कोकण रेल्वेमध्ये ऑफिस बॉय, खलाशी आणि हेल्पर पदांसाठी १४ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतींमधून ३२ बेरोजगार उमेदवारांची निवड करण्यात आली; मात्र, प्रशासनाने निवड झालेल्या उमेदवारांची केवळ नावे जाहीर केली. त्यांच्या नावासमोर गाव, तालुका आणि जिल्ह्याचा पत्ता जाहीर केलेला नाही. त्यामुळे हे उमेदवार कोकणातील स्थानिक आहेत की बाहेरील, याबाबत संभ्रम निर्माण झाला असून सर्व उमेदवारांची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी ‘कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती’चे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे २५ उमेदवारांची भरती करण्यात आली होती. नुकत्याच निवड झालेल्या ३२ आणि पूर्वीच्या २५ अशा सर्व उमेदवारांच्या नावासह त्यांचा पूर्ण पत्ता जाहीर केल्यासच या प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असे मुकादम यांनी स्पष्ट केले आहे. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकणातील जनतेने मोठा त्याग केला आहे. त्यामुळे येथील रोजगारावर स्थानिक भूमिपुत्रांचाच पहिला हक्क आहे. स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील उमेदवारांची भरती झाल्यास समिती गप्प बसणार नाही, असा इशारा देत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा मुकादम यांनी दिला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















