त्वरा करा!, RTE अर्जासाठी आज शेवटचा दिवस; राज्यभरातून तीन लाख अर्ज प्राप्त! | RTE Admission 2023 @ student.maharashtra.gov.in
RTE Admission 2023
RTE Admission 2023 – https://student.maharashtra.gov.in/
RTE Admission 2023 Another Link: An alternative link system has now been made available by the Education Department to apply for Free and Compulsory Education (RTE) admission process for children. It has been clarified through the education department that if there are any difficulties in filing the application from the link on the main portal, the parents can file the application from this link.
शिक्षणाचा हक्क कायदा आरटीई अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये माेफत प्रवेशासासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. पालकांना आज दुपारी बारापर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्यभरात दि. १६ मार्च अखेर रिक्त जागांच्या तिप्पट म्हणजे ३ लाख ५ हजार अर्ज प्राप्त अर्ज प्राप्त झाले हाेते. आरटीईअंतर्गत रिक्त जागांवर प्रवेशासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास दि. १ मार्च राेजी सुरुवात झाली. त्यानंतर पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साेळा दिवसांत राज्यभरातून तीन लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील ८ हजार ८२८ खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये १ लाख १ हजार ९६९ जागा रिक्त आहेत.
पुण्यात ६६ हजार अर्ज Pune RTE Admission 2023
आरटीईअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९३६ शाळांमध्ये रिक्त असलेल्या १५ हजार ६५५ जागांसाठी ६६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. नाशिक ४,८५४ रिक्त जागांसाठी १८ हजार १३०, तर सातारा जिल्ह्यात १,८२१ जागांसाठी ३८२६ अर्ज आले आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लवकरच लाॅटरीची तारीख जाहीर हाेणार RTE Lottery Result 2023
ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर ऑनलाइन साेडत लाॅटरी काढण्याकरिता तारीख निश्चित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व रिक्त जागांसाठी एकाच टप्प्यात लाॅटरी काढून शाळांमध्ये आरटीई अंतर्गत रिक्त जागांएवढी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. लाॅटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार आहे.
बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण (आरटीई) प्रवेशप्रक्रियेत अर्ज दाखल करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आता पर्यायी लिंकची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्य पोर्टलवरील लिंकवरून अर्ज दाखल करण्यात अडचणी येत असल्यास पालकांना या लिंकवरून अर्ज दाखल करता येणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
RTE प्रवेश संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी पालकांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली होती. त्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत असून, राज्यभरातून या प्रवेशप्रक्रियेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दहा दिवसांतच या प्रवेशांसाठी राज्यभरातून एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी दोन लाखांवर प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत.
✅2023 RTE प्रवेशासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्र – RTE Admission 2023 Documents list
राज्यभरातून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे मूळ पोर्टलवरील अर्ज दाखल करण्याच्या student.maharashtra.gov.in लिंकला अनेक समस्या येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन साइट संथ असल्यास पुन्हा अर्ज भरण्याचा प्रयत्न करण्याची सूचनाही शिक्षण विभागामार्फत देण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांत समस्या अधिकच वाढल्याने अनेक पालकांनी पैसे खर्च करून इंटरनेट कॅफेमध्ये अर्ज भरण्यास प्राधान्य दिले.
या समस्यांमुळे वैतागलेल्या पालकांनी ही सुविधा सुरळीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरटीई प्रवेश अर्जांसाठी rte25admission.maharashtra.gov.in ही पर्यायी लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे. १७ मार्चला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पालकांना मूळ पोर्टल किंवा नव्याने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर अर्ज दाखल करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज कुठे करणार?
यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 827 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 926 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांबाबतची माहिती https://student.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
…तर अर्ज बाद होणार
प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरीसाठी अर्ज विचारात घेतला जावा यासाठी अनेक पालक एकापेक्षा अधिक अर्ज भारतात. मात्र, यंदापासून एकहून अधिक अर्ज भरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
लॉटरी कधी निघणार?
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. 25 टक्के आरक्षणातंर्गत जागांसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. शाळेतील जागांनुसार प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येईल. लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रे घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
आरटीईसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे
आरटीईसाठी अर्ज निवासी पुराव्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यातील एका पुरावा ग्राह्य धरता येण्यार आहे. या शिवाय जन्मतारखेचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असल्याचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा, अनाथ बालकांची आवश्यक प्रमाणपत्रे, विधवा/ घटस्फोटीत महिला असल्याचा पुरावा अशी विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या वेळी पालकांना सादर करावी लागणार आहेत.
RTE Admission 2023 – 24 @ student.maharashtra.gov.in
Under the Right to Education Act, 25 percent of the seats in private primary schools are provided to children from the economically weaker and disadvantaged sections for free education from 1st to 8th. RTE online admission process has started from today. Last date for online applications is March 17. In this year’s RTE admission process, 1 lakh 1 thousand 926 seats are available for admission in 8 thousand 827 schools. Last date for online applications is March 17. In this year’s RTE admission process, 1 lakh 1 thousand 926 seats are available for admission in 8 thousand 827 schools.
दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवर ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशप्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली असून, १७ मार्चपर्यंत पालकांना आररटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतील. स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित व खासगी कायम विनाअनुदानित ५४६ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये एकूण ४ हजार ६९ जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या जागा थोड्या कमी झाल्या आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले होते. शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, आता मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना १ ते १७ मार्च या कालावधीत अर्ज करण्याची मुदत आहे. आपल्या पाल्याचा या राखीव जागेवर नंबर लागलाच पाहिजे, यासाठी पालक एकापेक्षा अधिक अर्ज भरतात. मात्र, यंदापासून एकाच नावासाठी अधिक अर्ज भरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
RTE प्रवेश संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मोफत प्रवेशाच्या चार हजार जागा
RTE अंतर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ५४६ शाळांमध्ये ४ हजार ६९ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
१७ मार्चपर्यंत मुदत
मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना १ ते १७ मार्च या कालावधीत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.
कोणाला मिळतो मोफत प्रवेश ?
वंचित घटकात अनुसूचित जाती, अनु. जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी, विशेष मागासप्रवर्ग तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला असून, हे विद्यार्थी मोफत प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. केवळ जातीच्या दाखल्याच्या आधारावर या गटातून प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करता येतो. याशिवाय दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी असावे. कोरोनामध्ये पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवेश मिळणार आहे.
काय कागदपत्रे लागतात ?
– रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल आदी.
– आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
– आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचे उत्पन्नाचा दाखला.
– विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला.
– विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला.
मुदतवाढ मिळणार नाही
आरटीईअंतर्गत १ मार्चपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. १७ मार्चपर्यंत पालकांना आपल्या पाल्याच्या मोफत प्रवेशासाठी अर्ज करता येतील. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही.
– जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी
राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागा ठेवून त्यावर आरटीईचे प्रवेश केले जातात. त्यामध्ये मागास, आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्यांक समाजातील घटकांना प्रवेश दिले जातात. बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया बुधवारी १ मार्चपासून सुरू केली जाणार आहे.
या प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मागील काही दिवसात राज्यातील शाळांची नोंदणी पूर्ण केली आहे. त्या नोंदणीनुसार यंदा राज्यात ८ हजार १३० शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून या शाळांमध्ये तब्बल एक लाखाहून अधिक आरटीई च्या जागा उपलब्ध आहेत.
या जागांवर प्रवेश करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनांकडून बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेची जिल्हा व शाळा निहाय माहिती संचालनालयाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex/language:jpn या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षण विभागाकडून सूचना आल्यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरवात होईल, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. यंदाची प्रवेशप्रक्रिया साधारण २० फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र, सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आरटीई प्रवेशप्रक्रिया ही सरकारी योजना असून, याद्वारे मुलांना मोफत प्रवेश मिळतो.
त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांचे आधारकार्ड लागण्याची शक्यता आहे. मात्र, मुलांकडे आधारकार्ड नसल्यास ते प्रवेशप्रक्रियेपासून वंचित राहू शकतात. या पार्श्वभूमीवर मुलांकडे आधारकार्ड नसल्यास प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल का, आधारकार्ड काढताना मिळणाऱ्या पावतीवर प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल का, अशा काही शंकांबाबत शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. आरटीई प्रवेशांसाठीची शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थी नोंदणी कधी सुरु होणार याकडे पालकांचे लक्ष लागले होते. प्रवेशासाठी मुलाचे आधार कार्ड स्वीकारण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात आल्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पालकांना 1 ते 17 मार्च या कालावधीत अर्ज करता येईल.
RTE Admission 2023 – Registration of schools for RTE has started. Under the Right to Education Act (RTE), 25 per cent seats are reserved for children from economically and socially disadvantaged sections of the school, with the aim of ensuring that everyone has the right to education student.maharashtra.gov.in. Students are given free admission to these seats. The Director of Primary Education Sharad Gosavi has ordered through a circular that it is mandatory to register for the RTE 25 percent admission process for the academic year 2023-24 from January 23 to February 3 by the School Education Department. According to RTE, 25 percent seats are reserved for admission of students from disadvantaged and weaker sections in private unaided schools. As every year for the academic year 2023-24, central online admission process is implemented to admit students on 25 percent reserved seats in private schools. In the first phase of this process, schools are being registered and this process will start from January 23. Gosavi has also clarified that no extension will be given for school registration.
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आधारकार्ड नसल्यास प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, आधार कार्ड काढताना मिळणाऱ्या पावतीवर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवले आले आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून सूचना आल्यावर दोन दिवसांत विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.
आरटीईअंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र, सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया ही सरकारी योजना आहे. आरटीई प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यास ते प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात. या पार्श्वभूमीवर मुलांकडे आधारकार्ड नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, आधारकार्ड काढताना मिळणाऱ्या पावतीवर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, याबाबत शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. त्याबाबत दोन दिवसांत सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसांत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. आरटीई प्रवेशांबाबतची माहितीखालील लिंक वर देण्यात आली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या शाळांवर कारवाई
आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्यातील शाळांची नोंदणी जवळपास पूर्ण झाली आहे. प्रवेश प्रक्रियेत जाणीवपूर्वक समाविष्ट न होणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काही शाळांना स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात येत असल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले. आरटीई संकेतस्थळावरील माहितीनुसार, आठ हजार ८२० शाळांनी नोंदणी पूर्ण केली आहे. त्याद्वारे १ लाख १ हजार ८८१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.
मागील अपडेट :
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, पालकांसाठीची नोंदणी प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.
‘आरटीई’ प्रवेशाच्या प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्याची संधी मिळते. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा पालकांना होती. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांना १० फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. गेल्या वर्षी ५७५ शाळांमध्ये प्रवेश देण्यात आले होते. यंदा ५४५ शाळांनीच नोंदणी केली आहे.
शाळांचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर २० फेब्रुवारीपासून पालकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, कोरोनाकाळात कमी पटसंख्येमुळे ३० शाळा बंद करण्यात आल्या आहेत. काही शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याने त्या ‘RTE Admission 2023 – 2024’ प्रवेश प्रक्रियेत नाहीत. अशा एकूण ३० शाळा या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
RTE Admission 2023-24
RTE म्हणजेच शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराअंतर्गत कोणत्याही प्रवर्गातील पालकांना आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. सरकार कडून हि खास शिक्षणाच्या अधिकारातली योजना आहे. सर्वाना शिक्षकानं मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे.
Name of the Registration | Maharashtra RTE Admission |
Authority | School Education and Sports Department, Maharashtra |
State | Maharashtra |
Year | 2023-24 |
Act | Right To Education or RTE |
Purpose | Free School Education to Underprivileged Students in Private Schools |
Beneficiaries | Underprivileged students up to Class 8 |
Reservation | 25% |
Academic Session | 2023-2024 |
Application Mode | Online |
Application Started | 20 February 2023 |
Last Date to Apply | March 2023 |
Selection Procedure | Lottery पद्धती |
List Documents for RTE Admission 2023 – अर्जासाठी कागदपत्रं
List of Documents For RTE Admission are given below.
RTE प्रवेश प्रकीरियेत सहभागी होण्यासाठी आपण खालील डॉक्युमेंट्सची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- ओळखीचा पुरावा म्हणून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आवश्यक आहे.
- पालकांच्या पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, लाईट बिल,पाण्याचे बील इत्यादी कागदपत्र वापरू शकतात
- आरक्षित संवर्गातून अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे
- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांचे 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याचे जन्म दाखला असणे आवश्यक आहे
- विद्यार्थी अपंग असल्यास अपंग असल्याचा पुरावा
20 फेब्रुवारी 2023 पासून RTE प्रवेश सुरु होण्याची अपेक्षा आहे. पुढील सर्व अपडेट्स साठी महाभ्रतीला भेट देत रहा.
Age Criteria, Limit For RTE Admission 2023 Maharashtra
‘आरटीई’ अंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसह आठ ते १४ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही याच घटकातून खासगी शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट
नाही. केवळ जातीच्या दाखल्यावर प्रवेश अर्ज करता येतो. दुर्बल घटकासाठी मात्र आर्थिक उत्पन्नाची अट आहे. यात वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे. दिव्यांगांना जिल्हा शल्यचिकित्सक तथा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांकडील ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. आरटीई मोफत प्रवेश अर्ज करण्यासाठी ही सर्व कागदपत्रे लागतात, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.
प्रवेशासाठी अर्ज
ऑनलाइन अर्जासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/ users/rteindex या शासकीय वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अॅप्लिकेशन नावाचा पर्याय दिसेल. त्या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून अर्ज करावा. अर्ज भरण्यासंदर्भातील माहितीसाठी होम पेजवर एक व्हिडिओ तसेच मार्गदर्शक सूचना असतात. प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, निवासाचा पुरावा (रेशनकार्ड, आधार तथा मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, टेलिफोन बिल, टॅक्स पावती, ड्रायव्हिंग लायसन) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म दाखला उत्पन्न, जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे
प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
- निवासाचा पुरावा (रेशनकार्ड, आधार तथा मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बॅंकेचे पासबुक, टेलिफोन बिल, टॅक्स पावती, ड्रायव्हिंग लायसन)
- प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म दाखला
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
RTE Admission 2023 district wise Maharashtra
District | RTE Schools | RTE Vacancy |
Ahmadnagar | 364 | 2825 |
Akola | 190 | 1946 |
Amravati | 236 | 2305 |
Aurangabad | 546 | 4069 |
Bhandara | 89 | 763 |
Bid | 225 | 1827 |
Buldana | 227 | 2246 |
Chandrapur | 186 | 1503 |
Dhule | 93 | 1006 |
Gadchiroli | 66 | 462 |
Gondiya | 131 | 864 |
Hingoli | 75 | 539 |
Jalgaon | 282 | 3122 |
Jalna | 284 | 2273 |
Kolhapur | 325 | 3270 |
Latur | 200 | 1669 |
Mumbai | 272 | 5202 |
Mumbai | 65 | 1367 |
Nagpur | 653 | 6577 |
Nanded | 232 | 2251 |
Nandurbar | 45 | 340 |
Nashik | 401 | 4854 |
Osmanabad | 107 | 877 |
Palghar | 266 | 5483 |
Parbhani | 155 | 1056 |
Pune | 936 | 15688 |
Raigarh | 264 | 4256 |
Ratnagiri | 92 | 929 |
Sangli | 226 | 1886 |
Satara | 211 | 1712 |
Sindhudurg | 49 | 287 |
Solapur | 295 | 2320 |
Thane | 628 | 12270 |
Wardha | 111 | 1111 |
Washim | 99 | 786 |
Yavatmal | 194 | 1940 |
Total | 8820 | 101881 |
RTE Admission 2023 Online Application @ student.maharashtra.gov.in
RTE Admission 2023: The latest update for RTE Admission 2023. As per the latest news, Out of the total number of RTE seats in Nagpur district for students from economically weaker sections, two thousand seats are vacant. Further details are as follows:-
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरटीईच्या नागपूर जिल्ह्यातील एकूण जागांपैकी दोन हजार जागा शिल्लक राहिल्या आहेत. गेले काही महिने आरटीईची प्रक्रिया राबविल्यानंतरही या जागा भरल्या गेल्या नाहीत.
- नागपूर जिल्ह्यात ६६३ शाळांनी आरटीईअंतर्गत नोंदणी केली आहे.
- या शाळांमधील ६ हजार १८६ शाळा या आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
- या जागांवर प्रवेश घेण्यासाठी एकूण ३१ हजार ४११ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले होते.
- या अर्जांची पडताळणी शिक्षण विभागाद्वारे करण्यात आली.
- या पडताळणीनंतर ६ हजार १०६ विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी निवड झाली.
- विद्यार्थ्यांना त्यासंदर्भात मोबाइल संदेशही पाठविण्यात आले.
- या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेश फेऱ्या राबविण्यात आल्या.
- या प्रवेश फेऱ्यांतून आजवर केवळ ४ हजार १३३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.
- याचा अर्थ उर्वरीत २ हजार ५३ जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.
अर्जप्रक्रियेदरम्यान, ३१ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात जागा रिकाम्या राहिल्या आहेत. राज्यातही एक लाखांहून अधिक जागांसाठी २ लाख ८२ हजार अर्ज आले होते. त्यासाठी ९० हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यातही ६२ हजार ६४९ विद्यार्थ्यांनीच आपले प्रवेश निश्चित केले आहेत. पसंतीच्या शाळा न मिळणे, अर्ज फेटाळले जाणे, अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांनी आरटीई प्रक्रियेद्वारे प्रवेश न घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Previous Update –
RTE प्रवेशफेरी नवीन अपडेट!!
RTE Admission 2022: Confusion About Right To Education Round. After the admissions in the selection list, four rounds of admissions in the waiting list for ‘RTE’ were conducted. Further details are as follows:-
निवड यादीतील प्रवेशांनंतर ‘आरटीई’साठी प्रतीक्षा यादीतील प्रवेशाच्या चार फेऱ्या राबविण्यात आल्या. वेळोवेळी त्याची सूचना जिप. शिक्षण विभागाला देण्यात आली होती. परंतु, सध्या या प्रक्रियेबद्दल शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनाही कोणतीच माहिती नाही. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी पाचवी फेरी राबविली जाणार की, प्रवेश प्रक्रियाच संपली याबाबत या अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम आहे.
- एक नियमित आणि तीन प्रतीक्षा यादीतील फेऱ्यांनंतर मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकारांतर्गतची (Right to Education, RTE) प्रवेश प्रक्रियाच संभ्रमात सापडली आहे.
- प्रवेश संपले की, पाचवी प्रवेश फेरीही होणार याबद्दल कोणतीही माहिती जि.प.शिक्षण विभागाला नसून, जिल्हा शिक्षण विभागही वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे.
- शालेय शिक्षण विभागामार्फत फेब्रुवारी महिन्यापासून ‘आरटीई’साठी प्रवेासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
- संपूर्ण राज्यभरात यंदा या प्रक्रियेला दहा वर्षांतील विक्रमी प्रतिसाद मिळाला.
- ४ एप्रिलला लॉटरी प्रक्रिया पार पडल्यानंतर ५ एप्रिलपासून निवड यादीतील विद्यार्थ्यांना या २५ टक्के मोफत जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
- निवड यादीवेळीच शिक्षण संचालनालयामार्फत प्रतीक्षा यादीही तयार करण्यात आली होती.
निवड यादीतील प्रवेशांनंतर ‘आरटीई’साठी प्रतीक्षा यादीतील प्रवेशाच्या चार फेऱ्या राबविण्यात आल्या. वेळोवेळी त्याची सूचना जिप. शिक्षण विभागाला देण्यात आली होती. परंतु, सध्या या प्रक्रियेबद्दल शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनाही कोणतीच माहिती नाही. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी पाचवी फेरी राबविली जाणार की, प्रवेश प्रक्रियाच संपली याबाबत या अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम आहे.
-
- प्रतीक्षा यादीतील चौथ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली होती.
नवीन अपडेट – RTE प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीअखेर – शाळांच्या नोंदणीला सुरुवात ! | RTE Admission 2023
- यावेळीही या प्रवेशांना अत्यल्प प्रतिसाद होता.
- त्यानंतर आठवडा उलटला तरी ‘आरटीई’च्या वेबसाईटवर या प्रवेशांबाबतची कोणतीही अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
- जिप शिक्षण विभाग केवळ वरीष्ठ कार्यालयाच्या आदेशाच्या सूचनेची वाट पाहत असून, त्यांनीही याबाबत स्वत:हून चौकशी करण्याची तसदी घेतलेली नाही.
- सध्या नाशिक जिल्ह्यात ‘आरटीई’चे ३ हजार ९६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, ९६३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही बाकी आहेत.
- एक महिन्यापूर्वी मी प्राथमिक शिक्षण विभागाचा शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला.
- या महिनाभरात तरी ‘आरटीई’च्या नवीन फेरीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
- संबंधित अधिकारी ते काम पाहत आहेत.
- शिक्षण विभागाकडून आदेश आल्यानंतरच प्रवेश फेरी आहे की नाही ते समजेल अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी दिली.
New Information…
RTE Admission 2023 – 24 @ student.maharashtra.gov.in
Rameshwar Naik
Mala fakt admission chi Parikh kdwa
Age limit