नारीशक्ती दूत ॲपद्वारे लाडकी बहीणसाठी ऑनलाईन अर्ज सूरू, पूर्ण स्टेप्स – Nari doot Application form Registration
Nari Shakti Doot Registration Login Apply
Nari Shakti Doot Registration Login now- मित्रांनो जुलै २०२४ पासून नारीशक्ती दूत ॲप (Nari Shakti doot app) प्ले स्टोर वर उपलब्ध झाली. आता पर्यंत या अँपचे लाखो डाऊनलोड्स झालेत. परंतु हजारो लोकांना या अँप द्वारे ऑनलाईन अर्ज करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, परंतू आता प्रकाशित अपडेट नंतर ॲप सुरळीत काम करत आहे. आता आपल्याला या ॲप ला लगेचच अपडेट करायचं आहे. त्या नंतर आपण अर्ज करू शकता. अनेक मंडळी Nari Shakti Doot HelpLine Number सुद्धा शोधण्याचा प्रयन्त करत आहे. परंतु अनेक उमेदवारांना निराशाच मिळत आहे. या मुळे आम्ही फॉर्म भरण्याचा पूर्ण स्टेप्स आपल्याला येथे देत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या योजनेसाठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया मोफत असणार आहे. Nari doot Application form Registration Login कस करायचं पूर्ण माहिती खाली दिली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
स्टेप १ : अँप डाउनलोड करणे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले-स्टोअर वरुन Narishakti Doot नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाऊनलोड किंवा या लिंक वरून डाउनलोड करायचं आहे आणि ते Install करायचं आहे. ते केलं की पुढे या Application विषयी माहिती दिलेली दिसेल.
स्टेप २ :
त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याखालच्या terms and conditions accept करायच्या आहेत (Tick करायचा आहे) . मग लॉग-इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि आपला मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकायचा आहे . त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. तो टाकून Verify OTP वर क्लिक करायचं आहे. मग तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे.
स्टेप ३ : Nari Shakti Registration Process
यात अर्जदार महिलेचं पूर्ण नाव, ई-मेल आयडी टाकायचा आहे. पुढे जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार (सामान्य महिला, बचतगट अध्यक्ष/सचिव/सदस्य, गृहिणी, ग्रामसेवक) निवडायचा आहे. मग अपडेट करा पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग नवीन पेज ओपन होईल. इथं स्क्रीनवर दिसणाऱ्या नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल.
narishakti dootसुरुवातीला अर्जदार महिलेची वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात सुरुवातीला अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचे नाव, जन्म दिनांक टाकायचं आहे. पुढे अर्जदाराचा पत्ता, यात जन्माचं ठिकाण- जिल्हा, तालुका, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत किंवा महापालिकेचं नाव आणि पिनकोड टाकायचा आहे. मग पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकायचा आहे.
स्टेप ४ : Nari Shakti Bank Link
शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. होय किंवा नाही, असं हे उत्तर द्यायचं आहे. होय असेल तर लाभाची रक्कम तिथं नमूद करायची आहे. पुढे लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती निवडायची आहे. अर्जदार महिलेनं अविवाहित, विवाहित,विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित इ.पैकी योग्य पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे. यात बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकायचा आहे. आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, असा प्रश्न तिथं असेल. हो किंवा नाही ते उत्तर निवडायचं आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लिंक करुन घ्यायचा आहे.
स्टेप ५ : कागदपत्र अपलोड करणे (Nari Shakti Document Upload)
यानंतर खाली दिलेली सर्व कागदपत्रं अपलोड करायची आहेत.
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र – 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक.
- उत्पन्न प्रमाणपत्र – अडीच लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड.
- अर्जदाराचे हमीपत्र – अर्जदाराचे स्वयंघोषणा पत्र, त्याचा नमुना खालील Accept हमीपत्र इथं दिलेला आहे. एका कागदावर तुम्ही ते लिहून त्यावर सही व दिनांक टाकून इथं डाऊनलोड करू करू शकता.
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो – कॅमेरा सुरू होईल आणि मग फोटो काढायचा आहे.
त्यानंतर आपण, Accept हमीपत्र या पर्यायावर क्लिक करुन खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक आहे आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल, ती माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल. मग मुख्य पेजवर तुमचा अर्ज, त्याची स्थिती दाखवली जाईल. तिथं सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच अर्जाचा क्रमांक दिला जाईल. जो तुम्हाला अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरता वापरता येईल.
अशाप्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
सूचना – ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाल्यामुळे अर्ज भरताना काही वेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते. माहिती अपलोड होण्यास विलंब लागू शकतो.
अर्ज केल्यानंतर पुढे काय?
- अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर पात्र अर्जदारांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
- या योजनेसाठी राज्य आणि जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. योजनेसाठीचे अंतिम पात्र लाभार्थी ठरवणे आणि योजनेवर देखरेख ठेवण्याचं काम ही समिती करणार आहे.
- अर्ज केल्यानंतर पुढे काय होईल, याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात म्हणाले की, “जो आपला जुना डेटाबेस आहे त्याची माहिती घेऊन ज्यांचं अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, त्यांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा करण्यात येईल. पण समजा त्यांचे अर्ज जुलै महिन्याच्या शेवटी आले, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रक्रिया झाली, तर जुलै-ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे त्यांना मिळतील.”
????माझी लाडकी बहीण योजनेस मुदतवाढ,महत्वाचे बदल जाहीर, अर्ज सुरू, अँप सुरु!
Nari Shakti App Error
आपल्याला अर्ज करताना कदाचित खालील प्रमाणे Error येऊ शकतो. तरी काळजी करू नये. जास्त Request असल्याने आपल्याला अशी एरर येऊ शकते. तेव्हा आपण काही वेळाने किंवा रात्री उशिरा प्रयत्न करावा कारण त्यावेळेस कमी यूजर्स असतात.
????माझी लाडकी बहीण योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करा!
Table of Contents
Comments are closed.