महाराष्ट्र राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक महत्वाकांक्षी योजना आहे. आता या योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. काही महिलांच्या खात्यात जून महिन्याचे पैसे आले नाही तर त्याचा फायदा घेत. या योजनेच्या नावाने काही बनावट वेबसाईट आणि फेक लिंक्स सोशल मीडिया यावर व्हायरल होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. या संदर्भातील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात बनावट वेबसाइट व फेक लिंक्स सोशल मीडियावर व्हायरल. आधार कार्ड नंबर गोळा करून डेटा चोरीचा धोका निर्माण. योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अपात्र लाभार्थ्यांची यादी उपलब्ध नाही..!

राज्य सरकारची सुपरहिट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. या योजनेच्या नावानं काही बनावट वेबसाईट्स आणि फेक लिंक्स सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या लिंक्सवर क्लिक करून आधार क्रमांक मागवला जात असून, त्यामुळे डेटा चोरी होण्याची दाट शक्यता आहे. काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचे पैसे जमा झाले नाही. त्यामुळे काही जण चुकीच्या फेक लिंक्सला बळी पडतात.
आपण पात्र आहोत की नाही, हे तपासण्यासाठी काही लिंक्स शेअर होत आहेत. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अपात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे लाभार्थींनी अशा अफवांपासून सावध राहावं आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर निर्णय घेऊ नये.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रूपये जमा होतात. या योजनेच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मात्र, तपास केल्यानंतर पुरुष आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांनीही या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे सरकारने योजनेची छाननी करत २६.३४ लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळेच जून महिन्यात त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली नाही. अपात्र लाभार्थी महिलांची यादी तपासता येत नाही
काही महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिला फेक लिंक्सला बळी पडतात. पण वेबसाईटवर अपात्र महिलांची यादी तपासण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. पात्र महिलांच्या संबंधित वैयक्तिक माहिती आपल्याला मिळेल. पण पात्र नाही. तसेच कोणत्या महिन्याचा हप्ता खात्यावर जमा झाला, हे देखील पाहता येणार आहे
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















