‘काय रे भाऊ, फ्लॅटमधील बहीण लाडकी? मग मी काय रे? मी लाडकी बहीण नाही का? असा सवाल बोरिवलीच्या पारधी समाजातील गंगाबाई पवार (४६) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. गंगाबाईंसह चिकूवाडीतील पारधी वस्तीतील ७० ते ८० महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित आहेत. या महिला राज्यातीलच असून, आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करू न शकल्यामुळे योजनेपासून वंचित आहेत.

मंत्रालय असलेल्या शहरातच या वंचित लाडक्या बहिणींची अशी दुर्दशा असल्यास राज्यात दुर्गम भागातील बहिणींना खरच या योजनेचा लाभ मिळत असावा का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शहराच्या गजबजाटात पोटाची खळगी भरण्यासाठी रोज लिंबामिरची विकणाऱ्या आणि पावसाळ्यापूर्वी पतीच्या खांद्याला खांदा लावून नालेसफाई करून मुंबईला पूरातून वाचवणाऱ्या या पारधी समाजातील महिलांना ‘लाडकी बहीण’ योजना आजही दूरच स्वप्न ठरल आहे. मुंबईतील चिकुवाडी आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या ५५ ते ६० कुटुंबांत ७० ते ८० महिलाकडे पूर्तता करण्यास कागदपत्र नाहीत. या महिलांनी कामाने शहराचं पोट भरलं, नाले स्वच्छ केले, बाजार टिकवला. मात्र त्यांची शहरातील ओळखी पुरावा नसल्याने योजनेसाठीचा संघर्ष अद्याप सुरूच आहे. लाडकी बहीण योजना सुरु होऊन दीड वर्ष लोटून पारधी समाजाच्या महिलाना मानवी हक्कांच्या दाराशी येऊनही लाभ दूरच असल्याचे चित्र प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

लाडकी बहीण योजने साठी नवीन अर्ज करण्यासाठी पात्रता तपासा:
- अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठरावीक मर्यादेपेक्षा कमी असावे (उदा. ₹2.5 लाखांपर्यंत).
- सरकारी कर्मचारी नसावा.
- आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, मतदार ओळखपत्र आवश्यक.
तसेच अर्ज सादर करण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रांची तयारी करा:
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- मतदार ओळखपत्र / राशन कार्ड
- बचत खाते असलेली बँक पासबुक
- मोबाईल क्रमांक
Ladki Bahin yojana online apply महाराष्ट्र link – ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी आहे :
- https://ladkibahinyojana.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या (किंवा MahaDBT पोर्टलवरून).
- नवीन नोंदणी करा (Registration).
- लॉगिन करून लाडकी बहिण योजना निवडा.
- अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा.
- सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट काढून ठेवा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















