डीएड उमेदवारांचे भवितव्य अंधारात बेरोजगारांमध्ये तीव्र संताप,कंत्राटी शिक्षक भरती पद्धत रद्द! – DEd, DTEd Shikshak Bharti Updates

DEd, DTEd Shikshak Bharti Updates 2025

DEd, BEd Vacancies 2025

जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना कंत्राटी शिक्षक म्हणून सामावून घ्या, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीने गेली अनेक वर्षे आवाज उठविला. कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये स्थानिक पातळीवर डीएड (D.Ed.) बेरोजगारांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती शासनाने नवा आदेश काढत रद्द केली आहे. सिंधुदुर्गात डीएड बेरोजगार संघटनेने केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अशा पद्धतीची भरती प्रक्रिया सुरू केली होती. आता तीच रद्द केल्याने स्थानिक डीएड बेरोजगारांमध्ये संतापाची लाट आहे.  दहा व दहा पटसंख्येच्या आतील शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमणुकीचा २३ सप्टेंबर २०२४ चा निर्णय शासनाने रद्द केल्याने डीएड बेरोजगारांनी गेली साडेतीन वर्षे संघर्ष करून केलेले प्रयत्न आणि मेहनत वाया गेली आहे. भरतीचा निर्णय शासनाने एका क्षणात रद्द केला आहे. कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय झाल्यानंतर शिक्षण सेवेत सहभागी होता येईल म्हणून गेली चार महिने आशेवर असलेल्या या उमेदवारांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आता आम्ही पुढे कोणत्या आशेने जगावे? आमची एवढी फसवणूक का केली? असा प्रश्‍न डीएड बेरोजगार उमेदवारांनी केला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना कंत्राटी शिक्षक म्हणून सामावून घ्या, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीने गेली अनेक वर्षे आवाज उठविला. या आवाजाला जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी तसेच लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री केसरकर यांनी भरतीची प्रक्रिया सुरु केली होती.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

‘आलमट्टी’ची उंची वाढविण्यास महाराष्ट्र सरकार विरोध करणार; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शिष्टमंडळ जाणार दिल्लीला

त्यानुसार शासनाने त्या गावातील किंवा पंचक्रोशीतील डीएड उमेदवाराला (D.Ed Candidate) कंत्राटी शिक्षक म्हणून संधी द्यावी व त्याला त्या ठिकाणी कायम सेवेत ठेवावे, असा शासन निर्णय काढला. या निर्णयानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेने कंत्राटी शिक्षकांच्या नेमणुकाही केल्या. परंतु, सिंधुदुर्गातील स्थानिक उमेदवारांच्या पदरी निराशा पडली. गेल्या आठवड्यात या डीएड बेरोजगारांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यांनी या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी, अन्यथा आपण उपोषणास बसणार असल्याचा इशारा प्रशासनास दिला होता. त्यानंतर प्रशासनात भरतीबाबत हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र, त्या हालचाली स्थानिक डीएड बेरोजगारांना संधी देण्यासाठी होत्या की हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी होत्या, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शासनाने २३ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड, बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान केली होती. वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यास्तव ही तात्पुरती व्यवस्था केली होती. २०२२ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा २० जानेवारी २०२५ ला प्रत्यक्षात सुरू झाला आहे.

त्यामुळे आवश्यक अर्हताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन नव्या शासन निर्णयात २३ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयान्वये ज्या उमेदवारांना शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती दिली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल, तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही, असे नव्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द झाल्याने जिल्ह्यातील तीनशेहून अधिक डीएड बेरोजगार या कंत्राटी शिक्षक संधीपासून वंचित झाले आहेत. याबाबत खासदार नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नियुक्ती दिलेले ५०० हून अधिक डीएड उमेदवार पुन्हा बेरोजगार बनले आहेत.

शासनाने कंत्राटी शिक्षक भरतीचे गाजर दाखवून डीएड बेरोजगारांची चेष्टा केली आहे. गेली बारा वर्षे नोकरीसाठी आंदोलने उपोषण करूनही शासन आणि प्रशासनाकडून डीएड बेरोजगारांवर अन्याय केला जात आहे. शासनाने पुनर्विचार करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील दुर्गम भागांचा विचार करून विशेष बाब म्हणून स्थानिक डीएड बेरोजगारांना सरसकट नियुक्ती द्यावी; अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीतर्फे तीव्र आंदोलन उभारू.


: :  मागील अपडेट्स : : 

मित्रांनो, आपण जर नोकरीच्या शोधात असर तर एक नवीन महत्वाची बातमी!  DEd  व BEd पात्रताधारक उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांत या नियुक्त्या होतील. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने १० डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले आहेत. खुल्या वर्गासाठी १८ ते ३८ वर्षे वयोगटांतील उमेदवार पात्र आहेत. मागासवर्गीयांमध्ये वयोमर्यादा ४३ वर्षांपर्यंत पात्र असेल. ज्या शाळेत नियुक्ती होणार असेल, तेथील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहील. 

त्यानंतर, तालुका व जिल्हा या अनुक्रमाने प्राधान्य दिले जाणार आहे. ही नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. तिला मुदतवाढीचा निर्णय शासकीय स्तरावर होईल. नियुक्त उमेदवारांना प्रतिमहिना १५ हजार रुपये मानधन मिळेल. या पदावर कायम शिक्षकाची नियुक्ती झाल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा समाप्त होणार आहे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी ही माहिती दिली.

 


 

गडचिरोली हा नक्षलग्रस्त, आदिवासी, उद्योगविरहित व मागासलेला जिल्हा असून या जिल्ह्यात अनेक सुशिक्षित बेरोजगार हे डीएड, बीएड करून अनेक दिवसांपासून रिकामे आहेत. अशाच युवकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत घेण्यात यावे व रिक्त पदे भरावी, अशा मागणीचे निवेदन डीएड बीएड संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आरमोरीच्या तहसीलदारांमार्फत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पाठवलेले आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असून अजूनही ती रिक्त पदे भरण्यात आलेली नाही. परंतु राज्य शासनाने मागील काही दिवसात सदर रिक्त पदावर जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना शिकवण्यासाठी आवेदन पत्र मागविले आहेत. ज्यांनी 58 वर्षे नोकरी केली व काही 58 वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झाले अशांना शिक्षण विभागाने व राज्य शासनाने पूर्ववत शिकविण्याकरीता आवेदन अर्ज मागविले. ही बाब उचित नसल्याने बारावीनंतर डीएड आणि बीएड व पदव्युत्तर शिक्षण घेऊन अनेक बेरोजगार युवक, युवती हे जिल्ह्यात बेरोजगार आहेत. त्यामुळे रिक्त पदावर सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्याचा जो आदेश काढलेला आहे तो आदेश बदलवून जिल्ह्यातील डिएड, बीएड, पदव्युत्तर सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींनाच प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक पदावर भरती करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.


 

सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी विभागात येत असल्याने येथील बेरोजगार डी.एड. उमेदवारांना डोंगरी विभागाचा निकष लावून भरती प्रक्रिया राबवून नोकरीत सामावून घ्यावे. यासाठी खासदार नारायण राणे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कौशल्यपणाला लावावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.

श्री. तळवणेकर यांनीबाबत खासदार राणे व शिक्षणमंत्री केसरकर यांना निवेदन दिले आहे. त्यात असे म्हटले की, अलीकडे झालेल्या शिक्षण भरतीत सिंधुदुर्गातील २०५ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. उर्वरित भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असली तरी अद्यापही ४०० पेक्षा जास्त बेरोजगार डी.एड धारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. नारायण राणे यांनी २००२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी विभागात असल्याने स्थानिक उमेदवारांना जिल्हा निवड मंडळामार्फत भरती करून संधी दिली होती. तोच डोंगरी विभागाचा निकष लावून उर्वरित भरती प्रक्रिया करून ४०० हून अधिक डी.एड. धारकांना नोकरीत सामावून घ्यावे. यासाठी खासदार राणे व मंत्री केसरकर यांनी प्रयत्न करावेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही मोठी कंपनी नाही किंवा उद्योगधंदे नाहीत, त्यामुळे अनेक जण बेरोजगार आहेत. त्यामध्ये डी.एड. धारकांचाही समावेश आहे. त्यामुळे डी.एड. धारकांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावा.

 


 

एकीकडे शिक्षक भरती अनेक वर्षांनंतर सुरू झाली, तर दुसरीकडे अनेक शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आले आहेत. त्यामुळे शिक्षकी पेशात नोकरीच्या संधी आणखी वाढणार आहेत. अशातच सोमवारपासून डी.एड.ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, यंदा महाराष्ट्रातील ५६९ अध्यापक विद्यालयात ३० हजार ८०७ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने डी.एड. अभ्यासक्रमासाठी ३ जूनपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायची इच्छा असल्यास यंदा भरपूर संधी आहे. बारावीत किमान ४९.५ टक्के गुण असणारे विद्यार्थी डी.एड. साठी प्रवेशपात्र आहेत. गेल्या काही वर्षांपासून डी.एड. अभ्यासक्रमासाठी अत्यल्प प्रवेश अर्ज येत आहेत. परंतु, आत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाल्यामुळे यंदा अर्जाची संख्या वाढण्याची शक्यत वर्तविली जात आहे. 

 

 

DEd, DTEd Shikshak Bharti Updates : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर डी.एल.एड. प्रथम वर्ष (डी.एड्.) प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थी सोमवारपासून डी. एड्. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. शासकीय व व्यावसायिक कोट्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, एसईआरटीच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रकासह प्रवेशाची नियमावली उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार डी.एड्. अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, असे आवाहन राज्यस्तरीय डी.एल. एड्. प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल रेखाराव यांनी केले आहे. … 

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून, गुणपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. काही विद्यार्थी बारावीनंतर डी. एड. अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. अशा विद्यार्थ्यांना ३ जून ते १८ जून या कालावधीत डी. एड्. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. डाएट स्तरावर पूर्ण भरलेल्या अर्जाची ऑनलाइन पडताळणी ३ ते १९ जून या कालावधीत केली जाणार असून, २६ जून रोजी गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेशाबाबतची सर्व माहिती या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

डी.एड्. प्रवेशाची पहिल्या फेरीची यादी २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना २७ जून ते १ जुलै या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी २ जुलै विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे विकल्प भरता येणार असून, पूर्वी भरलेले विकल्प बदलता येणार आहेत. ४ जुलै रोजी प्रवेशाची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ४ ते ८ जुलै या कालावधीत प्रवेश घेता येतील. प्रवेशाची तिसरी फेरी ११ जुलै रोजी सुरू होईल.
तर १५ जुलैपासून प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होतील.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड