अल्पसंख्याक तरुणांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

Police Bharti Free Training for minority candidates


Police Bharti Free Training for minority candidates  – राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील १४ जिल्ह्य़ांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, उर्वरित जिल्ह्य़ांमध्येही ती लवकरच सुरू केली जाईल. प्रत्येक जिल्ह्य़ातून किमान ३०, तर कमाल १०० जणांना प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

Police Bharti 2020 Details (पोलीस भरती कधी आणि कशी..)

राज्यात सुमारे साडेबारा हजार पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे. या भरतीमध्ये राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी त्यांची तयारी करून घेण्यात येणार आहे. त्यांना सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलढाणा, नाशिक, बीड आणि अकोला या जिल्ह्य़ांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्य़ामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करावयाचा आहे. उर्वरित जिल्ह्य़ांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड प्रक्रिया करण्यात येत असून त्यानंतर त्या ठिकाणीही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरू असून करोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण नंतर सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट के ले.

शिकवणार काय?

 • प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • याशिवाय प्रत्येक उमेदवाराला ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी १ हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी ३०० रुपये, प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी ३ हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज न्याहारी देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्यांचे असेल.
 • प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी साधारण ५ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र एखाद्या जिल्ह्य़ात किमान ३० विद्यार्थी आले तरी त्यांना प्रशिक्षण देणे संबंधित स्वयंसेवी संस्थेवर बंधनकारक करण्यात आले आहे, असे मलिक यांनी सांगितले.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

5 Comments
 1. Karishma Momin says

  Sir amhala kadhi samajnaar ki amhi joint zalo ki naahi te

 2. Ajay says

  Apply ksa kraycha sir

 3. कुणाल जयवंत पवार says

  पोलीस भरती प्रशिक्षणासाठी , विद्यार्थ्यांने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज कसा करावा . आणि त्या अर्ज दाखल करण्याची website कोणती आहे .

 4. Pranita pohanakr says

  मुली पण या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात का?

 5. मोहन विष्णू दणके says

  अर्ज कसा भरायचं सर त्याची लिंक पाहिजे सर

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड