Kotwal Bharti 2026
Kotwal Bharti 2026: मित्रांनो, एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे, कोतवाल अर्थात महसूल सेवक या भरतीची आतुरतेने वाट बघत असाल तर ही न्यूज तुमच्यासाठी!!! महाराष्ट्र कोतवाल भरती कधी होणार? किती पदे भरली जाणार या बद्दल नवीन माहिती येथे जाणून घ्या . महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील 2192 रिक्त पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. याबाबत महसूल व वन विभागाने 19 ऑगस्ट 2026 रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील महसूल सेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2026 रोजी राज्यातील महसूल सेवक संवर्गात एकूण 2192 पदे रिक्त होती. या रिक्त पदांच्या भरतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2026 ल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा. यंदा झालेला कोतवाल भरती परीक्षेचा पेपर येथे डाउनलोड करा..
कोतवाल भरती 2026 प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश
शासनाच्या पत्रात संबंधित जिल्ह्यांतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोतवाल पदांची भरती करताना संबंधित शासन निर्णयातील सुधारित तरतुदी आणि आरक्षणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता निवड समितीने घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सदर पदभरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात यावी, असेही शासनाने निर्देशित केले आहे. त्यामुळे लवकरच संबंधित जिल्ह्यांकडून अधिकृत भरती जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा किंवा निवड पद्धती आणि महत्त्वाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय कोतवाल रिक्त पदांची माहिती
खालील तक्त्यात महसूल व वन विभागाच्या जोडलेल्या जिल्हानिहाय विवरणपत्रातील रिक्त पदांची माहिती दिली आहे.
| अ.क्र. | जिल्हा | रिक्त पदे |
|---|---|---|
| 1 | छत्रपती संभाजीनगर | 283 |
| 2 | जालना | 47 |
| 3 | परभणी | 64 |
| 4 | हिंगोली | 45 |
| 5 | नांदेड | 78 |
| 6 | बीड | 71 |
| 7 | लातूर | 62 |
| 8 | धाराशिव | 35 |
| 9 | नागपूर | 115 |
| 10 | वर्धा | 46 |
| 11 | भंडारा | 58 |
| 12 | गोंदिया | 39 |
| 13 | चंद्रपूर | 76 |
| 14 | गडचिरोली | 70 |
| 15 | अमरावती | 84 |
| 16 | अकोला | 80 |
| 17 | वाशिम | 41 |
| 18 | बुलढाणा | 85 |
| 19 | यवतमाळ | 108 |
| 20 | पुणे | 144 |
| 21 | सातारा | 11 |
| 22 | सांगली | 67 |
| 23 | सोलापूर | 114 |
| 24 | कोल्हापूर | 107 |
| 25 | नाशिक | 149 |
| 26 | धुळे | 47 |
| 27 | नंदुरबार | 45 |
| 28 | जळगाव | 46 |
| 29 | अहिल्यानगर | 101 |
| 30 | मुंबई शहर | 0 |
| 31 | मुंबई उपनगर | 13 |
| 32 | ठाणे | 108 |
| 33 | पालघर | 123 |
| 34 | रायगड | 119 |
| 35 | रत्नागिरी | 64 |
| 36 | सिंधुदुर्ग | 42 |
महत्त्वाचे : शासनाच्या 19 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रानुसार राज्यातील महसूल सेवक संवर्गातील 2192 रिक्त पदे भरण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. जिल्हानिहाय भरतीची अंतिम जाहिरात संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे.
उमेदवारांनी काय लक्षात ठेवावे?
- महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी जिल्हानिहाय भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
- भरतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा नामनिर्देशित अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती कार्यवाही करेल.
- आरक्षण व शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे पालन केले जाणार आहे.
- भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश आहेत.
- अर्जाची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती व इतर अटी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर स्पष्ट होतील.
महसूल प्रशासनातील सर्वात शेवटचा कर्मचारी समजल्या जाणाऱ्या कोतवालाच्या पदोन्नतीची मार्गच बंद झाले आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाचा सर्वाधिक मोठा फटका त्यांना बसला आहे. महसूल विभागाला प्रशासनाचा कणा समजला जातो. मंत्रालय ते गावपातळीवर महसूल विभागाचे कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे गाव पातळीवरील अनेक माहिती मिळण्यास आणि योजना राबविण्यास मदत होते. शासनाने महसूल विभागाच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी दिली आहे. यानुसार राज्यसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारी उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे कमी करण्यात आली. तर तहसीलदारांची पदे वाढवण्यात आली. काही ठिकाणी अपर जिल्हाधिकारी आणि अपर तहसीलदारांची नवी कार्यालये सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अपर जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या पदात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढवण्यात येईल.
साधारणतः प्रत्येक तलाठी कार्यालयात कोतवालाचे पद आहे. इतर पदांप्रमाणे ही कोतवालांची पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. कोतवालला शिपाई पदावर पदोन्नती देण्यात येत होती. कालांतराने त्याला इतरही पदावर पदोन्नती मिळत असे. शिपाई हे ‘ड’ वर्गातील पद आहे. आता शासनाने ‘ड’ वर्गातील पदेच न भरण्याचा निर्णय घेतला आहे. शिपाई पदाचे काम करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ‘ड’ वर्गाचे पदेच नसल्याने कोतवालांच्या पदोन्नतीचा मार्गच भरण्यात येणार बंद झाला आहे.
Kotwal New Salary Details
Kotwal Bharti 2026: राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून, त्याचा लाभ १२ हजार ७९३ कोतवालांना मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या १५ हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे असमर्थ ठरल्यास अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासही मंजुरी देण्यात आली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















