Jilhadhikari Karyalay Nanded Result
Jilhadhikari Karyalay Nanded Result: तलाठी पदभरती २०२३ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयामार्फत २६ जून २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान TCS मार्फत परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर प्राप्त गुणवत्ता यादीच्या आधारे १४ मार्च २०२४ रोजी तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून अद्ययावत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासन निर्णय २ डिसेंबर २०२५ नुसार ही निवड यादी १३ मार्च २०२६ पर्यंत दोन वर्षांसाठी वैध राहणार आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महसुल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरती-२०२३ साठी उमेदवारांची सुधारीत प्रतिक्षा यादी
Jilhadhikari Karyalay Nanded Update
विभागीय स्तरावर पुरवठा निरीक्षक गट-क संवर्गात सरळसेवा नियुक्तीचा मार्ग विहित केलेला असून सरळसेवा व पदोन्नती नियुक्तीचे प्रमाण ५०:५० असे निश्चित केले आहे. संदर्भ क्र.२ अन्वये विभागीय स्तरावर पुरवठा निरीक्षक संवर्गाकरिता नियुक्ती प्राधिकारी विभागीय आयुक्त राहतील असे स्पष्ट नमूद केले आहे. संदर्भ क्र.३ वरील शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले असून, मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १५० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत चालु निवडसूची वर्षातील अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करुन नियुक्तीचे आदेश निर्गमित करणे बाबत संदर्भ क्र.४ वरील परिपत्रकान्वये निर्देशीत केले आहे.
तसेच संदर्भ क्र.३ वरिल शासन निर्णयातील मुद्दा क्र.VIII (अ) नुसार गट-क अनुकंपा नियुक्तीसाठी किती पदे उपलब्ध होतात याबाबतची माहिती विहित नमुन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व नियुक्ती प्राधिका-यांकडून संकलित करणेबाबत नमूद आहे.
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करतांना येणा-या अडचणीबाबत सदर्भक्र.५ अन्वये वरील परिपत्रकान्वये मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदरहू शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ मधील अ.क्र.५ अन्वये ज्या नियुक्ती प्राधिका-याचे कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त जिल्हयामध्ये म्हणजेच राज्य अथवा विभाग स्तरावर आहे अशा नियुक्ती प्राधिका-यांनी रिक्त पदांची माहिती कळवितांना कोणत्या जिल्याच्या जिल्हाधिका-यांना कळवावी याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे.
गट क अंतर्गत अनुकंपा नियुक्ती करिता उपलब्ध पदांचा तपशील व प्रतीक्षा यादी
Jilhadhikari Karyalay Nanded Result
तलाठी पदभरती 2023 अंतर्गत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांसाठी परीक्षा TCS कंपनीमार्फत 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान घेण्यात आली. त्यानंतर निवड व प्रतिक्षा यादी अनुक्रमे 14 मार्च व 30 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. शासनाने या यादीचा कालावधी 13 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवला असून, अतिरिक्त निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यासही मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यात अनुसूचित प्रवर्गासाठी पुरेसे उमेदवार उपलब्ध असल्याने त्यात बदल नाही, मात्र खुला व आ.दु.घ. प्रवर्गात अतिरिक्त प्रतिक्षा यादी प्रसिद्ध होणार आहे.
करिता या प्रसिध्दी पत्रकाद्वारे अतिरीक्त प्रतिक्षा यादी या जिल्हयाचे संकेतस्थळ www.nanded.gov.in वर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर अतिरीक्त प्रतिक्षा यादी दिनांक १३.०९.२०२५ पर्यंत वैध राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तलाठी पदभरती -२०२३ उमेदवारांची सुधारीत प्रतिक्षा यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















