जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची टंचाई: विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात! | Teacher Shortage, Education at Risk!
Teacher Shortage, Education at Risk!
गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या तब्बल २१% म्हणजेच ७८३ शिक्षकांची पदे रिक्त असून, सेवानिवृत्तीमुळे हा आकडा वाढत आहे. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, त्यांच्यावर योग्य मार्गदर्शनाचा अभाव जाणवत आहे. ग्रामस्थ आणि पालक वारंवार प्रशासनाला विनंती करत आहेत, मात्र अद्याप तातडीने कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
शाळांमध्ये मूलभूत सुविधा अपूर्ण
गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळा अत्यंत दयनीय स्थितीत आहेत. अनेक शाळांची इमारती जीर्ण झाल्या असून, नवीन बांधकामाऐवजी तात्पुरती डागडुजी करून जबाबदारी झटकली जात आहे. सुरक्षा भिंत, वीज, पाण्याची व्यवस्था, शौचालय, रॅम्प यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कंत्राटी शिक्षकांच्या भरतीने तोडगा?
शिक्षक टंचाईवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवून कंत्राटी शिक्षकांची भरती केली आहे. मात्र, ही भरती तात्पुरती असून, कायमस्वरूपी शिक्षक न भरल्यास शिक्षणाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारी शाळांमध्ये शिकवण्यासाठी सक्षम शिक्षक उपलब्ध नसल्याने पालक मुलांना खासगी शाळांमध्ये घालण्यास प्राधान्य देत आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नक्षलग्रस्त भागात शिक्षक जायला तयार नाहीत!
सालेकसा, देवरी आणि अर्जुनी मोरगाव या नक्षलग्रस्त तालुक्यांमध्ये शिक्षक जायला तयार नाहीत, त्यामुळे या भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याचा फटका गावखेड्यातील गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बसत आहे. शासनाने यावर तोडगा काढत तिथे सेवा देणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहनपर भत्ते आणि संरक्षण व्यवस्था द्यायला हवी.
मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांची पदे रिक्त
शिक्षकच कमी असताना मुख्याध्यापक मिळणेही कठीण झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात १९० पदवीधर शिक्षक, ५५० सहाय्यक शिक्षक आणि ४३ मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक शाळांचा कारभार उपमुख्याध्यापकांवर चालत आहे. शिक्षक नसल्यामुळे शाळांचे व्यवस्थापन ढासळत असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे.
शासनाने तातडीने पावले उचलावीत!
गोंदिया जिल्ह्यातील सरकारी शाळांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. सरकारी शाळांमध्ये योग्य शिक्षक आणि चांगल्या सुविधा उपलब्ध नसतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात येईल. शासनाने तातडीने शिक्षक भरती करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे.