
  A/P Ambitguon
  TAL-CHIPLUN
  Dist -Ratnagiri

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड