मुंबई पोलीस भरतीचा निकाल जाहीर, आपले मार्क्स पहा! | Mumbai Police Bharti Result 2025

Mumbai Police Bharti Result 2025

Mumbai Police Shipai Chalak Bharti Result 2024

मुंबई पोलीस भरती २०२२-२३ ची लेखी परिक्षा दिनांक जानेवारी  २०२५ मध्ये मुंबईतील विविध शाळा/ महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे. सदर लेखी परिक्षेची अंतिम उत्तर तालिका संदर्भ क्र.२ अन्वये mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या  पदच्या लेखी परिक्षेच्या अंतिम उत्तर तालिकेप्रमाणे लेखी परिक्षेच्या गुणांमध्ये बदल करुन उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता  सोबत दिलेल्या लिंक वर  प्रसिध्द करण्यात येत असून, सदर लेखी परिक्षेच्या गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी [email protected] या ई-मेलवर दिनांक ३०/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेपासून दिनांक ३१/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवावेत. दिनांक ३१/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या ई-मेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही.

 

Date Title Recruitment for Post Info
३०-जानेवारी-२०२५ दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षेतील गुणांबाबत. कारागृह शिपाई भरती २०२२-२३ PDF view
३०-जानेवारी-२०२५ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ लेखी परिक्षेच्या गुणांबाबत. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ PDF view
३०-जानेवारी-२०२५ मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेच्या गुणांबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती : २०२२-२३ PDF view

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) / पोलीस शिपाई (वाद्यवृंद) / कारागृह शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेकरिता दिनांक १०/०१/२०२५ व दिनांक ११/०१/२०२५ तसेव १२/०१/२०२५ या कालावधीत शाळा/महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ क्रमांक ०६ अन्वये कळविण्यात आलेले आहे.

 

 

Police Bharti Mumbai Exam Timetable

Mumbai Police Bharti Result 2024: मुंबई पोलीस शिपाई (शिपाई) भरती २०२२-२३ च्या पोलीस शिपाई (चालक) पदाच्या ९१७ पदांसाठी एकूण १,०१,२०४ पुरुष/महिला/तृतीयपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते. सदर उमेदवारांपैकी शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेत पात्र ठरलेले तसेच वाहन चालविणे कौशल्य चाचणीसाठी १:१५ प्रमाणात पात्र ठरलेल्या १९३६२ उमेदवारांची यादी दिनांक ३०/०८/२०२४ व ०९/०९/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून, दिनांक २७/०९/२०२४ ते २१/१०/२०२४ या कालावधीत वाहन चालविणे कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे.तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

Maharashtra Police Driver Syllabus And Selection Process – पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम

मा. पोलीस महासंचालक कार्यालयाचे उपरोक्त संदर्भाधीन परिपत्रकान्वये लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी (अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) व (ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) अशा दोन चाचण्या द्याव्या लागतील. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सदर नियमान्वये पोलीस शिपाई (चालक) पदाच्या वाहन चालविणे कौशल्य चाचणीत ५० गुणांपैकी ४० टक्के गुण मिळवून म्हणजेच २० व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून वाहन चालविणे कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेले १५०१२ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत. लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या १५०१२ उमेदवारांची यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षा वेळापत्रकाबाबत लवकरच अवगत करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

२०-डिसेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणेबाबत मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२ Download
१६-डिसेंबर-२०२४ मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती –२०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१ Download

 


Mira Bhyndar Police Answer Key Download

Mira Bhyndar Police Answer Key Download 2023 from following given link. Latest Todays answer of examination schduled on 7th July 2024.

आज झालेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

 


 

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून आपण यादी डाउनलोड करू शकता. तसेच कट ऑफ खालील प्रमाणे..???? Open 41 SC 32 ST 32 VJ- A 39 NT B 39 NT C 39 NT D 39 SEBC 28 OBC 36 EWS 25 . 

 

यादी डाउनलोड करा 

 


Mumbai Police Bharti Result 2024: मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनूसार प्रसिध्द करण्यात आली आहे. मुंबई पोलीस शिपाई भरतो- २०२१ प्रक्रियेतील अंतिम निवड यादीत समावेश झालेल्या उमदेवारांची नियुक्ती देण्याची कार्यवाही करणेपुर्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करणे, तसेच ज्या उमदेवारांच्या वैद्यकीय चाचणीस ०६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, त्यांची महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ नुसार पुन्हा वैद्यकीय चाचणी घेणे आवश्यक आहे. 

यास्तव सोबतच्या यादीतील ३ उमेदवारांनी वैद्यकीय चाचणीकरीता दि.०७/०६/२०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजता पोलीस शल्य चिकित्सक, नागपाडा पोलीस रुग्णालय, भायखळा, मुंबई- ४००००८ येथे हजर रहावे. सदर वैद्यकिय तपासणीमध्ये पात्र ठरतील अशाच उमेदवारांना त्याचदिवशी नियुक्ती आदेश देण्यात येतील, त्यामुळे सदर उमेदवारांनी प्रशिक्षणास जाण्याच्या सर्व तयारीनिशी हजर रहावे.
उमेदवारांना नियुक्ती पत्र स्विकारण्याकरिता बोलाविण्यात आले म्हणुन नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. भरती प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिका-यास आहेत, याची संबधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच खाली नमूद केलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे.

Date Title Recruitment for Post Info
०५-जून-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती -2021 वैद्यकीय तपासणीसाठी पत्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दी :-०५-०६-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ Donwload
०४-जून-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ Download
०४-जून-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ Download
०४-जून-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ Download

Mumbai Police Result 2024

Mumbai Police Bharti Result 2024: Mumbai Police Constable and Police Constable (Driver) Recruitment 2021 for Police Constable and Police Constable (Driver) Post Final Selection List but talk to them for appointment. Some of the shortlisted candidates have written a request to this office regarding their “cancellation of selection/appointment for the post of Police Constable and Police Constable (Driver) as they have been appointed to other establishment / family reasons and other reasons”.

मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ मधील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेले परंतू त्यांना नियुक्तीसाठी बोल. विण्यात आलेल्या काही उमेदवारांनी त्यांची “इतर आस्थापनेवर नियुक्ती झाली असल्याने / कौटुंबिक कारणास्तव व इतर कारणास्तव पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदवरील निवड/नियुक्ती रद्द होणेबाबत” या कार्यालयास लेखी विनंती केली आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

त्यानुसार, सोबतच्या यादीतील नमुद पोलीस शिपाई पदाचे ९६ व पोलीस शिपाई (चालक) पदाचे २६ असे एकूण १२२ उमेदवारांची पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्यात येत आहे. तसेच त्यांना यापुढे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाकरिता नियुक्तीसाठी दावा दाखल करण्याची मुभा राहाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ प्रक्रीयेमधील काही उमेदवारांनी पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) या दोन्ही पदांकरीता आवेदन अर्ज सादर केले असून, पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) या दोन्ही पदांच्या अंतिम निवड यादीमध्ये त्यांचा समावेश आहे.
पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) या दोन्ही पदांच्या अंतिम निवड यादीमध्ये सोबतच्या यादीतील ११ उमेदवारांनी पोलीस शिपाई पदी नियुक्ती स्विकारली आहे. त्यामुळे त्यांची पोलीस शिपाई (चालक) पदावरील अंतिम निवड यादीतील नाव कमी करण्यात येत आहे. पोलीस शिपाई पदावर नियुक्ती स्विकारल्यानंतर संबंधित ११ उमेदवारांनी पोलीस शिपाई (चालक) पदावरील निवड रद्द करणेबाबत विनंती करणे आवश्यक होते, परंतू सदर उमेदवारांनी कोणतेही विनंतीपत्र या कार्यालयास सादर केले नाही.
त्यामुळे सोबतच्या यादीत नमूद केलेल्या पोलीस शिपाई पदावर नियुक्ती स्विकारलेल्या ११ उमेदवारांची पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्यात येत आहे व त्यांच्या जागी अंतिम प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल. तसेच संबंधित पोलीस शिपाई पदावर नियुक्ती घेतलेल्या ११ उमेदवारांना यापूढे पोलीस शिपाई (चालक) पदावर नियुक्ती मिळणेसाठी कोणताही दावा करता येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Mumbai Police Chalak Shipai Result 2024

Date Title Recruitment for Post Info
१२ – एप्रिल – २०२४ मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड त्यांच्या विनंतीवरून रद्द करण्याबाबत दि १२-०४-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ Download
१२ – एप्रिल – २०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक)भरती – २०२१ पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत दि १२-०४-२०२४ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ Download
१२ – एप्रिल – २०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत दि १२-०४-२०२४ मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ Download

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई या कार्यालयाच्या आस्थापनेवर विधी अधिकारी यांची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याकरिता दिनांक ३०/०१/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षा व दि.१७/०२/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीनुसार खालील नमूद उमेदवारांना विधी अधिकारी पदासाठी पात्र करण्यात आले आहे.

पात्र झालेल्या अ.क्र. १ ते २५ वरिल उमेदवारांनी विधी अधिकारी पदावर करारबध्द होण्यासाठी इच्छुक असल्याबाबत दि. १९/०४/२०२४ रोजी पर्यंत लेखी स्वरूपात संमतीपत्र (मोबाईल नंबर व रहात्या ठिकाणाचा पत्ता नमुद करणे आवश्यक) या कार्यालयास सादर करावे. विहीत मुदतीत संमतीपत्र सादर न केल्यास ते सदर पदावर कराश्वध्द होण्यास इच्छुक नसल्याचे गृहित धरून त्यांचे नाव निवडसूचीवरून कमी करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

१२ – एप्रिल – २०२४ विधी अधिकारी यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भात निवड मंडळाचा निकाल दि १२-०४-२०२४ विधी अधिकारी कंत्राटीपद्धतीने निकाल ,२०२४ Download


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड