खुशखबर – 200 बेरोजगारांसाठी नवीन नोकऱ्या देणार
Mamaearth Recruitment 2021
Mamaearth Recruitment 2021 : मामाअर्थ ब्रांड (Mamaearth Products) या नावाने वैयक्तिक सौंदर्य प्रसाधनांची उत्पादने विकणारी होनसा कन्झ्युमर प्रायव्हेट लिमिटेड (एचसीपीएल) ही कंपनी 200 नव्या नोकऱ्या देणार आहे. यंदा 200 लोकांची या कंपनीत भरती करण्यात येणार आहे. कंपनीने म्हटले आहे की टियर-1 आणि टियर -2 शहरांमधील उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झालीय आणि ऑनलाईन व्यवसायात वेगाने वाढ झालीय. एचसीपीएलने सांगितले की, यंदा त्यांचे उत्पन्न वाढून 500 कोटींपेक्षा जास्त झाले आणि नजीकच्या काळात ते दुप्पट होण्याची शक्यता आहे. (Mamaearth Will Hire 200 Employees This Year).
कंपनीची चार वर्षांत 500 कोटींची उलाढाल – Mamaearth Recruitment 2021
कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण अलघ म्हणाले, “आम्ही आता 300 लोक आहोत आणि या वर्षाच्या अखेरीस आम्ही 500 लोक होऊ.” यापैकी 100 लोक ऑफलाईन रिटेल टीमचा भाग असतील तर उर्वरित ग्रोथ टीम, डीटीओएस टीम, ग्राहक सेवा, मार्केटिंग टीम आणि इतर असतील. ”कंपनीने चार वर्षांत 500 कोटींची उलाढाल केली असल्याचे ते म्हणाले. कंपनीनं आता 1000 कोटी रुपये कमाईचे उद्दिष्ट ठेवले आहे.
7.3 टक्के सरासरी वाढ शक्य
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यंदा जॉबच्या आघाडीवर एक चांगली बातमी येत आहे. वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कोरोना साथीच्या नंतर व्यवसाय हालचालींत अपेक्षेपेक्षा वेगवान सुधारणा आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे कंपन्या यंदा त्यांचे पगार वाढवू शकतात. एका फर्मने म्हटले आहे की, यंदा तुमच्या सरासरी पगारामध्ये 7.3 टक्के वाढ होऊ शकते. हे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चांगले आहे. काही कंपन्या पगाराच्या आकड्यात दुपटीनं वाढ करतील.
डेलॉयट टच टोहमात्सु इंडिया एलएलपीने (DTTILLP) कार्यबळ आणि वेतनवाढीच्या कलाच्या 2020 च्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, यंदा पगाराची सरासरी वाढ 2020 मध्ये 4.4 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, परंतु 2019 मध्ये 8.6 टक्क्यांपेक्षा कमी असेल. यंदा सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 92 टक्के कंपन्यांनी पगारवाढ झाल्याचे सांगितले, तर मागील वर्षी केवळ 60 टक्के लोकांनी असे म्हटले आहे. 20 टक्के कंपन्यांनी यंदा दोन आकडी पगाराची योजना बनवली आहे, तर 2020 मधील तुलनेत केवळ 12 टक्के होती. सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षी पगार न वाढविणाऱ्या कंपन्यांपैकी एक तृतीयांश कंपन्यांनी यंदा त्यांना जास्त वाढ किंवा बोनसच्या स्वरूपात भरपाई करण्याची तयारी केलीय.
Qualification n detalis sir please information me
If any vacancy in Account Department please inform me.
Qualifation n other details of job and please share contact number or address.
Qualifation and other details of job description
Qualifation n other details of job