Jilhadhikari Karyalay Pune Result Update
अनुकंपा नियुक्तीबाबत पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून सुधारित शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयानुसार, परिपत्रकाद्वारे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून गट-क संवर्गातील पदांवर वेळेत नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या 05/08/2025, 13/08/2025 आणि 22/08/2025 रोजी प्रत्यक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आल्या. या बैठकीत प्रतिक्षासूची अद्ययावत करणे, गटबदल, अनुकंपा नियुक्तीसाठी रिक्त पदांची मोजणी, तसेच गट-ड मधील पदे पुनर्जीवित करण्याबाबत प्रस्ताव पाठविणे यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.
यामुळे, संबंधित कार्यालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार 22/08/2025 पर्यंतची गट-क संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची अद्ययावत प्राथमिक प्रतिक्षासूची परिशिष्ट-इ मध्ये, तसेच रिक्त पदांची माहिती परिशिष्ट-फ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
या प्राथमिक प्रतिक्षासूचीतील नोंदीबाबत जर कोणत्याही उमेदवारांना आक्षेप असल्यास त्यांनी 28/08/2025 पर्यंत लेखी स्वरूपात, आवश्यक कागदपत्रांसह, आपल्या कार्यालय प्रमुखामार्फत संबंधित कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. ठरवलेल्या मुदतीनंतर मिळालेले आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.
सर्व कार्यालय प्रमुखांना सूचना करण्यात येते की, त्यांनी ही प्राथमिक प्रतिक्षासूची उमेदवारांना कळवावी, आक्षेप असल्यास त्यांची प्रत अभिप्रायासह 28/08/2025 पर्यंत या कार्यालयात सादर करावी, तसेच प्रतिक्षासूची प्रकाशित केल्याचे पंचनामेही तातडीने सादर करावेत.
ही अधिसूचना www.pune.gov.in या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Jilhadhikari Karyalay Pune Result
जिल्हाधिकारी कार्यालय पुनर्वसन शाखा पुणे, यांनी दिनांक १५.०७.२०२५ ते २२.०७.२०२५ रोजी कंत्राटी विधी अधिकारी, या पदाच्या भरती प्रक्रिये साठी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज मागविणेत आलेले होते.
प्राप्त अर्जामधील तोंडी मुलाखती साठी खालील पात्र उमेदवारांनी दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता अपर जिल्हाधिकारी पुणे यांचे दालन, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, बी विंग, ५ वा मजला, येथे आपल्या पात्रतेसंबधीचे मुळ कागदपत्रासह न चुकता उपस्थित रहावे. ठरविलेल्या दिवशी व वेळी आपण उपस्थित न राहिल्यास आपणांस सदर पदाची आवश्यकता नाही असे गृहित धरुन नियुक्ती प्रक्रिया पुर्ण केली जाईल.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कंत्राटी तत्वावर विधी अधिकारी पदासाठी तोंडी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















