Divyang Vibhag Maharashtra Bharti – दिव्यांग व्यक्तींना शासकीय सेवेत अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विभागांतर्गत दिव्यांगांसाठी पदे निश्चित करण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार सरळसेवा भरती आणि पदोन्नतीमध्ये दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध संवर्गातील पदांचा आढावा घेऊन दिव्यांग व्यक्तींसाठी कोणती पदे योग्य आहेत, हे निश्चित करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव असतील, तर विभागाचे सचिव सहअध्यक्ष म्हणून काम पाहतील. आरोग्य सेवा संचालनालयातील रुग्णालये व प्राथमिक आरोग्य विभागाचे संचालक, सहसंचालक तसेच ठाणे जिल्हा रुग्णालयातील कर्णबधिर तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञ, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ यांच्यासह दिव्यांग प्रवर्गातील एका तज्ज्ञ व्यक्तीचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















