JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

NMMC नवी मुंबई पालिका भरतीचा निकालाची तारीख जाहीर.. – NMMC Exam Results

NMMC Exam Result 2026

मित्रांनो, NMMC नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमीत आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील दिनांक २७/०३/२०२५ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्रमांक आस्था/०१/२०२५, च्या अनुषंगाने पदभरतीबाबत. या कार्यालयाकडील सरळसेवा पदभरती २०२५ सूचनापत्र क्र. नमुंमपा/प्रशासन/आस्था-१/३५८५/२०२६, दि.०८/०९/२०२६. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमीत आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील पदे सरळसेवेने भरणेकरीता जाहिरात क्रमांक आस्था/०१/२०२५, दिनांक २७/०३/२०२५ व शुध्दीपत्रक दि.२९/०४/२०२५ च्या अनुषंगाने Score Report नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.nmmc.gov.in वर दि.११/०९/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. तथापि रिट याचिका क्रमांक ४९३२/२०२५ मधील Interim Application No.7241 of 2026 in Writ Petition No.5319 of 2025 च्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि.१६/०९/२०२६ रोजी पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे दि.१६/०९/२०२६ च्या आदेशास अनुसरून जाहिरात क्रमांक आस्था/०१/२०२५, दिनांक २७/०३/२०२५ व शुध्दीपत्रक दि.२९/०४/२०२५ अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमधील नमुद खालील संवर्गातील पदांची Merit List नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.nmmc.gov.in वर दिनांक ०७/१०/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात येईल.

Mark sheet Download Link 

2nd Response Sheet Download Link 

नोकर भरतीतील ३० संवर्गांचे स्कोअर कार्ड येत्या शुक्रवारी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचा संवर्गनिहाय तपशील ही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उपलब्ध पदांच्या मर्यादेतच नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

उमेदवारांमध्ये उत्सुकता
न्यायालयाने निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली आहे. यानंतर महानगरपालिका प्रशासनाने ११ सप्टेंबरला निकाल जाहीर होणार असून परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची उत्सुकता वाढली आहे.


नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘सरळसेवा भरती २०२५-२६’ अंतर्गत घेण्यात आलेली ऑनलाइन स्पर्धा परीक्षा मंगळवारी (२२ जुलै) कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे पूर्ण झाली. या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर झाली असून खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता.  दोन दिवसांत सहा संवर्गांतील ३६ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली असून, काटेकोर नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय देखरेखीमुळे संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित पार पडल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील पवई येथील परीक्षा केंद्रांवर दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. सकाळी ९ ते ११ या सत्रात ५८८, तर दुपारी १ ते ३ या सत्रात ४२२ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी एकूण १,०१० उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. यापूर्वी सोमवारी (२१ जुलै) सहा जिल्ह्यांतील १३ केंद्रांवर तीन सत्रांत परीक्षा घेण्यात आली होती. दोन दिवसांच्या या प्रक्रियेत तीन संवर्गांतील १३ पदांसाठी नियोजित परीक्षा पूर्ण झाली. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा.

PDF उत्तरतालिका डाउनलोड लिंक 

NMMC Update Answer Key Download

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

PDF उत्तरतालिका डाउनलोड लिंक 

महापालिकेच्या या भरती प्रक्रियेसाठी सहा संवर्गांतील ३६ पदांसाठी एकूण १८ हजार ९३० अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले होते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग-१ दर्जाचे आठ समन्वय अधिकारी आणि १३ केंद्र निरीक्षक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी संबंधित केंद्रांची पाहणी करून व्यवस्थेची खातरजमा केली होती. परीक्षेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ऑनलाइन परीक्षेच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या मान्यतेने सर्व परीक्षा कक्षांमध्ये मोबाईल जॅमरची व्यवस्था करण्यात आली होती. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कोणीही आर्थिक मागणी करत असल्यास उमेदवारांनी तत्काळ स्थानिक पोलिसांकडे तक्रार करावी, तसेच अफवा किंवा आमिषांना बळी न पडता भरतीसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ आणि अधिकृत समाजमाध्यम खात्यांवरील माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.


 

nmmc.gov.in NMMC Answer Key 2026 Overview

Dear Friends As ypu Know, Earlier Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) had launched the recruitment drive for various posts including Junior Engineer, Technician, Wireman, Account Clerk, ANM, Wardboy, Typist and others. To help candidates quickly understand the key highlights of the recruitment drive, we’ve shared an overview of the same-

ParticularsDetails
OrganizationNavi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Post NameJunior Engineer, Technician, Wireman, Account Clerk, ANM, Wardboy, Typist and others
Advt. No.Bharti 2026
Exam ModeComputer-Based Test (Online Exam by )
Exam Date२१ जुलै, २०२६ व दि.२२ जुलै, २०२६
Answer Key statusPublished Download From given Link
Official Websitehttps://www.nmmc.gov.in/

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड