Maha sarkari Nokri Link 2026 – महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमधील रिक्त पदांसाठी तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maha sarkari Nokri Link For 16 Thousand Vacancies Apply Online Link Started ) राबविण्यात येणाऱ्या ‘गट-क’ (Group C) संयुक्त सेवा भरती प्रक्रियेमध्ये रिक्त पदांच्या संख्येत विक्रमी वाढ करण्यात आली असून, आता एकूण १६,७१७ पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC Job vacancies) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी आजपासून (१३ नोव्हेंबर) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण १६ हजार ७१७ पदांसाठी ही भरती होणार आहे. नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांसह यापूर्वी अर्ज केलेल्यांनाही नव्या संवर्गांचे पसंतीक्रम नोंदवता येणार आहेत. यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. तर मित्रानो ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी पात्र संवर्ग निवडून अर्ज भरावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. परीक्षा शुल्क ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन भरता येणार आहे. सुरुवातीला जाहीर झालेल्या जाहिराती नुसार ५ हजार ७०७ पदांमध्ये आणखी ११ हजार १० पदांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण पदसंख्या १६ हजार ७१७ झाली आहे. परीक्षा योजनेत २१ अतिरिक्त संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलतही देण्यात आली आहे. गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २४ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. मित्रांनो, हि नोकरी म्हणजे सरकारी नोकरीची एक मोठ्ठी सुवर्णसंधी आहे. या भरतीही पूर्ण जाहिराती आणि अर्जाची लिंक आम्ही खाली दिली आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत.

तसेच एक लखस्त थवे ज्या उमेदवारांनी यापूर्वीच MPSC च्या लिंक वरून अर्ज केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यांनी एसपीएससीच्या ऑनलाइन पोर्टलवरून आपली पात्रता तपासून पाहावी. त्यानंतर पात्र असलेल्या नव्या संवर्गांचे पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा. या प्रक्रियेसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, एकदा निवडलेले पर्याय नंतर बदलता येणार नाहीत, असे एमपीएससीने म्हटले आहे. या बदलांमुळे आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्या पदांसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसली, तरी नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी पात्रता तपासून पसंतीक्रम देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खालील लिंक वरून लॉगिन करून आपण हि प्रक्रिया करू शकता.
या वाढीव व मेगाभरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २७ नोव्हेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केला होता किंवा जे नवीन पात्र उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीमुळे नव्याने अर्ज करण्यास पात्र ठरले आहेत, त्यांना mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित तरुणांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर आपली ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे अचूक अपलोड करणे बंधनकारक असून, मुदतीनंतर आलेले किंवा अपूर्ण अर्ज सरळ फेटाळले जातील, असा इशाराही आयोगाने दिला आहे.
ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि निर्दोष पार पाडण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समितीच्या शिफारसींनुसार कडक पावले उचलली आहेत. परीक्षा काळात कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस्त तसेच सिग्नल जॅमर्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. तसेच, प्रश्नपत्रिकांची छपाई, साठवणूक आणि वाहतूक अत्यंत गोपनीय व कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पाडण्याचे नियोजन सुरू आहे. सुधारित वेळापत्रकानुसार या भरतीची संयुक्त पूर्व परीक्षा २४ जानेवारी २०२७ रोजी घेतली जाणार असून, विद्यार्थी आता जोमाने अभ्यास करू लागले आहेत. वाढलेल्या रिक्त जागा आणि शासनाकडून मिळालेली वयोमर्यादेतील सवलत यामुळे यंदाची ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, तरुणांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार तयारी करावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) जाहीर करण्यात आलेल्या सुधारित १६,७१७ रिक्त पदांच्या मेगाभरतीमध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक आणि ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी),वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-क,सहायक अधीक्षक, गट-क, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क, लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी), लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग विविध प्रशासकीय आणि तांत्रिक संवर्गातील पदांचा समावेश असून, या अंतर्गत उमेदवारांसाठी विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या भरतीमधील सर्वात प्रमुख पदांमध्ये लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) आणि कर सहायक (Tax Assistant) यांचा समावेश आहे, ज्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असण्यासोबतच संबंधित मराठी व इंग्रजी टंकलेखनाचा वेग असणे आवश्यक आहे. हे दोन्ही संवर्ग राज्य शासनाच्या विविध मंत्रालयीन विभागांमध्ये आणि राज्य कर निरीक्षक कार्यालयांमध्ये महत्त्वाची प्रशासनिक जबाबदारी सांभाळतात, ज्यामुळे येथे अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या नेहमीच सर्वाधिक असते.
तांत्रिक आणि विशेष विभागांमधील रिक्त जागांचा विचार करता, या भरतीत उद्योग निरीक्षक (Industry Inspector) आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) यांसारख्या तांत्रिक पदांना मोठे स्थान देण्यात आले आहे. उद्योग निरीक्षक पदासाठी अभियांत्रिकी पदवी, तंत्रज्ञान पदविका किंवा विज्ञान शाखेची पदवी अनिवार्य आहे, तर सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी दहावी उत्तीर्ण असण्यासह ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमा असणे आवश्यक ठरते. या पदांमुळे तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या सुशिक्षित तरुणांना शासकीय सेवेत थेट योगदान देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, राज्यभरातून या पदांसाठी विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.
याशिवाय, विविध विभागांच्या गरजेनुसार तांत्रिक सहायक (Technical Assistant), ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी, तसेच सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांसारख्या महत्त्वाच्या पदांचाही या सुधारित पदनिहाय आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदासाठी मत्स्यविज्ञान विषयातील पदवी (किमान द्वितीय श्रेणी) बंधनकारक करण्यात आली आहे, तर इतर पदांसाठीही संबंधित शाखेतील शैक्षणिक अर्हता मागविण्यात आली आहे. MPSC च्या या सर्वसमावेशक पदरचनेमुळे विविध क्षेत्रांत शिक्षण घेतलेल्या राज्यातील प्रत्येक घटकातील उमेदवाराला आपल्या योग्यतेनुसार अर्ज करण्याची आणि सरकारी नोकरी मिळवण्याची समान संधी प्राप्त झाली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















