Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कारागृह शिपाई पदांकरीता शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी ची प्रक्रिया आयोजित! – Karagruh Police Bharti 2024

Karagruh Police Bharti 2024

Karagruh Police Bharti Ground Test 2024

Karagruh Police Bharti 2024: Deputy Inspector General of Jails, Central Division, Chhatrapati Sambhajinagar for the post of 315 Jail Constables during the period from 28.06.2024 to 01.08.2024 from 5.00 a.m. at Divisional Sports Complex, Sutgirni Chowk, Garkheda area, Chhatrapati Sambhajinagar for physical measurement and A process of field testing has been conducted.

 


Karagruh Police Bharti 2024

Karagruh Police Bharti 2024: Jail guards will be recruited soon by the state home ministry. When the process will start after the code of conduct for the Lok Sabha elections is over, almost 54 lakh applications have been received for only 1800 seats. Lakhs of applications have also been received for other posts in the police force. Many posts of jail guards are vacant in the state. Therefore, the security system in almost all the jails in the state is in a state of flux. Keeping this in mind, the Ministry of Home Affairs decided to implement the recruitment process.

 

राज्याच्या गृहमंत्रालयाकडून कारागृह रक्षकांची लवकरच भरती केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार असताना अवघ्या १८०० जागांसाठी तब्बल पावणेचार लाख अर्ज आले आहेत. पोलीस दलातील अन्य पदांसाठीही लाखोंच्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात कारागृह रक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच कारागृहातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
 
राज्यभरात १८०० रिक्त जागांसाठी ३ लाख ७२ हजार ३५४ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी दिली. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याखेरीज गृहमंत्रालयाने राज्य पोलीस दलातील शिपाई, चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस दलातील जवानांची रिक्त पदे भरण्यासही मंजुरी दिली आहे. या १७ हजार ४७१ पदांसाठी तब्बल १७ लाख ७६ हजार अर्ज आले आहेत. यात पोलीस शिपायांच्या ९ हजार ५९५ रिक्त पदांसाठी सर्वाधिक ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले. वाहनचालकाच्या १,६८६ जागांसाठी १ लाख ९८ हजार ३०० युवक-युवतींनी अर्ज केले आहेत.

 


 

Karagruh Police Bharti 2024: Around 1,800 new police constable posts have been Filled by Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024. Accordingly, applications are being invited from the candidates. The application is to be done online. Online application will start from 5th March 2024. Also, the last date to apply is 15 April 2024. A candidate can apply for a post in only one unit in the entire state of Maharashtra. Can be canceled at any stage.

राज्याच्या कारागृह प्रशासनात सुमारे 1,800 नवीन पोलीस शिपाई पदांना मंजुरी मिळाली आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल २०२४ आहे . उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!

District Wise Karagruh Police Shipai Vacancy 2024

Mumbai Karagruh Police Bharti 2024 Download
Pune Karagruh Police Bharti 2024 Download
Nagpur Karagruh Police Bharti 2024 Download
Auranagabad Karagruh Police Bharti 2024 Download
वयोमर्यादा –

खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे

मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग: रु. 450 /-

मागास प्रवर्ग: रु. 350 /-

पोलीस भरती 2024 महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती २०२४ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती २०२४ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅पोलीस भरती २०२४ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 | Pune Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2024
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2024 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

Karagruh Police Recruitment 2024

अर्ज सुरु होण्याची तारीख 05-03-2024 00.00 वा.
अर्ज बंद होण्याची तारीख 15-04-2024 24.00 वा.
ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 15-04-2024 24.00 वा.
अर्जासाठी सूचना अधिक माहिती…
जाहिरात अधिक माहिती…
महत्वाची सूचना अधिक माहिती…

Karagruh Police Bharti 2024 online form date

Karagruh Police Bharti 2024 online form date

Important Note for Applicants To Apply For Karagruh Vacancy 2024

1. Applicants are requested to enter valid and functional email ID and mobile number, as they will be used for communication purpose.

2. Applicant should preserve correct user ID/email ID and password for further recruitment process.

3. The link for password reset is sent to the email ID provided by the applicant during registration. So if wrong/invalid email ID is entered during registration, password cannot be recovered.

4. Please read all instructions carefully before filling online application, changes will not be made once form is submitted.

नवीन उमेदवार नोंदणी, अर्ज करण्याचे चार सुलभ टप्पे – How To Apply For Karagruh Police Bharti 2024

  • Step1 – नोंदणी
  • Step2 – लॉग इन
  • Step3 – अर्ज करा
  • Step4 – शुल्क भरणा करा

मी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

policerecruitment2024.mahait.org या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.

Karagruh Police Bharti 2024 – There are nearly two thousand vacancies in the prison department in the state. Amitabh Gupta, Additional Director General of Prisons in the state informed that these 2,000 vacant posts will be filled soon as this is putting a strain on the available employees.

 

राज्याच्या कारागृह प्रशासनात सुमारे दोन हजार नवीन पदांना मंजुरी मिळाली आहे. त्याअनुषंगाने ऑक्टोबर २०२३ मध्ये शासनादेश देखील जारी करण्यात आला. मात्र, या पदभरती प्रक्रियेबाबत गृह विभागातून कोणत्याही हालचाली होत नसल्याने बेरोजगार युवकांनी पदमंजुरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

राज्याच्या कारागृहांचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गत पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाने २ हजार २३८ पदांना नव्याने मंजुरी प्रदान केली आहे. आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत असताना या पदभरतीबाबत गृह विभागातून हालचाली नाही. त्यामुळे या पदभरतीकडे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार युवकांची हिरमोड झाल्याचे चित्र आहे. कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी बंदिस्त असून, एकूण ६ हजार १३७ पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. केवळ २ हजार २३८ पदांना मान्यता मिळाली आहे. कारागृहांत बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे कारागृहांच्या अंतर्गत आणि बाह्यसुरक्षेविषयी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंजूर पदांची त्वरेने भरतीप्रक्रिया राबवावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी केली आहे.

 

विशेष कारागृह महानिरीक्षक १, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक २, मानसशास्त्रज्ञ ७, मनोविकृती शास्त्रज्ञ ६, उपअधीक्षक ७, वैद्यकीय अधिकारी (वर्ग २ व ३) ३५, स्वीय सहायक/ प्रशासन अधिकारी २, कार्यालय अधीक्षक ५, तुरुंगाधिकारी (श्रेणी १) ४५, तुरुंगाधिकारी (श्रेणी २) ११६, मिश्रक २१, वरिष्ठ लिपिक १२, लिपिक २१, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ७, सुभेदार ५६, हवालदार २७७, कारागृह शिपाई १३७०, परिचारक १०.

 


राज्याच्या कारागृह विभागात हल्ली मंजूर पदांव्यतिरिक्त नव्याने दोन हजार पदे निर्माण केली जाणार आहेत. त्यानुसार शुक्रवारी गृह खात्याने मंजुरी दिली असून, शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहांमध्ये रिक्तपदांचा तिढा सुटण्याचे हे संकेत मानले जात आहेत. गृह विभागाचे उपसचिव यांच्या स्वाक्षरीने शुक्रवारी अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गांत नव्याने दोन हजार पदे निर्माण करण्याचा शासनादेश जारी करण्यात आला आहे. या शासनादेशात कारागृह महानिरीक्षक तथा अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या पाठपुराव्याचा आधार घेण्यात आला आहे. 

 

अशी मिळाली दोन हजार नव्याने वाढीव पदांना मंजुरी

राजपत्रित गट ‘अ’ : १ विशेष कारागृह महानिरीक्षक, २ अधीक्षक मध्यवर्ती कारागृह, ७ मानसशास्त्रज्ञ, १६ मनोविकृतीशास्त्रज्ञ. राजपत्रित गट ‘ब’ : ७ जिल्हा कारागृह अधीक्षक, ९ वैद्यकीय अधिकारी (वर्ग २), २ सहायक/ प्रशासन अधिकारी.

अराजपत्रित गट ‘क’ : २६ वैद्यकीय अधिकारी (वर्ग ३). ५ कार्यालय अधीक्षक, ४५ तुरुंग अधिकारी (श्रेणी १). ११६ तुरुंग अधिकारी, २१ मिश्रक, १२ वरिष्ठ लिपिक, २१ लिपिक, ७ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ५६ सुभेदार, २७७ हवालदार, १,३७० कारागृह शिपाई (महिला, पुरुष), तर १० परिचालक.

 


राज्यातील ६० कारागृहांतील कैदी संख्या आठ पटीने वाढली असून ही बाब राज्य शासनासाठी चिंताजनक झाली आहे. सहा कैद्यांमागे किमान एक रक्षक असे राष्ट्रीय मापदंड असताना राज्यातील कारागृहात हा मापदंड पाळला जात नाही. या पार्श्वभूमीवर नवीन दोन हजार पदांची निर्मिती करून नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ९ मध्यवर्ती, २८ जिल्हा, एक किशोर सुधारालय, एक महिला, १९ खुली, एक खुली वसाहत अशी एकूण ६० कारागृहे आहेत. या कारागृहातील क्षमता २५ हजार ३९३ कैद्यांची असताना सध्या ४१ हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत. सुमारे १६ हजार कैदी जास्त आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि कारागृह सेवेसाठी ५ हजार ६८ पदांचा आकृतिबंध मंजूर आहे. सध्या ४ हजार १९४ पदे भरलेली आहे. त्यामुळे कैदी जास्त आणि कर्मचारी कमी असा विरोधाभास २००६ पासून सुरू आहे. सर्वसाधारणपणे सहा कैद्यांमागे एक रक्षक आवश्यक असल्याचे राष्ट्रीय प्रमाण आहे. यामुळे कैद्यांवर लक्ष ठेवणे कारगृह प्रशासनाला जिकिरीचे होऊ लागले आहे.

 

कांदिवली केईएस विधि महाविद्यालयाच्या रुची कक्कड यांनी जुलै २०१९ रोजी मुंबईतील कारागृहांना भेट दिली होती. या कारागृहात अधिकृत बंदीपेक्षा अतिरिक्त बंदी संख्या जास्त असल्याची तक्रार त्यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे २५ जुलै रोजी केली. त्याची आयोगाने दखल घेऊन पोलीस महासंचालकांना सद्य:स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी हा विरोधाभास आढळून आला असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.पावसाळी अधिवेशन काळात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या नोकरभरतीवर शिक्कामोर्तब झाले असल्याने लवकरच ही भरती होणार आहे.

 

सहा हजार पदे नामंजूर

जास्त कैदी आणि कमी कर्मचाऱ्यांमुळे अनेक वेळा कारागृहात कैद्यांना आवरणे कठीण जाते. कारागृह विभागाने सहा हजार पदे निर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता, पण वित्त विभागाने एवढी पदे मंजूर करण्यास असमर्थता व्यक्त केली. नवीन प्रस्तावानुसार २३२८ पदांच्या निर्मितीची मागणी करण्यात आली होती. त्यातही कपात करून तो दोन हजार पद निर्मितीचा प्रस्ताव तयार केला आहे. गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असल्याचे सांगितले.

 


 

राज्यात कारागृह विभागात तब्बल दोन हजार पदे रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने लवकरच रिक्त असलेली ही २ हजार पदे भरली जाणार असल्याची माहिती राज्यातील कारागृहांचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. सध्या राज्य कारगृह विभागात तब्बल पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले तरी दोन हजार पदे ही रिक्त होती. ही रिक्त पदे भरण्यासाठी दोन हजार पदांची लवकरच भरती केली जाणार आहे,

 

कारागृह कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या नवीन भरती प्रक्रिया मध्ये अधिक ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्ष भरात विविध आजारांनी १२० कैद्यांचा मृत्यू झाला होता. यावर्षी हे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या साठी कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. त्यांची आरोग्य तपासणी देखील जाणार असल्याचे गुप्ता म्हणाले. गुप्ता म्हणाले,पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृह बनविण्यात येणार आहे. तसेच आणखी दोन नवीन कारागृह विभाग बनवण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. उद्योजक सायरस पूनावला यांनी येरवडा आणि कोल्हापूर येथील कारागृहातील दहा हजार कैद्यांना रोज गरम पाणी देण्याचे प्रस्ताव स्वीकारला आहे. राज्यातील कारागृह विभागाकडे १२०० संगणक मागणी आली असून ती लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.

Karagrug Police Bharti 2023 Details

गुप्ता म्हणाले, राज्यातील १२ कारागृहात ड्रोन लावण्यात येणार असून सुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने त्याचा वापर करण्याबाबत कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. राज्यातील कारागृहातील आतील परिसर तसेच कारागृह शेती परिसर विस्तीर्ण असून या परिसरातील कायद्यांच्या हालचालींवर निग्रणी ठेवणे व सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणे यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे.

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड