MPSC च्या गट-क पूर्व परीक्षेची तारीख बदलली; आता ३ जानेवारी २०२७ रोजी परीक्षा !! | MPSC Group C Services Combined Preliminary Examination 2026

MPSC Group C Services Combined Preliminary Examination 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ची तारीख बदलण्यात आली आहे. यापूर्वी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी ही परीक्षा आता ३ जानेवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर ऑफलाइन ओएमआर पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या तारखेतील या बदलाची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

शासनाच्या विविध विभागांतील गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठी आयोगामार्फत ही संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. आयोगाने १६ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकाद्वारे परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन ओएमआर आधारित पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, परीक्षा आयोजनाच्या अनुषंगाने राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि परीक्षार्थींना केंद्रांवर वेळेत व सुरक्षितपणे पोहोचण्याची शक्यता यांचा आयोगाने सर्वंकष विचार केला.

यासोबतच संबंधित जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल, राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२६, सणासुदीचा कालावधी, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक तसेच हिवाळी अधिवेशन आदी बाबींचाही विचार करण्यात आला. या सर्व बाबी लक्षात घेऊन २५ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलून ३ जानेवारी २०२७ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, परीक्षेचे केंद्र, प्रवेशपत्र, परीक्षेची वेळ, केंद्रनिहाय आवश्यक सूचना आणि इतर महत्त्वाची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना नियमितपणे तपासाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘गट क’ संयुक्त सेवा परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात यंदा विक्रमी संख्या आहे, त्यातच गेल्या काही दिवसांपासूनच्या आयोगाबाबत विद्यार्थ्यांत निर्माण झालेल्या वातावरणामुळे अधिक दक्षता घेतली जात आहे. ‘एमपीएसी’कडून ५ हजार ७०७ पदांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे, त्याकरीता तब्बल ११ लाख ५० हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात यापैकी ५६ हजार ७१८ उमेदवार परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात प्रथमच नोकरीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनानेही आतापासूनच परीक्षेचे काम सुरू केले आहे.

शहराबाहेरही असतील केंद्रे
या परीक्षेसाठी विद्यार्थी संख्याच अधिक असल्याने यावेळी एमपीएसीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर शहराबाहेरही केंद्रे राहणार आहेत. त्यानुसार केंद्र निश्चित करणे आणि त्यांचा प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर शहरासह शिरोळ, हातकणंगले, कागल, पन्हाळा तालुक्यातील महत्वाच्या शहरात, शाळा-महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांत ही केंद्रे असणार आहे.

कर्मचारी नियुक्ती तिप्पट संख्येने
जिल्ह्यात यापूर्वी ३० एप्रिल २०२३ रोजी झालेल्या परीक्षेसाठी सर्वाधिक २२ हजार ७०१ विद्यार्थी संख्या होती. आता आजवरची सर्वाधिक विद्यार्थी संख्या ५६ हजार ७१८, इतकी दि.२५ आक्टोंबरच्या परीक्षेसाठी असल्याने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती या जवळपास तिप्पट संख्येने कराव्या लागणार आहेत. यापूर्वी सर्वाधिक ७१ केंद्रांवर जिल्ह्यात परीक्षा झाली, यावेळी परीक्षेसाठी किमान १८२ केंद्रांची आवश्यकता आहे.

प्रस्तावित केंद्रांची पडताळणी
परीक्षेसाठी निश्चित केल्या जाणाऱ्या केंद्रांची पडताळणी सुरू आहे. प्रकाश व्यवस्था, खोल्यांची स्थिती, बैठक व्यवस्था, इमारतीची सुरक्षितता, सरंक्षक भिंत, परिसरासाठी एकच प्रवेशद्वार आदींसह कोणत्याही प्रकारे गैख्यवहार होणार नाही, यासह सर्व पायाभूत सुविधा यांची तपासणी केली जात आहे. याकरीता नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची पथके स्थापन केली आहेत.


MPSC Group C Services Combined Preliminary Examination 2026 : MPSC Group C (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Maharashtra Group-C (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination 2026”. There are total of 2619 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can apply before the last date. Applications will start from 27th June 2026. Also, the last date to apply is 5th Aug 2026. More details are as follows about MPSC Group C Services Combined Preliminary Examination  2026, visit our website www.MahaBharti.in. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क अंतर्गत “उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक” पदांच्या एकूण 2619 रिक्त जागा,  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  २७ जून २०२६ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 Aug 2026 (मुदतवाढ)आहे.मागील वर्षीचा गट क भरतीचा पूर्ण सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६

  • पदाचे नाव –  उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक
  • पदसंख्या –  2619 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र.
  • वयोमर्यादा – 19 – 38  वर्षे
  • अर्ज शुल्क – 
    • खुला वर्ग –  रु. 394/-
    • मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 294/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख २७ जून २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  05 Aug 2026 (मुदतवाढ)
  • अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

MPSC Group C Services Combined Preliminary Examination Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
उद्योग निरीक्षक09
तांत्रिक सहायक03
कर सहायक 282
सहायक मोटार वाहन निरीक्षक461
गट-क लिपिक-टंकलेखक1864

Educational Qualification For MPSC Group C Services Combined Preliminary Examination Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक(अ) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(ब) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

तांत्रिक सहायक
कर सहायक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
सहायक मोटार वाहन निरीक्षक(१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी. च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता, आणि

(२) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील किमान ३ वर्षाची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता.

(३) स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील मान्यता प्राप्त विदयापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवार देखील पात्र राहतील.

(4) स्वयंचल अभियांत्रिकी वा यंत्र अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी/अत्युच्च अर्हता अथवा वरीलप्रमाणे समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत व्यवसायांचे अखत्यारीतील यंत्रशाळामध्ये घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान एक वर्ष कालावधीचा अनुभव आवश्यक.

(5) अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अॅप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहित धरला जाऊ शकेल.

(6) मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान एक वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल त्यांनी नियुक्तीनंतर परिवीक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील.

गट-क लिपिक-टंकलेखकमराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

 Salary For MPSC Group B Services Combined Preliminary Examination Job 2026

mpsc group c salary

Important Documents for MPSC Group C Prelims Bharti 2026- महत्त्वाची कागदपत्रे

imp doc mpsc group b

How To Apply For MPSC Group C Services Combined Preliminary Examination Advertisement 2026

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 Aug 2026 (मुदतवाढ) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mpsc.gov.in Group C Bharti  2026

📑 PDF जाहिरात  https://lnk.ua/DE2pZU65A
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/ocFTc
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड