महावितरण मेगा भरती २०२०

MahaVitaran Mega Bharti 2020

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., पारेषण आणि वितरण या कंपन्यांमध्ये एकूण ३६ हजार ७६४ पदे रिक्त आहेत. त्याचा विपरीत परिणाम उपलब्ध मनुष्यबळावर आणि पर्यायाने राज्यभरातील विद्युत ग्राहकांच्या सेवेवर होतो.

वितरण, पारेषण व निर्मिती कंपनीमध्ये अनुक्रमे २५८६५, ६५६४ व ४३३५ पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक संख्या हि वेतन गट – ३ व ४ च्या पदांची आहे. तीनही कंपन्यांमधील रिक्त पदांची टक्केवारी ३२.७८ एवढी आहे. म्हणजेच ६७ टक्के मनुष्यबळावर वीज कंपन्यांचा राज्यभरातील डोलारा उभा आहे. वेळीच पदोन्नती न देणे, सरळसेवा भरती न करणे यामुळे रिक्त पदांचा हा अनुशेष निर्माण झाला आहे. वीज वाहनापोटी पारेषण कंपनी २९ पैसे प्रती युनिट दराने वितरण कंपनी कडून पैसे वसूल करते. संचालन, सुव्यवस्था व बांधकामांच्या माध्यमातून वीज वहनाचे जाळे वाढविण्याचे काम पारेषण कंपनी करते. परंतु त्या तुलनेत मनुष्यबळ भरतीवर जोर दिला जात आहे.

अन्य MSEB संदर्भातील जाहिराती 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्याची २०१७ पर्यंतची वीज निर्मिती स्थापित क्षमता १३ हजार ६०२ मेगावॉट एवढी आहे. वीज निर्मिती प्रकल्प अधिनियमाखाली मोडत असल्याने ओव्हर टाईमवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. मात्र त्यानंतरही रिक्त पदांच्या भरतीबाबत फारसे गांभीर्य दिसत नाही. थेट वीज ग्राहकांशी संपर्क येणाऱ्या वीज वितरण कंपनीत अन्य दोन कंपन्यांच्या तुलनेत पाच पट अधिक रिक्त पदे आहेत. या रिक्त पदांच्या भरतीकडे पदोन्नतीच्या प्रतीक्षेतील वीज कर्मचारी आणि सुशिक्षित – तांत्रिक बेरोजगारांचे लक्ष लागले आहे. नोकरभरतीसाठी लढा देणाऱ्या संघटनांनीही या रिक्त पदांबाबत वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे हात टेकल्याचे दिसते.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. संतोष says

    या शासनाने lovkar भरती करावी कमीत कमी 20000 पदे तातडीने भरावी विश्वास आहे पण शेवटी …कर्तव्य imp

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड