जि.प.च्या शाळांना ८०००+ नवीन शिक्षक..!| ZP Teachers Recruitment
ZP Shikshak Bharti 2024
८ हजार १७७ शिक्षकांची पदे मंजूर जिल्ह्यातील जि.प. शाळांमध्ये एकूण ८ हजार १७७ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यातील ९५ टक्क्यांहून अधिक पदे भरली. जिल्हा बदलीने आलेले शिक्षक रुजू झाल्यानंतर हा आकडा ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे रिक्त जागा अत्यल्प राहतील अले सांगण्यात आले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी ३३६ जणांची नियुक्ती केली होती. त्यामध्ये आणखी १८२ जणांची भर पडली आहे. इतर जिल्ह्यांतून १४० शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये रुजू झाले. त्यामुळे एकूण मंजूर पदांच्या ९५ टक्क्यांहून अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना आंदोलने करावी लागत होती. मात्र,मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती पूर्ण होत आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलमार्फत ३३६ शिक्षकांची नियुक्ती केली होती.
प्राप्त माहिती नुसार, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, तसेच पवित्र पोर्टलमधून शिक्षणसेवक नियुक्त्या दिल्यानंतर आता शिक्षण विभागात पदोन्नतीची प्रक्रिया पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. यात शिक्षकांना पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती मिळणार आहे. शिक्षण विभागाने मागील काही दिवसांत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्या दिल्या. याशिवाय पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या शिक्षकांना जिल्ह्यात रिक्त जागी पदस्थापना देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत १७९ शिक्षक पवित्र पोर्टलने, तसेच १२८ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात विविध शाळांत दाखल झाले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
तसेच, सध्या जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या साडेचारशे जागा रिक्त आहेत. दरम्यान, अनेक महिन्यांपासून जिल्हांतर्गत बदल्यांची मागणी शिक्षक करत आहेत. मात्र, त्यास अद्याप मुहूर्त लागलेला नाही. आता पदोन्नतीची प्रक्रिया उरकल्यानंतर आणखी काही जागा रिक्त होतील. त्यानंतर शासनाचे मार्गदर्शन आल्यास शिक्षकांच्या बदल्यांना मुहूर्त मिळू शकतो. प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षक संवर्गातील पात्र उपाध्यापक, पदवीधर आणि मुख्याध्यापक शिक्षकांच्या पदोन्नतीची
प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार कार्यरत शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदांवर पदोन्नती मिळणार आहे. पदोन्नतीनंतर संबंधितांना एक वेतनवाढीचा लाभही मिळेल,
शिक्षक भरती, आंतरजिल्हा बदली होऊनही सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास १०० पदे रिक्तच राहतात. जिल्हा परिषदेच्या सर्व तालुक्यातील शाळांमध्ये पटसंख्येच्या प्रमाणात पुरेसे शिक्षक मिळावेत, अशी मागणी आहे. तब्बल ४०० ते ४५० शिक्षकांची पदे समानीकरणात लॉक असून बऱ्याच वर्षांपासून त्याच त्या शाळांमधील पदे लॉक असल्याने गुणवत्ता व पटसंख्येवर परिणाम होत असल्याने समानीकरणातून आता दुसऱ्या शाळांमधील पदे लॉक करावीत, अशीही मागणी वाढत आहे. दरम्यान, शिक्षक भरतीनंतरही राज्यातील बहुतेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक नसल्याची वस्तुस्थिती आहे.
गुणवत्ता वाढीतून पटसंख्या टिकविण्याचे आव्हान जिल्हा परिषद शाळांसमोर आहे. जवळपास दोन लाख विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशित असून २४० शाळांची पटसंख्या दहा ते २० पर्यंतच आहे. काही शाळांमध्ये पटसंख्या खूपच कमी असतानाही त्याठिकाणी दोन शिक्षक आहेत. तर अनेक ठिकाणी पटसंख्या मोठी असतानाही त्या प्रमाणात शिक्षक नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी ज्या शाळांची पटसंख्या मोठी आहे, त्या शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत पण अध्यापनावर परिणाम होणार नाही अशा ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार काही पदे समानीकरणाच्या तत्त्वानुसार लॉक करण्यात आली आहेत. मात्र, त्याच त्या शाळांमध्ये किती दिवस समानीकरणातून पदे लॉक राहणार, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी समानीकरणातील शाळा बदलण्यासाठी ठोस पावले उचलतील, अशी आशा शाळांना आहे. ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार सर्व तालुक्यांना समानप्रमाणात शिक्षक असावेत, एका तालुक्यात १०० टक्के शिक्षक आणि दुसरीकडे कमी शिक्षक, असे समानीकरणामुळे होत नाही. आता शिक्षक भरतीतून नवीन २५८ शिक्षक, आंतरजिल्हा बदलीतून आलेले ५४ शिक्षक व जिल्हाअंतर्गत बदलीची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे समानीकरणातील पूर्वीच्या शाळा बदलण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत होवू शकते. त्यावर काही दिवसांत कार्यवाही होईल आणि त्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाला पाठविला जाईल.
समानीकरण म्हणजे नेमके काय?
सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात दोन हजार ७९५ शाळा असून त्याअंतर्गत दोन लाखांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित आहेत. मात्र, अद्याप पटसंख्येच्या प्रमाणात शाळांना शिक्षक मिळालेले नाहीत. काहीवेळा एका तालुक्यात १०० टक्के शिक्षक असतात तर दुसरीकडे दूरवरील किंवा जिल्ह्याच्या सीमेवरील तालुक्यात खूपच कमी शिक्षक असतात. अशावेळी सर्व तालुक्यांमध्ये समानप्रमाणात शिक्षक रिक्त ठेवून समानीकरणाच्या तत्त्वानुसार काही शाळांमधील ठरावीक पदे लॉक केली जातात. रिक्त पदांच्या तुलनेत पटसंख्येनुसार जिल्ह्याला पूर्ण क्षमतेने शिक्षक मिळाल्यानंतर समानीकरण उठविले जाते. दुसरीकडे एकाच शाळेसाठी हे तत्त्व लागू न करता काही वर्षांनी ते बदलून दुसऱ्या शाळांमध्ये लागू केले जाते.
ZP Shikshak Bharti 2024: जिल्ह्यात भरती प्रक्रिया होऊनही केवळ ५१३ एवढीच शिक्षक पदे नव्याने भरली आहेत. जिल्ह्यात एकूण ३८७३ मंजूर पदे होती. पैकी भरती प्रक्रियेनंतर ३२०४ जणांना संधी दिली. अद्यापही ६६९ पदे रिक्तच राहिली आहेत. त्यामुळे शिक्षक रिक्त पदांचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही.
अनेक वर्षे शिक्षक भरती न झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त होती. त्यातच आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांच्या रिक्त पदांमध्ये आणखीनच भर पडली. जिल्ह्यात ३८७३ एवढी शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ २६९१ एवढी पदे कार्यरत होती. सुमारे ११८२ पदे रिक्त होती. ही पदे भरावीत, यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलने, उपोषणे सुरू झाली होती. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्याथ्यर्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत होते. याचा विचार करून अखेर शासनाने निर्णय घेत नुकतीच शिक्षक पद भरती प्रक्रिया राबविली. यातून जिल्ह्यात केवळ ५१३ पदे भरली गेली, तर अद्यापही ६६९ एवढी पदे रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. प्रक्रियेत १४२ पदवीधर शिक्षक, तर ३७१ उपशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. अद्यापही पदवीधर शिक्षकांची २३३ व उपशिक्षकांची ४३६ एवढी पदे रिक्त राहिली आहेत.
डीएड बेरोजगारांना संधी देण्याची मागणी
जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था सुरळीत व दर्जेदार होण्यासाठी अद्याप ६६९ एवढी पदे भरण्याची गरज आहे. त्यामुळे ही उर्वरित रिक्त पदे केव्हा भरणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहेत. उर्वरित पदांवर स्थानिक डीएड बेरोजगार उमेदवारांना संधी द्यावी, अशी ही मागणी होऊ लागली आहे.
उर्वरित रिक्त पदे केव्हा भरणार ?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था दर्जेदार व सुरळीत पार पाडण्यासाठी अद्यापही ६६९ एवढी रिक्त पदे भरण्याची गरज असून, उर्वरित रिक्त पदे केव्हा भरणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे तर उर्वरित पदांवर स्थानिक डीएड बेरोजगार उमेदवारांना संधी द्यावी, अशीही मागणी होऊ लागली आहे.
तालुकानिहाय रिक्त पदे
तालुका* पदवीधर शिक्षक* उपशिक्षक’ एकूण
देवगड ४३*१११*१५४
वैभववाडी २०*३५*५५
कणकवली* २३*३२*५५
कुडाळ* ३२*६०*९२
मालवण* २९*६५*९४
सावंतवाडी* २८*४५*७३
वेंगुर्ले* ३०*४६*७६
दोडामार्ग* २८*४२*७०
एकूण २३३*४३६०६६९
Zilla Parishad Shikshak Bharti Update
पवित्र पोर्टलमार्फत पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांवर पहिल्याच टप्प्यात १८१ पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी १५२ उमेदवारांची कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषदेतर्फे येत्या शुक्रवारी दि. १४ रोजी त्यांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना उपशिक्षक म्हणून रुजू होता येणार आहे. राज्यात पवित्र पोर्टलमार्फत जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात ११ हजार ८५ शिक्षकांचे पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यांत रिक्त पदे भरतीसाठी दि. २५ फेब्रुवारी रोजी १८१ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. जिल्हा परिषद प्रशासनाने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यांत उमेदवारांची समुपदेशन फेरी घेत कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान, लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे शिक्षक भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र, दि. १३ मे नंतर पुन्हा प्रक्रियेला सुरुवात झाली. मे महिन्याअखेर सुमारे शंभर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली होती. अखेर असंख्य अडथळ्यानंतर शिक्षकांचे कामावर रुजू होण्याचे स्वप्न साकार होणार असल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
जिल्ह्यांतील १९ उमेदवारांची नियुक्ती रखडली – शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी १५२ विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य सीईओमार्फत नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. तसेच उर्वरित १९ उमेदवारांचे कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी आणि समांतर आरक्षणाबाबतची तपासणी सुरू आहे. त्यांनाही लवकरच नियुक्त्ती पत्रे देण्यात येतील.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकभरती झाली असली तरी अजूनही ही भरती अपुरीच ठरणार आहे. मे महिन्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेने ९९६ शिक्षकांची भरती केली. ही भरती होऊनही जिल्ह्यात अद्याप १ हजार ६३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न संपला असला तरी एकशिक्षकी शाळांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात शून्यशिक्षकी शाळा होऊ नये याकरिता रिक्त पदांनुसार शाळांना एक एक शिक्षक देताना शिक्षण विभागाला कसरत करावी लागत आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक पदे मोठ्या संख्येने रिक्त झाल्यामुळे अनेक शाळा शून्यशिक्षकी शाळा झाल्या होत्या. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता २०२३-२४ या वर्षाकरिता मानधनावर तात्पुरते शिक्षक नेमले होते. त्यानंतर जिल्ह्यात शिक्षकभरती झाली. आचारसंहितेमुळे शिक्षकभरती रखडली होती. मेमध्ये अखेर या शिक्षकभरतीला मुहूर्त मिळाला. समुपदेशनाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात ९९६ शिक्षकांची पदे भरण्यात आली. त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत ७१४ उपशिक्षक भरण्यात आले. सहावी ते आठवीपर्यंत २३० पदवीधर शिक्षक भरण्यात आले आणि उर्दूचे ५८ शिक्षक भरण्यात आले. जिल्ह्यात ९९६ शिक्षकांची भरती होऊनही १ हजार ६३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे भरती होऊनही शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा शिक्षकांचा गोंधळ ग्रामीण भागात होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेची कमान प्रशासनाकडे आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्यासाठी शासनाच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे अन्यथा पुन्हा पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकांची एकूण रिक्त पदांची संख्या लक्षात घेता त्यानुसार भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक होते.
मागील वेळी शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा शासनाने मानधनावर नेमलेल्या शिक्षकांना पुन्हा अशा कमी शिक्षकी शाळांवर नियुक्ती देणे आवश्यक आहे तरच शैक्षणिक गुणवत्ता व्यवस्थित राखणे शक्य होईल.
Zilla Parishad Shikshak Bharti Started
जिल्हा परिषदेची रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया अखेर प्रशासनाने हाती घेतली असून २३ व २४ मे रोजी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. २३ रोजी दिव्यांग व महिला उमेदवारांना बोलावण्यात आले असून २४ रोजी पुरुष उमेदवारांना भरतीसाठी बोलाविण्यात आले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षक भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविल्यानंतर मराठी माध्यमासाठी ६०४, तर उर्दू माध्यमासाठी ११ अशा एकूण ६१५ उमेदवारांची निवड यादी सिंधुदुर्ग शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना ८ मार्च रोजी समूपदेशनासाठी बोलाविले होते. तर काही उमेदवारांना नियुक्ती पत्रेही देण्यात आली होती. दरम्यान, शिक्षक भरती पूर्वी जिल्हांतर्गत बदली करण्याचे शासन आदेश असल्याने शिक्षक संघटनांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधत आपल्यावर अन्याय होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्याची तात्काळ दखल घेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्रामविकास विभागाशी चर्चा करून संबंधित भरती प्रक्रियेतील उमेदवारांची नियुक्तीपत्रे देण्याची कार्यवाही थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ८ मार्च रोजीची भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. तर ग्रामविकास विभागाच्या ११ मार्चच्या पत्रानुसार या भरती प्रक्रियेदरम्यानची दिली गेलेली नियुक्ती पत्रे रद्द केल्याचे तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी जाहीर केले होते. १५ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने ही संपूर्ण प्रक्रियाच लांबली होती.
दरम्यान, निवडणूक आचारसंहिता शिक्षक भरतीसाठी शिथील झाली असल्याने गुरुवार २३ व शुक्रवार २४ मे रोजी ही शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जि. प. प्रशासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने २० दिव्यांग, २५३ महिला आणि २८४ पुरुष अशा एकूण ५५७ उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
ZP Shikshak Vacancy 2024
ZP Shikshak Bharti 2024: जिल्हा परिषद शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून ही प्रक्रिया २० व २१ मे रोजी होणार आहे. या भरती प्रक्रियेत पुन्हा विघ्न येवू नये, अशी इच्छा भरती पात्र उमेदवारांकडून केली जात आहे. समुपदेशनद्वारे १ हजार ८३ जणांना नव्या शाळा मिळणार आहे. शिक्षक भरतीला लागलेलं ग्रहण सुटता सुटेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा अडकली होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
मार्च महिन्यात शासनाने राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांचा विचार करून पवित्र पोर्टलवरून भरती प्रक्रिया केली होती. जिल्ह्यात १ हजार ८३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. मार्च महिन्यात ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. मात्र शाळांमधील रिक्त पदांवर नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या कराव्यात, अशी मागणी संघटनांनी केली होती. याची दखल राज्य शासनाने घेतली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पवित्र पोर्टलद्वारे निवडलेल्या नवीन उमेदवारांना रिक्त पदांवर शाळा देण्यासाठी समुपदेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यातच लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली.
निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय ही प्रक्रिया करता येणार नसल्यामुळे समुपदेशन स्थगित करण्यात आले. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. त्यानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मार्गदर्शन पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झालं आहे. ज्या जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया होईल त्या तारखेनंतर ही बदली प्रक्रिया करावी, असे आदेश दिले आहेत. या आदेशाचा संदर्भ घेत समुपदेशन प्रक्रियेची तारीख निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या.
समुपदेशन तारीख निश्चित करून ही भरती प्रक्रिया होणार होती. मात्र समुपदेशनाबाबत विचार करत असतानाच अचानक पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता आयोगाने जाहीर केली होती. यामुळे पुन्हा शासनाने याबाबत मार्गदर्शन मागवले. पदवीधरची निवडणूक पुढे गेल्यामुळे आता या भरतीचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. शासनाने त्यानुसार सोमवार व मंगळवारी दोन दिवस समुपदेशन ठेवले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत समुपदेशन होणार आहे. पहिल्या दिवशी ५११ तर दुसऱ्या दिवशी ५७२ अशा १ हजार ८३ उमेदवारांना समुपदेशनद्वारे शाळा दिली जाणार आहे.
Zilla Parishad Shikshak Bharti 2024
ZP Shikshak Bharti 2024: Solapur Zilla Parishad has two thousand 795 schools. Since almost seven years, the entire vacancies in the schools were not filled, the teachers were less than the students. Now Education Minister Deepak Kesarkar took an important decision to recruit historical teachers. Accordingly, the Solapur Zilla Parishad has finalized the point list of vacancies in Marathi, Urdu and Kannada medium schools from the backward class section. Under the guidance of Chief Executive Officer of Zilla Parishad Manisha Avale, In-charge Education Officer Prasad Mirakle, Administrative Officer of Municipal Corporation Sanjay Javir worked hard for it.
सोलापूर जिल्हा परिषदेने सोमवारी शिक्षक भरतीची जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यानुसार आता सोलापूर जिल्हा परिषदेला मराठी, इंग्रजी, कन्नड व उर्दू माध्यमाचे एकूण ४६८ शिक्षक मिळणार आहेत. फेब्रुवारीअखेर शिक्षक भरतीची प्रक्रिया संपविली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा आहेत. साधारणतः सात वर्षांपासून शाळांमधील संपूर्ण रिक्त पदांची भरती न झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक कमीच होते. आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ऐतिहासिक शिक्षक भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेने मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांच्या शाळांमधील रिक्त पदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, महापालिकेचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
‘कन्नड’ची बिंदुनामावली अल्पावधीत पूर्ण करून काही दिवसांत त्याची मान्यता मिळविली आणि शेवटच्या दिवशी जाहिरात ‘पवित्र’वर अपलोड केली हे विशेष. आता जानेवारी अखेर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरून द्यावे लागतील.
प्राधान्यक्रमात उमेदवारांना किती जिल्हा परिषदांचा पर्याय द्यायचा याचे बंधन नाही. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल व संबंधितांना नेमणुका मिळतील. एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्के पदे सध्या भरली जात आहेत.
माध्यमनिहाय शिक्षकांची भरती
■ माध्यम व शिक्षक
■ मराठी -३१२, इंग्रजी – ९१, कन्नड -२५, उर्दू – ४० ■ एकूण ४६८
जिल्हा परिषदेने मागितले ९१ इंग्रजी शिक्षक
सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात १७९ केंद्र शाळा आहेत. त्याअंतर्गत आता प्रत्येक केंद्र शाळेसाठी स्वतंत्र इंग्रजी शिक्षक घ्यावा लागणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेकडे सध्या इंग्रजीचे ६९ शिक्षक आहेत. त्यामुळे इंग्रजी विषयासाठी अजून ९१ शिक्षक मिळावेत, अशी मागणी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या जाहिरातीतून केली आहे. त्यामुळे मराठी माध्यमांचे ३१२ शिक्षक भरले जातील. शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून त्यात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप असणार नाही
ZP Teachers Bharti 2024
जिल्हा परिषदांमधील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून, आता माध्यमिक शिक्षक भरतीलाही सुरवात होणार आहे. ज्या अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदे रिक्त आहेत त्यांना प्रारंभी शिक्षणाधिकाऱ्यांकडून रोस्टर (बिंदुनामावली) तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करून घ्यावी लागेल. शेवटी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करावी लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ५४ अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जवळपास ५५० शिक्षकांची भरती होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन शिक्षक भरतीतून मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये ६७८ शिक्षकांची भरती होणार आहे. मागासवर्गीय कक्षाने बिंदुनामावली अंतिम केल्यानंतर डिसेंबरअखेर रिक्तपदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर जानेवारीत नोंदणी केलेल्या भावी शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत.
गुणवत्ता यादीनुसार संबंधित शिक्षकांची नेमणूक होईल. त्याचवेळी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्तपदे देखील भरली जाणार आहेत. पण, आता पूर्वीप्रमाणे संस्थापक ठरवेल त्याच उमेदवाराला शिक्षक म्हणून मान्यता मिळणार नाही. नोंदणीकृत उमेदवाराच्या प्राधान्यक्रमानुसार त्या उमेदवारांना संबंधित संस्थेत मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे. वशिलेबाजी, डोनेशन अशा गोष्टींना लगाम बसावा म्हणून शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे
खासगी अनुदानित शाळांमध्ये (माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षक भरतीची पद्धती आता बदलली आहे. आता ज्या शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करून घेतली आहे, त्या खासगी अनुदानित शाळांमध्ये पदे रिक्त आहेत, त्याठिकाणी एका पदासाठी तीन उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच संबंधित शाळांमध्ये पाठविले जातील. त्या तिघांची मुलाखत घेऊन त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार संस्थेला असणार आहे. पूर्वी, एका पदासाठी दहा उमेदवारांना पाठविण्याचा निर्णय होता, परंतु त्यात बदल करून आता एका पदासाठी तीन उमेदवार असे समीकरण आहे.
जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांमधील शिक्षक पटसंख्येअभावी अतिरिक्त आहेत. त्यांची संख्या ८४ असून कोणत्या संस्थांमध्ये कोणत्या विषयांचे शिक्षक रिक्त आहेत याची माहिती घेतली जात आहे. नवीन शिक्षक भरती करण्यापूर्वी सुरवातीला या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल, अशी माहिती ‘माध्यमिक’च्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही एखादी शाळा अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करीत नसल्यास त्या शाळेतील रिक्तपद कमी केले जाण्याची दाट शक्यता आहे.
ZP Teachers Bharti 2024: After the bogus verification decision in the state, the teacher recruitment process was stalled for many years. In the past few years, the education minister has often threatened prospective teachers by showing the ‘carrot’ of teacher recruitment. The angry D.Ed., B.Ed. The graduates had started a recruitment drive through social media. Education Commissionerate has given good news to thousands of candidates who are eyeing teacher recruitment in the state. Education Commissioner Suraj Mandhare has instructed the Chief Executive Officers of all Zilla Parishads in the state to take immediate action on the sacred website in the teacher recruitment process.
उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांच्या सुमारे साडेचार हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या भावी शिक्षकांच्या भरती प्रक्रियेस शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या हिरव्या कंदिलामुळे या जागा भरल्या जातील. त्यामुळे डी. एड., बीएड. पदविकाधारक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
As more than four and a half thousand posts of teachers in North Maharashtra are vacant, the students are suffering a huge educational loss. Hence, the recruitment process of the prospective teachers waiting for teacher recruitment through the holy website will be filled with the green light received from the Education Commissioner’s Office. So D. Ed., B.Ed. There is a happy atmosphere among the graduate candidates.
राज्यात बोगस पटपडताळणीच्या निर्णयानंतर अनेक वर्षे शिक्षक भरती प्रक्रिया ठप्प होती. गेल्या काही वर्षांत शिक्षणमंत्र्यांनी अनेकदा शिक्षकभरतीचे ‘गाजर’ दाखवून भावी शिक्षकांचा हिरमोड केला. त्यामुळे संतप्त झालेल्या डी.एड., बीएड. पदविकाधारकांनी सोशल मीडियातून भरतीबाबत मोहीम सुरू केली होती.
राज्यातील शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या हजारो उमेदवारांना शिक्षण आयुक्तालयाने आनंदाची बातमी दिली आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र संकेतस्थळावर तत्काळ जाहिराती देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
शिक्षकांच्या तीस हजार जागांची भरती करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली होती. त्यासाठी अभियोग्यता चाचणी घेऊन त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, बिंदूनामावली तपासणी, शिक्षक समायोजन अशी तांत्रिक प्रक्रिया लांबली आहे. शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र संकेतस्थळावर मात्र अद्याप जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने, उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर होता.
संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी रिक्तपदांचे सामाजिक आरक्षण, अध्यापनाचे गट, विषयनिहाय रिक्तपदांची माहिती संकेतस्थळावर नोंदणी करण्याची सुविधा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या ‘लॉगिन’वर देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नोंद केलेली माहितीची पडताळणी करीत योग्य असल्यास बिंदूनामावली, विषयनिहाय रिक्तपदांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ‘लॉगिन’द्वारे मान्य करतील.
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या ‘लॉगिन’वर जाहिरात तयार करणे यावर ‘क्लिक’ केल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या रिक्तपदांची जाहिरात तयार होणार आहे. ही कार्यवाही करण्यासाठी आवश्यक आरक्षणनिहाय रिक्तपदे, गट, विषयनिहाय रिक्तपदांच्या माहितीची पडताळणी करीत जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक भरती विनाविलंब होण्यासाठी पवित्र संकेतस्थळावरील सूचनांनुसार तत्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
गुणवत्तेवर होणार शिक्षकांची निवड.
शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी भरती प्रक्रियेचे नियोजन केले असून नव्या शैक्षणिक वर्षात नवीन शाळांमध्ये शिक्षक रुजू होतील. सरकारी व खासगी संस्थानिहाय पवित्र संकेतस्थळावर स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरती गुणवत्तेनुसार होणार आहे. टीईटी व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची गुणवत्तायादीनुसार उमेदवारांना संधी मिळणार आहे.
ZP Teachers Bharti 2023
ZP Teachers Bharti 2023: According to the education department, the administrative machinery for the recruitment of zilla parishad primary teachers has been completed and more than 1450 posts of primary teachers will be filled with this recruitment. In the last few years, the vacant posts of teachers in zilla parishad schools have been increasing every year due to non-recruitment of teachers. After the inter-district transfer of teachers last year, people from across the state started developing a negative attitude towards the government. The number of vacant posts in Ratnagiri Zilla Parishad had reached 2,000. It also drew attacks from the opposition. To overcome this situation and to avoid educational loss to the children, the Zilla Parishad administration appointed teachers on a honorarium basis.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीसाठी प्रशासकीय यंत्रणेची पूर्वतयारी पूर्ण झाली असून या भरतीमुळे सुमारे साडेचौदोशेहून अधिक प्राथमिक शिक्षकांची पदे भरली जातील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. मागील काही वर्षांत शिक्षक भरती न झाल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे दरवर्षी वाढतच आहेत. गतवर्षी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर राज्यभरातून लोकांमध्ये सरकारविषयी नकारात्मक भूमिका तयार होऊ लागली. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची संख्या तर दोन हजारांवर पोहोचली होती. त्यामुळे विरोधकांकडूनही हल्लाबोल केला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने मानधन तत्त्वावर शिक्षक नेमले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
त्यानंतर नियमित रिक्त पदे भरण्यासाठी राज्यस्तरावर शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू झाली. शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर ऑनलाइन भरावयाची होती. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून रोस्टर तपासून रिक्त पदे निश्चित करून घ्यावयाची होती. ही प्रक्रिया गेल्या ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु अजूनही राज्यातील ६ जिल्ह्यांनी ऑनलाइन नोंदणी पूर्ण केलेली नाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेची रोस्टर तपासणी आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडून करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार ७६६ मराठी, तर १४७ उर्दू माध्यमातील शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरण्यास मान्यताही दिली गेली आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवर भरण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्याला सुमारे १ हजार ४०० नवीन शिक्षक मिळणार आहेत.
ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असले तरीही अन्य जिल्ह्यांची माहितीला विलंब होत आहे. भरतीची प्रक्रिया राज्यात एकाचवेळी केली जाणार असल्याने जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी आणखी दोन महिने लागतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
The zilla parishad has paved the way for contractual appointments as teachers in schools in rural areas. Earlier, there was a demand for recognition of teachers in this post from the Mineral Welfare Sector Fund. However, the demand was pending. The high court was informed that the state government has now given administrative approval to the demand. Chandrapal Chaukse, president of the Rashtriya Panchayatraj Gramin Sarpanch Association, had filed a PIL in the high court in this regard. Instead of retired teachers, educated youth from rural areas should be appointed as volunteer teachers in hundreds of vacant seats in Nagpur Zilla Parishad.
जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक पदावर कंत्राटी नेमणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी या पदावरील शिक्षकांना खनिज कल्याण क्षेत्र निधीतून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, ही मागणी प्रलंबित होती. आता या मागणीला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे, अशी माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली. राष्ट्रीय पंचायतराज ग्रामीण सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. नागपूर जिल्हा परिषदेतील शेकडो रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी ग्रामीण भागातील शिक्षित तरुणांची स्वयंसेवक शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात यावी.
या तरुणांना प्रधानमंत्री खनिज कल्याण क्षेत्र निधीतून मानधन देण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. शिक्षण आयुक्तांनी खनिज कल्याण क्षेत्रातील निधी कोणत्या क्षेत्रात परिवर्तित करण्यात येऊ शकते, याबाबत क्रीडा व शिक्षण विभागांच्या सचिवांशी पत्रव्यवहार केल्याची माहिती मागील सुनावणीत राज्य शासनाने न्यायालयाला दिली होती. त्यानंतर न्यायालयाने क्रीडा व शिक्षण विभागातील मुख्य सचिवांना याप्रकरणी प्रतिवादी करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑक्टोबरला निधी वितरणाबाबत खनिज नियमन परिषदेची बैठक पार पडली. याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड. श्रीरंग भांडारकर आणि अॅड. मनीष शुक्ला यांनी युक्तिवाद केला.
There are one thousand 64 aided secondary schools in the district. It is mandatory for schools to conduct point-by-point inspection every three years. Now teachers are going to be recruited in private aided schools along with Zilla Parishad schools through Pavitra Partal. For that purpose some schools have checked the Bindu Namavili (roster). Now the department has given instructions to the secondary schools that the rest of the schools should also check the Bindu Namavili in time. That point list will have to be re-checked by the backward class cell. Chief Executive Officer Manisha Avhale has assured to provide adequate manpower to the secondary education department in Zilla Parishad. Therefore, Trupti Andhare, the education officer in charge of secondary, expressed the belief that the pending works will be settled in time. Know More details about ZP Teachers Bharti 2023 at below:
जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाला पुरेसे मनुष्यबळ देण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रलंबित कामांचा निपटारा वेळेत होईल, असा विश्वास माध्यमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी व्यक्त केला.
माध्यमिक शिक्षण विभागाकडे मुख्याध्यापक मान्यता, संस्थेच्या वादामुळे शाळेची व शिक्षकांची कामे अडू नयेत म्हणून तीन महिन्यांसाठी ही कामे प्रलंबित आहेत. अनुकंपा प्रभारी मुख्याध्यापक नेमला जातो, नियुक्त्या, अल्पसंख्याक शाळांचे प्रश्न, शालार्थ आयडी, संचमान्यता, बिंदुनामावली तपासणे, दहावी बारावी परीक्षांचे नियोजन, अशी कामे प्रलंबित आहेत. मागील एक-दीड वर्षांपासून माध्यमिक शिक्षण विभागात प्रलंबित कामांचा ढीग पडला असून त्यासंदर्भात सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सक्त सूचना केल्या आहेत. त्यादृष्टीने हा विभाग आता गतिमान झाला आहे. आता मनुष्यबळ मिळणार असल्याने प्रलंबित कामांचा काही दिवसांत निपटारा होईल
बिंदुनामावलीची तपासणी करून घेण्याच्या सूचना
जिल्ह्यात माध्यमिकच्या एक हजार ६४ अनुदानित शाळा आहेत. प्रत्येक तीन वर्षांनी शाळांनी बिंदुनामावली तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. आता पवित्र पार्टलद्वारे जिल्हा परिषद शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती होणार आहे. त्यादृष्टीने काही शाळांनी बिंदुनामावली (रोस्टर) तपासून घेतली आहे. आता उर्वरित शाळांनीही वेळेत बिंदुनामावली तपासून घ्यावी, अशा सूचना विभागाने माध्यमिक शाळांना दिल्या आहेत. ती बिंदुनामावली पुन्हा मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घ्यावी लागणार आहे.
ZP Teachers Bharti 2023
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे. म्हणून जिल्ह्यातील ५३० जिल्हा परिषद शिक्षकांच्या जागा रिक्त असून, त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने भरती करून घेण्यासाठीची जाहिरात लवकरच जिल्हा परिषदेकडून काढली जाणार आहे. सद्यःस्थितीत शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे डोंगरी आणि दुर्गम भागांमधील शाळांवर तातडीने शिक्षक देण्यासाठी जिल्हा परिषदेने हा पर्याय पुढे आणला आहे. त्यासाठी शासनाने संमती दिली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आणि शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावांमधील शिक्षकांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सुमारे ५२१ शिक्षक महापालिका क्षेत्रातच कार्यरत आहेत. दुर्गम भागासह इतर ठिकाणीही शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सर्व १३ तालुक्यांतील रिक्त जागांची माहिती मागविली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५३० शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगितले. या शिक्षकांना २० हजार रुपये प्रति महिना मानधन दिले जाणार आहे.
ZP Teachers Bharti 2023 : The number of students in Zilla Parishad schools in the state is decreasing every year. Six years ago there were 2.5 lakh students in class I, but now the number has come down to 1.9 lakh. Therefore, six thousand teachers have decreased compared to the total number of teachers for 2017-18. Against this backdrop, the school education department has now decided to permanently appoint the teacher in the new post in the same school and district.
राज्यात जिल्हा हजार शाळा असून परिषदांच्या ६४ त्याअंतर्गत ६८ लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत पण इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढलेला असतानाही त्या शाळांनी स्वतः मध्ये काहीच बदल केला नाही. दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करणाऱ्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या शाळांनी देखील कमी आहे. २०१७ नंतर थेट २०२३मध्येच शिक्षक भरती होत आहे. दरम्यान, इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूलबसची सोय केली आहे. पण, दूरवरून येणाऱ्यांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये तशी सोय नाही. स्पर्धेच्या युगात आपलीही मुले टिकावीत म्हणून पालक आता मुलांचे प्रवेश इंग्रजी, सेमी इंग्रजी शाळांमध्ये घेत आहेत. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांच्या तब्बल १४ हजार ७८३ शाळांची पटसंख्या कमी झाल्याने त्या शाळांसाठी पानशेत समूह शाळा पॅटर्न राबविला जाणार आहे.
झेडपी शाळांमध्येही आता सेमी इंग्रजी
सध्या राज्यातील १४ हजार ७८३ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर | आता जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये देखील सेमी इंग्रजीचे शिक्षण सुरु करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभाग करीत असल्याचे वरिष्ठ अधिकायांनी सांगितले
शिक्षकांची आंतरजिल्हा बदली यापुढे बंद
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्याा जिल्ह्यात बदली) बदलीची प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडून पार पाडली जाते. मात्र, या ऑनलाइन बदली प्रक्रियेत यंदा अनेक जिल्हा परिषदांना त्यांच्याकडून गेलेल्या प्रमाणात शिक्षकच मिळाले नाहीत. पटसंख्या कमी व्हायला हेदेखील प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळे जून महिन्यातील शासन निर्णयानुसार यापुढे नवनियुक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. त्यांना ज्याठिकाणी नेमणूक मिळाली, त्याच शाळेत किंवा त्याच जिल्ह्यात सेवानिवृत्त होईपर्यंत काम करावे लागणार आहे.
झेडपी शिक्षक भरतीची सद्य:स्थिती
| संभाव्य शिक्षक भरती
२३,०००
उमेदवारांची नोंदणी
१.६५ लाख
| स्व:प्रमाणीकरण केलेले
उमेदवार
१.५६ लाख | बिंदुनामावली अंतिम जिल्हे १५
ZP Solapur Shikshak Bharti 2023
राज्यातील जिल्हा परिषदांच्या १४ हजार ७८३ शाळांची पटसंख्या चिंताजनक आहे. १ ते २० पटसंख्येच्या त्या शाळांवर तब्बल २९ हजार ७०७ शिक्षक कार्यरत आहेत. दुसरीकडे शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये जवळपास २० हजार शिक्षकांची भरती केली जात आहे. वास्तविक पाहता झेडपीच्या शाळांमध्ये तेवढ्या जागा रिक्त नसल्याने समूह शाळांवरील अंदाजे १० हजार शिक्षक अतिरिक्त होतील, अशी चिंताजनक सद्य:स्थिती आहे. RTE तील निकषांनुसार इयत्ता सातवीपर्यंत ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असे समिकरण आहे. मात्र, राज्यातील सतराशे जिल्हा परिषद शाळांमध्ये तीन विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक तर तीन हजार १३७ शाळांमध्ये आठ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, अशी वस्तुस्थिती आहे.
दुसरीकडे नऊ हजार ९१२ शाळांमध्ये १५ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असे एकूण २९ हजार ७०७ शिक्षक कमी पटसंख्येच्या शाळांवर कार्यरत आहेत. पहिली ते चौथी तर काही ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून त्याठिकाणी सरासरी दोन शिक्षक आहेतच. मात्र, ज्या शाळांमध्ये पटसंख्या मोठी आहे, त्याठिकाणी ३८ ते ४२ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असा विरोधाभास आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्यात ‘पानशेत मध्यवर्ती शाळा’ पॅटर्न राबविला जाणार असून त्यातून शासनाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. दुसरीकडे त्यातून सर्व शाळांना विद्यार्थी संख्येच्या तुलनेत पुरेसे शिक्षकही मिळणार आहेत. मात्र, या पॅटर्नमुळे अनेकजण अतिरिक्त होतील असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
ZP Teachers Bharti 2023: Around 30,000 teachers will be recruited by the school education department of the state and the registration process of candidates is currently underway on the ‘Pavitra’ portal. All zilla parishads are expected to get the list of teacher posts in schools under the primary education department approved by the backward classes. After that, as many posts will be uploaded on the holy portal. Candidates will then have to fill in the preferences.
जिल्हा परिषदेच्या शाळांना ५८१ शिक्षक मिळणार आहेत. जिल्हा परिषदेकडून बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडे मान्यतेसाठी पाठविली आहे. त्यानंतर पदभरतीला प्रारंभ होणार असून बिंदुनामावलीनुसार अनुसूचित जाती-जमाती, भज-ब आणि खुला, अशा चार प्रवर्गातील तेवढी पदे सध्या रिक्त आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
राज्यातील शालेय शिक्षण विभागाकडून जवळपास ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असून सध्या ‘पवित्र’ पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. सर्व जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत शाळांवरील शिक्षक पदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षांकडून मंजूर करून घेणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यानुसार पवित्र पोर्टलवर तेवढी पदे अपलोड केली जाणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरावा लागणार आहे.
शेवटी मेरिटनुसार त्या त्या उमेदवारांना जिल्हा परिषदांच्या शाळांवर नेमणूक मिळणार आहे. खासगी शाळांना मात्र एका पदासाठी पवित्र पोर्टलवरील प्रत्येकी तीन उमेदवारांमधून एकाची निवड करायची आहे. ते तीन उमेदवार शालेय शिक्षण विभागच त्याठिकाणी पाठवणार आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन एकाची निवड करणे क्रमप्राप्त आहे.
तत्पूर्वी, बिंदुनामावली व विषयनिहाय रिक्तपदांची संख्या, जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेने मागासवर्गीय कक्षाकडे पाठविलेल्या बिंदुनामावलीस या आठवड्यात मान्यता मिळेल, असा विश्वास प्राथमिक शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर काही दिवसांत म्हणजेच साधारणतः: ऑक्टोबरमध्ये भरतीला सुरवात होईल. जिल्हा परिषदेने त्यांच्या शाळांमधील शिक्षकांची मंजूर, कार्यरत व रिक्त पदांची बिंदुनामावाली मागासवर्गीय कक्षाकडे पाठविली आहे. उद्यापासून त्याची पडताळणी सुरु होणार असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सहा कर्मचारी तिकडे रवाना झाले आहेत. आठ दिवसात बिंदुनामावलीची पडताळणी होणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
As many as 23,000 teachers in zilla parishads, municipalities and municipalities and 8,000-10,000 teachers in private aided educational institutions will be recruited in the state. Enrolment is currently underway on the holy portal and the inter-district transfer of newly appointed teachers will be permanently stopped. For this, newly selected teachers will have to give such a consent letter. There are 65-68 lakh students in 70,000 zilla parishad schools in the state. Around 28,000 teaching posts are vacant as compared to students in local government schools. On the other hand, up to 30,000 posts are vacant in private aided schools as well. There has been no teacher recruitment since 2019, while there were restrictions on recruitment of government posts due to Corona.
राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका व महापालिकांमधील २३ हजार तर खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील आठ ते दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे. पवित्र पोर्टलवर सध्या नावनोंदणी सुरु असून आता नवनियुक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली कायमची बंद होणार आहे. त्यासाठी नव्याने निवड होणाऱ्या शिक्षकांना तसे संमतिपत्र द्यावे लागणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या ७० हजार शाळांमध्ये ६५ ते ६८ लाख विद्यार्थी आहेत. स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत अंदाजे २८ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे खासगी अनुदानित शाळांमध्येही ३० हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. २०१९ नंतर शिक्षक भरती झालेली नाही, दुसरीकडे कोरोनामुळे शासकीय पदभरतीवर निर्बंध होते.
डी.एड, बी.एडनंतर टेट, टीईटी उत्तीर्ण होऊनही चार ते पाच लाख उमेदवारांना शिक्षक भरतीची प्रतीक्षा होती. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आता प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून ‘पवित्र’ पोर्टलद्वारे सर्वच शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. भरती प्रक्रिया सुरु झाल्याने ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांच्या नेमणुका देखील थांबविण्यात आल्या आहेत.ऑक्टोबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आता आंतरजिल्हा बदल्यानंतर कोकणसह इतर विभागांमध्ये वाढलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या बदल्यांची पद्धत कायमची बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
तीन वर्षाला होणार जिल्हाअंतर्गत बदल्या
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांच्या प्रत्येक तीन वर्षाला जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या होतात. मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी गतवर्षीपासून या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय झाला. पण, आता विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळून गुणवत्तेवर कोणताही परिणाम होवू नये म्हणून आंतरजिल्हा बदल्या (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) कायमच्या बंद केल्या आहेत. त्यासाठी संबंधितांना तसे लेखी संमतिपत्र द्यावे लागणार आहे. मात्र, जिल्हाअंतर्गत बदल्या तीन वर्षातून एकदा होतील, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना त्यानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे.
While preparing the rules under ‘RTE’, students were made to create the central point of law. One teacher for every 30 students is such an equation. One center head is appointed for 10 schools. However, none of those rules have been followed for the time being. That’s why there is a need to organize agitations by the parents along with the students as teachers are not available in the Zilla Parishad schools on the border of such talukas as Mangalvedha, Sangola, Malshiras, Akkalkot. 199 center heads are approved for two thousand 795 schools of Solapur Zilla Parishad, but, as of now, the responsibility of only 19 people has come to the fore. The result of this is the fact that along with the number of students, the quality of the students is also affected.
अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत 3 एप्रिल 2023 च्या शासन आदेशानूसार वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगांव, नांदेड, नंदूरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांस भरतीस परवागनी देण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेला प्राप्त शासन आदेशानूसार जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपूरी, बागलाण, देवळा या तालुक्यातील पेसा क्षेत्रातील उमेदवारांची तत्काळ प्रभावाने पदभरती सुरु करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये साधारणत: 450 पदसंख्या असून याच्या 80 टक़्के म्हणजेच 360 जागा भरण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे.
पवित्र प्रणालीमार्फत अनुसूचित जमाती-पेसामधील रिक्त पदे भरण्यासाठी अन्य पदभरतीबरोबर काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्त, शिक्षण आयुक्तालय, पुणे या कार्यालयाकडून पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार शासनाचे पत्र दि.१०.०८.२०२३ अन्वये पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याकरीता कार्यवाहीस मान्यता देण्यात आली आहे.
शासन निर्णय दि.०१.०२.२०२३ मधील अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत जिल्ह्यांच्या प्रमुखांनी कार्यवाही करण्याची तरतुद आहे. यानुसार टेट-2022 परीक्षा दिलेल्या एसटी-पेसा उमेदवारांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही चाचणी (टेट-2022) परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून पेसा क्षेत्रातील यादीनूसार गुणवत्तेप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची निवड करावी असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासनाकडून प्राप्त झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील पदभरती तत्काळ करण्याबाबत शासनाचे पत्र प्राप्त झाले असून त्यानूसार रिक्त पदांच्या 80 टक्के पदे भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून समिती पूर्ण यादीचा आढावा घेणार आहे. यासाठी स्वतंत्र पेसा भरती कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले असून शासन आदेशानूसार पदभरती कार्यवाहीस तत्काळ सुरुवात करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत 7 तालुक्यांमधून माहिती मागविण्यात येणार असून पुढील 8 ते 10 दिवसांत तत्काळ पदभरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल.: आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत घेण्यात आलेल्या टेट-2022 मधील उत्तीर्ण उमेदवारांची यादी शासनाकडून प्राप्त होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानूसार जिल्हा परिषदेत पेसा भरती कक्ष स्थापन करण्यात आला असून टेट-2022 उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राप्त होताच ज्येष्ठतेनूसार गुणवत्ताधारक पेसा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.: नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नाशिक
शिक्षणात सुसूत्रता यावी, शिक्षकांच्या अध्यापनावर, गुणवत्तेवर लक्ष ठेवणे सोयीचे व्हावे म्हणून प्रत्येक दहा शाळांसाठी एक केंद्रप्रमुख नेमला जातो. सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांसाठी १९९ केंद्रप्रमुख मंजूर आहेत, परंतु, सद्य:स्थितीत १९ जणांवर ही जबाबदारी असल्याची बाब समोर आली आहे. त्याचा परिणाम पटसंख्येसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही झाल्याची वस्तुस्थिती आहे.
‘आरटीई’अंतर्गत नियमावली तयार करताना विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून कायद्याची रचना करण्यात आली. प्रत्येकी ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे समीकरण आहे. १० शाळांसाठी एक केंद्रप्रमुख नेमला जातो. मात्र, त्यापैकी कोणताही नियम सध्या पाळला गेलेला नाही. त्यामुळे मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, अक्कलकोट अशा तालुक्यांच्या सीमेवरील जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना आंदोलन करावे लागत आहे, हे दुर्दैवीच.
जिल्ह्यातील अनेक शाळा केंद्रप्रमुखांविनाच सुरु आहेत. दरम्यान, आता नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमाणात पुरेसे शिक्षक व शाळांच्या प्रमाणात केंद्रप्रमुख मिळतील, असा विश्वास सर्वांनाच आहे. महापालिका शाळांमध्येही अशीच स्थिती आहे.
झेडपी शाळांची सद्य:स्थिती
- एकूण शाळा
- २७९५
- केंद्रप्रमुखांकडील शाळा
- १०
- मंजूर केंद्रप्रमुख
- १९९
- केंद्रप्रमुखांची रिक्तपदे
- १८०
पदोन्नतीतून ८२ जण होणार केंद्रप्रमुख
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता ८२ केंद्रप्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे. पात्र पदवीधर म्हणून तीन वर्षे सेवा बजावलेल्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने ती पदे भरली जातील. दुसरीकडे ज्या शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत, त्याठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याची कार्यवाही सुरु आहे.
– संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
सेवानिवृत्त शिक्षकांची अजूनही नाही नेमणूक
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या ६९० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. संचमान्यता, त्यानंतर अतिरिक्त झालेल्यांचे समायोजन आणि शिक्षक भरती, अशी प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. तोवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्या शाळांवर ७० वर्षांपर्यंतचे सेवानिवृत्त शिक्षक नेमले जाणार आहेत. शासनाचा निर्णय देखील झाला, शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे त्यांच्या तालुक्यातील इच्छुकांची यादी पाठविण्याचे आदेश दिले. पण, अद्याप कोणीच शिक्षणाधिकाऱ्यांकडे यादी दिलेली नाही. त्यामुळे ‘निर्णय वेगवान, गतिमान प्रशासन’चा अनुभव विद्यार्थ्यांसह पालकांना येत आहे.
पदोन्नतीची फाइल ‘सीईओं’कडे निर्णय कधी?
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवरील ८२ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्याची कार्यवाही तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यकाळात पार पडली. पण, त्याच्या अंतिम मान्यतेसाठी आता ती फाइल नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याकडे आहे. त्यावर आता कधीपर्यंत निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ZP Teachers Assessment Test
ZP Teachers Bharti 2023: Preparations have started for the district level motivation test of teachers. The Divisional Commissioner’s Office has given instructions regarding giving seat number to the examinees, fixing the center, appointment of invigilators, printing of question papers, transcripts, arrangement of OMR machine for checking the answer sheets
माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्रशासनाच्या व शंभर टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, नियोजन सुरू आहे, परंतु जिल्ह्यातील किती शिक्षक ही परीक्षा देणार, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. यातच परीक्षा ऐच्छिक असल्याचे सांगत, परीक्षा टाळण्याचे प्रयत्न शिक्षकांकडून होत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, विषयज्ञानात वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी, म्हणून शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन केले आहे, परंतु आमची परीक्षा कशासाठी? म्हणत काही संघटनांनी विरोध दर्शविला, तर बहुतांश शिक्षकांनी मौन राखत परीक्षेला मूकसंमती दिली.
जिल्हास्तरावर होणाऱ्या प्रेरणा परीक्षेची तयारी सुरू
शिक्षकांच्या जिल्हास्तरावर होणाऱ्या प्रेरणा परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. परीक्षार्थीना आसन क्रमांक देणे, केंद्र निश्चिती करणे, पर्यवेक्षकांची नियुक्ती, प्रश्नपत्रिका, उत्तपत्रिका छपाई, उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी ओएमआर मशिनची व्यवस्था करण्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने सूचना दिलेल्या आहेत, परंतु दुसरीकडे किती शिक्षकांनी परीक्षेसाठी अनुमती दिली, याची माहिती अद्याप शिक्षण विभाग, तसेच आयुक्त कार्यालयाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नेमके किती शिक्षक परीक्षा देणार, हे स्पष्ट झालेले नाही.
शिक्षकांनी परीक्षा द्यायला हरकत नाही
वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच शिक्षकांमध्ये संशोधनक्षमता विकसित व्हाव्यात, म्हणून ही परीक्षा आहे. यात कमी मार्क मिळाले, तर ते जाहीर केले जाणार नाही. खरं तर शिक्षकांनी परीक्षा देण्यास कहीही हरकत नसून, जिल्ह्यातील शंभर टक्के शिक्षकांनी परीक्षा द्यावी, यासाठी गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांची व्हीसी घेऊन कळविले आहे. जास्तीतजास्त शिक्षकांनी परीक्षा द्यावी.
– वासुदेव सोळंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड
३०, ३१ ला परीक्षा
३० जुलै रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत भौतिकशास्त्र, १९.३० ते १२.३० या वेळेत रसायनशास्त्र, १ ते २ या वेळेत जीवशास्त्र, तर ३१ जुलै रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत गणित, ११.३० ते १२. ३० या वेळेत इंग्रजी १ ते २ या वेळेत इतिहास व भूगोल (एकत्रित) विषयांची परीक्षा होणार आहे, तर चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी ०.२५ गुण वजा करण्यात येणार आहेत.
Now Teachers Appointment Through ZP
ZP Teachers Bharti 2023: The teachers’ exams have been completed. Also their merit list has been prepared. The Aurangabad bench of the High Court had ordered a stay on the recruitment process of teachers. School Education Minister Deepak Kesarkar assured in the Legislative Council that the recruitment of teachers will be done in two phases. At the same time, teachers will be appointed directly through the Zilla Parishad, Kesarkar explained.
शिक्षकांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. तसेच त्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. शिक्षकांच्या भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती आदेश दिला होता. यापुढील काळात दोन टप्प्यात शिक्षकांची भरती होणार आहे, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. त्याचबरोबरच जिल्हा परिषदेमार्फत शिक्षकांची थेट नियुक्ती केली जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आधार कार्ड लिंक होत नसल्यामुळे राज्यात रखडलेल्या शिक्षक भरतीकडे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेचे लक्ष वेधले. त्यावेळी शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी लवकरच भरती होणार असल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने जिल्हा परिषदेला शिक्षकांची अंतिम आकडेवारी कळविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक जिल्हानिहाय अंतिम यादी आल्यानंतर, शिक्षकांना चॉईस दिला जाईल. त्यानुसार त्या श्रेणीनुसार शिक्षकांना जिल्ह्यांची निवड करण्यात येईल. तसेच माध्यमिक शाळांमध्ये भरतीवेळी मुलाखती घेतल्या जातात. राज्य मंत्रिमंडळाने पूर्वीच्या १० ऐवजी केवळ ३ उमेदवारांची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काही जणांनी न्यायालयात दाद मागितली आहे. परंतु, प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदे मार्फत थेट नियुक्तीपत्रे दिली जातील, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
ZP Ratnagiri Shikshak Bharti 2023
ZP Ratnagiri Bharti 2023: To fill the vacant posts of teachers in Zilla Parishad primary schools, 684 temporary teachers have been appointed on emoluments. Education department said that 16 more teachers will be appointed. 3 to 4 applications were received in one school also for these appointments. Due to the stalled teacher recruitment process and inter-district transfers, about 7700 teachers left the district, leaving the Zilla Parishad primary teacher vacancies at 2,000. As more than 25 percent of the posts remained vacant compared to the sanctioned posts, there were fears of decline in the quality of education.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची जागा भरून काढण्यासाठी मानधनावर ६८४ तात्पुरते शिक्षक नियुक्त केले आहेत. अजून १६ शिक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या नियुक्त्यांसाठीही एका शाळेत ३ ते ४ अर्ज आले होते. या भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच सराव पेपर साठी येथे क्लीक करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
ZP Teachers Bharti 2023 – प्राथमिक शिक्षकांची एकूण २००२ पदे रिक्त; भरती लवकरच होणे अपेक्षित
रिक्त पद दोन हजारावर
रखडलेली शिक्षकभरती प्रक्रिया आणि आंतरजिल्हा बदलीने सुमारे सव्वासातशे शिक्षक जिल्ह्याच्या बाहेर गेल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची रिक्त पद दोन हजारावर पोचली. मंजूर पदांच्या तुलनेत २५ टक्केहून अधिक पदे रिक्त राहिल्याने शैक्षणिक गुणवत्ता घसरण्याची भिती व्यक्त केली जात होती.
महिन्याला ९ हजार रुपये मानधन देण्याच्या सूचना
या प्रश्नावरून ठाकरे शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. खासदार, आमदारांसह माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकार्यांकडून जिल्हा परिषद अधिकार्यांकडे निवेदने देण्यास सुरवात केली. शिक्षकांची तातडीने नियुक्त करा, अन्यथा मुलांना जिल्हा परिषदेत आणून बसवू, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिक्षण विभागाकडून मानधनावर डीएड्, बीएड्धारकांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीचा प्रस्ताव तयार केला. त्याला पालकमंत्री उदय सामंत यांनी पाठबळ देत महिन्याला ९ हजार रुपये मानधन देण्याच्या सूचना केल्या. त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले. त्यामुळे मानधनावर शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली होती. उमेदवार निवडीत गावातील तरुणांना प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे ७०० शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, आतापर्यंत ६८४ जणांना मानधनावर काम करण्यास परवानगी दिली गेली आहे. दापोलीत ४ आणि गुहागरमध्ये १२ जणांची निवडप्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक शाळेत ३ ते ४ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधील एकाची निवड शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. ही नियुक्ती नवीन भरतीप्रक्रिया राबवेपर्यंत किंवा हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत राहणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
चौकट
शिक्षक पदाचे वास्तव
तालुका शिक्षक रिक्त पदे मानधनावर नियुक्ती
* चिपळूण* १७९* ५७
* दापोली* ३०२* ७६
* गुहागर* २३०* १०४
* खेड* २६१* ६८
* लांजा* १८५* ५८
* मंडणगड* १३०* ३९
* राजापूर * २८८ * १०८
* रत्नागिरी* १६६* ८१
* संगमेश्वर* ३१५* ९३
ZP Guhagar Shikshak Bharti 2023
ZP Ratnagiri Bharti 2023: The new academic year is starting from Thursday (15th). There is no teacher in 14 schools of Guhagar taluka. The education department has planned which teachers will be sent to these schools as a temporary arrangement. There are 227 vacant posts of teachers in 196 schools of the Zilla Parishad in the taluka, while 24 teachers are urgently required to be appointed in Urdu medium schools.
नव्या शैक्षणिक वर्षाला गुरूवारपासून (ता. १५) सुरू होत आहे. गुहागर तालुक्यातील १४ शाळांमध्ये शिक्षकच नाही, अशी परिस्थिती आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून कोणत्या शिक्षकांना या शाळांवर पाठवायचे याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १९६ शाळांमधील २२७ शिक्षकांची पदे रिक्त असून, उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये २४ शिक्षकांची तातडीने नियुक्ती आवश्यक आहे. या भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच सराव पेपर साठी येथे क्लीक करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
उर्दू माध्यमाला २४ शिक्षकांची गरज
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. गेल्या वर्षी नासा आणि इस्रोला भेट देण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर परीक्षा व मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. शालांत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा, नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांना यश मिळावे यासाठी गेली दोन वर्ष शिक्षक जीवतोड मेहनत घेत आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाला आज सुरवात होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. ज्ञानोत्सवाच्या या आनंददायी प्रारंभाला मात्र शिक्षकांच्या कमतरतेची किनार आहे. गुहागर तालुक्यातील १४ शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, अशी स्थिती आहे. तालुक्यात १९६ शाळा आहेत. या शाळांच्या पटसंख्येनुसार ६१७ शिक्षकांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात ३९० शिक्षकच उपलब्ध आहेत. ९ शाळांना मुख्याध्यापक नाहीत. १६८ पदवीधर शिक्षक आवश्यक असताना केवळ ७० पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. ९८ पदे रिक्त आहेत. उपशिक्षकांची १२० पदे रिक्त आहेत. गुहागर तालुक्यातील उर्दू माध्यमाच्या १० शाळांपैकी ६ शाळा उच्च प्राथमिक वर्गांच्या आहेत. येथे ३७ शिक्षकांचे काम केवळ १३ शिक्षक करत आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक जातील, याची व्यवस्था आम्ही केली आहे. शून्य शिक्षकी शाळा आणि अन्यत्र असलेली शिक्षकांची कमतरता या विषयाची माहिती जि. प. शिक्षण विभागाला दिलेली आहे. शिक्षक देण्यासाठी तेथील अधिकारी कार्यवाही करत आहेत.
– लीना भागवत, गटशिक्षणाधिकारी, गुहागर
ZP Ratnagiri Shikshak Bharti 2023
ZP Ratnagiri Bharti 2023: As Per New ZP Teacher GR, there is a provision that Zilla Parishad teachers whose teacher vacancies are more than 10 percent cannot be relieved.., In Ratnagiri Zilla Parishad, taking into account the percentage of vacant posts of teachers according to medium, it was possible to release some teachers. As the percentage of vacant posts is more than 10 percent, it is expected that very soon Ratnagiri ZP Teacher Bharti will start.
२७/०२/२०२१७ च्या शासन निर्णयानुसार घेतला. तसेच शासन निर्णय दिनांक ०७/०४/२०२१ नुसार सुधारीत निर्णय जाहार झालेला आहे. सन २०१७ नंतर जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन पध्दतीने आंतरजिल्हा बदल्या सुरु झाल्या. तथापि ज्या जिल्हा परिषदांची शिक्षक रिक्त पदे १० टक्के पेक्षा अधिक आहेत अशा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नाही अशी तरतूद आहे. त्यामुळे सन २०१७ पासून रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची माध्यमनिहाय रिक्त पदांची टक्केवारी विचारात घेऊन काही शिक्षकांना कार्यमुक्त करता येणे शक्य झाले. रिक्त पदांची टक्केवारी १० टक्के पेक्षा जास्त असल्यामुळे खालील कांष्टकानुसार माध्यमनिहाय शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त केलेले नाही. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यावर रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १०९१ पदे रिक्त असून हि भरती लवकरच होणे अपेक्षित आहे..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
ZP Teachers Bharti 2023 – प्राथमिक शिक्षकांची एकूण २००२ पदे रिक्त; भरती लवकरच होणे अपेक्षित
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १०९१ पदे रिक्त
ZP Ratnagiri Bharti 2023
ZP Ratnagiri Bharti 2023: Good news for job seekers!!! As per the latest news, The recruitment will be soon at Zilla Parishad Ratnagiri. There are a total of 2 Thousand 844 posts vacant in ZP Ratnagiri. All these vacancies will be filled. This is a great opportunity for job seekers. Zilla Parishad Ratnagiri will recruit Class 1 to Class 4 posts. For more details about ZP Ratnagiri Recruitment 2023, Zilla Parishad Ratnagiri Bharti 2023. Zilla Parishad Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
नोकरीच्या (Jobs) शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) पुढील काही दिवसांमध्ये बंंपर भरती होणार आहे.
नवीन अपडेट – जिल्हापरिषदेच्या शाळांत शिक्षकांची 450 पदे रिक्त!!
ZP प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी 200 स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय!!
महत्त्वाचे – राज्यात शिक्षकांच्या तब्बल 37 हजार जागा रिक्त!!
राज्यात पवित्र पोर्टल असताना MPSC चा अट्टाहास का?
- वर्ग एक ते वर्ग चार पदांसाठी ही संधी असणार आहे.
- सध्या रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल दोन हजार 844 पदे रिक्त आहेत.
- ही सर्व रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
- त्यामुळे बेरोजगारांना सरकारी नोकरींची संधी उपलब्ध होणार आहे.
- जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागातील सर्वाधिक जागा रिक्त आहेत.
- कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- त्यामुळे बेरोजगारांना रत्नागिरी जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
- दरम्यान दुसरीकडे येत्या दीड वर्षात मोठ्याप्रमाणात तरुणांना रोजगार उलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा केंद्राच्या वतीने देखील करण्यात आली आहे.
- त्यामुळे केंद्रकडून करण्यात येणाऱ्या नोकरभरतीमध्ये देखील तरुण आपले नशीब अजमावू शकतात.
कोरोनामुळे वाढली बेरोजगारी
देशासह राज्यात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले. कंपन्या बंद होत्या. त्यामुळे अनेकांनी आपले रोजगार गमावले. हातात नोकरी नसल्याने पैसा देखील नव्हता. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली. बाजार सुस्तावला. या काळात नोकरीच्या संधी देखील कमी झाल्या होत्या. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाले असून, सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेकांना पुन्हा रोजगार भेटल्याने अर्थचक्र गतिमान झाले आहे.
Other Related Link:
विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा
जिल्हा परिषद भरती महत्त्वाचे सराव प्रश्नसंच
ZP Shikshak Bharti New Update 2023
ZP Shikshak Bharti 2023 – The school education department of the state is confused whether to start the regular recruitment process to fill the vacant posts of teachers in Zilla Parishad schools or to appoint retired teachers on contractual basis. Therefore, in the last month, this department has announced two regular recruitments and one time for temporary appointments from retired teachers on contract basis. The appointment of retired teachers has been strongly opposed by in-service teachers and unemployed youths who have completed their diploma courses in education. Due to this, the recruitment of teachers has remained as it is.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नियमित भरती प्रक्रिया सुरु करायची की, सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या करायच्या, याबाबत राज्याचा शालेय शिक्षण विभागच संभ्रमात पडला आहे. त्यामुळे या विभागाकडून गेल्या महिनाभरात दोन वेळा नियमित भरतीची तर, एक वेळा निवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्यांना सेवेत असलेल्या शिक्षकांनी शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बेरोजगार युवकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यामुळे शिक्षकांच्या भरतीचा घोळ अद्याप जैसे थे स्थितीत कायम राहिला आहे.
मागील तब्बल बारा वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती रखडली आहे. प्रदीर्घ खंडानंतर या भरतीवरील स्थगिती मागे घेण्यात आल्यानंतर शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांपैकी निम्म्या जागा भरण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली होती. याबाबतचा निर्णय सरकारने २१ जून २०२३ ला जाहीर केला होता. पण या घोषणेनंतर आठवडाभरातच पुन्हा जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. मात्र या निर्णयाला सेवेतील शिक्षक आणि या क्षेत्रातील बेरोजगार युवकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
यामुळे आतापर्यंत नियमित शिक्षक भरती प्रक्रिया आणि सेवानिवृत्त शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्याची प्रक्रिया या दोन्हीपैकी एकही प्रक्रिया सुरु होऊ शकलेली नाही.यामुळे नियमित शिक्षक भरतीच्या प्रक्रियेची स्थिती ही कधी तळ्यात, तर कधी मळ्यात या उक्तीप्रमाणे झाली असल्याची भावना जिल्ह्यातील शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
ZP Teachers Bharti 2023: In Raigad district, the condition of education has become serious due to many problems such as insufficient teachers, many dilapidated school buildings, lack of toilets, falling number of students, poor seating conditions. Fifty two lakh students from class I to VIII are studying in Zilla Parishad schools; But for the last fifteen years, the number of students in the school has started to decline. More than five hundred schools of the Zilla Parishad have been closed due to the decrease in the number of students in the district.
रायगड जिल्ह्यात अपुरे शिक्षक, मोडकळीस आलेल्या अनेक शाळांच्या इमारती, स्वच्छतागृहांची वानवा, पटसंख्येत होत असलेली घसरण, बसण्याच्या जागेची दुरवस्था अशा अनेक समस्यांमुळे शिक्षणाची अवस्था गंभीर झाली आहे. पहिली ते आठवीपर्यंत पावणेदोन लाख विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत; मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांची घसरण होऊ लागली आहे. जिल्ह्यातील घटलेल्या पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या पाचशेहून अधिक शाळा बंद पडल्या आहेत अजूनही काही शाळा भविष्यात पटसंख्या घटल्यामुळे बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
जिल्ह्यात 1208 शिक्षकांची भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती | ZP
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची ७ हजार ३१६ पदे मंजूर आहेत. यापैकी ५ हजार ४६५ पदे भरण्यात आली आहेत. १ हजार ८५१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामध्ये उपशिक्षक १,२००, पदवीधर ५४९, मुख्याध्यापक ९४, गटशिक्षणाधिकारी १५ पैकी १४ पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुख मंजूर आहेत; यापैकी १५६ पदे रिक्त आहेत. अडीचशे शिक्षक बदली होऊन गेले आहेत. १६५ शाळा शिक्षकी आहेत. उदू माध्यमाच्य २४९ शाळा असून, शिक्षकांची ४२० पैकी १८४ पदे रिक्त आहेत.
ZP Teachers Bharti 2023
As many as 227 Teacher Posts are vacant in Central Primary School and Zilla Parishad Prashala, Marathi and Urdu medium schools in twenty central schools in Kannada Taluka. Due to this, the education of the students has been hampered and the parents are demanding that the seniors should take notice and fill the vacancies in the taluka immediately. 1 thousand 362 posts of teachers have been sanctioned in 304 primary schools, 10 prashalas and 6 Urdu medium schools in 20 centers under the office of Group Education Officer of Kannada Panchayat Samiti. Among them 1 thousand 135 teachers are working and 227 posts are vacant. 87 posts of teachers have been sanctioned in 10 schools of the school and 69 teachers are working while 18 posts are vacant. Similarly, in 6 schools of Urdu medium, 27 posts of teachers have been approved, only 14 teachers are working and 13 posts are vacant, Group Education Officer Sheshrao Gande informed.
कन्नड तालुक्यात केंद्रीय प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्रशालेच्या, मराठी व उर्दू माध्यमाच्या वीस केंद्रातील शाळांमधील तब्बल 227 शिक्षकांची पदे (Teachers Post) रिक्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून, वरिष्ठांनी दखल घेऊन त्वरित तालुक्यातील रिक्त जागा भराव्या, अशी मागणी पालकांकडून होत आहे. कन्नड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या २० केंद्रातील ३०४ प्राथमिक शाळा, १० प्रशाला व उर्दू माध्यमाच्या ६ शाळांमध्ये शिक्षकांची १ हजार ३६२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १ हजार १३५ शिक्षक कार्यरत असून, २२७ पदे रिक्त आहेत. प्रशालेच्या १० शाळांमध्ये शिक्षकांची ८७ पदे मंजूर असून ६९ शिक्षक कार्यरत आहेत तर १८ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे उर्दू माध्यमाच्या ६ शाळांमध्ये शिक्षकांची २७ पदे मंजूर असून केवळ १४ शिक्षक कार्यरत असून १३ पदे रिक्त आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी शेषराव गंडे यांनी दिली.
तालुक्यातील बऱ्याच गावातील चौथीपर्यंतच्या शाळेवर एक शिक्षक तर सातवीपर्यंतच्या शाळेवर दोन शिक्षक आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार याकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष दिले. तरच ग्रामीण भागातील शाळा टिकतील नाहीतर खाजगी शाळा, इंग्रजी शाळा शिक्षण विभागाच्या भरभराटीस येतील.
ZP Teachers Bharti 2023: The Graduate Teachers’ Association warns of protest Rajgurunagar – Khed Taluka Graduate Teachers’ Association has demanded that the vacant posts of headmasters in the primary schools of the district council be filled soon and if the vacancies are not filled soon, they have warned to protest in front of the Pune Zilla Parishad.
पदवीधर शिक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा राजगुरूनगर – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा लवकर भराव्यात अशी मागणी खेड तालुका पदवीधर शिक्षक संघटनेने केली असून लवकर जागा भरल्या नाही तर पुणे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील रिक्त असलेल्या मुख्याध्यापक जागा पदोन्नतीने सेवाजेष्ठ शिक्षकातून त्वरित भराव्यात,अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली असून पदोन्नतीची कार्यवाही न झाल्यास आगामी शिक्षक दिनावर बहिष्कार घालून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे, राज्य सरचिटणीस मनोज मराठे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त कार्यभार शाळेतील सेवाजेष्ठ शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक यांच्याकडे दिलेला आहे.वर्गाचे अध्ययन अध्यापणाचे काम पाहून ऑनलाइनची कामे, ताबडतोब मागितली जाणारी विविध प्रकारची माहिती, आधार कार्ड नोंदणी, विद्यार्थी हिताच्या शासनाच्या विविध योजना विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणी करताना प्रभारी मुख्याध्यापकांची दमछाक होत आहे. त्यातच रिक्त असलेल्या केंद्रप्रमुख पदाचा कार्यभारही बहुसंख्य पदवीधर शिक्षकांकडे दिला आहे. त्यांनी हे काम स्वत:कडील वर्गाचे कामकाज पाहून करायचे आहे. कामाचे दडपण अधिक असल्याने त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थी गुणवत्तेवर होत आहे.
याबाबत संघटनेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करूनही पदोन्नतीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. हे प्रश्न त्वरित सोडविण्याची संघटनेने मागणी केली आहे. अन्यथा आगामी 5 सप्टेंबर 2023 या शिक्षक दिन कार्यक्रमावर बहिष्कार टाकून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार असल्याच्या निवेदनाची प्रत राज्याचे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, प्रधान सचिव, ग्रामविकास सचिव, शालेय शिक्षण व ग्रामविकास मंत्री आणि मुख्यमंत्री यांना दिली असल्याची माहिती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शांताराम नेहेरे व कार्याध्यक्ष शहाजी पवार
यांनी दिली.
13 वर्षे पदोन्नती नाही
तब्बल 13 वर्षे म्हणजे 2010 नंतर पुणे जिल्हा परिषदेत मुख्याध्यापक पदोन्नती झालेली नसल्याने सुमारे 232 पेक्षाही अधिक शाळा मुख्याध्यापक पद मंजूर असूनही रिक्त आहेत. या प्रदीर्घ कालावधीत पदोन्नती न झाल्याने अनेक पात्र शिक्षक मुख्याध्यापक न होताच सेवानिवृत्त झालेले आहेत. कर्मचारी संख्या जास्त आणि पदोन्नतीच्या कमी संधी असलेल्या या विभागात या दिरंगाईमुळे पदोन्नतीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे.
Marathwada ZP Teacher Motivation Test
ZP Teachers Bharti 2023: As the vacant posts of teachers in Zilla Parishad schools are not filled by the government level, the students are suffering a great educational loss. In order not to harm the students and to increase the educational quality of the students, the decision to select volunteer teachers on behalf of the Zilla Parishad in schools in villages with a population of less than 1500 was unanimously approved in the general meeting of the Zilla Parishad held on June 5.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे शासन पातळीवरून भरली नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यादृष्टीने 1500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांतील शाळेत आता जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक स्वयंसेवक निवडण्याच्या निर्णयाला 5 जून रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे शिक्षकांची कमतरता भागविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या धर्तीवर प्रत्येक पंचायत समितीने प्रत्येकी 12 तर नागरी सुविधा अंतर्गत येणार्या 60 ग्रामपंचायतींनी ही पुढाकार घेत प्रत्येकी 2 शिक्षक स्वयंसेवकांची निवड करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी यावेळी केले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती सोनू कुथे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, समाजकल्याण सभापती पूजा शेठ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर उपस्थित होते. जिल्ह्यात आजघडीला 850 च्या वर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. (ZP Teachers Recruitment)
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या संकल्पनेतून शिक्षक स्वयंसेवक पद भरून गुणवत्ता वाढीसाठी हातभार लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यात 220 शिक्षक स्वयंसेवक पद भरण्यासाठी आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे शिक्षकांची रिक्त पदे जास्त असल्याने पंचायत समितीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येक पंचायत समितीने 12 असे एकूण आठ पंचायत समितीच्या वतीने 96 तर नागरी सुविधा योजनेंतर्गत येणार्या 60 ग्रामपंचायतींनी प्रत्येकी 2 असे एकूण 120 शिक्षक स्वयंसेवक तर 1500 ते 3000 हजार लोकसंख्या असलेल्या गावाने प्रत्येकी एका शिक्षक स्वयंसेवक निवड करण्याचे आवाहन ही यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी यावेळी केले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर पंचायत समिती व ग्रामपंचायत यांनी शिक्षक स्वयंसेवक निवड केल्यास एकूण जवळपास 700 पदे भरण्यात येतील. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कायम राखण्यास मदत होणार आहे.
Previous Updates :
या संदर्भात १३ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात शिक्षक संघटनांची सहविचार सभा झाली होती. त्यात यावर चर्चा झाली होती. परीक्षा आयोजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणा व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी विभागीय संनियंत्रण समिती असेल. त्यात अध्यक्ष विभागीय आयुक्त, सदस्य सचिव प्रादेश विद्या प्राधिकरण संचालक, सदस्य उपायुक्त विकास, विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर, शिक्षण उपसंचालक लातूर यांचा समावेश असेल
समितीने प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिकेची प्रत सीलबंद स्वरूपात जिल्हा परीक्षा संनियंत्रण समिती सुपूर्द करणे, समिती सदस्यांनी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्ह्यांना पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय परीक्षा संनियंत्रण समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी, सहअध्यक्ष सीइओ जिल्हा परिषद, सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), सदस्य अतिरिक्त सीइओ, प्रकल्प संचालक डीआरडीए, डेप्युटी सीइओ (सामान्य प्रशासन)आणि प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था
याशिवाय आर्थिक नियोजन, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, छपाई, सिलिंग, उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांसाठी कस्टडी रूम, ओएमआर मशीन उपलब्धतता, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल, केंद्रनिश्चिती, बैठक व्यवस्था, परीक्षा संचलन सुरळीतपणे पार पाडणे आदी जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.
शिक्षक प्रेरणा परीक्षेसंदर्भात माहिती
– परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची असेल. निकालानुरूप कुठलीही कारवाई शिक्षकांवर होणार नाही.
– परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शिक्षकांना कळविणे.
– जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक प्रेरणा परीक्षेत सहभागी करून घ्यावे.
– विभागातील परीक्षेसाठी तारीख व वेळ सर्व जिल्ह्यांसाठी एकच असणार आहे.
– परीक्षेची तारीख व वेळ, विहित प्रपत्रे, पेपर तपासणीची तारीख स्वतंत्रपणे कळविली जाणार आहे.
– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र विषयांवर प्रत्येकी ५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल.
– प्रत्येक प्रश्नपत्रिका ५० प्रश्न, वस्तुनिष्ठ स्वरूपाची व ५० गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरास एक गुण, चुकीच्या उत्तरासाठी ०.५ गुण वजा केले जातील.
– परीक्षेचा कालावधी एक तास.
– ५० टक्के व त्याहून अधिक गुण घेणाऱ्या परीक्षार्थ्यास उत्तीर्ण ठरविले जाईल.
ZP Ratnagiri Teacher Bharti 2023
ZP Teachers Bharti 2023: 725 teachers of Ratnagiri Zilla Parishad were recently transferred to their respective villages on a single day. Previously, 2010 and 2017 Sakil teachers were recruited. Compared to that, there are about 2000 vacancies in the district due to continuous district transfer and retirement. Check Latest Update of ZP Ratnagiri Teacher Recruitment 2023, ZP Ratnagiri Teacher Bharti 2023 at below
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी डीएड, बीएड पदवीधारकांनी केली आहे. कोकणात परजिल्ह्यातून शिक्षक येतात आणि काही वर्षांनी बदली करून निघून जातात. जिल्हा परिषद शाळा वाचवायच्या असतील तर स्थानिक शिक्षकांना भरतीत प्राधान्य द्यावे, त्यासाठी स्वतंत्र निकष वापरून शिक्षक भरती करावी, अशी मागणी डीएड, बीएडधारक करत आहेत. पेसाप्रमाणेच स्वतंत्र निकष वापरून कोकणासाठी स्वतंत्र शिक्षक भरती करावी, अशी त्यांची मागणी आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील ७२५ शिक्षकांची नुकतीच एकाच दिवशी जिल्हा बदली झाली आणि ते आपापल्या गावी निघून गेले. यापूर्वी २०१० आणि २०१७ साकील शिक्षक भरती झाली. त्या तुलनेत जिल्हा बदली सातत्याने होत असल्याने आणि सेवानिवृत्तीमुळे जिल्ह्यातील सुमारे २००० पदे रिक्त आहेत. दरवेळी परजिल्ह्यातील शिक्षकांची नेमणूक केल्री जाते आणि ते शिक्षक ठरावीक वर्षे नोकरी करून आपापल्या जिल्ह्यात निघून जातात. त्यामुळे शिक्षकांची जिल्हाबदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी गेल्या १५ वर्षांपासून कोकणातील डीएड, बीएड पदवीधारक करत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपासून मुंबईपर्यंतच्या उमेदवारांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने केली. तरीही भरतीप्रक्रिया करताना ऑनलाइन पद्धतीचाच अवलंब केला जात आहे. त्यामध्ये भरतीसाठी पोर्टल उघडण्यात येणार असल्याने पुन्हा परजिल्ह्यातील उमेदवार भरले जातील. त्यावर वेळीच रोख लावला गेला नाही तर अडचणी निर्माण होतील.
सध्या उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाबदलीविरोधात ओस पडणाऱ्या कोकणातील शाळा वाचवण्यासाठी आता स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. गावागावातील लोकप्रतिनिधी, जाणकार नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत शाळा बचाओ आंदोलन सुरू केले आहे. पाठिंब्याची पत्रे कोकण डीएड, बीएड पदवीधारक असोसिएशनमार्फत शालेय शिक्षणमंत्र्यांना देण्यात येत आहेत. असोसिएशनकडे आलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पत्रात कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुजू व्हायचे आणि काही वर्षांनंतर आपापल्या जिल्ह्यात बदली करून निघून जायचे, या प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. नोकरीवर रुजू झाल्यानंतर परजिल्ह्यातील हे शिक्षक ग्रामीण भागात न राहता शहराच्या ठिकाणी राहतात. बहुतांश दिवस हे सलग सुट्ट्या घेतात. काही दिवस शैक्षणिक कामाचे कारण सांगून तालुक्याच्या ठिकाणी वाया जातात. त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत शिकवायला शिक्षकच नसतात, अशी स्थिती आहे. यात बदल करण्यासाठी स्थानिक उमेदवारांचीच भरती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ZP Primary Teacher Bharti 2023 Update
ZP Teachers Bharti 2023: The state government has announced the recruitment of primary teachers vacancies in the state through holy portal. However, due to the decline in the number of points, the students who qualify for ‘Tate’ in the open category will be affected. Out of 15,300 seats in the state, barely 1,600 seats will be available for open category students. For this, there is a demand to reserve 10 percent seats for ‘EWS’ category and 40 percent for open category.
राज्यात रिक्त प्राथमिक शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र, बिंदू नामावलीमध्ये झालेल्या घसरणीमुळे खुल्या प्रवर्गातील ‘टेट’ पात्र विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. राज्यात १५,३०० जागांपैकी जेमतेम १६०० जागा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. यासाठी ‘ईडब्लूएस’ प्रवर्गासाठी १० टक्के व खुल्या प्रवर्गसाठी ४० टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी होत आहे. राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या जवळपास ६७ हजार जागा रिक्त असल्याने महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे भरती प्रक्रियाच ठप्प असल्याने अनेक शाळा शिक्षकांविनाच भरत आहेत. आता शिक्षक भरती प्रक्रियेला गती देऊन रिक्त जागांपैकी किमान ८० टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, पुन्हा एकदा बिंदू नामावली खुल्या गटातील इच्छुकांच्या मानगुटीवर बसणार आहे.
यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या शिक्षक भरतीमध्ये ५२०० जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी जेमतेम १०० जागा आल्या होत्या. वास्तविक खुल्या प्रवर्गातील इच्छुकांसाठी ४० टक्के जागा राखीव असतात. मात्र, तेवढ्याही जागा दिल्या गेल्या नव्हत्या. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, कोणालाही या वेदनेकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आता नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे. गुणवत्तेनुसार ही प्रक्रिया राबवली जाणार असली तरी मुळात खुल्या गटासाठी कोटाच कमी केला तर न्याय मिळणार कसा? असा प्रश्न खुला प्रवर्ग संघर्ष समितीने केला आहे.
यापूर्वी मराठा समाजाला एसईबीसी कोट्यातून १६ टक्के आरक्षण मिळत होते. मात्र, तेही आता रद्द केल्याने त्याचा फटकाही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बसत आहे.
शिक्षक संवर्गाची आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्याची सन २०२२ मधील शिक्षक संवगांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सदर बदली प्रक्रियेमध्ये ४७८ प्राथमिक शिक्षकांची जिल्हा परिषद पालघर मधून आंतरजिल्हा बदली झालेली होती, परंतु ९ प्राथमिक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीस नकार दिल्याने संबंधित शिक्षकांचे ऑनलाईन संगणक प्रणालीवरील आंतरजिल्हा बदली झालेले आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांच्या मान्यतेने रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांची संख्या ४६९ एवढी आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यावर पालघर जिल्ह्यात एकूण २००२ पदे रिक्त असून हि भरती लवकरच होणे अपेक्षित आहे..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
ZP Ratnagiri Bharti 2023– रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल १०९१ शिक्षक पदांची होणार बंपर भरती
जिल्हा परिषद पालघर अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचा रिक्त पदांचा गोषवारा
वर नमूद केल्याप्रमाणे सर्व माध्यमाची रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांना संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयातील परिच्छेद २.८ नुसार कार्यमुक्त करता येणार नाही.
Table of Contents
Pavitra portal var register kelele nahi sir parat registration karrta yeil ka,?
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या ६९० शिक्षकांची पदे रिक्त
New Update
Sir me MA bed. Ahe English sub. Mla job chi kup garaj ahe