Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

RTE प्रवेश आजपासून तिढा सुटला; मंगळवारपासून कागदपत्र पडताळणी! – RTE Admission Alternative Link – RTE Admission 2024 @ student.maharashtra.gov.in

RTE Admission 2024 @ student.maharashtra.gov.in

RTE Admission 2024

आरटीई मोफत प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटला आहे. सोडतीची निवड यादी जाहीर केल्यानंतर सोमवार २२ जुलैपासून पालकांना प्रवेशासाठीचे एसएमएस पाठविण्यात येणार असून मंगळवार कागदपत्र पडताळणी, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या ४ हजार २४२ विद्यार्थ्यांसाठीची प्रक्रिया होणार आहे. आरटीई कायद्याअंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५७४ शाळांमध्ये आरटीईच्या ४ हजार ४५१ जागा राखीव आहेत. त्यासाठी एकूण १५ हजार १०३ अर्ज आले. या जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. मात्र, त्याचा निकाल जाहीर झालेला नाही. न्यायायलाच्या निर्णयानंतर आता ही प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

७ जून रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतीक्षायादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर सोमवारपासून एसएमएस जाण्यास सुरुवात होणार आहे. प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त पालकांनी २३ जुलै ते ३१ जुलैपर्यंत संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून पडताळणी समितीमार्फत बालकांचा प्रवेश निश्चित करून घ्यावा. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर पडताळणी केंद्राची तपासणी करून पडताळणी केंद्र अपडेट करण्यावी यावी, पालकांना अडचण येणार नाही याची दक्षता घ्या, असे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश शिक्षण संचालकांनी निर्देश दिले आहेत. यासह पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती व बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी, असे आवाहनही संचालकांनी केले आहे.

 


 

आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत अद्याप संभ्रमावस्था कायम आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे यंदा मुलांना आरटीई प्रक्रिया कधी सुरू होणार? मुलांना प्रवेश कधी मिळणार? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गुरुवारी उच्च न्यायालयात आरटीईबाबत सुनावणी झाली. पंरतु, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के गरजू मुलांना मोफत प्रवेश देण्यात येतो. यंदा राज्य शासनाने आरटीई प्रक्रियेत बदल केले होते. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने आरटीईच्या जुन्या नियमाप्रमाणे आरटीई प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, या याचिकेवर ११ जुलै रोजी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने आरटीईबाबत निकाल जाहीर केला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसलेल्या पालकांचा भ्रमनिरास झाला. प्रवेशासाठी अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न पालकांना सतावत आहे. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

 

१५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरवात झाली आहे. शाळा सुरू होऊन एक महिना झाला, तरी आरटीई प्रवेशप्रक्रिया रखडलेलीच आहे. खासगी शाळांमधील प्रवेशप्रक्रियेबद्दल प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पालकांमध्ये चिंता आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने शिक्षण हक्कविरोधी ठरवीत स्थगिती दिली आहे. त्यात आता खासगी शाळांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे सुनावणीला वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा आरटीई प्रक्रिया कधी सुरू होईल, याबाबत अस्पष्टता आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आरटीईच्या एकूण ५७४ शाळा असून, ४ हजार ४५१ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातून जवळपास २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने पूर्वीच्या नियमावलीप्रमाणे आरटीईची प्रवेशप्रक्रिया सुरू केली होती. परंतु, आता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

 


 

✅2024 RTE प्रवेशासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्र – RTE Admission 2024 Documents list

त्यामुळे बालकांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पालकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ही शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण णि विभागातर्फे दरवर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत शुक्रवारी काढण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
राज्यातील नऊ हजार २१७ शाळांमधील एक लाख पाच हजार ३९९ जागांवरील प्रवेशासाठी दोन लाख ४२ हजार ९९७ अर्ज आले आहेत. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बालकांच्या पालकांची उत्सुकता आता संपणार आहे. ऑनलाइन सोडत जाहीर झाल्यानंतर प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रवेशाबाबत मेसेज पाठविण्यात येईल. तसेच आरटीई पोर्टलवरही बालकांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसू शकणार आहे

अधिक माहितीसाठी: https://student.maharashtra.gov. in/adm_portal/Users/rte_index_new

RTE Admission Process 2024

आरटीई कायद्यातील जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाइन माध्यमातून प्रवेश अर्ज करण्यास पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दि. २९ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आरटीई पोर्टलवर दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून, अर्ज करण्यासाठी आता शेवटच्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. 

आठवडाभरात आरटीईचे दी लाख अर्ज प्राप्त राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त जागांवर दि. १७ मे पासून ऑनलाइन प्रवेश अर्जास सुरुवात झाली. गत एक आठवड्यात १ लाख ५६ हजारपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.

आरटीईच्या जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त २५ टक्के जागांची माहिती आरटीई पोर्टलवर अद्ययावत करीत पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होताच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. शुक्रवार दि. २४ मे रोजी रात्री आठ वाजेपर्यंत १ लाख ५६ हजार ५५० अर्ज प्राप्त झाले होते. तर पुणे जिल्ह्यांत १७ हजार ५९६ रिक्त जागांसाठी सर्वाधिक रिक्त जागांच्या दुप्पट ३३ हजार अर्ज आले होते. पालकांना येत्या ३१ मे पर्यंत https://student.maharashtra.g ov.in/adm_portal संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.

राज्यातील ९ हजार १९७ शाळांमध्ये १ लाख ४ हजार ७३५ जागा रिक्त आहेत. त्यासाठी पहिल्या आठ दिवसातच दीड लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. पुढील एक आठवड्याच्या कालावधीत सरासरी तेवढेच अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर नियमाप्रमाणे यंदाही लॉटरी पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड करावी लागणार आहे.

  • राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. शिक्षण विभागाने आरटीईच्या जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त २५ टक्के जागांची माहिती आरटीई पोर्टलवर अद्ययावत केली आणि दि. १७ मेपासून नव्याने ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली.
  • पहिल्या चार दिवसांतच प्रवेश अर्जानी एक लाखांचा टप्पा गाठला होता. एक आठवड्यानंतर दि. २४ मेपर्यंत दीड लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर दि. २९ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अर्जांची संख्या २ लाख १ हजार ३८३ एवढी झाली होती.
  • राज्यातील ९ हजार १९७ शाळांमध्ये १ लाख ४ हजार ७३५ जागा रिक्त आहेत. पालकांना येत्या ३१ मेपर्यंत https://student.maharashtra.g ov.in/adm_portal संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची शक्यता? – राज्य शासनाने केलेल्या आरटीईतील बदलामुळे पालकांना दोन वेळा प्रवेश अर्ज करण्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. जुन्या नियमानुसार अर्ज करण्यास येत्या ३१ मेपर्यंत मुदत दिली असून, शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत… पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आणखी काही दिवस मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
  • या जिल्ह्यांत सर्वाधिक अर्ज
    • जिल्हा | रिक्त जागा | प्राप्त अर्ज (दि. २९ मेपर्यंत)
    • पुणे – १७ हजार ५९६ – ४१ हजार १५०
    • नागपूर – ६ हजार ९२० – १७ हजार ८१९ ११ हजार ३७७ १६ हजार ४९४ ४ हजार ४५१ १२ हजार ३८० ५ हजार २७१ १२ हजार १६४
    • ठाणे – ११ हजार ३७७ – १६ हजार ४९४
    • छत्रपती संभाजीनगर – ४ हजार ४५१ – १२ हजार ३८०
    • नाशिक – ५ हजार २७१ – १२ हजार १६४

📝 अर्ज करा


RTE Admission New Rule 2024

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सुधारित ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला १७ मेपासून सुरुवात झाली असून, ३१ मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

यापूर्वी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पालिका शिक्षण विभागाने केले आहे. यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असला तरी त्याचा या प्रवेशप्रक्रियेत विचार केला जाणार नाही. त्यामुळे नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे .पालकांनी http:// student.maharashtra. gov.in/adm_portal या संकेतस्थळावरून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. आर्थिक वर्षामध्ये ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, ते आरटीई प्रवेशासाठी पात्र आहेत. प्रवेशप्रक्रियेकरिता १० शाळांची निवड करावी लागणार आहे.

‘अर्जप्रक्रिया सुरू – अंतिम मुदतवाढ जाहीर’ :

मुंबईतील ३१९ पात्र शाळांत ‘आरटीई’ च्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पाच हजार ६७० जागा उपलब्ध आहेत. यापूर्वी २०२४-२०२५ या वर्षाकरिता ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेशप्रक्रियेसाठी पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असला, तरी बालकांच्या पालकांनी नव्याने प्रवेश अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जाचा २०२४-२५ या वर्षाच्या सुधारित आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. प्रवेशप्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली आहे.. अर्ज ३१ मे पूर्वी करा.

 

आवश्यक कागदपत्रे
निवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, जातीचा दाखला, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे, एचआयव्हीबाधित असल्यास आवश्यक कागदपत्रे, घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे, न्यायप्रविष्ठ असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला, विधवा महिला असल्याची आवश्यक कागदपत्रे.
मुदतीत अर्ज करा अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर
लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील. तसेच रिक्त जागा राहिल्या असतील तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा संदेश पाठवला जाईल. यानंतरही जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा संदेश पाठवला जाईल. कागदपत्रे तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवरील सूचनांचे पालन करावे. मुदतीनंतर जागा रिक्त असेल तरीही कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही.

RTE Admission 2024 

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशप्रक्रिया जुन्या पद्धतीने घेण्याचे निश्चित झाल्यानंतर नवी नियमावली अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया रखडण्याची दाट शक्यता आहे. राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतरही प्राथमिक शिक्षण विभागाला सूचना प्रसिद्ध करता आल्या नाहीत. दरम्यान, RTE प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद!

उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर आरटीई प्रवेशप्रक्रिया रद्द करण्यात आली. जुन्या पद्धतीनुसारच प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. परंतु याबाबत सूचना जाहीर होत नसल्याने प्रवेशप्रक्रियेची पालकांकडून प्रतीक्षा केली जात आहे. आठवडाभरात शिक्षण विभागाला नवीन सूचना प्रसिद्ध करता आल्या नाहीत. यापूर्वी आरटीईच्या कायद्यात बदल करत शासनाने प्रवेशप्रक्रिया सुरू केली होती. साधारणपणे महिनाभर ऑनलाइन पद्धतीने अर्जनोंदणी सुरू होती. मात्र अर्जनोंदणीला पालकांनी प्रतिसाद दिला नाही.

संकेतस्थळावर खासगी शाळांचा पर्याय दिसत नसल्याने पालकांनी प्रवेशप्रक्रियेकडे पाठ फिरवली. तसेच काही शिक्षण संघटनांनी आरटीईतील बदलाविरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कायद्यातील बदलास स्थगिती दिली. त्यामुळे आता नव्याने प्रवेशप्रक्रिया राबवावी लागणार आहे. तसेच राज्यभरातून जवळपास ७० हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जाचे काय करायचे याचा निर्णय शिक्षण विभागाला घ्यावा लागणार आहे.

 


 

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्वीच्या नियमानुसार ये राबवण्यासाठी आवश्यक ते बदल RTE पोर्टलमध्ये करण्यात येत आहेत. तसेच जनहित, याचिकेवरील आदेश विचारात डी घेऊन ६ मार्च २०१४ आणि ३ एप्रिल २०२४ रोजीचे परिपत्रक रद्द करून स्वयंअर्थसहाय्यीत न शाळा, पोलीस कल्याणकारी ना शाळा (विनाअनुदानित शाळा) आणि महानगरपालिका शाळा (स्वयंअर्थसहाय्यीत शाळा) , यांचा समावेश करून आरटीई न प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी नव्याने परिपत्रके निर्गमित करावे, मे असे निर्देश राज्य शासनाचे कक्ष अधिकारी रामदास धुमाळ यांनी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांना दिले आहेत.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षण जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्याबाबत राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाला परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागातर्फे पूर्वी वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग स्तरावर कमीत कमी २५ टक्के प्रवेश करण्याची पद्धत होती. 

 

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळांना वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यानंतर सुधारित परिपत्रक काढण्यात येईल, अशी ग्वाही राज्य शासनाने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे आता खासगी विनाअनुदानित शाळांसह स्वयं-अर्थसाहाय्यित महापालिका आणि विनाअनुदानित पोलीस कल्याण शाळांमध्येही पंचवीस टक्के जागा वंचित घटकांसाठी राखीव ठेवल्या जातील. मात्र त्यासाठी संपूर्ण नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवण्याची वेळ शिक्षण विभागावर  येणार आहे.

कोणताही नियम किंवा बदल हा मूळ कायद्याच्या अधीन असणेच अनिवार्य आहे, असे स्पष्ट करून आरटीईअंतर्गत राखीव आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळा वगळण्याच्या निर्णयाला न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर सुधारित परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाला दिली. विधायक भारती या संस्थेने केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी शासनाने ही बाब स्पष्ट केली. वास्तविक, अश्विनी कांबळे यांच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने आरटीईतील दुरुस्तीला स्थगिती दिली होती. सुधारित आरटीई कायद्याअंतर्गत ६ मार्च आणि ९ एप्रिल रोजी सरकारने काढलेल्या परिपत्रकांना विधायक भारतीने आव्हान दिले आहे. ६ मार्चच्या परिपत्रकानुसार काही शाळांना सुधारित कायद्यातील तरतुदींच्या आधारे नवीन प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत नोंदणी करण्यास सांगितले होते. तर ९ एप्रिलच्या परिपत्रकात, आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या आधारावर प्रवेश दिला जाईल, हे स्पष्ट करण्यात आले होते. यामुळे आरटीईमधून मुक्त असलेल्या शाळांचा नवीन वर्ग तयार होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

 


RTE Admission 2024 @ student.maharashtra.gov.in: शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) अंतर्गत महानगरपालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस १६ एप्रिलपासून सुरुवात झाली. त्याची मुदत मंगळवार, ३० एप्रिलपर्यंत होती. मात्र पालिकेने या प्रक्रियेस १० मेपर्यंत मुदतवाढ दिली असून पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !
आरटीईअंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार मुंबईतील १३८३ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांना राज्य शासनाच्या https:// student.maharashtra. gov.in/adm_portal या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील.
प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिली आहे. तसेच या प्रक्रियेसाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचेदेखील कंकाळ यांनी सांगितले.


How Many Applications Filed Under Rte 

RTE Admission 2024:  शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभागाकडून यंदा बदल करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवेशांसाठी उपलब्ध जागांच्या १० टक्केही नोंदणी झालेली नाही. नोंदणीसाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना प्रवेश दिला जातो. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांतील २५ टक्के जागा आरटीईसाठी राखीव होत्या. मात्र, यंदा या प्रवेश प्रक्रियेत बदल करून विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किंवा तीन किलोमीटर परिसरातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळांचा पर्याय उपलब्ध नसल्यास खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या बदलाला पालक संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.

आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यभरातील ७६ हजार ५३ शाळांमध्ये मिळून ८ लाख ८६ हजार ४११ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आतापर्यंत सुमारे ४७ हजार विद्यार्थ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीपर्यंत प्रवेशासाठी एक लाख जागांसाठी दुपटीपेक्षा जास्त नोंदणी होत होती. मात्र यंदा खासगी स्वयंअर्थसहाय्यित विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नसल्याने पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.


Changes In RTE Admission Rules – Know Here 

RTE Admission 2024 : महाराष्ट्र शासनाच्या बदललेल्या शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) नियमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत प्रवेशाची वाट कठीण झाली आहे. त्यामुळे, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या नव्या नियमांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

शिक्षण हक्क कार्यकर्ते वैभव कांबळे, वैभव एडके, राहुल शेंडे, अनिकेत कुत्तरमारे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, आरटीई अंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात.

शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.

याआधी हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांत खासगी शाळांत मुभा देणारे नियम तेथील सरकारने तयार केले. मात्र, तसे नियम हे उच्च न्यायालयाने रद्द केल्याचा दाखला न्यायालयाला देण्यात आला. २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांना मुभा देता येत नाही.

खासगी शाळांना वेळेत परतावा दिल्यास त्यांचा देखील विरोध होणार नाही. राज्य सरकारचे नवे नियम बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ विधिज्ञ जयना कोठारी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. दीपक चटप, ॲड. पायल गायकवाड, ॲड. ऋषिकेश भोयर यांनी सहकार्य केले.

…तर शासकीय शाळेत प्रवेश
आरटीई अंतर्गत उपलब्ध शाळा नसल्यास स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. नुकतेच आरटीईचे ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहे. या नियमांची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. नव्या नियमांमुळे श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा, अशी वर्गवारी तयार होईल, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे.


RTE Admission Form 2024 @student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यास दि. १६ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. यंदा पालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, गत सहा दिवसात केवळ २४ हजार ७८३ अर्ज आले आहेत. गतवर्षी पहिल्या चार दिवसांत राज्यातून तब्बल ९४ हजारांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले होते.

आरटीईअंतर्गत खासगी तसेच विनानुदानित शाळांमध्ये वंचित, आर्थिक दुर्बल तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो.

येत्या ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन माध्यमातून प्रवेश अर्ज करता येणार आहेत. राज्य शासनाने आरटीई कायद्यात बदल केला आहे. शाळांसह जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांनीही नोंदणी केली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणार नसल्याने पालकांकडून दुर्लक्ष केले जात आहे.


RTE Admission 2024: The much awaited RTE admission process started from Tuesday. At present, the process of filling applications from parents has started on the RTE portal. However, the portal still shows the academic year 2023-24, causing confusion among parents. Govt launched RTE portal, but forgot to correct academic year. According to the new rules, if there is no subsidized school, government school, local body school within a distance of one kilometer from the student’s home, then they will be admitted to a private school within one kilometer

बहुप्रतीक्षित आरटीई प्रवेश प्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात झाली. सध्या आरटीई पोर्टलवर पालकांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पोर्टलवर अजूनही शैक्षणिक वर्ष २०२३-२४ दाखवत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने आरटीई पोर्टल सुरू केले, मात्र शैक्षणिक वर्ष दुरुस्त करण्यास विसरले आहे. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमपर्यंतच्या अंतरादरम्यान अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल, तर एक किलोमीटरच्या अंतरावरील खासगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

या शाळांची निवड करताना शासकीय शाळा, अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व शेवटी खासगी शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. मागीलवर्षी राज्यभरातील ८ हजार ८२८ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९६९ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. दरवर्षी डिसेंबर-जानेवारीतच प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते. परंतु, यंदा तब्बल तीन महिने उशिराने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; तसेच यंदा राज्यातील ७५ हजार ९७४ शाळांमधील ९ लाख ७२ हजार ८२३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया आरटीई पोर्टलवर सुरू आहे. पोर्टलच्या स्टेटसबारमध्ये २०२४- २५ असे असायला हवे. मात्र, अजूनही २०२३-२४ वर्ष अशी नोंद दिसत आहे. शासनाच्या वेबसाइटवर अशी चक दिसन येत असल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

३० एप्रिलपर्यंत नोंदणी प्रक्रिया

आरटीईअंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्याथ्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू असून, ती ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे.
RTE Portal – शाळा नोंदणी प्रक्रिया
Detais. Address RTE Details vacancies Ferwerd to BEO

नोंदणीला पालकांचा थंड प्रतिसाद
आरटीई प्रवेशासाठी पालकांचा मोठा कल हा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असतो. पण, यावेळी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचाही आरटीई प्रवेश प्रक्रियेत समावेश झाला, असंख्य पालकांना जवळच्या भागातील इंग्रजीच्या खासगी शाळा आणि त्यांची नावे ऑनलाइन नोंदणीत मिळत नसत्याच्या तक्रारी पालक शिक्षण विभागाकडे करत आहेत. यंदा आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील २ हजार ८३६ शाळांमध्ये ३६ हजार १४३ जागा उपलब्ध असताना मागील दोन दिवसांपासून केवळ ६७० पालकांनी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. जागांसाठी पालकांचा ऑनलाइन नोंदणीला प्रतिसाद कमी मिळत असल्याने ही नोंदणी प्रक्रिया पुढील काही महिने सुरू ठेवावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
येत असल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

 

image not found RTE २५% ऍडमिशन साठी पालकांकरीता सूचना: Click Here to download

पालकांकरीता सूचना (2024-2025)

1)  आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2024-2025  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

3)  आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.

4) १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

5) अर्ज भरत असताना  आवश्यक कागदपत्र   पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे  २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे  दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज  लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

8)  अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला  मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

11) RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/04/2024 पर्यंत राहील.

12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

13) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

14) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

16) जर तुम्हाला १ किमी च्या अंतरावर अनुदानित/सरकारी शाळा उपलब्ध असल्यास तुम्हास Self Finanace school सिलेक्शन साठी उपलब्ध नसेल व Self Finanace school not available असा मेसेज दिसेल.

 

image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com OR educom-mah@mah.gov.in वर इमेल पाठवावा.


RTE Admission 2024

‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत महापालिका आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात झाली. यंदा आरटीईअंतर्गत मुंबईतील १,३८३ पात्र शाळांमध्ये २९ हजार १४ जागा उपलब्ध आहेत. यापूर्वी ही प्रक्रिया फक्त विनाअनुदानित खासगी शाळांसाठी लागू असायची. मात्र, या वर्षापासून महापालिकेच्या शाळांचाही समावेश केल्याने १ हजार शाळांची वाढ झाली असून, जवळपास २३ हजार जागांमध्ये वाढ झाली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. यंदा ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाइन प्रवेशाची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे. त्यापूर्वी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

या प्रवेशासाठी पालकांना महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. आरटीईअंतर्गत मुंबईतील एस. एस. सी. बोर्डाच्या १३१९ तर अन्य ६४ अशा मिळून १३८३ पात्र शाळांमध्ये २५ टक्के प्रवेशासाठी २९ हजार १४ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये एस. एस. सी. बोर्ड २७ हजार ८६९ तर अन्य ११४५ जागांचा समावेश आहे. यंदा वाढलेल्या जागांमुळे विद्यार्थ्यांना घरापासून १ किलोमीटरच्या आत असणाऱ्या शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे.

दुसऱ्यांदा प्रवेशास बंदी ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच आरटीई अंतर्गत प्रवेश घेतला आहे, अशांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. अर्ज भरताना चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द होईल, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी स्पष्ट केले आहे.


 

सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षासाठी बहुप्रतीक्षेतील शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रिया १६ एप्रिलपासून सुरू होत आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सोमवारी याबाबतचे आदेश पारित केले आहेत. सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमअंतर्गत आरटीईअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना १८ मार्चपर्यंत नोंदणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. अखेर राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने याबाबत सोमवारी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क अधिनियमानुसार ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १६ ते ३० एप्रिल या कालावधीत सुरू होणार आहेत. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

निवासी पुरावा : रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टैक्स, घरपट्टी, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांसाठी भाडेकरार दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा, जन्मतारखेचा पुरावा. जात प्रमाणपत्र, एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे दिव्यांग प्रमाणपत्र.

बालक वयोमर्यादा निश्चित

इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकांची वयोमर्यादा निश्चित केली आहे. यात ३१ डिसेंबर २०२४ रोजी किमान वय ६ वर्षे असावे. कमाल वय ७ वर्षे ५ महिने ३० दिवस असावे, असे स्पष्ट केले आहे.


RTE Admission Registration Process 

राज्य शासनाने आरटीई कायद्यात बदल केल्यानंतर एक महिन्याने आरटीई पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे आणि रिक्त जागा अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. मार्च महिन्यात त्यास वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात करण्याऐवजी शाळा नोंदणीस पुन्हा १२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन गंभीर आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

आरटीई पोर्टलवर ७ एप्रिल रोजी ७५ हजार ९५२ शाळांची नोंदणी झाली असून, तब्बल ९ लाख ७२ हजार ६९१ रिक्त जागा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून पोर्टलवर शाळा तसेच आरटीईअंतर्गत २५ टक्के रिक्त असलेली विद्यार्थी संख्या ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे, तरीही शिक्षण विभागाने पुन्हा एकदा शाळा नोंदणीस मुदतवाढ मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, आरटीई पोर्टलवर शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, आरटीईतील बदल आणि प्रवेश प्रक्रियेस होणाऱ्या विलंबाला विविध संघटनांनी विरोध होत आहे.


शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणाऱ्या शाळांची नोंदणी प्रक्रिया ६ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन सुरु केले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांना ६ ते १८ मार्च या कालावधीत नोंदणी करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पिंपरी विभागात ६६ आणि आकुर्डी विभागात ११५ अशा एकूण १८१ खाजगी शाळा आहेत. त्यापैकी किती शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणार हे पाहावे लागणार आहे. नोंदणी पूर्ण केल्यानंतरच पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत.

 

पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी देखील लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळेस देखील नवीन खासगी शाळांचा तीन वर्षांपर्यत आरटीई प्रवेश प्रक्रिया लगेच समावेश होणार नाही. या शाळांची शैक्षणिक तपासणी आणि पडताळणी पूर्ण केल्यानंतरच त्यांचा समावेश प्रक्रियेत करण्यात येणार आहे. शाळांनी नोंदणी अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागद पत्रांच्या तपासणीसाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. पडताळणी यशस्वी झाल्यावर प्रवेश घेता येईल. शाळेत कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी होणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

 

RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे (List of Documents For RTE Admission)

निवासी पुराव्यासाठी रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, भाडेकरार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची आवश्यकता आहे. शिक्षण विभागाकडून पत्त्याची पडताळणी करण्यात येईल. जन्म तारखेचा, उत्पन्नाचा पुरावा आणि दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

 


RTE Admission 2023 All the rounds of the RTE admission process have been completed in the month of August. However, 606 of the 4,062 seats in capacity remain vacant. Parents said it was the result of a delayed process; According to the education department, the seats remained vacant only because parents insisted on admission in certain schools. Under the Right to Free and Compulsory Education Act, 2009, children of parents belonging to economically weaker sections are admitted to 25 per cent seats in private schools. This year, the process for the academic year 2023-2024 started in January. His entry draw was drawn in March.

 

आरटीई प्रवेश प्रक्रियेतील सर्व फेऱ्यांची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात पूर्ण झाली आहे. परंतु, तरी देखील क्षमतेच्या ४ हजार ६२ पैकी ६०६ जागा रिक्त राहिल्या आहेत. विलंबाने होत असलेल्या प्रक्रियेचा हा परिणाम असल्याचे पालकांनी म्हटले आहे; तर ठराविक शाळांमध्येच पालकांचा प्रवेश हट्ट असल्यानेच जागा रिक्त राहिल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदा शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीची प्रक्रिया जानेवारीत सुरू करण्यात आली. तर त्याचा प्रवेशाचा ड्रॉ हा मार्चमध्ये काढण्यात आला होता.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ५४५ शाळा यंदा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरल्या असून, त्यांची प्रवेश क्षमता ४ हजार ६२ आहे. त्यापैकी ३ हजार ४५३ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. नियमित चार फेऱ्या आणि चार विशेष फेऱ्यानंतरही ६०६ जागा या रिक्त राहिल्या आहेत.दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत ठराविक शाळांकडे पालकांचा कल अधिक असतो. अशा काही नामांकित शाळांकडून प्रवेशासाठी पालकांची अडवणूक केली जाते. त्याअनुषंगाने यंदा खबरदारी म्हणून शाळांनी प्रवेशासाठी आडमुठेपणा केल्यास कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला होता.

त्यामुळे प्रवेश प्रक्रिया नियमानुसार झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. तर विद्यार्थ्याचे प्रतिक्षा यादीत नाव असताना प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने नाईलाजास्तव पालकांनी इतर शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेतल्याचे पालकांनी सांगितले.


The RTE admission process is currently underway and students who have qualified in the draw were given a deadline of May 8 to confirm their admission. But the admission process could not be completed even within this deadline. Only 1965 candidates were admitted within the given time limit.
Hence, the deadline was extended till May 15 to determine the remaining admissions. This deadline is Monday, While ending on May 15, now again for the third time due to lack of response and due to technical difficulties, the deadline has been extended till May 22 and since the draw, this is the third time extension for admission.

‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. मे महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आशा पालकांना होती. परंतु प्रत्यक्षात प्रवेशाची प्रक्रिया सुरु न झाल्याने आरटीई पात्रांची प्रवेश निश्चिती कधी करणार? अशी विचारणा पालक आता करू लागले आहेत. आता आरटीई प्रवेशासाठी २२ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

शहरातील स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित आणि खासगी कायम विनाअनुदानित शाळांतील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’ अंतर्गत मोफत शिक्षण दिले जाते. या वर्गातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, हा यामागे उद्देश आहे.

मागील महिन्यात उशिरा म्हणजे ५ एप्रिलला आरटीई सोडत काढण्यात आली आहे. तर १३ एप्रिलपासून बालकांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी सुरवात केली होती. त्यानुसार ५ मेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत दिली होती. मात्र, पहिल्या दिवसापासूनच आरटीईचे पोर्टल बंद पडल्याने पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यात अडचणी उद्भवत होत्या. परिणामी आरटीई अंतर्गत  प्रवेश घेता यावेत, यासाठी शिक्षण विभागाने ८ मेपर्यंत मुदत वाढवून दिली होती. त्यास पुन्हा १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, अनेक बालकांचे प्रवेश अद्यापही निश्चित झाले नाहीत. त्यामुळे आता आरटीई प्रवेशासाठी २२ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

वाढीव मुदतीतील दाखले ग्राह्य धरणार

याप्रकरणी कागदपत्रांची तपासणी करणे व प्रवेश निश्चितीकरीता २२ मेपर्यंतच्या वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात यावेत. तद्नंतर या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाला सुरवात होणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले


RTE Date Extend

RTE Admission 2023 New Update: The RTE admission lottery was announced on 5th April, after which the actual admission process started from 13th April. However, many parents faced difficulties in getting admission as RTE’s website was not working properly. The Directorate of Primary Primary Education has once again extended the deadline till May 15 for admission to 25 percent reserved seats of RTE admissions in private schools. Director of Education Sharad Gosavi has appealed to parents to take admission in term extension.

खाजगी शाळांतील आरटीई प्रवेशाच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदत वाढीत पालकांनी प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.

RTE प्रवेश संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरटीई प्रवेशाची लॉटरी ५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर प्रत्यक्षांत प्रवेशाची प्रक्रिया ही १३ एप्रिलपासून सुरू झाली. मात्र आरटीईचे संकेतस्थळ नीट चालत नसल्याने असंख्य पालकांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी आल्या होत्या. त्यामुळे शिक्षण संचालकांनी हे प्रवेश घेण्यासाठी सोमवारी, ८ मे पर्यंत मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही हजारो जागांवरील प्रवेश अद्यापही होऊ शकले नसल्याने पुन्हा एकदा १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

प्रवेशाची आकडेवारी

नोंदणीकृत शाळा ८८२३
एकूण जागा १०९८४६
आलेले अर्ज ३६४४१३
प्रवेश जाहीर ९४७०० – झालेले प्रवेश ४९९६६ –
रिक्त जागा : ५१८८०

यादरम्यान शाळांनी प्रलंबित प्रवेशाच्या तक्रारी, अपील अर्जाची , सुनावणी घेत त्यासाठीचे सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आदेशही संचालकांनी शाळांना दिले आहेत.

राज्यातील ८ हजार ८२३ शाळांमध्ये १ लाख १ हजार ८४६ आरटीई प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत ४९ हजार ९६६ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून उर्वरित तब्बल अर्ध्याहून अधिक म्हणजेच ५१ हजार ८८० जागांवर प्रवेश होऊ शकले नाहीत. त्यामुळे पालकांनी मुदतीत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले.

‘आरटीई’चे पर्यायी संकेतस्थळ : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

 

RTE Admission 2023

RTE Admission 2023 – The date for RTE admission has been extended and admissions can now be done till May 8. This letter of extension has been issued by Director of Primary Education 5 Sharad Goswami on Monday (24th). So now the parents have got the same relief. An online lottery was held on April 5 itself to provide 25 percent free admission to children from weaker sections under RTE. After that SMS was sent to the parents from 12th April. Due to this, the attention of all parents is towards mobile. 863 parents of Ashat district received ‘Good News’ through mobile SMS. The period for determining admission was given from 13th to 25th April. But since this period is short for admission, on Monday (24th), the deadline for admission has been extended to May 8.

 

आरटीई प्रवेशासाठी तारीख वाढविण्यात आली असून, ८ मेपर्यंत आता प्रवेश घेता येणार आहेत. मुदतवाढीचे हे पत्र प्राथमिक शिक्षण 5 संचालक शरद गोस्वामी यांनी सोमवारी (दि. २४) काढले आहे. त्यामुळे आता पालकांना तेवढाच दिलासा मिळाला आहे. आरटीईअंतर्गत दुर्बल घटकातील मुलांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी ५ एप्रिल रोजीच ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर १२ एप्रिलपासून पालकांना एसएमएस पाठविण्यात आले. यामुळे सर्वच पालकांचे लक्ष मोबाइलकडे लागून होते. अशात जिल्ह्यातील ८६३ पालकांना मोबाइल एसएमएसच्या माध्यमातून ‘गुड न्यूज’ मिळाली. प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी १३ ते २५ एप्रिलदरम्यान देण्यात आला होता. परंतु हा कालावधी प्रवेशासाठी अल्प असल्यामुळे सोमवारी (दि. २४) पत्र काढून प्रवेशाची मुदत वाढवून ८ मे देण्यात आली आहे.

या कालावधीत आरटीईअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या लोकांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी केले आहे. आता या पालकांना कागदपत्रांची पडताळणी करून मिळालेल्या शाळेत प्रत्यक्ष प्रवेश करावयाचा आहे. म्हणजेच, आता त्यांची प्रवेशासाठी लगबग वाढणार आहे.

शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा सक्तीचा अधिकार आणला आहे. याअंतर्गत गरजू-गरीब घटकातील मुलांनाही इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी २५ टक्के जागांचे आरक्षण करण्यात आले आहे. मात्र, यासाठी पालकांना अर्ज करावे लागत असून, लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यातील १३१ शाळांमध्ये ८६४ जागा आरक्षित असून, त्यासाठी ३९५९ अर्ज आले आहेत.
६२ प्रवेश झाले निश्चिंत संपूर्ण राज्यासाठी ५ एप्रिल रोजी लॉटरी काढण्यात आली. अशात पालक आपल्या मुलांचा नंबर लागतो की नाही, यासाठी एसए- मएस’ची वाट बघत होते. मात्र, हे एसएमएस १२ एप्रिलपासून पाठविण्यात आले आहे. जिल्ह्याला ८६४ जागा आरटीईअं- तर्गत भरावयाच्या असून, यातील ६२ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. आता मुदत वाढ झाल्याने पालकांना थोडा आधार मिळाला आहे. वेळेच्या आत आपल्या पाल्यांचे प्रवेश करता येईल.


RTE Admission 2023: The website for admission to 25 percent reserved seats under the Right to Education Act (RTE) is continuously being closed. Therefore, the primary education department has now made available an alternative website for the admission of children. According to RTE, 25 percent reserved seats are given to students from economically weaker and disadvantaged sections in private schools. Online admission process was implemented by the Primary Education Department for admission to these seats

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे संकेतस्थळ सातत्याने बंद पडत आहे. त्यामुळे बालकांच्या प्रवेशासाठी आता प्राथमिक शिक्षण विभागाने पर्यायी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. RTE प्रवेश संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या बालकांच्या अर्जातून ऑनलाइन सोडत काढण्यात आली. यामध्ये ९४ हजार ७०० बालकांची प्रवेश देण्यात आला. या निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना बुधवारपासून ‘एसएमएस’ जाण्यास सुरूवात झाली, परंतु दरम्यान आरटीई पोर्टलची तांत्रिक यंत्रणा कोलमडली.

 

पालकांमधील गोंधळाची दखल

आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या बालकांच्या प्रवेशासाठी बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून पालकांना एसएमएस जाण्यास सुरवात झाली. पण प्रवेशाचे संकेतस्थळ बंद पडल्याने आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की नाही, हे पालकांना संकेतस्थळावर पाहता येत नव्हते. परिणामी पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण झाले. त्याची दखल घेत अखेर शिक्षण विभागाने प्रवेशाची माहिती पाहण्यासाठी पर्यायी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.

पालकांसाठी सूचना…

  • प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर संबंधित पालकांना एसएमएस पाठविणार.
  • पालकांनी आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांकांची स्थिती तपासून पहावी.
  • प्रवेश मिळाल्याचा संदेश प्राप्त झाल्यावर अॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी
  • अॅलॉटमेंट लेटरवर पडताळणी समितीचा पत्ता असेल तेथे जाऊन आवश्यक कागदपत्रांची पू्र्तता व पडताळणी करून घ्यावी
  • त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून करून घ्यावी.
‘आरटीई’चे पर्यायी संकेतस्थळ : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

RTE Lottery Date 2023 – https://student.maharashtra.gov.in/

RTE Admission 2023 Another Link: RTE Lottery Date is published now. The candidates can check the lottery from this page. The link is given below. The lottery will be published on 5th April 2023. alternative link system has now been made available by the Education Department to apply for Free and Compulsory Education (RTE) admission process for children. It has been clarified through the education department that if there are any difficulties in filing the application from the link on the main portal, the parents can file the application from this link.

‘RTE’ प्रवेशासाठी प्राप्त अर्जांची सध्या पडताळणी सुरु आहे. काही दिवसात ते काम पूर्ण होईल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशाची लॉटरी काढली जाईल. त्यानंतर प्रवेश कितीजणांनी घेतले हे पाहून प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी दिली जाणार आहे.

 

प्रवेश निश्चित करण्यासाठी संबंधित शाळेत जाताना पालकांनी त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मुलाचे आधारकार्ड, अशी प्रवेश अर्जावेळी भरलेल्या माहितीनुसार सर्व कागदपत्रे घेऊन जावी लागतील. तसेच खुल्या प्रवर्गातील एसईबीसी प्रवर्गातील मुलांसाठी एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा पालकांचा उत्पन्न दाखला लागतो. दरम्यान, प्रवेश निश्चित झालेल्या म्हणजेच लॉटरीत नंबर लागलेल्या मुलांच्या पालकांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहेत.

 

RTE Lottery Date – RTE Admission 2023 @ student.maharashtra.gov.in

पुण्यात ६६ हजार अर्ज Pune RTE Admission 2023 
आरटीईअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९३६ शाळांमध्ये रिक्त असलेल्या १५ हजार ६५५ जागांसाठी ६६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. नाशिक ४,८५४ रिक्त जागांसाठी १८ हजार १३०, तर सातारा जिल्ह्यात १,८२१ जागांसाठी ३८२६ अर्ज आले आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

13 Comments
  1. Dheeraj Nai says

    How can I take my child admission in cbsc board mighaghar school Mulund East

  2. Dheeraj Nai says

    मी माझ्या मुलाचे प्रवेश सीबीएसई बोर्ड मधे कसा घेउ कृपया मला मदत करा मुळी चा वय ३ वर्षे ८ महिने झाल आहे

  3. MahaBharti says

    RTE New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड