RTE २५ टक्के प्रवेशाची ऑनलाइन सोडत जाहीर; शनिवारपासून पालकांना मिळणार प्रवेशाचा संदेश- RTE Admission Alternative Link – RTE Admission 2025 @ student.maharashtra.gov.in

RTE Admission 2025 @ student.maharashtra.gov.in

RTE Admission 2025 @ student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आलेल्या अर्जाची ऑनलाइन सोडत (लॉटरी) सोमवारी विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. राज्यातील आठ हजार ८६३ शाळांमधील एकूण एक लाख नऊ हजार १११ जागांसाठी तीन लाख पाच हजार १५९ बालकांचे अर्ज आले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन सोडत जाहीर झाली असली तरीही पालकांना प्रवेशाच्या निवड यादीसाठी शनिवारपर्यंत (ता.१५) वाट पहावी लागणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ (आरटीई) नुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) सभागृहात नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत चिठ्ठ्या काढून ही सोडत काढण्यात आली.

 

यावेळी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, शिक्षण संचालक (योजना) महेश पालकर, ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात चिठ्ठ्या उचलल्यानंतर प्रत्यक्ष ऑनलाइन सोडत प्रक्रियेस सुरवात करण्यात येते.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या उचलून काढलेल्या नंबरच्या सहाय्याने काही गुणसूत्र वापरून राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रामार्फत (नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर-एनआयसी) सोडत काढली जाते. त्यासाठी तीन-चार दिवसांचा अवधी लागतो. साधारणत: शुक्रवार (ता. १४) ते शनिवार (ता.१५) पर्यंत एनआयसीमार्फत ऑनलाइन सोडतीचे तांत्रिक काम पूर्ण होईल. त्यानंतर येत्या शनिवारपासून (ता.१५) निवड यादीत असलेल्या बालकांच्या पालकांना प्रवेशाबाबतचे संदेश अर्जात नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे गोसावी यांनी सांगितले.

‘आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रियाही पूर्णपणे पारदर्शकच होत आहे. त्यामुळे, पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. आरटीई २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देतो, असे कोणी एजंट सांगत असल्यास, त्याची तक्रार त्वरित संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे करा. त्यांच्या कठोर कारवाई करण्यात येईल. आरटीई प्रवेश प्रवेश नाकारणाऱ्या शाळांविरोधातही पालकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात. आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीत गेल्यानंतर शाळांकडून थेट ट्रान्स्फर सर्टिफिकेट’ (टीसी) दिले जात असल्यास, अशा पालकांनीही तक्रार नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा. शिक्षण विभागातर्फे निश्चितच पालकांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल.’’

 

 

राज्यात आरटीई अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमधील २५% मोफत प्रवेशासाठी होणाऱ्या प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबाबत बालहक्क आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हजारो जागा रिक्त राहून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बालहक्क आयोगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाला दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांनी शिक्षण विभाग व बालहक्क आयोगाला या संदर्भात मागणी करत अॅड. विक्रम माने यांच्या मार्फत नोटीस पाठवली होती. जर प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही आणि पूर्वीप्रमाणे हजारो जागा रिक्त राहिल्या, तर अनेक गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहावे लागेल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

या तक्रारींची दखल घेत बालहक्क आयोगाने प्राथमिक शिक्षण संचालकांना पत्र पाठवून २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया मे २०२५ पर्यंत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी १ लाख ९ हजार जागांसाठी तब्बल ३ लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले असून, यासंदर्भातील सोडत सोमवारी जाहीर होणार आहे. ही सोडत वेळेत पूर्ण करून प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर संपवावी, अशी मागणी विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाने केली आहे.

गतवर्षी तब्बल ११ हजार ८२१ जागा राहिल्या रिक्त
सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात पार पडलेली प्रवेशाची प्रक्रिया ही सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या शाळा सुरु झाल्यानंतर २ महिने उलटल्यावर ऑगस्ट २०२३ पर्यंत संपली. परिणामी राज्यातील खासगी शाळांत उपलब्ध असलेल्या ९४ हजार ७०० जागांपैकी ८२ हजार ८७९ एवढ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला व तब्बल ११ हजार ८२१ जागा रिकाम्या राहिल्या होत्या


 

RTE Admission 2025 @ student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेची सोडत पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. तसेच, १५ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होण्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, त्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश घेणे कठीण होते. मात्र, यंदा प्रक्रिया वेळेत सुरू होणार असल्याने जून-जुलैपर्यंत ती पूर्ण होईल आणि प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी वेळ मिळणार आहे.

आरटीईसाठी अपेक्षित अर्ज प्राप्त झाल्याने अर्ज भरण्याच्या मुदतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच, दुबार अर्जांची छाननी करून ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

 

 


 

RTE Admission 2025 @ student.maharashtra.gov.in

लहान मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा हक्क म्हणजेच ‘आरटीई’ राज्यात २०१०पासून लागू झाल्यानंतर त्यात वेळोवेळी अनेक बदल झाले. मात्र, या सर्व नियमांचा आढावा घेऊन त्यात बदल सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने ( education department maharashtra ) नव्या समितीची स्थापना केली आहे. ही समिती आतापर्यंतच्या सर्व नियमांचा अभ्यास करून नव्या शिफारसी करणार आहे; तसेच ज्या शाळांच्या शुल्क प्रतिपूर्तीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांचाही पाठपुरावा समिती करील.

 

राज्य सरकारने २०१३ मध्ये नवे नियम आणून इयत्ता पहिली किंवा शाळेत प्रवेशासाठी ‘आरटीई’अंतर्गत ( rte admission 2025-26 maharashtra ) २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा नियम केला. त्याशिवाय शाळांना वेळोवेळी काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. या २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया पार पाडताना अनेक अडचणी येत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. या २५ टक्के प्रवेशापोटी शाळांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीची प्रकरणेही प्रलंबित आहेत. त्या प्रकरणांविरोधात अनेक शाळा चालकांनी न्यायालयात धाव घेतली असून, अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. ‘आरटीई’शी निगडित ( Maharashtra RTE Admission 2025-26 ) अनेक बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज लक्षात घेऊन आता समिती नेमली आहे.

या समितीने पुढील दोन महिन्यांमध्ये आतापर्यंत आरटीईबाबत आलेल्या सर्व नियमांचा आणि निर्णयांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे; तसेच न्याप्रविष्ट असलेल्या प्रकरणांची माहिती घेणे अपेक्षित आहे. त्यानंतर दोन महिन्यांत ही समिती शिफारशी सादर करील. शिफारसी सादर केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.

 


शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत २ लाख ५२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येतो. आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. यंदा राज्यभरातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये प्रवेशासाठी १ लाख ९ हजार १११ जागा उपलब्ध झाल्या आहेत. या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी १४ ते २७ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्यापही अर्ज न भरलेल्या पालकांना संधी मिळण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, किंवा या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

ज्या पालकांना आपल्या पाल्याच्या पहिलीतील प्रवेशासाठी ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाइन अर्ज करायचे आहेत, त्यांना २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व अर्जाची छाननी करून प्रवेशासाठी लॉटरी प्रक्रियेने विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांना संबंधित शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यापूर्वी पडताळणी समितीमार्फत अर्ज व प्रमाणपत्रांची पडताळणी करून घावी लागणार आहे.

 


आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शाळा नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी नोंदणी सुरू होत असून, सोमवार (दि. 14) पासून नोंदणीस प्रारंभ होणार आहे. राज्यातील ८ हजार ६२४, तर नाशिक जिल्ह्यातील ४०५ खासगी शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंद केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना १ लाख ५ हजारवर जागा उपलब्ध होणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशपात्र शाळांची पडताळणी १८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली, शाळा नोंदणीसाठी शाळांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत ४ जानेवारीपर्यंत वाढविली होती. जिल्ह्यात एकूण ४०५ शाळा असून, त्यामध्ये २५ टक्के याप्रमाणे ५ हजार २९६ जागा राखीव आहेत. यापुढील टप्प्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले जाणार आहेत. त्यानंतर लॉटरी काढून प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (चौकट) प्रवेशयोग्य मुलाच्या आई-वडिलांचे शासकीय ओळखपत्र (जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्माचा दाखला किंवा पासपोर्ट), विद्यार्थ्यांचे ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बेघर मुले किंवा प्रवासी कामगारांच्या मुलांच्या प्रवेशासाठी एक प्रतिज्ञापत्र, मुलाचा पासपोर्ट साइज फोटो, बालक अनाथ असेल, तर माता-पिता दोघांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

 

आरटीईचा ऑनलाईन अर्ज कसा भराल ?

शाळेची यादी माहिती झाल्यानंतर पालकांना आपल्या मुलांचे अर्ज भरण्यासाठी rte25admission.maharashtra.gov.in वर जावे लागेल. आरटीई २५ टक्के आरक्षणाच्या खाली शाळेच्या यादीवर क्लिक करा. आता तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा त्यानंतर ब्लॉकमधील शाळेच्या यादीवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर शाळेची यादी व प्रवेश अर्ज तुमच्या कॉम्प्युटर स्क्रिनवर दिसू लागेल. अर्जामध्ये मुलाचे संपूर्ण नाव, ठिकाणाचे नाव, लिंग व अन्य माहिती अचूक भरवी. अर्ज भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे.

 

परिसरात आरटीईअंतर्गत शाळा असल्यास संबंधित शाळेतून आरटीई अर्ज घ्यावा. एका मुलासाठी एकाच शाळेत आरटीई फॉर्म भरू शकतात. तसेच ऑनलाइनही फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यावी. त्यानंतर प्रिंट कॉपी आवश्यक कागदपत्रे जोडून शाळेत जमा करावी.

✅2024 RTE प्रवेशासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्र – RTE Admission 2024 Documents list

आरटीई फॉर्म ऑनलाइनही भरू शकतात. यासाठी शाळेची यादी माहीत झाल्यानंतर उमेदवारांना अधिकृत वेबसाइट rte25admission.maharashtra.gov.in वर जावे लागेल. होमपेजवर अधिसूचना आरटीई २५ टक्के आरक्षणच्या खाली शाळेच्या यादीवर क्लिक करावे. आता तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडावे त्यानंतर ब्लॉकमधील शाळेच्या यादीवर क्लिक करावे. त्यावर क्लिक केल्यानंतर शाळेची यादी व प्रवेश फॉर्म तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसू लागेल, हा फॉर्म राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर एका निर्धारित कालावधीमध्ये उपलब्ध असतो. हा फॉर्म दरवर्षी मर्यादित कालावधीसाठी वेबसाइटवर उपलब्ध असतो. मुदत संपल्यानंतर हा फॉर्म संकेतस्थळावर उपलब्ध नसतो. फॉर्ममध्ये मुलाचे संपूर्ण नाव, ठिकाणाचे नाव, लिंग व अन्य माहिती अचूक भरावी. फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करावा.

 

RTE ऑनलाईन अर्ज प्रणाली २०२५ लिंक  

 


शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांच्या प्रवेशासाठी नोंदणी (रजिस्ट्रेशन) केली जाणार आहे. यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होणार असल्यामुळे अपेक्षा आहे की इतर मुलांसोबत आरटीई अंतर्गत प्रवेश घेणारे विद्यार्थीही वेळेत शिक्षण सुरू करू शकतील. कारण सीबीएसई बोर्डासह अनेक खाजगी शाळा प्रवेश प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारीतच पूर्ण करतात, तर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत चालू राहते. उशिरा होणाऱ्या प्रवेशाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. यामुळे यावेळी 18 डिसेंबरलाच शाळांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आरटीई प्रवेशासाठी अधिक जागा उपलब्ध आहेत, मात्र शाळांची संख्या कमी झाली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत राज्यातील 8,732 शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी 1 लाख 7 हजार 104 जागा उपलब्ध आहेत, तर मागील वर्षी 9,217 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 238 जागा उपलब्ध होत्या. असे सांगितले जाते की आरटीई प्रवेश टाळण्यासाठी अनेक शाळा अल्पसंख्याक दर्जा मिळवत आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या १३ जानेवारीपासून विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी दिली जाणार आहे. ९ हजार शाळांनी आतापर्यंत नोंदणी केल्याने एक लाखांहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आणि नोंदणीसाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे ४ जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली होती. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू.  धन्यवाद !

 

 

RTE Admission 2025: खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी राबवली जाणारी आरटीई प्रवेशप्रक्रिया यावर्षी १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीसह सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी जानेवारी महिन्यात सुरू होईल, तर प्रवेशासाठीची लॉटरी मार्च महिन्यात काढली जाईल. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यात संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल, ज्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग वेळेत सुरू करता येणार आहेत.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटक आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठीची आरटीई प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात राबवली जाते. यावर्षीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्राद्वारे कळविले की, १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीस सुरुवात होईल आणि जून-जुलै महिन्यापर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाईल.

डिसेंबर महिन्यात सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू होत असताना, आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या मुहूर्ताला मात्र विलंब होत होता. मात्र यंदा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रिया डिसेंबर महिन्यातच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १५ डिसेंबर रोजीच पूर्वतयारी कार्यशाळा घेण्यात येणार आहे, जी पूर्वी १५ जानेवारीला नियोजित होती. विशेष म्हणजे, अंतिम प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्याची अंतिम तारीख १० एप्रिलऐवजी १० मार्च करण्यात आली आहे.

२०२४-२५ शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रिया अनेक कारणांमुळे लांबली होती. आधी चुकीच्या निर्णयांमुळे, नंतर न्यायालयीन प्रकरणांमुळे आणि पुनप्रक्रियेमुळे वेळेत प्रवेश न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शाळांनाही २५ टक्के जागांवर प्रवेश देण्याचा ताण सहन करावा लागला, आणि पालकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यंदा तरी प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती.

गेल्या वर्षाचा अनुभव:
अमरावती जिल्ह्यातील २३२ शाळा आरटीई प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या होत्या. या शाळांमध्ये २३९६ जागांसाठी ६६२६ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २३०० विद्यार्थ्यांची सोडत निघाली, मात्र फक्त १५१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. अनेक जागा रिक्त राहिल्या. यंदा मात्र प्रक्रिया एक महिना आधी सुरू होणार असल्याने उर्वरित जागांवरील प्रवेशही व्यवस्थित होण्याची शक्यता आहे. यासाठी शिक्षण विभागाने शाळांना नोंदणीसाठी आवाहन केले आहे.


शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नसून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नसून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.

 

सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती- मात्र प्रवेशाचा टक्का कमी असल्याने आधी ५ ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत ५९ हजार ११२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यामुळे जवळपास ४५ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. याबाबत माहिती देताना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, आरटीईच्या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. रिक्त जागांचा आढावा घेऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून येत्या दोन ते तीन दिवसांत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील.

 


 

 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेतील ५० हजारांहून अधिक जागा अजूनही रिक्त असून प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी ८ ऑगस्टपर्यंत संधी मिळाली आहे.

यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज दाखल झाले होते त्यातन ९३ हजार ९ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. सुरुवातीला शिक्षण विभागाने या प्रवेशासाठी २३ ते ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत ३९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यानंतर ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ५३ हजार २०० पर्यंत पोहोचली आहे

 


RTE अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन लॉटरीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या ९३ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्रे पडताळणी पूर्ण केली असून शाळांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. प्रवेश घेण्यासाठी आज सोमवारी (दि.५ ऑगस्ट) शेवटची संधी असून त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद!

राज्यात आरटीई अंतर्गत ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ रिक्त जागांसाठी २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज प्राप्त झाले होते. २० जुलै रोजी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या ९३ हजार ९ विद्यार्थ्यांची यादी आरटीई पोर्टलवर  २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ रिक्त जागांसाठी २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज प्राप्त झाले होते. २० जुलै रोजी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या ९३ हजार ९ विद्यार्थ्यांची यादी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर दि. २३ जुलैपासून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेश निश्चित करण्यास सुरुवात झाली. राज्यातील अनेक जिल्ह्यांत दि.२५ आणि २६ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून प्रवेश घेण्यासाठी मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. प्रतीक्षा यादीतील ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात येणार आहे.


 

त्यामुळे बालकांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पालकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ही शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण णि विभागातर्फे दरवर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत शुक्रवारी काढण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
राज्यातील नऊ हजार २१७ शाळांमधील एक लाख पाच हजार ३९९ जागांवरील प्रवेशासाठी दोन लाख ४२ हजार ९९७ अर्ज आले आहेत. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बालकांच्या पालकांची उत्सुकता आता संपणार आहे. ऑनलाइन सोडत जाहीर झाल्यानंतर प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रवेशाबाबत मेसेज पाठविण्यात येईल. तसेच आरटीई पोर्टलवरही बालकांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसू शकणार आहे

अधिक माहितीसाठी: https://student.maharashtra.gov. in/adm_portal/Users/rte_index_new

RTE Admission Process 2024

आरटीई कायद्यातील जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाइन माध्यमातून प्रवेश अर्ज करण्यास पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दि. २९ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आरटीई पोर्टलवर दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून, अर्ज करण्यासाठी आता शेवटच्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. 

आठवडाभरात आरटीईचे दी लाख अर्ज प्राप्त राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त जागांवर दि. १७ मे पासून ऑनलाइन प्रवेश अर्जास सुरुवात झाली. गत एक आठवड्यात १ लाख ५६ हजारपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.

आरटीईच्या जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त २५ टक्के जागांची माहिती आरटीई पोर्टलवर अद्ययावत करीत पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होताच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. शुक्रवार दि. २४ मे रोजी रात्री आठ वाजेपर्यंत १ लाख ५६ हजार ५५० अर्ज प्राप्त झाले होते. तर पुणे जिल्ह्यांत १७ हजार ५९६ रिक्त जागांसाठी सर्वाधिक रिक्त जागांच्या दुप्पट ३३ हजार अर्ज आले होते. पालकांना येत्या ३१ मे पर्यंत https://student.maharashtra.g ov.in/adm_portal संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.

राज्यातील ९ हजार १९७ शाळांमध्ये १ लाख ४ हजार ७३५ जागा रिक्त आहेत. त्यासाठी पहिल्या आठ दिवसातच दीड लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. पुढील एक आठवड्याच्या कालावधीत सरासरी तेवढेच अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर नियमाप्रमाणे यंदाही लॉटरी पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड करावी लागणार आहे.

  • राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. शिक्षण विभागाने आरटीईच्या जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त २५ टक्के जागांची माहिती आरटीई पोर्टलवर अद्ययावत केली आणि दि. १७ मेपासून नव्याने ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली.
  • पहिल्या चार दिवसांतच प्रवेश अर्जानी एक लाखांचा टप्पा गाठला होता. एक आठवड्यानंतर दि. २४ मेपर्यंत दीड लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर दि. २९ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अर्जांची संख्या २ लाख १ हजार ३८३ एवढी झाली होती.
  • राज्यातील ९ हजार १९७ शाळांमध्ये १ लाख ४ हजार ७३५ जागा रिक्त आहेत. पालकांना येत्या ३१ मेपर्यंत https://student.maharashtra.g ov.in/adm_portal संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची शक्यता? – राज्य शासनाने केलेल्या आरटीईतील बदलामुळे पालकांना दोन वेळा प्रवेश अर्ज करण्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. जुन्या नियमानुसार अर्ज करण्यास येत्या ३१ मेपर्यंत मुदत दिली असून, शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत… पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आणखी काही दिवस मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
  • या जिल्ह्यांत सर्वाधिक अर्ज
    • जिल्हा | रिक्त जागा | प्राप्त अर्ज (दि. २९ मेपर्यंत)
    • पुणे – १७ हजार ५९६ – ४१ हजार १५०
    • नागपूर – ६ हजार ९२० – १७ हजार ८१९ ११ हजार ३७७ १६ हजार ४९४ ४ हजार ४५१ १२ हजार ३८० ५ हजार २७१ १२ हजार १६४
    • ठाणे – ११ हजार ३७७ – १६ हजार ४९४
    • छत्रपती संभाजीनगर – ४ हजार ४५१ – १२ हजार ३८०
    • नाशिक – ५ हजार २७१ – १२ हजार १६४

???? अर्ज करा

 

image not found RTE २५% ऍडमिशन साठी पालकांकरीता सूचना: Click Here to download

पालकांकरीता सूचना (2024-2025)

1)  आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2024-2025  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

3)  आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.

4) १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

5) अर्ज भरत असताना  आवश्यक कागदपत्र   पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे  २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे  दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज  लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

8)  अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला  मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

11) RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/04/2024 पर्यंत राहील.

12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

13) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

14) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

16) जर तुम्हाला १ किमी च्या अंतरावर अनुदानित/सरकारी शाळा उपलब्ध असल्यास तुम्हास Self Finanace school सिलेक्शन साठी उपलब्ध नसेल व Self Finanace school not available असा मेसेज दिसेल.

 

image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित [email protected] OR [email protected] वर इमेल पाठवावा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

13 Comments
  1. Dheeraj Nai says

    How can I take my child admission in cbsc board mighaghar school Mulund East

  2. Dheeraj Nai says

    मी माझ्या मुलाचे प्रवेश सीबीएसई बोर्ड मधे कसा घेउ कृपया मला मदत करा मुळी चा वय ३ वर्षे ८ महिने झाल आहे

  3. MahaBharti says

    RTE New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड