Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अकोला जिल्यात अंगणवाडी मदतनीस पदांच्या 42 जागा रिक्त; नवीन भरती सुरु!!! – Akola Anganwadi Bharti 2023

Akola Anganwadi Bharti 2023

Akola Anganwadi Bharti 2023

Akola Anganwadi Bharti 2023 – Integrated Child Development Services Scheme, Project Office Akola Rural is conducting recruitment for 42 posts of Anganwadi Helper on Emolument basis. The announcement in this regard was made on Wednesday, dt. It has been issued on 28th June, eligible women candidates dt. Child Development Project Officer, Integrated Child Development Scheme, Akola Rural has appealed to apply from 3rd to 14th July 2023.

एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय अकोला ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस या मानधन तत्त्वावरील ४२ पदाची भरती राबविण्यात येत आहे. याबाबतचा जाहीरनामा बुधवार, दि. २८ जून रोजी जारी करण्यात आला असून, पात्र महिला उमेदवारांनी दि. ३ ते १४ जुलैपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास योजना अकोला ग्रामीण यांनी केले आहे.

भरती प्रक्रिया राबविण्यासाठी गावात दवंडी देण्यात येत आहे. त्या त्या गावातील इच्छुक व पात्र महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावेत, असे कार्यालय तर्फे कळविण्यात आले आहे. या पदासाठी किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण व स्थानिक राहिवासी असणे गरजेचे आहे. भरती संदर्भातील सविस्तर अटी व शर्ती ,अर्ज नमुना इ. संबंधित ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी केंद्रात तसेच प्रकल्प कार्यालयात पाहावयास मिळणार आहे. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व शासन निर्णयानुसार होणार असून कुणाच्या भूलथापांना व अमिषाला बळी पडू नये,असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले यांनी केले आहे. या पदभरती प्रक्रियेत आपोती खुर्द ,मारोडी , म्हैसांग , मजलापूर , घुसरवाडी , दोनवाडा , एकलारा , लाखोंडा बु , दहिहांडा , धामणा , सांगवी खु , निराट , निभोंरा , आगर , लोणाग्रा , पाळोदी , टाकळी जलम , उगवा , मंडाळा , कापशीतलाव , लोणी , चांदुर , कुरणखेड ,पातुर नंदापूर ,टाकळी पोटे ,येळवण, देवळी , पैलपाडा , कानशिवणी , बाभुळगाव , बोरगाव मंजु ,वाकी व वरोडी या गावांतील पदभरती शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे.

 

Akola Anganwadi Bharti 2023: Integrated Child Development Services Scheme, Child Development Project Officer (Civil) Akola invites applications from local women candidates for the vacant post of Anganwadi Helper. There are a total of 60 vacancies are available fill the posts. Application is to be done in offline mode. The last date for submission of application is the 10th of July 2023. More details are as follows:-

महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्रं: एबावि-२०२२/ प्र.क्र.९४/का.६ दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हया केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ना) अकोला या प्रकल्प कार्यालयातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त मदतनीस या मानधनी पदासाठी प्रकल्प महानगरपालिका कार्यक्षेत्रातून पात्र महिला उमेदवारांकडून सरळ नियुक्तीने (By Nomination) अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज स्विकारण्याचा दिनांक २६/०६/२०२३ ते दिनांक १०/०७/२०२३ पर्यंत वेळ ( दि. १०/०७/२०२३ रोजी सायं. ०५:३० वाजेपर्यंत) बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ना) अकोला शहर पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टॅन्ड च्या मागे आय. टी. आय जवळ महसूल कॉलनी अकोला ४४४००१ या पत्यावर अर्ज स्विकारण्यात येतील. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
  • पदसंख्या – 60 जागा
  • शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण‍
  • वयोमर्यादा
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टॅन्ड च्या मागे आय. टी. आय जवळ महसूल कॉलनी अकोला ४४४००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – akola.gov.in

Akola Anganwadi Anganwadi Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 60 पदे (६० पैकी हिंदी भाषीक ०५, ऊर्दु भाषीक २०)

Educational Qualification For Akola Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) आवश्यक राहील.

Salary Details For Akola Anganwadi Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मदतनीस पदासाठी रू.५५००/दरमहा एकत्रित मानधन मिळेल. तसेच वेळावेळी शासन  आदेशानूसार मानधन वाढ देय राहील

How To Apply For Akola Anganwadi Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • विहीत नमुण्यातील अर्ज विहित वेळेत सादर करावा. पोस्टाने आलेले अर्ज तथा उशिरा प्राप्त होणारे अर्जांचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी
  • अर्ज स्विकारण्याचा दिनांक २६/०६/२०२३ ते दिनांक १०/०७/२०२३ पर्यंत वेळ ( दि. १०/०७/२०२३ रोजी सायं. ०५:३० वाजेपर्यंत) बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ना) अकोला शहर पत्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टॅन्ड च्या मागे आय. टी. आय जवळ महसूल कॉलनी अकोला ४४४००१ या पत्यावर अर्ज स्विकारण्यात येतील
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
  • अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Akola Anganwadi Helper Bharti 2023 | akola.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/boKNY
✅ अधिकृत वेबसाईट akola.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड