पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंत टीईटी बंधनकारक
TET is for Teaching to Class Pre Primary to 12th
TET is for Teaching to Class Pre Primary to 12th : Teachers Eligibility Test TET is Compulsory : नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते आठवीसाठी सध्या अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आता पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंत लागू केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) ‘टीईटी’संदर्भात समिती नियुक्त केली आहे. ही समिती देशभरातील राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) टीईटी संदर्भातील आढावा घेऊन अहवाल सादर करेल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
शिक्षक होण्यासाठी ‘एनसीटीई’ने ठरवलेल्या पात्रतेनुसार टीईटी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. नव्या शैक्षणिक धोरणानंतर शिक्षक आणि शिक्षकांच्या पात्रतेबाबत काही बदल होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उच्चशिक्षित, व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित, साधनसुविधायुक्त, ध्येयवादी शिक्षकांची गरज आहे. त्यासाठी ‘एनसीटीई’ने शिक्षकांच्या शिक्षणाबाबत काही महत्त्वाचे बदल करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. ही समिती १५ फेब्रुवारीपर्यंत ‘सीबीएसई’कडून माहिती घेईल. त्यानुसार पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या ‘टीईटी’ची रचना, परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना ३१ मार्चपूर्वी सादर करील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
‘एनसीटीई’ने २०११ मध्ये राज्यातील आणि ‘सीबीएसई’च्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य केली होती. मात्र, या संदर्भात काही आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे त्या संदर्भातील अडीअडचणी, आक्षेपांचाही अभ्यास ही समिती करणार आहे.
सोर्स : म. टा.