नवीन अपडेट – जिल्हापरिषदेच्या शाळांत शिक्षकांची 450 पदे रिक्त!! ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022: There are a total of 450 Teacher posts vacant in Zilla Parishad Schools. The ZP Shikshak Bharti 2022 will be soon. For more details about ZP Teachers Recruitment 2022, Zilla Parishad Shikshak Bharti 2022, Zilla Parishad Shikshak Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

जिल्हापरिषदेच्या शाळांत शिक्षकांची ४५० पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरती घेण्यात आली नाही. शिक्षणासारख्या गंभीर विषयावर राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. समायोजनाच्या नावावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.

आनंदाची बातमी!! रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 2 हजार 844 पदांची होणार बंपर भरती

ZP प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी 200 स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय!!

महत्त्वाचे – राज्यात शिक्षकांच्या तब्बल 37 हजार जागा रिक्त!!

राज्यात पवित्र पोर्टल असताना MPSC चा अट्टाहास का?

 • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
 • शिकविणारेच अपुरे असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत.
 • राज्य सरकारने शिक्षक भरती थांबविल्याने ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे.
 • ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे.
 • गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरती घेण्यात आली नाही.
 • भंडारा जिल्ह्यात शिक्षकांचा अनुशेष वाढू लागला आहे.
 • शिक्षणासारख्या गंभीर विषयावर राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.
 • समायोजनाच्या नावावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.
 • ही परिस्थिती असतानाच गेल्या १८ वर्षांपासून घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढविण्यात आले नाहीत.
 • बीए बीएड, पदवीधर तथा अन्य घड्याळी तासिका शिक्षक म्हणून कार्य करीत आहेत.
 • या शिक्षकांना तीन हजार रुपयांचे तुटपुंजे मानधन देण्यात येते.
 • समाधानकारक मानधन देण्यात येत नसल्याने गावातील शिक्षित तरुण घड्याळी तासिका शिक्षक म्हणून काम करण्यास नकार देत आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांची पदे रिक्त असल्याने पहिली ते चौथीचे वर्ग एक किंवा दोन शिक्षक सांभाळतात. ही पोकळी भरून काढण्याची क्षमता घड्याळी तासिका शिक्षकांत आहे. राज्य शासनाने शिक्षक भरती थांबविली असली तरी घड्याळी तासिका शिक्षक भरतीकडे पाठ फिरविली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे, घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढविणे गरजेचे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘एमपीएससी’ची धास्ती

 • आतापर्यंत शिक्षक बनण्यासाठी डीएड, बीएड व त्यानंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते.
 • परंतु, आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत शासनपातळीवर हालचाली सुरू आहेत.
 • त्यामुळे शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या राज्यातील हजारो तरुणांमध्ये धास्ती पसरली आहे.
 • एमपीएससीचे दिव्य पार केल्यानंतरच पुढे शिक्षक होता येणार आहे.

Other Related Link:

विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा  

ZP भरती नवीन टेस्ट सिरीज

जिल्हा परिषद भरती महत्त्वाचे सराव प्रश्नसंच 


ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022 : There are a total of 700 Teacher posts vacant in Zilla Parishad Schools. The Education Committee has decided to fill 50 of them. There are 40 Thousand Teacher posts vacant in the State. This includes 27,000 posts in Zilla Parishad schools and 13,000 posts in secondary schools. Further details are as follows:-

Zilla Parishad Shikshak Bharti 2022 | नवीन अपडेट – जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी शिक्षक पदांची भरती लवकरच!!

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मानधनावर शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सेस फंडातून 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातून 50 शिक्षक नियुक्ती करण्यास समितीने मंजुरी प्रदान केली. या कंत्राटी शिक्षकांना मानधन म्हणून 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या 1518 शाळांमध्ये सातशेवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. बहुतांश दोन शिक्षकी शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. तर काही ठिकाणी एकही शिक्षक नाही.

 • जिल्हा परिषदेच्या शाळेत 2005 पासून शिक्षकांची भरती बंद आहे.
 • त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या संख्येत शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
 • आजच्या घडीला 700च्या वर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
 • कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
 • अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता. जिल्हा परिषदेने मानधनावर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नियुक्तीचा कदाचित पहिलाच प्रसंग आहे.
 • अशा परिस्थितीत त्या शाळेमध्ये शेजारील दोन शिक्षकी शाळेतील एक शिक्षक घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.
 • शासन शिक्षक भरती करेल तेव्हा करेल, परंतु स्थानिक पातळीवर जि. प. ने विद्यार्थ्यांच्या हितार्थ कंत्राटी तत्त्वावर गावातील सुशिक्षित बेरोजगारांना मानधन तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • एक शिक्षकी व विषय शिक्षकांची अत्यंत आवश्यकता असलेल्या शाळांमध्ये प्रथम प्राधान्याने कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

ZP Teachers Recruitment 2022

राज्यात 40 हजार पदे रिक्त

 • राज्यात सध्या 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
 • यात जिल्हा परिषद शाळांतील 27 हजार आणि माध्यमिक शाळांतील 13 हजार पदांचा समावेश आहे.
 • या जागा टप्प्याटप्प्याने भरण्याची घोषणा शिक्षण विभागाने केली असून पहिल्या टप्प्यात 6,100 जागा भरणार असल्याची माहिती आहे.
 • नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षकांची सुमारे 700 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 50 पदे भरण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे.

ZP Teachers Bharti 2022

ZP Teachers Bharti 2022: There are 1594 teachers and 35 center heads working for 402 primary schools in the taluka. However, there are 165 vacancies for Headmaster, Graduate Teacher, Deputy Teacher and Head of Center. Further details are as follows:-

ZP Teachers Bharti 2022 | ZP Teachers Recruitment 2022

खेड तालुक्‍यातपुढील शैक्षणिक वर्षाची जिल्हा परिषदेच्या शाळांची तयारी सुरु झाली आहे. शिक्षकांसह शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याकर भर दिला जात आहे. तालुक्‍यातील 402 प्राथमिक शाळांसाठी 1594 शिक्षक व 35 केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. मात्र, मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक, उपशिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या 165 जागा रिक्‍त आहेत. त्यामुळे करोनाच्या कहरानंतर आता शिक्षण क्षेत्रात दर्जा आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

 • खेड तालुका शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेला तालुका आहे.
 • अंगणवाडी ते सातवीपर्यंतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवतेचा दर्जा सुधारला आहे.
 • शिष्यवृत्ती परीक्षेत खेड तालुका अग्रेसर असतो.
 • यामुळे इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल कमी झाला आहे.
 • दरवर्षी नव्याने 2 ते हजार विद्यार्थी झेडपी शाळेत प्रवेश घेतात. इंग्रजीसह दर्जेदार शिक्षण प्राथमिक शाळांमध्ये मिळत असल्याने झेडपीच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
 • गेल्या पाच वर्षांत तालुक्‍यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संख्या व त्यातील विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढली होती.
 • सर्वसामान्य पालक मुलाला इंग्रजी शाळांमध्ये पाठवत होता.
 • मात्र, या शाळांची अवाढव्य फी भरून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली नाही.
 • केवळ फी वसुली हे एकमेव उद्दिष्ट ठेवून अनेक शाळा सुरु होत्या त्यावर पालकांनी अनेकदा आवाज उठवले.
 • आंदोलने केली मात्र पालकांची दखल शासन घेत नसल्याने आता पालकांमधून या शाळांकडे जाण्याचा कल कमी झाला आहे.

2 years of epidemics and financial planning collapsed. They cannot afford to pay for English medium schools. This has disturbed the parents. Zilla Parishad school buildings in Khed taluka and its physical facilities are satisfactory. Various necessary facilities are provided to the students in the school. In addition, parents are relieved that there is no need for fees.

शहरातील अनेक विद्यार्थी मराठी शाळांमध्ये शिक्षणासाठी जात आहेत. शाळा इमारती, परिसर स्वच्छता, शौचालये, संरक्षक भिंती, इ- लर्निंग सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची सोय होत आहे. तालुक्‍यातील अनेक शाळांची गुणवत्ता इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा जास्त आहे. निसर्ग चक्रीवादळात तालुक्‍यातील अनेक शाळांना फटका बसला. त्या शाळांच्या दुरुस्तीला झेडपीकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला. जुन्या जीर्ण 60 शाळांची दुरुस्ती झाली नाही. 138 शाळांमध्ये मुलींसाठी व 120 शाळांमध्ये मुलांसाठी शौचालये नाही. तालुक्‍यात 163 शाळांना गरजेनुसार संरक्षण भिंत बांधल्या नाहीत. 402 शाळांपैकी 34 शाळांमध्ये इ- लर्निंगचे संच नाहीत.

खेड तालुक्‍यात उपशिक्षकांची 1218 पदापैकी 89 पदे रिक्‍त आहेत. पदवीधर शिक्षकांची 314 पदापैकी 23 पदे रिक्‍त आहेत. मुख्याध्यापकांच्या 62 पदापैकी 36 पदे रिक्‍त आहेत. केंद्रप्रमुख 35 पदापैकी 17 पदे रिक्त आहेत. अशी एकूण 1629 पदांपैकी 165 पदे रिक्त आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड