प्रतिदिन 10 हजार मजुरांना रोजगार – जाणून घ्या
Employment of 10000 Laborers Every Day
सावली तालुक्यात प्रतिदिन 10 हजार मजुरांना रोजगार
Employment of 10000 Laborers Every Day : यावेळी तहसीलदार परिक्षित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, नगर परिषदच्या मुख्याधिकारी मनिषा वजाडे, वन अधिकारी वसंत कांबळे, विस्तार अधिकारी अनिरूद्ध वाडके, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सुधीर राऊत, विलास चांदेकर, मनसुखलाल बोंगले आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, सावली येथे दररोज २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अखंडित वीज उपलब्ध व्हावी म्हणून एक्सप्रेस फीडरसाठी दोन कोटी मंजूर केले. बांधकाम विभागाची प्रशासकीय इमारत व आरोग्य विभाग, भूमी अभिलेख व बांधकाम कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थान बांधकामासाठी १३. ५ कोटी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ५. ५ कोटी मंजूर करण्यात आले स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाकरिता ई-लायब्ररी सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तहसीलदार पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा आढावा सादर केला. मास्क न वापरणे व कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून चार दिवसात २७ हजारांचा रुपये दंड वसूल केल्याची माहिती दिली.
आसोलामेंढात ताजमहलची प्रतिकृती
आसोलामेंढा येथे पर्यटन केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सर्व सुविधायुक्त ५० कॉटेज, हॉल, बोटींग सुविधा, आयफेल टॉवर, लाल किल्ला व ताजमहलच्या फायबर प्रतिकृती बसविण्यात येणार आण्त. यातून किमान ५०० स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येत्या काही वर्षांत सावली तालुका पर्यटनाच्या नकाशावर आणू, अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
सोर्स : लोकमत
Table of Contents