राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या नागरिकांना मिळणार ओळखपत्रे!! । VJNT Cast Certificate Application

VJNT Cast Certificate Arj

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच त्यांची ओळख नव्याने निर्माण व्हावी, यासाठी ओळखपत्रे, प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. हे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी राज्यस्तरापासून तालुकापातळीपर्यंत शासकीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

या ओळखपत्रांमध्ये आधारकार्ड, मतदारकार्ड, शिधापत्रिका, जन्म- मृत्यू दाखले, आयुष्मान भारत कार्ड, जात प्रमाणपत्र यांचा समावेश राहणार आहे. समित्या ग्रामपंचायतस्तरावर शिबिरे आयोजित करुन नागरिकांपर्यंत ही सेवा पोहोचवतील.

दरम्यान, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गाव, तालुका, नगरपरिषद आणि महापालिका यांना शासनाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती परंपरागत पद्धतीने स्थिर राहत न येता फिरत्या स्वरूपात उदरनिर्वाह करतात, त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीनुसार शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आव्हानात्मक आहे. या नव्या मोहीमेने त्यांच्या अधिकारांची पुष्टी करण्यास आणि सामाजिक समावेशन वाढविण्यास मदत होणार आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

...या कागदपत्रांचा समावेश
आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलेयर, राहिवास प्रमाणपत्र, अधिवास दाखला, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, अन्य आवश्यक प्रमाणपत्रे, कौशल्य व स्वयंरोजगार योजना, शिष्यवृत्ती योजना, पी.एम. किसान योजना आदी

…या कागदपत्रांचा समावेश
आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलेयर, राहिवास प्रमाणपत्र, अधिवास दाखला, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, अन्य आवश्यक प्रमाणपत्रे, कौशल्य व स्वयंरोजगार योजना, शिष्यवृत्ती योजना, पी.एम. किसान योजना आदी


 

VJNT Cast Certificate Arj

VJNT Cast Certificate Application: भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना जन्म दाखला, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापुरवठा पत्रिका, जातीचे दाखले देण्याबाबत सर्व जिल्ह्यात 30 ऑगस्टपर्यंत मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश महसूल, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विधानभवन येथे भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात बैठक झाली. याप्रसंगी गृहनिर्माण तथा इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, माहिती व तंत्रज्ञान, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय पुरी भटके विमुक्त विकास परिषदेचे पदाधिकारी हजर होते. सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

VJNT Cast Certificate Arj

Read This Also  – Jaticha Dakhla Documents – Caste Certificate Document List in Marathi

मंत्री अतुल सावे म्हणाले की, भटक्या विमुक्त जातीतील नागरिक एका जागी दीर्घकाळ राहत नसून वारंवार स्थलांतरित होत असल्याने शिक्षणासह विविध शासकीय लाभापासून वंचित राहतात. त्यांना शासकीय दाखले व प्रमाणपत्र मिळण्यासाठी विविध शासन निर्णय निर्गमित केले आहेत. या समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले.

Read This Also  – आता केवळ ८ दिवसात मिळणार कास्ट व्हॅलिडिटी दाखला – Caste Validity Certificate Maharashtra

यावेळी प्रामुख्याने जन्म दाखला, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, आयुष्यमान भारत आरोग्य पत्रिका, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र यांची गरज असते ते मिळताना विविध समस्या टाळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्तांनी या मोहिमेबाबत दर आठवड्यात आढावा घ्यावा. संबंधित जिल्हाधिकारी यांनी मोहिमेसाठी समन्वय साधत शिबिरांच्या माध्यमातून जास्तीत जास्त दाखले देण्यासाठी कार्यवाही करावी.

Read This Also  – Maha Non Creamy Layer Certificate New GR

याप्रसंगी भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरीकांना शासकीय दाखले व प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रामुख्याने जन्म दाखला अथवा जन्माचे नोंद उपलब्ध नसते. आधार ओळखपत्र मिळणेबाबत कागदपत्री पुराव्याच्या अडचणीची माहिती देण्यात आली. यासह विविध अडचणींवर उपाययोजना व पर्यायाबाबत चर्चा करण्यात आली.

Read This Also  – Maratha Reservation Benefits in Recruitment

भटके विमुक्त समाजातील नागरिकांना मतदार ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा अधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याचा भटके विमुक्त समाजाचा असल्याचा दाखला, शहरी भागात नगरसेवकांचा व ग्रामीण भागात सरपंच/उपसरपंच यांचा रहिवाशी दाखला यापैकी कोणतेही एक कादगपत्र असल्यास आवश्यक असलेले दाखले मिळणार आहेत.

भटक्या विमुक्त जाती विकास परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी समाजाच्या अडचणी व परिस्थितीबाबत माहिती दिली.

Read This Also  – मोठी बातमी! ‘SEBC’ सवलतीसाठी नव्याने करावा लागणार अर्ज ! कोणते डॉक्युमेंट्स लागणार बघा!- Maratha SEBC Caste Certificate

Check how to apply for Caste VJNT certificate provided by the revenue department,Govt. of Maharashtra.The department will provide service within 20 days.

Proof of Identity (Any -1)

Proof of Address (Any -1)

Other Documents (Any -1)

Mandatory Documents(All Mandatory)

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड