खुशखबर – 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती

Tata Consultancy Services Vacancies

Tata Consultancy Services Vacancies  : भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) पुढील वर्षापर्यंत ब्रिटनमध्ये 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने बुधवारी सांगितले. ब्रिटनचे व्यापारमंत्री लिझ ट्रस आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन (TCS CEO Rajesh Gopinathan) यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

या बैठकीत दोन्ही पक्षांनी टीसीएसच्या ब्रिटन अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीबरोबरच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, विविध प्रकारची गुंतवणूक, कौशल्य आदींबाबत महत्वपूर्ण चर्चा केली. दरम्यान, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटनच्या काही मोठ्या कॉर्पोरेट्सच्या वाढत्या प्रवाहात सहभाग घेऊन आणि नवीन पुढाकार, तसेच विविध सेवांसाठी मदतनीस म्हणून ब्रिटनची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठेवण्यात टीसीएस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

ब्रिटनमधील टीसीएस कामगारांमध्ये 54 देशांचे लोक आहेत, त्यातील 28 टक्के महिला कर्मचारी आहेत. दरम्यान, या आर्थिक वर्ष 2020 च्या अखेरीस कंपनीचे ब्रिटन मार्केटमधून 2.7 अब्ज इतके उत्पन्न घेण्यात आले होते, त्यामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर ठळक ठरण्यात टीसीएसचा मोठा वाटा असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोर्स : सकाळ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड