JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

संगणक टायपिंग प्रमाणपत्र पुनर्परीक्षा (GCC-TBC) 2026 चा निकाल प्रकाशित झाला, चेक करा – mscepune typing exam result 2026

COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM) Result 2026 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) – २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. खाली लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

 

 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जून-2025मध्ये इंग्रजी, मराठी व हिंदी – 30/40 शब्द प्रति मिनिट या विषयांची परीक्षा  ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांसाठी परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची ऑनलाईन प्रिंट घेता येईल.

विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे/ गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरूपात संबंधित संस्थांच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात येतील. सदरील प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंट द्वारे 100GSM कागदावर करून विद्यार्थ्यांना मोफत वितरित करावे. तसेच संबंधित वि‌द्यार्थ्यास सॉफ्ट कॉपी PDF स्वरूपात देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार सदरील प्रमाणपत्र कलर प्रिंट द्वारे 100GSM कागदावर छपाई करून घेता येईल. संस्थांनी संबंधित विद्यार्थ्यास प्रमाणपत्र/ गुणपत्रके वितरित केलेली पोहोच दप्तरी जतन करून ठेवावी.

निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून 10 दिवसात उमेदवारांनी गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेमधून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुण पडताळणीसाठी प्रति विषय रु.100/- प्रमाणे व छायाप्रतीसाठी प्रति विषय रु.400/- प्रमाणे रक्कम ऑनलाईन पद्धतीने

भरणे आवश्यक राहील. गुण पडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय रु.600/- प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरून अर्ज करावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड