8 हजार पोलिस पदांची भरती लवकरच सुरु होणार

Maharashtra Police Bharti 2020


Maharashtra Police Bharti 2020 : महाराष्ट्र पोलीस भरती २०२० – २०२१ – राज्यात रखडलेली आठ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाईल, अशी आश्‍वासक भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे व्यक्त केली. कोरोनाच्या युद्धात मृत्यू पावलेल्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. पोलीस भरती संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच, तेव्हा हि बातमी आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरती अधिकृत अँप लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यात रखडलेल्या आठ हजार पोलिसांच्या भरतीचे नियोजन लवकरच केले जाईल. करोनाचा संसर्ग नियंत्रणात येताच भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आज जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना देशात थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे.  प्रस्तावित अशी आठ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया रद्द झाली होती. त्यामुळे तरूणाईत एक धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते. यावर बोलतांना श्री. देशमुख म्हणाले,”कोरोना संकटामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. लवकरच प्रक्रिया राबवली जाईल.”

श्री. देशमुख म्हणाले,”कोरोनाच्या युद्धात आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घराची चिंता करू नये. सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल. सरकारने माणुसकीच्या नात्याने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने कर्तव्यावर असताना 58 जणांचा बळी गेला आहे, ही खेदाची बाब आहे. त्यासाठी शासन पातळीवरून 65 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच 55 वर्षावरील 12 हजार पोलिसांना पगारी सुटी देण्यात आली आहे. तसेच 50 ते 55 वर्षातील 23 हजार पोलिसांना ताणविरहित ड्युटी देण्यात आली. तसेच पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांची विशेष काळजी या काळात घेतण्यात आली आहे.” महाभरती वर सर्व नवीन जाहिराती पहा.

Maharashtra Police Bharti 2020 is expected Soon For 8000 Posts. The Recruitment process of MahaPolice Bharti 2020 will begin soon. The Details about this Police bharti are given above.

 

महाराष्ट्र राज्य पोलीस अंतर्गत नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी पदाच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे. महाराष्ट्रातील सर्व जॉब्स अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा.

Maharashtra Police Bharti 2020

Department Name
Special Inspector General of Police, Police Superintendent Amravati, Akola, Buldhana, Washim & Yavatmal
Recruitment Name
Vidhi Adhikari Recruitment
Name of PostsLaw Officer – Group B & Law Officer
Total Vacancies28 Posts
How To ApplyOffline
Official Websitewashimpolice
 • पदाचे नाव – विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी
 • पद संख्या – ३० जागा
 • शैक्षणिक पात्रता – कायद्याचा पदवीधर व सनदधारक
 • वयोमर्यादा – ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
 • फीस – रु. ५००/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यालय, वसवेश्वर चौक, ट्रेझर बाजार (मॉल) समोर, नवीन कौठा, नांदेड – ४३१६०३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maharashtra Police Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2zWmvlo
अधिकृत वेबसाईट : http://mahapolice.gov.in/


8 Comments
 1. प्रशिक मदन सोनणे says

  हया पडसाथी 10 पास चालेल का.

 2. Supriya Subhash Kamble says

  12vi pass aahe sir job bhetel ka please

 3. Kiran Folane says

  Police Bharti Buldhana

 4. Nadeem khan says

  sir main 12th pass hu or ITI Govrment Diploma bhi ha mere pass

 5. Ganesh doifode says

  Age kiti pahije

 6. pinki thakur says

  apply karnyasathi link kuthe ahe

 7. Vaishali says

  Vaishali Pawar mai 12th pass hu

 8. vinay rawat says

  when is the bharti starting?
  how can we apply?

Leave A Reply

Your email address will not be published.