एकशे नऊ तलाठी अन् एकशे पंधरा महसूल सहायक पदे रिक्त! । Solapur Talathi Bharti 2024
Solapur Talathi Bharti 2024
Solapur Talathi Bharti 2024 Update
Solapur Talathi Bharti 2024 Update – महसूल विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सध्या कामाचा ताण असून, वर्कलोड होत असल्याने कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत कार्यालयात थांबताहेत. महसूल विभागातील विविध कार्यालयांमध्ये सध्या ३०२ पदे रिक्त असून, यात १०९ तलाठी पदे, तसेच ११५ महसूल सहायक पदे रिक्त आहेत. नायब तहसीलदाराची ५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे तत्काळ भरल्यास महसूलच्या कामाची गती वाढणार आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एकूण १५ उपजिल्हाधिकारी पदे रिक्त आहेत. लेखाधिकारीची २ पदे मंजूर असून दोन्ही पदे रिक्त आहेत. सहायक लेखाधिकारीची २ पदे मंजूर असून, यापैकी एक पद रिक्त आहे. निम्नश्रेणी लघुलेखची ८ पदे मंजूर असून, यातील ३ पदे रिक्त आहेत. १७७ मंडल अधिकारी पदे मंजूर असून, यापैकी ५ पदे रिक्त आहेत. अव्वल कारकून १९९ पैकी १३ पदे, शिपाई १५५ पैकी ४२ पदे रिक्त आहेत. अधिक माहिती देताना अधिकान्यांनी सांगितले, तलाठी भरतीसंदर्भात २०२३ मधील उर्वरित एकूण ३६ उमेदवारांस नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. शिपाईसंदर्भात १५५ पैकी ३९ पदे निरसित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शिपाई तसेच वाहन चालकांना पदोन्नती द्यावयाचे आहे. परंतु, बहुतांश शिपाई अन् वाहनचालक यासाठी पात्र ठरेनात. यासंबंधीचा आकृतीबंध प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. शासनाने अद्याप यास मंजुरी दिली नाही. पुरवठा विभाग स्वतंत्र झाल्याने मनुष्यबळाचा तुटवडा आणखीन जाणवत आहे. वरिष्ठ अधिकारी पातळीवर रिक्त पदांची संख्या अत्यल्प आहे. सर्वाधिक महसूल सहायक, तसेच तलाठी पदे रिक्त आहेत, यासंदर्भात लवकर कार्यवाही करू, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Solapur Talathi Bharti 2024: According to Talathi Recruitment-2023, the Talathi posts recruiter at the establishment of Collector Office T.C. S. According to the merit list received from the company, this office has published the selection list and waiting list. Date of candidates in the selection list. On 08/02/2024 concerned T.C. S. Biometric verification and document verification process of the company’s employees has been carried out. As per the documents received from the concerned candidates, after verifying the respective candidates, the process for deciding the eligibility is going on at this office level. After taking a decision regarding the eligibility/disqualification of the concerned candidates in the said case, the action regarding appointment of the concerned qualified candidates will be done from this office level.
Before taking the said action, it was under consideration at the level of this office to call for the order of preference before appointment of the concerned candidates. Accordingly, the order of preference of the candidates in the selection list is being invited in the prescribed pattern. The concerned candidates should mention the name of 6 talukas of their convenience before their appointment and fill in the form attached along with the options, sign and mobile number in the space mentioned below and send it to the e-mail address of the establishment branch at [email protected]. Should be sent before 20/02/2024. Also the original copy of the submission of the said option should be sent to this office by post to the above mentioned address.
तलाठी भरती-2023 चे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठी पदांच्या भरतीकामी टी.सी. एस. कंपनीकडून प्राप्त गुणानुक्रम यादीनुसार या कार्यालयाने निवड यादी व प्रतिक्षा यादी या प्रसिध्द केली आहे. निवड यादीतील उमेदवारांची दि. 08/02/2024 रोजी संबंधित टी.सी. एस. कंपनीचे कर्मचारी बायोमेट्रीक तपासणी व कागदपत्रांची पडताळणीकामीची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार संबंधित उमेदवार पडताळणीअंती पात्रतेबाबतचा निर्णय घेणेबाबतची कार्यवाही या कार्यालयाच्या स्तरावर सुरु आहे. सदर प्रकरणी संबंधित उमेदवारांच्या पात्र/अपात्रतेबाबत निर्णय घेतलेनंतर या कार्यालयाकडून संबंधित पात्र उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही या कार्यालयाच्या स्तरावरुन करण्यात येणार आहे. तलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी या लिंक वरून तलाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावे.
सदर कार्यवाही करणेपूर्वी संबंधित उमेदवारांचे नियुक्तीपूर्वी पसंतीक्रम मागविणेचे या कार्यालयाच्या स्तरावर विचाराधीन होते. त्यास अनुसरुन निवड यादीतील उमेदवारांचे सोबतच्या विहीत केलेल्या नमुन्यात पसंतीक्रम मागविण्यात येत आहेत. संबंधित उमेदवारांनी त्यांचे नियुक्तीपूर्वी त्यांचे सोईच्या असणाऱ्या 6 तालुक्यांचे नाव नमूद करुन विकल्प सोबत जोडलेल्या नमुन्यात भरुन त्याखाली नमूद ठिकाणी स्वाक्षरी व मोबाईल क्रमांक नमूद करुन आस्थापना शाखेच्या [email protected] या ई-मेलवर दि. 20/02/2024 पूर्वी पाठविण्यात यावेत. तसेच सदर विकल्प सादर केलेची मूळ प्रत टपालाने उक्त नमूद पत्त्यावर या कार्यालयास पाठविण्यात यावी.
सदरचे पसंतीक्रम सादर केले याचा अर्थ नियुक्तीसाठी पात्र ठरविले असा अर्थ होणार नाही. तसेच अंतिमतः नियुक्ती देण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांचेच पसंतीक्रमाचा विचार करण्यात येवून रिक्त पदांच्या स्थितीनुसार नियुक्तीबाबतची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Talathi Recruitment 2023- Notification to Call Options for appointments of Candidates in Selection List & Format for Submission of Options | District Collector Office Solapur
( Last Date for Submission of Options:-20/02/2024 ) |
13/02/2024 | 20/02/2024 | Download |
Solapur Talathi Bharti 2024: The latest update for Solapur Talathi Recruitment 2023. Good News is that Talathi Bharti 2023 official advertisement is published on 23 June 2023. As per the Official PDF, there are total of 197 Talathi posts under the Solapur District. The registration process is carried through MahaBhulekh Portal Applicants should have Graduation Degree from a Government recognized University or Institution. also an application link is give below. Last date to apply for this Recruitment 17th July 2023. Further details are as follows:-
सोलापूर महसूल विभाग अंतर्गत (Talathi) तलाठी पदाच्या १९७ पदांची भरती सुरु झाली आहे. २३ जून २०२३ प्रसिद्ध झालेल्या PDF जाहिराती नुसार सोलापूर जिल्ह्यात 197 पदांची तलाठी भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे. तलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी या लिंक वरून तलाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – तलाठी
- पदसंख्या – 197 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सोलापूर जिल्हा
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
- मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – Rs.१०००/-
- मागासवर्गीय – Rs.९००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –१७ जुलै २०२३.
- अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in
तलाठी भरती २०२४ महत्वाच्या लिंक्स :
- तलाठी भरती २०२३ परीक्षेचे नवीन सिलॅबससाठी येथे क्लिक करा
- तलाठी भरती TCS पद्धतीनुसार मोफत मोक टेस्ट २०२३
- तलाठी भरतीची तयारी कशी कराल? – How To Prepare For Talathi Bharti Exam ?
- तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लागणारी कागदपत्रे कोणती?
- नवीन नियमांनुसार तलाठी पदाचा पगार किती राहणार
- तलाठी भरतीचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन PDF डाउनलोड करा
- तलाठी भरती नवीन TCS लेव्हल नुसार अपेक्षित प्रश्नसंच २०२३ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
Solapur Talathi Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
तलाठी | 197 पदे |
Educational Qualification For Solapur Talathi Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तलाठी (महसूल विभाग) |
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
|
Salary Details For Solapur Talathi Bharti 2024 Online Form
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तलाठी | s8 : 25,500 – 81,100 + Others |
How To Apply For Solapur Talathi Jobs 2024
- तलाठी भरती 2023 करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- शैक्षणिक अनुसार पात्र असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार.
- ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतात.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Solapur Talathi 2024 Recruitment
- तलाठी भरती 2023 करिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
तलाठी भरती २०२४ साठी महत्वाचे मुद्दे:
- या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
- या साठी आम्ही या लिंक वर मोफत मोक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा मोफत रजिस्टर करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Solapur Talathi Application 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://t.co/eP1DAsbyiW |
✅ ऑनलाईन अर्ज लिंक |
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://mahabhumi.gov.in |
तलाठी भरती २०२४ महत्वाच्या लिंक्स :
तलाठी भरती २०२३ परीक्षेचे नवीन सिलॅबससाठी येथे क्लिक करा
तलाठी भरती TCS पद्धतीनुसार मोफत मोक टेस्ट २०२३
तलाठी भरतीची तयारी कशी कराल? – How To Prepare For Talathi Bharti Exam ?
तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लागणारी कागदपत्रे कोणती?
नवीन नियमांनुसार तलाठी पदाचा पगार किती राहणार
तलाठी भरतीचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन PDF डाउनलोड करा
तलाठी भरती नवीन TCS लेव्हल नुसार अपेक्षित प्रश्नसंच २०२३ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
Table of Contents
एकशे नऊ तलाठी अन् एकशे पंधरा महसूल सहायक पदे रिक्त!, Solapur Talathi Bharti 2024
Ex serviceman chi vaccuncy kiti aahe