Government Jobs – मराठा उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणार!!
Government Jobs 2022
Maratha Aarakshan
Government Jobs 2022: मराठा आरक्षण रद्द होण्यापूर्वी निवड झालेल्या, परंतु नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही मविआ मंत्रिमंडळाची अखेरची बैठक. यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराच्या, तसेच नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या निर्णयाबरोबरच विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्र. ३१२३/२०२० मध्ये झालेल्या निर्णयामुळे बाधित उमेदवारांना संरक्षण देण्यासाठी विधेयक मांडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्द केले होते. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय |विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या वर्षी घेतला होता. मात्र नवी |मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी, तसेच त्यांच्या मागण्यांसाठी दि. बा. पाटील यांचे योगदान, स्थानिक भूमिपुत्रांची व विविध संघटनांची मागणी लक्षात घेऊन ठाकरे यांनी दिबांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या विमानतळाला गेल्या वर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय सिडकोसह नगरविकास विभागाने घेतला होता. मात्र त्यावेळी नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांनी, तसेच विविध संस्था-संघटनांनी स्थानिक लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती. दिबा हे आगरी समाजाचे नेते होते. ठाणे-रायगड पट्ट्यातील आगरी समाज नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेने या समाजाच्या मागणीची दखल घेत दिबांचे नाव देण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. नवी मुंबई विमानतळाला आपले दिवंगत वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकभावनेची कदर करत दिबांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरेंचे आप तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी स्वागत केले आहे.
Latest Government Jobs 2022
Latest Government Recruitment 2022: Looking for a job? So this is a great opportunity for you. The recruitment process has started for more than 2500 posts for graduates in various departments. Further details are as follows:-
नोकरी शोधताय? तर तुमच्यासाठी उत्तम संधी निर्माण झाली आहे. पदवीधरांसाठी विविध विभागांमध्ये सुमारे 2500 हून अधिक जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
Government Recruitment 2022
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे भरती 2022
- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज करण्याची तारीख १४ मेपर्यंत आहे.
पूर्ण जाहिरात – https://mahabharti.in/maharashtra-education-society-pune-bharti-2022/
भारतीय कृषी संशोधन संस्था भरती 2022
- भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या सहायक पदांच्या ४६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ जून २०२२
पूर्ण जाहिरात – https://mahabharti.in/hindi/icar-delhi-bharti-2022/
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2022
- दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १०४४ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जून २०२२
पूर्ण जाहिरात – https://mahabharti.in/south-east-central-railway-nagpur-bharti-2022/
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती 2022
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी लिपिक पदांच्या १९५ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२२
पूर्ण जाहिरात – https://mahabharti.in/maharashtra-state-co-operative-bank-bharti-2022/
पिंपरी-चिंचवड महापालिका भरती 2022
- पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या आस्थापनेवरील आरोग्यसेविका पदाच्या ८८ जागा भरण्यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येणार आहेत.
- मुलाखतीची तारीख १७, १८ व १९ मे २०२२. मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
पूर्ण जाहिरात – https://mahabharti.in/pcmc-bharti/
पनवेल महानगरपालिका भरती 2022
- पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, एलएचव्ही आणि आरोग्यसेविका पदाच्या १७५ जागा भरण्यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
- मुलाखतीची तारीख १८, १९ व २० मे २०२२. मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
पूर्ण जाहिरात – https://mahabharti.in/panvel-mahanagarpalika-bharti-2022/
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2022
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील कार्यक्रम समन्वयक, लसीकरण फील्ड मॉनिटर आणि स्टाफ नर्स पदांच्या ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक. अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मे २०२२
पूर्ण जाहिरात – https://mahabharti.in/nhm-nashik-bharti-2022/
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2022
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि सहायक अभियंता पदांच्या २२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन मागविण्यात येत आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मे २०२२
पूर्ण जाहिरात – https://mahabharti.in/mahapareshan-bharti-2022/
Central Government Jobs 2022
Government Jobs 2022: More than 7,000 vacancies will be filled in various departments of the Union Ministry. The notification has been announced on March 22 and candidates can apply till April 30. Interested and eligible candidates can apply for the vacant post by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-
केंद्रीय मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये ७ हजारहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी २२ मार्च रोजी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.
- विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (Multi tasking Staff, MTS) आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि सीमाशुल्क (Central Board of Indirect Taxes and Customs, CBIC) आणि सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स (Central Bureau of Narcotics, CBN) मध्ये हवालदार पदांच्या ७,३०१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून ३० एप्रिल २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या पदांसाठी भरती कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission, SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Task, MTS) आणि हवालदार परीक्षा २०२१ (Constable examination 2021) च्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
- यासंदर्भात २२ मार्च रोजी नोटिफिकेशन जाहीर करुन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
Where and How to Apply?
- इच्छुक आणि पात्र उमेदवार एसएससी वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात.
- अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल.
- नंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉगिन करून त्यांचा अर्ज सबमिट करावा लागेल.
- एसएससीने परीक्षेसाठी अर्ज शुल्क देखील निर्धारित केले असून ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
- उमेदवार ४ मे पर्यंत बँक चलनाद्वारे ऑफलाइन माध्यमातून शुल्क जमा करू शकतील.
Central Government Recruitment Eligible Criteria
- या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- तसेच १ जानेवारी २०२२ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त (काही पदांसाठी २७ वर्षे) नसावे.
- एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज लिंक – https://bit.ly/3qpVwVJ
PDF जाहिरात – https://bit.ly/3vxcQvT
SSC MTS 3603 पदांची भरती जाहिरात प्रकाशित- 10 वी पास उमेदवारांना मोठी संधी
Vacancies in Government Departments
Government Jobs 2022: Prime Minister Narendra Modi last Saturday asked senior officials to give more priority to the process of filling various vacancies in government departments. This will create more job opportunities, he said. Further details are as follows:-
देशात सध्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. ‘अच्छे दिना’चं स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेवर आलं असलं तरी वर्षाकाटी दोन कोटी नोकऱ्यांचं आश्वासन सफशेल फोल ठरलेलं दिसून येतंय. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सरकारी विभागांमधील विविध रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला (vacancies in government departments) अधिक प्राधान्य देण्यास सांगितलं आहे. यामधून अधिक नोकरीच्या संधी निर्माण होतील, असं त्यांनी म्हटलंय. पुढे पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रालयांतील सर्व सचिवांना आपल्या कोणत्याही सरकारी धोरणामध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये आढळणाऱ्या उणिवा त्यांच्या लक्षात आणून देण्यासही सांगितलं आहे.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक चार तास चालली.
- या मॅरेथॉन बैठकीत मोदींनी गरिबीचा गौरव करण्याची आणि भारताला एक गरीब राष्ट्र म्हणून मार्केटिंग करण्याची मानसिकता दूर होण्याची गरज बोलून दाखवली आहे.
- हा प्रकार गेल्या अनेक दशकांपासून होत असल्याचंही ते म्हणाले.
- आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानण्याऐवजी सरकारी विभागांनी मेगा प्रोजेक्ट्स हाती घ्यावेत आणि बेंचमार्क सेट करावेत, असंही ते म्हणाले.
रिक्त पदे भरण्याचं त्यांचं विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे कारण यूपीमध्ये विरोधी पक्षांनी या रिक्त जागांनाच बेरोजगारी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच येत्या काही महिन्यांमध्ये ही रिक्त पदे भरण्याच्या आदेशाला महत्त्व प्राप्त झालं आहे. यूपीमध्ये भाजपने सहजगत्या विजय मिळवला असला तरी 2024 च्या लोकसभेच्या पूर्वी अशी तयारी करणं योग्य असल्याचं राजकीय तज्ज्ञांकडून म्हटलं जातंय.
सरकारने फेब्रुवारीमध्ये राज्यसभेत माहिती दिली होती की 1 मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये 8.7 लाखांहून अधिक रिक्त पदे आहेत. अधिका-यांनी सांगितलंय की, मोदींनी या बाबीचा पुनरुच्चार केला की, केंद्रातील सर्वांत वरिष्ठ नोकरशहांनी स्वतःला त्यांच्या त्यांच्या संबंधित विभागांमध्ये मर्यादित न ठेवता एका टीमप्रमाणे काम केलं पाहिजे. भागीदारीमध्ये काम केलं पाहिजे.
Latest Government Job 2022
SSC MTS Notification 2022, Latest Government Job 2022 : कर्मचारी निवड आयोगाने ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व पात्र उमेदवार SSC MTS भर्ती 2022 साठी 30 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र, अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख २ मे आहे.
SSC MTS Vacancy 2022 – संपूर्ण माहिती – mahabharti.in/ssc-mts-bharti-2022
याव्यतिरिक्त, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ग्रेड B पदांसाठी भरतीसाठी एक शॉर्ट नोटिस जारी केली आहे. या प्रक्रियेद्वारे ग्रेड ब च्या 294 रिक्त जागा भरल्या जातील. सर्व पात्र उमेदवार RBI ग्रेड बी भर्ती 2022 साठी 28 मार्च 2022 पासून बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 आहे.
RBI Bharti 2022 – संपूर्ण माहिती – mahabharti.in/rbi-bharti-2022
बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ने असिस्टेंट टाउन प्लानिंग सुपरवाइजर पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार 6 एप्रिल 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट bpsc.bih.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
निमलष्करी दलात (Paramilitary Forces) नोकरी (Job) करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांना चांगली संधी आहे. त्यासाठी (CISF Recruitment 2022) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) स्पोर्ट्स कोट्यांतर्गत हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) (CISF Recruitment 2022) ही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र ज्यांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते सीआयएसएफ https://www.cisf.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (CISF Recruitment 2022) उमेदवार 31 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
CISF Bharti 2022 – संपूर्ण माहिती – mahabharti.in/cisf-bharti-2022
MPSC AO Recruitment 2022: राज्य सेवा आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील (General State Services and Public Health Department) रिक्त गट-ब पदांसाठी भरतीसाठी आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 21 मार्च 2022 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना MPSC,च्या अधिकृत वेबसाइटला mpsc.gov.in भेट द्यावी लागेल.
MPSC Bharti 2022 – संपूर्ण माहिती – mahabharti.in/mpsc-bharti-2022
Millions of Vacancies in the State
Government Jobs 2022: There are lakhs of vacancies in various departments in the state and no government servant has been recruited in the last five or six years. Millions of unemployed youth in Maharashtra are waiting for this recruitment. Further details are as follows:-
राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत.
राज्यात दोन लाख ३ हजार ३०२ पदे रिक्त आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर ह्या पदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले
विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, दरवर्षी 9 टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. आता जो रिक्त पदांचा आकडा सांगितलेला आहे तो कमी आहे. रिक्त पदांची संख्या यापेक्षा जास्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षात एकही नोकर भरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार ? मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. ह्या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागात रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे? आणि किती दिवसात नोकर भरती करणार, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.
Central Government Job Vacancy 2022
Government Jobs 2022 : 8 lakh 72 thousand posts are vacant in the center. Adding the vacancies of teachers, this number goes up to 18 lakhs. The number of sanctioned posts is more than 40 lakh and 21% posts are vacant. There are 2 lakh 37 thousand vacancies in the Ministry of Railways. According to the number of sanctioned posts, this figure is 15%. There are 1 lakh 28 thousand 842 vacancies in Home Ministry and 8 thousand 227 vacancies in Science and Technology Department. Further details are as follows:-
केंद्रात शिक्षकांची 10 लाख पदे तर रेल्वे मंत्रालयातही 2 लाख जागा रिक्त
गृहमंत्रालयात 1 लाख 28 हजार 842, विज्ञान व तंत्रज्ञान विभागता 8 हजार 227 पदे रिक्त आहेत.
देशात कोरोन महामारीमुळे अनेकांवर बेरोजगारीचे मोठे संकट आले आहे. तीन दिवसांपूर्वीच बिहारमध्ये रेल्वे भरती प्रक्रियेतील गोंधळावरून तरुणांनी आंदोलन केले. सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार केंद्रात लाखो पदे रिक्त आहेत. मात्र, ती भरण्याची प्रक्रिया संथपणे सुरु असल्याचे चित्र आहे.
सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार केंद्रात लाखो पदे रिक्त आहेत. त्यानुसार १ मार्च २०२० पर्यंत केंद्रात ८ लाख ७२ हजार पदे रिक्त हाेती. शिक्षकांच्या रिक्त जागा जोडल्यास हा आकडा १८ लाखांवर जातो. मंजूर पदांची संख्या ४० लाखांहून अधिक असून, २१ टक्के पदे रिक्त आहेत. रेल्वे मंत्रालयात २ लाख ३७ हजार पदे रिक्त आहेत. मंजूर पदांच्या संख्येनुसार हा आकडा १५ टक्के आहे. गृहमंत्रालयात १ लाख २८ हजार ८४२, विज्ञान व तंत्रज्ञान विभागात ८ हजार २२७ पदे रिक्त आहेत. दरवर्षी एक काेटी नाेकऱ्या देण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या पंतप्रधान कार्यालयातही २६ टक्के पदे रिक्त आहेत. निती आयाेगातही इतर मंत्रालयांप्रमाणे माेठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. देशातील सार्वजनिक बँकांमध्येही ४१ हजार पदे रिक्त आहेत. देशभरात ६१ लाख ८४ हजार शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यांपैकी १०.६ लाख पदे रिक्त आहेत.
Government Jobs 2022
Government Jobs 2022 : There are 15 lakh 91 thousand 394 officer and staff posts of State Government Officers and Employees, Government Granted Institutions and Government Corporations. Of these, 40 per cent are vacant. Further details are as follows:-
राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, शासकीय अनुदान प्राप्त संस्था आणि सरकारी महामंडळे अशी 15 लाख 91 हजार 394 अधिकारी आणि कर्मचारी पदे आहे. यातील 40 टक्के पदे रिक्त आहेत.
आधीच बिकट आर्थिक परिस्थिती आणि त्यात दोन वर्षांपासून कोरोनावर होणारा वाढता खर्च यामुळे भरतीच बंद झाली. परिणामी, राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुमारे 16 लाख पदांपैकी 40 टक्के पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी 20 टक्के पदे ही कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
Central Government Vacanct Posts
Government Job 2021 – There are about 40,000 vacancies for backward classes in eight different departments of the central government. As on 31st December 2019, there are over 40,000 vacancies in the Central Government’s Housing, Postal, Railway, Defense, Atomic Energy, Financial Services and Revenue Departments. Of these, 14,000 are for Scheduled Castes, 12,000 for Scheduled Tribes and 15,000 for OBC. Further details are as follows:-
केंद्राच्या आठ विभागांत मागासवर्गीयांची 40 हजारांहून अधिक पदे रिक्त
वर्षाला दोन कोटी रोजगार भरती करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळातही केंद्र सरकारच्या विविध आठ विभागांत मागासवर्गीयांची सुमारे ४० हजारांवर पदे रिक्त आहेत. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण, टपाल, रेल्वे, संरक्षण, अणुऊर्जा, वित्तीय सेवा आणि महसूल विभागासह इतरही विभागांत चाळीस हजारावर पदे रिक्त आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीची १४ हजार, अनुसूचित जमातीची १२ हजार आणि ओबीसींच्या १५ हजारावर पदांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदे रिक्त होणाऱ्या पदांच्या तुलनेत कमी पदे भरण्यात आल्याने हा अनुशेष निर्माण झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अनुसूचित जातीच्या २८ हजार ३८६ पदांपैकी १३ हजार ९७१ पदे भरण्यात आली. अनुसूचित जमातीच्या २२ हजार पदांपैकी ९ हजार ४०० तर इतर मागासवर्गीय (ओबीसी) २८ हजार ९६२ पदांपैकी १३ हजार पदे भरण्यात आली आहेत.
ऑल इंडिया कॉन्फेड्रेशन ऑफ सेंट्रल गव्हरमेन्ट ईम्प्लॉईज या संघटनेचे पश्चिम विभागाचे सचिव गुरुप्रीर्तंसग म्हणाले की, खासगीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या नीतीमुळे विविध विभागात हजारो पदे रिक्त आहेत. एकीकडे उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या संख्यने वाढत असून केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम करून घेत आहे. ही गंभीर बाब आहे.
ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल या संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे यांनी सांगितले की, अनुसूचित जमातीची पदे रिक्त असणे ही दुर्दैवी बाब आहे. संविधानाच्या कलम १६ (४ अ) या तरतुदीचे उल्लंघन आहे. राज्याप्रमाणे केंद्रात जात प्रमाणपत्र पडताळणीचा कायदा नसल्याने आदिवासींसाठी राखीव जागा गैरआदिवासींनी बळकावल्या.
148 Contract Graduate Part Time Posts
Government Job 2021 : The vacant 148 contract posts in various government establishments in the district will be filled from the cadre of part-time candidates. The Government has from time to time issued Government Resolutions and Circulars accordingly. Further details are as follows:-
नागपूर: जिल्ह्यातील विविध शासकीय आस्थापनांमध्ये रिक्त 148 कंत्राटी पदे पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या संवर्गातून भरली जाणार आहेत. शासनाने त्यानुषंगाने वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रके निर्गमित केलेली आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
Mega Bharti 2021
Government Job 2021 : Public Health Department, Medical Education Department etc. have been exempted from the recruitment restrictions and the process of filling a total of 15 thousand 511 posts from Group A to C through Maharashtra Public Service Commission will be started soon. This information has been given by the Minister of State for General Administration Dattatraya Bharane.
सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे.
एमपीएससीमार्फत घेण्यात येणार्या परीक्षा आणि रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट अ ची 4417 पदे, गट ब ची 8031 पदे आणि गट ङ्गक ची 3063 पदे अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची चार रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Central Government Department Vacancy 2021
Government Job 2021 : Nine lakh ten thousand 153 posts are vacant in various 77 departments of the Central Government. In this, the railway is on top. This department has a strength of two lakh 85 thousand 258 employees, while 90 thousand posts are vacant in the postal department of the center itself. Further details are as follows:-
केंद्र शासनाच्या विविध 77 विभागांमध्ये नऊ लाख दहा हजार 153 पदे रिक्त असल्याचे पुढे आले आहे. यामध्ये रेल्वे टाॅपवर आहे. या विभाग दोन लाख 85 हजार 258 कर्मचाऱ्यांचा तुव्दा आहे, तर केंद्राच्याच डाक विभागामध्ये 90 हजारांवर पदे रिक्त आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आरोग्य, शिक्षक, संरक्षण, कृषी, समाज आदी विभागांमध्ये रिक्त पदांच्या संख्यावाढीची मालिका सुरु सतत आहे. माहितीच्या अधिकारात ही बाब स्पष्ट झाली आहे. नागौर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी हि माहिती मागितली होती.
नोव्हेंबर 2016 मध्ये राज्य सरकारने नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी असे स्पष्ट केले की, सरकारी खात्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यासाठी जाहिराती काढण्यात आल्या आहेत. त्या पदांच्या लेखी परीक्षा येत्या जुलै महिन्यापासून घेतल्या जाणार आहेत.
Two Lakh Vacant Posts in Various Government Department
Government Job 2021 : There are more than 2 lakh vacancies in government offices, ZP, and the home department. Out of the vacancies, 1 lakh 41 thousand 329 posts are to be filled through direct service, while 58 thousand 864 posts are to be filled through promotion. Further detyails are as follows:-
शासकीय कार्यालये, ZP आणि गृह विभागात 2 लाखाहून अधिक पदे रिक्त!
राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून २ लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे वास्तव उघड झाले आहे. रिक्त असलेल्या पदांपैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे सरळ सेवेने, तर ५८ हजार ८६४ पदे पदोन्नतीने भरायची आहेत. या रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया कधी होणार याची राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना प्रतीक्षा आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सर्वाधिक रिक्त पदे असलेल्या विभागांमध्ये गृह विभाग आघाडीवर आहे. गृह विभागातील २४ हजार ५८१, सार्वजनिक आरोग्य विभागातील २० हजार ५४४, जलसंपदा विभागातील २० हजार ८७३ पदे रिक्त असल्याचे दिसून येत आहे.
पदे रिक्त असताना कंत्राटी भरती – ZP Recruitment 2021
राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांची मिळून लाखो पदे रिक्त असताना राज्य शासनाकडून कं त्राटी भरती करून तात्पुरती मलमपट्टी के ली जात आहे. मात्र, रिक्त पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे च (एमपीएससी) भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी सातत्याने के ली जात आहे.
शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद मिळून रिक्त पदांचा तपशील – Government Vacanct Posts
- अ वर्ग – १० हजार ५४५
- ब वर्ग – २० हजार ९९९
- क वर्ग – १ लाख २७ हजार ७०५
- ड वर्ग – ४० हजार ९४४
या संर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..
Table of Contents
How to apply in KVS recruitment?where will we get form?
Ex Army lokanna aroga vibhagat jaga aahet kay
D.t.ed zale aahe maze application kewha bharachi aahe saga
rajistretion nasalyas pawati no watun anm form bharata yeil ka?
midc exam date