Agniveer Recruitment News
केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल भरतीसाठी माजी अग्निवीरांचा कोटा १० टक्क्यांवरून वाढवून ५० टक्के केला आहे, अशी माहिती एका राजपत्रित अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर (नॉन गॅझेटेड) भरती नियम, २०१५ मध्ये सुधारणा करून हा बदल करण्यात आला आहे. माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचला उच्च वयोमयदित ५ वर्षांपर्यंत सवलत मिळेल, तर उर्वरित अग्निवीरांना ३ वर्षांची सवलत दिली जाईल. माजी अग्निवीरांना शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी मधून सूट देण्यात येईल, असे शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
मित्रांनो, एक महत्वाची बातमी समोर आली आहे, सैन्य दलात सध्या सुमारे १.८ लाख सैनिकांची कमतरता असल्याने अग्निवीरांच्या रिक्त जागा १ लाखांपर्यंत वाढवण्याचा सरकार विचार करत आहे. भारतीय सैन्य दलात सध्या सुमारे १.८ लाख सैनिकांची मोठी कमतरता आहे. ही कमतरता तातडीने भरून काढण्यासाठी केंद्र सरकार अग्निवीरांची भरती वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या अग्निवीरांसाठी वार्षिक ४५,००० ते ५०,००० इतकी असलेली रिक्त पदांची संख्या वाढवून ती दरवर्षी १ लाखांहून अधिक करण्याचा विचार उच्च स्तरावर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षापासून अग्निवीरांसाठी अतिरिक्त रिक्त जागा भरण्याचा विचार लष्कर करत आहे, ज्याची संख्या दरवर्षी अंदाजे १ लाख इतकी आहे, कारण सैनिक निवृत्त होण्याबरोबरच डिसेंबर २०२६ नंतर अग्निवीरांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे.कोविड महामारीच्या काळात (२०२० आणि २०२१) भरती प्रक्रिया थांबवल्याने सैन्यदलातील मनुष्यबळात कमतरता निर्माण झाली आहे. या दोन वर्षांत भरती प्रक्रिया थांबली असताना, दरवर्षी सुमारे ६०,००० ते ६५,००० सैनिक नियमितपणे सेवानिवृत्त होत राहिले.

२०२२ मध्ये ‘अग्निपथ’ योजना सुरू होण्यापूर्वी, सैनिकांची भरती सामान्य पद्धतीने केली जात असे. १४ जून २०२२ रोजी ही योजना सुरू झाल्यावर, जवान केवळ चार वर्षांसाठी भरले जाणार होते. २०२२ मध्ये सैन्य, नौदल आणि हवाई दलासाठी एकूण ४६,००० जागा निश्चित करण्यात आल्या होत्या, ज्यात सैन्यासाठी ४०,००० जागा होत्या. योजनेनुसार, पुढील चार वर्षांत सैन्यातील अग्निवीरांची संख्या १.७५ लाख आणि नौदल व हवाई दलातील संख्या २८,७०० पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. मात्र, २०२२ मध्ये मर्यादित संख्येत भरती सुरू होऊनही, दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या ६०,०००-६५,००० सैनिकांच्या तुलनेत भरतीची संख्या खूपच कमी राहिली. या तफावतीमुळेच दरवर्षी सैनिकांच्या एकूण संख्येत २०,००० ते २५,००० ने घट होत राहिली. परिणामी, आज सैन्यात एकूण १.८ लाख सैनिकांची कमतरता निर्माण झाली आहे.
भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि वयोमर्यादा
अग्नीवीर भरतीसाठी पुरुष आणि महिला दोघांनाही अर्ज करता येईल. उमेदवाराचे वय 17.5 वर्षांपासून 21 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. विविध पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आल्या असून, उमेदवारांनी 10वी आणि 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तांत्रिक आणि वैद्यकीय पदांसाठी विज्ञान शाखेतील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचण्या
अग्नीवीर भरतीसाठी पहिला टप्पा संगणक आधारित परीक्षा (CBT) आहे. या परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित, तार्किक बुद्धिमत्ता आणि तांत्रिक विषयांवरील प्रश्न विचारले जातील. परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांना भरती रॅलीसाठी बोलावले जाईल, जिथे त्यांची शारीरिक क्षमता, वैद्यकीय चाचणी आणि मानसिक तयारी तपासली जाईल.
सैन्यात सामील झाल्यानंतर मिळणारे फायदे
अग्नीवीर उमेदवारांना पहिल्या वर्षी 30,000 रुपये मासिक वेतन मिळेल, त्यापैकी 21,000 रुपये थेट खात्यात जमा होतील आणि उर्वरित रक्कम अग्नीवीर फंडमध्ये जमा केली जाईल. चार वर्षांनंतर हा पगार वाढत जाईल आणि सेवेसंपत्तीनंतर एकूण 10.04 लाख रुपयांचे संचित फंड मिळेल. याशिवाय 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण देखील दिले जाईल.
सैन्यात भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.joinindianarmy.nic.in येथे जाऊन नवीन नोंदणी करावी, अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरून अर्ज अंतिम सादर करावा. अर्ज यशस्वीरीत्या सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून भविष्यातील आवश्यकतेसाठी ठेवावी.
देशसेवा आणि उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी!
इंडियन आर्मी अग्नीवीर भरती 2025 ही केवळ एक नोकरी नाही, तर राष्ट्रसेवेची सर्वोत्तम संधी आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना संरक्षण, सुरक्षा आणि खासगी क्षेत्रातही उत्तम नोकरीच्या संधी प्राप्त होतील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी साधावी आणि भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी त्वरित अर्ज करावा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















